Home पनवेल

0 266

स्वयंम न्यूज ब्युरो : navimumbailive.com@gmail.com

पनवेल :  लोणावळा येथील सुनील वॅक्स म्युजियममध्ये श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजीराजे भोसले महाराज यांचे थेट १३ वे वंशज मा.खा. श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज यांचा मेणाचा पुतळा बनवून स्थापन करण्यात यावा अशी मागणी करणारे निवेदन राजे प्रतिष्ठानच्या मुंबई, नवी मुंबई, रायगड, ठाणे जिल्ह्याच्या वतीने रायगड जिल्हा संघटक केवल महाडिक यांच्यामार्फत गुरुवारी देण्यात आले आहे. सुनील वॅक्स म्युजियममध्ये राष्ट्रपुरूषांसह क्रीडा, कला तसेच राजकीय क्षेत्रातील मान्यवरांचे ८९ पुतळे स्थापन करण्यात आले आहेत. मात्र अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजीराजे भोसले महाराज यांचे थेट १३ वे वंशज मा.खा. श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज यांचा मेणाचा पुतळा याठिकाणी उपलब्ध नव्हता. ही बाब संस्थेच्या लक्षात आल्यामुळे मा.खा. श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज यांच्या मेणाच्या पुतळ्याचा समावेश वॅक्स म्युजियममध्ये करून तमाम शिवप्रेमींची इच्छा प्रत्यक्षात अंमलात आणण्याची मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी सुनील वॅक्स म्युजियमचे मालक श्री.सुनील यांनी आपण लवकरच पुतळा बनवून तो याठिकाणी म्युझियममध्ये ठेवणार असल्याचे आश्वासन देऊन तमाम पदाधिकाऱ्यांना आनंदाचा धक्का दिला. यावेळी येत्या महिन्याभरामध्ये श्रीमंत छत्रपती खा.उदयनराजे भोसले महाराज यांचा मेणाचा पुतळा याठिकाणी बनवून नागरिकांना तो पाहता येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. 
             यावेळी राजे प्रतीष्ठानचे मुंबई संघटक प्रमुख चंद्रकांत धडके उर्फ मामा, मुंबई अध्यक्ष प्रकाश कोळी, रायगड जिल्हा संघटक केवल महाडिक, रायगड जिल्हा अध्यक्ष शिवाजी कराळे, कर्जत खालापूर विधानसभेचे अध्यक्ष निवृत्ती सावंत, उपाध्यक्ष दत्ता पालकर, सचिव प्रकाश तुपे, कार्याध्यक्ष कृष्णा लबडे, पनवेल तालुका अध्यक्ष राज भंडारी, नवी मुंबई अध्यक्ष संदीप बागडे, उपाध्यक्ष अजय साळुंखे, धारावी विधानसभा अध्यक्ष सचिन लोखंडे, विशाल कटके, अशोक पुजारी, ईशान्य मुंबई जिल्हाध्यक्ष अनिल उम्राटकर, विकी राणे, प्रीतम सुमबे, योगेश दाभाडे, कुमार चौहान, दीपक साने, विकी भाटे, रोहित गोवलकर, प्रवीण जाधव, प्रणित महाडिक, सिद्धेश भांडूगळे आदींसह राजे प्रतिष्ठानचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.    

