Home Uncategorized साईभक्त वॉरियरने पटकावले सानपाडा प्रिमियर लिग २०२१ चे विजेतेपद

साईभक्त वॉरियरने पटकावले सानपाडा प्रिमियर लिग २०२१ चे विजेतेपद

0 189

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३

Navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई : सानपाडा सेक्टर ७ मधील सिताराम मास्तर उद्यानात गेले दोन दिवस रंगलेल्या सानपाडा प्रिमियर लिग २०२१ या फुटबॉल स्पर्धेत  समाजसेवक पांडुरंग  आमले यांच्या साईभक्त वॉरियर्सने अंतिम सामन्यात राजेश ठाकूर यांच्या टेन फायटर्सचा १-० असा पराभव करत स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.

शनिवार व रविवार असे दोन दिवस सानपाड्यातील सर्वपक्षीय राजकारण्यांच्या प्रायोजकतेमधून सानपाडा प्रिमियर लिग -२०२१ या फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत सानपाड्यातील प्रत्येक प्रभागातील दोन  असे पाच प्रभागातील दहा संघ सहभागी झाले होते. स्पर्धेचे विजेतेपद मिळविणाऱ्या साईभक्त वॉरियर्स संघाला १५ हजार रूपये रोख पारितोषिक व भव्य ट्राफी देवून सन्मानित करण्यात आले. स्पर्धेतील उपविजेत्याला टेन फायटर्स संघाला ८ हजार रूपये रोख पारितोषिक व  भव्य ट्राफी देवून गौरविण्यात आले. या स्पर्धेत सानपाड्यातील विविध राजकीय घटकांनी आपल्या मालकीचे संघ उतरविल्याने दोन  दिवस सानपाडावासियांना फुटबॉल स्पर्धेची मेजवानी मिळाली.

रविवारी सांयकाळी झालेल्या बक्षिस वितरण कार्यक्रमास शिवसेनेचे माजी नगरसेवक  सोमनाथ  (अण्णा) वासकर, माजी परिवहन समिती सदस्य विसाजी लोके, शिरीष पाटील, बाबाजी इंदोरे, भाजपाचे पांडुरंग आमले, राजेश ठाकूर, शैला पाटील, जगदीश पाटील, सुनील कुरकुटे, रमेश शेटे, विश्वास कणसे,  आज्ञा गव्हाणे, मंगल वाव्हळ आदी उपस्थित  होते.

NO COMMENTS

Leave a Reply