0 660
स्वयंम न्यूज ब्युरो : navimumbailive.com@gmail.com
जिल्हाध्यक्ष माणिकराव जगताप यांनी केली नियुक्ती 
 पनवेल :  कॉंग्रसच्या विचारांची पताका अखंडपणे फडकत ठेवणारे रायगड जिल्हा विचार सेलचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांच्यावर रायगड जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष माणिकराव जगताप यांनी नवी जबाबदारी सोपवली आहे. रायगड  जिल्हा कॉंग्रेसच्या उपाध्यक्षपदी कडू यांची निवड केल्याचे पत्र त्यांना दिले आहे. तशी घोषणा अलिबाग येथील भव्य कार्यकर्ता मेळाव्यातूनही त्यांनी केली.
 कवी, पत्रकार सामाजिक कार्यकर्ते, उत्तम वक्ते, सांस्कृतिक क्षेत्रातील भरीव कामगिरी आणि नागरिकांच्या पायाभूत समस्यांसाठी केलेली आंदोलने तसेच त्यांच्यातील नेतृत्व गुण हेरून माणिकराव जगताप यांनी कांतीलाल कडू यांची वर्णी रायगड जिल्हा कॉंग्रेसच्या उपाध्यक्षपदी लावली आहे.
 कडू यांची साहित्य क्षेत्रातील कामगिरी पाहता उत्कृष्ट अशी चार पुस्तके प्रकाशित झाली आहेत. पाचवे पुस्तक लवकरच प्रकाशित होणार आहे. नाट्य, सांस्कृतिक क्षेत्रात तर त्यांनी मैलाचा दगड पार करून पनवेल तालुक्यातील रसिकांना अविट गोडीच्या अनेक कलाकृती सहज आणि निशुल्क उपलब्ध करून दिल्याने अल्पावधीत कडू यांची कीर्ती गगनाला गवसणी घालण्यास सिद्ध झाली आहे.
 पाणी प्रश्‍न, अतिक्रमण, रस्ते, आयटीआय, वीज पुरवठा, जलप्रदूषण ते सामान्यांना पायाभूत सुविधांसाठी थेट प्रस्थापित राजकीय नेत्यांसह प्रशासनाशी दोन हात करून सामन्यांसाठी आंदोलन करणारे निर्भीड नेतृत्व म्हणून कडू नावारूपास आले आहेत. 
 पनवेल आणि परिसरात रिक्षा संघटना उभारून प्रवासी आणि रिक्षा चालक यांच्यात सेवेचा सेतू त्यांनी उभारला असल्यानेच ते अधिक लोकप्रिय ठरत आहेत.
 आपल्या शब्द अस्त्राने अनेकांना घायाळ करून समाजहिता आड येणार्‍या प्रत्येकाला उलटे आकडे मोजायला लावणारे जहाल मतवादी पत्रकारितेतून त्यांनी पत्रकारिता क्षेत्राला नवा आयाम दिला आहे. अतिशय परखड मतांचे पुरस्कर्ते पत्रकार म्हणून त्यांची ख्याती असून लिखाणाचा एक वेगळा बाज त्यांच्या पत्रकारितेतून डोकावत आहे. त्यांच्यातील संघटन कौशल्यामुळे त्यांची ही निवड करण्यात आली आहे.
 अलीकडे पनवेल महापालिकेचे कर्तव्यदक्ष आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांच्या बदलीविरोधात त्यांनी भाजपा शिवसेना वगळता सर्व पक्षांना समाविष्ट करून पनवेलला महापालिका क्षेत्रातील जनसामन्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी केलेले आंदोलन सत्ताधार्‍यांच्या जिव्हारी बसले आहे. पाणी प्रश्‍नावर आंदोलन छेडून पनवेलमध्ये त्यांच्या ताकदीचा एक इशारा देण्यात ते यशस्वी झाले आहेत.
 ज्येष्ठांसाठी मोफत आरोग्य शिबिरांचे आयोजन, रक्तदान तसेच तरुणांना व्यसनाधीनतेपासून अलिप्त ठेवण्यासाठी गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थावरील बंदीचे समर्थन करत तीची अधिक तीव्रतेने अंमलबजावणी व्हावी म्हणून सातत्याने प्रयत्नशील राहून अधिकार्‍यांना कार्यमग्न ठेवण्यात कडू यशस्वी झाले आहेत.
 डान्स बार विकृतीला पायबंद घालण्यासाठी समाज प्रबोधन आणि आंदोलनातून त्यांनी महाराष्ट्र सरकारचे लक्ष वेधले होते. डान्सबार विरोधी आधीसूचना काढण्यात यावी, अशी मागणी करून या प्रकरणाचे गांभिर्य त्यांनी अधोरेखित केले आहे.
 त्यांच्या चौकस कामांची दखल घेऊन अखिल भारतीय कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष खा. राहुल गांधी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष आ. बाळासाहेब थोरात यांच्या आदेशानुसार रायगड जिल्हा उपाध्यक्षपदी कांतीलाल कडू यांची निवड करण्यात येत असल्याचे जिल्हाध्यक्ष माणिकराव जगताप यांनी पत्रात म्हटले आहे.

0 292

स्वयंम न्यूज ब्युरो : navimumbailive.com@gmail.com

 पनवेल संघर्ष समितीच्या मागणीनुसार महापालिकेचा फिरला बुलडोझर
 
 पनवेल  ;  पनवेल शहर आणि तालुक्याच्या परिक्षेत्रात मोकळ्या जागांवर खासगी विकसक, भंगार माफिया आणि दुकानदारांनी अतिक्रमण करून भुखंड लाटण्याचा सपाटा लावला आहे. त्यामुळे गावे आणि शहरे बुडण्याच्या परिस्थितीत वाढ झाली आहे. कळंबोली ते तळोजे परिसरात केलेल्या अतिक्रमणावर आज कारवाई केल्याची माहिती महापालिका उपायुक्त जमिर लेंगरेकर यांनी दिली.
 पनवेल-मुंब्रा महामार्गावरील अतिक्रमणे हटविण्यासाठी तेथील माती, राडारोडा टाकलेल्या भरावासह वाढत्या बेकायदेशिर दुकानांची छायाचित्रे पनवेल संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी पनवेल महापालिकेचे उपायुक्त जमिर लेंगरेकर यांना सादर केली होती. वाढती अतिक्रमणे गाव आणि शहर बुडविण्यास धोकादायक ठरू शकतात, असे लेंगरेकर यांच्या निदर्शनास आणून दिले होते. 
 कर्मचार्‍यांच्या अपुर्‍या बळामुळे अतिक्रमण कारवाईत अडथळे येत असल्याचे गेल्याच आठवड्यात लेंगरेकर यांनी कडू यांना सांगितले होते. मात्र, परिस्थिती गंभीर असल्याने आणि उच्च न्यायालयाच्या आदेशाचे अवमान होत असल्याचे लेंगरेकर यांच्या लक्षात आणून देताच, त्यांनी आज पनवेल-मुब्रा मार्गावरील अतिक्रमणे काढून टाकण्याची कारवाई केली असल्याची माहिती कडू यांना दिली.
 पनवेल संघर्ष समितीने आतापर्यत शेकडो अतिक्रमणे तोडण्यासाठी महापालिका, सिडकोकडे पाठपुरावा केला होता. त्याला यश आले आहे. शिवाय अतिक्रमणे तोडल्याने नागरिकांच्या पायाभूत सुविधांवरील ताण कमी होत आहे.
 कालच कामोठ्यातील दूर्घटनेमुळे पदपथावरील अतिक्रमाणांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. पदपथावर कोणतेही अतिक्रमण असू नये, असे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. पादचार्‍यांना चालण्यासाठी मोकळी जागा राहावी, यासाठी पदपथ मोकळे ठेवण्याचे आदेश असताना कामोठे येथील पदपथावर छोट्या मोठ्या विके्रत्यांनी बस्तान बसविले आहे.
 यासंदर्भात लेंगरेकर यांच्याशी संपर्क साधून तिथेही महापालिकेचा बुलडोझर फिरवण्याची मागणी पनवेल संघर्ष समितीने आज केली असता, सिडकोने मेहरनजर ठेवून आरे दूध विक्रेत्यांचे लाड सुरू ठेवल्याची खंत व्यक्त केली. विशेष म्हणजे राजकीय नेत्यांनी त्यांच्या बगलबच्च्यांची उपजिविका सुरू राहावी म्हणून राजकीय दबावाने अनेक ठिकाणची पदपथे गिळंकृत केल्याने गंभीर प्रश्‍न उद्भवला असल्याची स्पष्टोक्ती त्यांनी दै. निर्भीड लेखशी बोलताना दिली.

0 212

पनवेल : वाढदिवस म्हटलं की आनंदाचा दिवस पण तो आनंद आपण दुसर्‍याच्या चेहर्‍यावर परावर्तीत करु शकलो तर व्दिगुणित होतो. आणि म्हणूनच वाढदिवशी सामाजिक उपक्रम राबवून आपल्या आनंदात सर्वांना सहभागी करुन घेण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे. अर्थातच यात केवळ माझेच श्रेय नाही तर माझे पती जगदिश घरत व अस्मिता कला क्रिडा सांस्कृतिक मंडळ व प्रियदर्शनी महिला मंडळाच्या पदाधिकारी व सदस्यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांच्या अथक परिश्रमाशिवाय हा कार्यक्रम होणे केवळ अशक्य असल्याचे प्रतिपादन नगरसेविका सुशिला घरत यांनी केले. त्यांच्या वाढदिवसा निमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव व ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार कार्यक्रमाचे आयोजन नवीन पनवेल येथील सिकेटी हायस्कुलमध्येे करण्यात आले होते, त्यावेळी त्या बोलत होत्या.
त्या पुढे म्हणाल्या की, भारत हा तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो आणि म्हणूनच त्यांना प्रोत्साहन देण्याचे काम आपण केले पाहिजे आणि म्हणूनच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करुन त्यांच्या पुढील वाटचालीसाठी प्रोत्साहित करण्याचे काम या ठिकाणी केले जात आहे. तरुणांचा देशाच्या जडणघडणीत महत्चाचे स्थान आहे. त्याचप्रमाणे ज्येष्ठांनी देशाला दिलेले योगदानही विसरता कामा नये. ज्येष्ठांचा आदर राखण्याची आपली परंपरा आहे. त्यामुळेच त्यांच्या अनुभवाला सलाम करण्यासाठीच त्यांचा सत्कारा या ठिकाणी करण्यात येत आहे. तरुणांचा जोश आणि ज्येष्ठांचे अनुभव यांचा संयम झाल्यास देशाची प्रगती आणखी वेगाने होईल आणि म्हणूनच या ठिकाणी जमलेल्या विद्यार्थ्यांना हेच सांगणे आहे की व्हॉटस अ‍ॅप आणि फेसबुकवर मिळणार्‍या ज्ञानापेक्षा आपल्या घरी असलेल्या ज्येष्ठांकडून ज्ञान घ्या. त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तरुण आणि ज्येष्ठ यामधला दुवा होण्याचा प्रयत्न पालकांनी करावयास हवा. आजचा तरुण भरकटत चालला आहे असे म्हटले जाते. परंतु तो एकटाच त्याला कारणीभूत आहे का? याचा विचारही होणे गरजेचे आहे. आजची पिढीही प्रचंड हुशार आहे. परंतु त्यांच्या हुशारीला योग्य वळणावर आणणे हे पालकांचे कर्तव्य आहे. आज येथे जमलेल्या विद्यार्थ्यांना माझे हेच सांगणे आहे की ज्येष्ठांचा आदर राखा त्यांच्या अनुभवाचा फायदा घ्या. मी येथे आवर्जून सांगू इच्छिते की, आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन लाभते ते आदरणीय लोकनेते आमचे प्रेरणास्थान रामशेठ ठाकूर यांच्या कडून. तसेच आमदार प्रशांत ठाकूर यांचेही प्रत्येक कार्यक्रमासाठी मोलाचे सहकार्य मिळते आणि ते नेहमीच समाजकार्यासाठी आम्हाला प्रेरणा देत असतात.
तरुण आणि ज्येष्ठ एकाच कार्यक्रमाला हजर राहण्याचा हा दुर्मिळ योग माइया वाढदिवसानिमित्त जुळून आल्याचा मला अभिमान वाटतो आणि त्यांच्यासमोर मला दोन शब्द बोलण्याची संधीही मिळाली हे मी माझे भाग्य समजते असे सांगत  वाढदिवसानिमित्त मला शुभेच्छा देण्यासाठी एवढया मोठया संख्येने उपस्थित राहिल्याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले. त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, वाय. टी. देशमुख, माजी नगराध्यक्ष चारुशीला घरत, पं. स. सदस्या रत्नप्रभा घरत, नगरसेविका वृषाली वाघमारे, दर्शना भोईर व सामाजिक कार्यकर्ते जगदीश घरत तसेच अन्य मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0 193

शरद पवारांची खंत, पनवेल संघर्ष समितीने दिले निवेदन
पनवेल : जेएनपीटी, सिडकोने स्थानिकांच्या प्रश्‍नावर सोयीस्कर भूमिका घेत पायाभूत सुविधांपासून वंचित ठेवले. स्थानिकांच्या जमिनी संपादन करताना करण्यात आलेल्या करारातील अटी, शर्तीचे उल्लंघन केले. तीन दशकाहून अधिक कालावधी लोटला, परंतु शेतकर्‍यांना मंजूर करण्यात आलेले साडेबारा, साडेबावीस टक्के भुखंडांची अंमलबजावणी झाली नाही, यावरून राज्य व केंद्र शासनाचे स्थानिकांविषयीचे उदासीन धोरण स्पष्ट होत असल्याची खंत माजी केंद्रिय मंत्री, राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली.
पनवेल संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू, महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील, संघर्षचे सचिव चंद्रकांत शिर्के आदींनी काल, गुरूवारी (ता. 13) पवार यांच्या मुंबई येथील सिल्वर ओक या निवासस्थानी भेट घेतली. एका निवेदनाद्वारे त्यांचे स्थानिकांच्या प्रश्‍नावर लक्ष वेधले असून जेएनपीटी व सिडकोच्या भुखंडांबाबत प्रलंबित प्रश्‍न तसेच सिडकोकडून खारघर, कळंबोली, नवीन पनवेल, कामोठे, तळोजे शहरांना पायाभूत सुविधा मिळण्यासाठी पनवेल संघर्ष समितीने शरद पवार यांना राज्य व केंद्र शासनाकडे मध्यस्ती करण्यासाठी साकडे घालणारे निवेदन सादर केले. त्यावेळी पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी पत्र्यव्यवहार करणार असल्याचे सांगितले. कॉंग्रेस आघाडीच्या काळात प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांना बर्‍या प्रमाणात न्याय मिळाला आहे. रखडलेले प्रश्‍न मार्गी लावण्याचे काम युती सरकारने करणे आवश्यक होते, पंरतू त्यांची मानसिकता दिसत नाही, असे पवार म्हणाले.
पवार कृषीमंत्री असताना केंद्रिय दळणवळण व भुपृष्ठ वाहतुक मंत्र्यांसोबत कृषी भवनात जेएनपीटीसंदर्भात बैठक बोलावली होती, यासंदर्भात कांतीलाल कडू यांनी आठवण करून दिली. तेव्हा प्रशांत पाटील यांनी सदरच्या बैठकीतील मुद्द्यांना स्पर्श करून त्यानंतर नितीन गडकरी यांच्या अखत्यारितीत जेएनपीटी आली, परंतु त्यांनी जाणीवपूर्वक दूर्लक्ष केले तर पंतप्रधान मोदींनी खोटे इरादेपत्र वाटप करून हुतात्म्यांची कु्ररचेष्टा केली असल्याचे पवारांच्या निदर्शनास आणून दिले.
जेएनपीटी, सिडकोच्या साडेबारा, साडेबावीस टक्के भुखंडाबाबत मला पुन्हा एकदा सविस्तर माहिती द्या, आपण संबंधित खात्याच्या मंत्र्यांसोबत बैठक घेऊन तो प्रश्‍न निकाली काढू, तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलून संघर्षच्या निवेदनातील विमानतळबाधितांच्या पूनर्वसनाचा प्रश्‍न, इतर शहरांसाठीच्या पायाभूत सुविधा आदींबाबत निर्णय घेण्यास भाग पाडू असे आश्‍वासन त्यांनी दिले.

0 338

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश गतिमान व डिजिटल : ना. रविंद्र चव्हाण 

राजेंद्र पाटील : ९९६७२८५६१८

पनवेल : आपला देश तरुणांचा देश आहे, त्या अनुषंगाने तरुण पिढीला सक्षम करण्यासाठी भाजप सरकार काम करीत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश गतिमान व डिजिटल होत आहे, असे प्रतिपादन  बंदरे, वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्रज्ञान, अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण राज्यमंत्री तथा रायगडचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी आज (दि. ०८) खांदा कॉलनी येथे केले. 

     लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त मल्हार रोजगार व सीकेटी महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने खांदा कॉलनी येथील सीकेटी महाविद्यालयात झालेल्या ‘भव्य रोजगार मेळावा २०१९’ चे उदघाटन पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झाले. त्यावेळी ना. चव्हाण बोलत होते.  सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या मेळाव्याला उमेदवारांनी तुफान प्रतिसाद दिला.

नामदार चव्हाण पुढे म्हणाले कि, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, क्रीडा आदी क्षेत्रात आदर्श काम करण्याबरोबरच तरुणांच्या हाताला काम मिळाले पाहिजे यासाठी लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर उल्लेखनीय कार्य करत आहेत. आज त्यांनी मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत.  त्याचा फायदा तरुणांना होणार आहे, त्यामुळे खऱ्या अर्थाने हा उपक्रम कौतुकास पात्र आहे. आपला देश कृषिप्रधान असला तरी देशाला सुजलाम सुफलाम बनविण्याची ताकद तरुणांमध्ये आहे, त्यामुळे त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विशेष लक्ष देऊन योजना आखल्या आहेत. स्किल इंडिया, स्टार्टअप इंडिया असे महत्वकांक्षी योजना देशाच्या प्रगतीत  हातभर लावत आहेत. या उद्देशातून रोजगाराची संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत आहे.  रोजगार, नोकरी करत असताना ‘मी नोकरी देणारा होणार’ हि मनात इच्छा आणि संकल्प करा असे सांगतानाच रोजगाराच्या संधी बरोबर शेतीसाठी संधी आहेत, त्यासाठी सरकारच्या प्रत्येक योजनेत सहभागी व्हा, असे आवाहनही त्यांनी केले.  सरकारी काम आणि थोडा वेळ थांब अशी परिस्थिती पूर्वीच्या सरकारची परिस्थिती होती, मात्र देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे झाल्यापासून सरकारी काम डिजिटलच्या दिशेने वाटचाल करून गतिमान झाले असल्याचा उल्लेखही नामदार रविंद्र चव्हाण यांनी यावेळी आवर्जून केला.

         लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात, आपण वर्षभर विविध समाजोपयोगी उपक्रम राबवितो. प्रत्येक दिवस कार्यक्रम असतात पण तरुणाच्या हाताला काम देणे हे सर्वात मोठे काम असल्याचे आवर्जून नमूद केले. शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, सहकार क्षेत्रात काम करताना रोजगार हा महत्वाचा प्रश्न असतो, तो या मेळाव्याच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे सोडविला जात आहे. तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे हि आपली नेहमीच धडपड असते, त्या अनुषंगाने सरकारने रोजगाराच्या दृष्टिकोनातून वेग पकडला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार धडाडीने काम करीत आहे व यामध्ये पालकमंत्री रविंद्र चव्हाण, सिडकोचे अध्यक्ष आमदार सक्रियतेने काम करीत असल्याचा उल्लेख करून तरुणांनी रोजगार, नोकरी करण्याबरोबरच समाजोपयोगी उपक्रमात सहभाग घेत राहावे, असा मार्गदर्शक सल्लाही लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी युवा पिढीला दिला. 

    सिडकोचे अध्यक्ष व मेळाव्याचे आयोजक आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपल्या भाषणात, कोणताही मोबदला न घेता गेल्या पाच वर्षांपासून सातत्याने रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येत असून हा १५ वा रोजगार मेळावा असल्याचे सांगून आजपर्यंत ७६८० जणांना या माध्यमातून रोजगार मिळाला असल्याचे सांगितले. देशातील तरुण सुसुक्षित आहेत, त्यांना रोजगार मिळाला पाहिजे यासाठी स्किल इंडिया कार्यक्रमावर भर देण्यात आला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केंद्रस्थानी मानून मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी यावेळी आवर्जून नमूद केले.  विमानतळ, जेएनपीटी एसईझेड व असे इतर प्रकल्प येथे कार्यन्वित होणार आहेत, त्यामुळे परिसराचा झपाट्याने विकास होऊन लाखाच्या संख्येने रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष लक्ष दिले आहे, त्या अनुषंगाने आपल्या शैक्षणिक कार्यक्षमतेच्या अनुरूप रोजगार मिळाला पाहिजे, यासाठी तरुणांनी जागरूक राहिले पाहिजे, असे सांगून त्यांनी मेळाव्यातील उमेदवारांना पुढील यशस्वी वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या. 

        मेळाव्याच्या उदघाटन सोहळ्यास मेळाव्याचे आयोजक व महापालिकेचे सभागृहनेते परेश ठाकूर, भाजपचे पनवेल शहराध्यक्ष जयंत पगडे, महापालिकेचे स्थायी समिती सभापती मनोहर म्हात्रे, महिला व बाल कल्याण सभापती लीना गरड, प्रभाग समिती सभापती संजय भोपी, नगरसेवक नितीन पाटील, एकनाथ गायकवाड, संतोष शेट्टी, अमर पाटील, नगरसेविका सीता पाटील, सुशिला घरत, कुसुम पाटील, वृषाली वाघमारे, राज्य परिषद सदस्य विनोद साबळे, जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, युवा मोर्चाचे महापालिका अध्यक्ष दिनेश खानावकर, प्राचार्य वसंत ब-हाटे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. 

    या मेळाव्यात शिक्षित-अशिक्षित, दहावी-बारावी उत्तीर्ण-अनुउत्तीर्ण, पदवीधर, अभियंता, व इतर अशा शैक्षणिक पात्रतेनुसार हजारो नोकऱ्यांच्या सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यात आल्या. मेळावा यशस्वी करण्यासाठी सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली सागर माने, ऍड. चेतन जाधव, चिन्मय समेळ, मयुरेश नेतकर, सीकेटी महाविद्यालय आणि सहकाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली. 

0 384

राजेंद्र पाटील

 पनवेल : रायगड बॉडी बिल्डर्स अँड फिटनेस असोसिएशन यांच्या वतीने आणि महाराष्ट्र बॉडी बिल्डर्स असोसिएशनच्या मान्यतेने डॉ. संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली रविवार दिनांक १० मार्च रोजी सायंकाळी ६. ३० वाजता कामोठे येथे ‘आमदार चषक रायगड श्री २०१९’ रायगड जिल्हा अजिंक्यपद शरीर सौष्ठव स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. 

           या स्पर्धेतून रायगड जिल्ह्याचा संघ निवडून १६ मार्चला बुलढाणा येथे होणाऱ्या ‘महाराष्ट्र श्री २०१९’ या स्पर्धेसाठी पात्र करण्यात येणार आहे.  कामोठे पोलीस ठाण्याजवळील मैदानात होणारी आमदार चषक स्पर्धा मेन फिजिक खुला, ५५, ६०, ६५, ७० किलो खालील आणि ७० किलोवरील खुला गट अशी होणार असून किताब विजेत्यास ५१ हजार रुपये, मनाचा पट्टा, चषक देण्यात येणार आहे.  बेस्ट पोझर, मोस्ट इम्प्रोमेन्ट तसेच विविध गटातील स्पर्धेतील विजेत्यांना रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे. त्याचबरोबर निवड झालेल्या स्पर्धकाला ट्रॅक सूट आणि सर्व सहभागी स्पधकाला चषक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. रायगड संघाचे प्रशिक्षक व जिल्हा सचिव दिनेश शेळके आणि जिल्हा कार्याध्यक्ष मारुती आडकर हे स्पर्धेची जय्यत तयारी करत आहेत. 

0 611

राजेंद्र पाटील

पनवेल : महाराष्ट्रातील पहिला महिला रिक्षा थांबा गतवर्षी नवीन पनवेल शहरातील डी मार्ट समोर सुरु कऱण्यात आला. शुक्रवार दिनांक ०८ मार्च रोजी महिला दिनानिमित्त या रिक्षा थांबायला एक वर्ष पूर्ण होत आहे. या संघटनेत त्यावेळी असणाऱ्या २० रिक्षांची संख्या आज ८५ च्या घरात पोहोचली असून त्या अनुषंगाने महिलांच्या संघटनेमार्फत शुक्रवारी (०८ मार्च ) सकाळी १० वाजता विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान सोहळ्याचे डी- मार्ट जवळील मैदानात करण्यात आलेले आहे.
या सोहळ्यास प्रमुख मान्यवर म्हणून सिडकोचे अध्यक्ष तथा भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार आमदार प्रशांत ठाकूर, पनवेलच्या महापौर डॉ.कविता चौतमोल, पालिकेचे आयुक्त गणेश देशमुख, प्रादेशिक परिवहन अधिकारी लक्ष्मण दराडे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील, पनवेलचे तहसीलदार अमित सानप, पालिकेचे उपायुक्त जमीर लेंगरेकर, लावणी सम्राट विजया पालव, महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध आगरी गायक जगदीश पाटील, आपला भगवा वृत्तपत्राच्या मुख्य संपादिका सारिका शिंदे यांच्यासह पनवेल, कळंबोली वाहतूक शाखेचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. यावेळी प्रथम वर्धापनदिनानिमित्त सर्व महिला रिक्षा चालकांमार्फत पर्यावरण, मुलगी वाचवा मुलगी शिकवा तसेच रस्ता सुरक्षा या विषयावर भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी महापौर डॉ. कविता चौतमोल, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील, सुप्रसिद्ध लावणी सम्राट सौ. विजया पालव, रायगड जिल्ह्यातील पहिली रिक्षा चालक महिला शालिनीताई गुरव, पनवेल फास्टच्या पत्रकार ऋतुजा महामुनी, दैनिक लोकसत्ताच्या प्रतिनिधी सिमा भोईर, नवी मुंबई आवाज वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधी श्वेता भोईर, आपला भगवा वृत्तपत्राच्या मुख्य संपादिका सारिका शिदे, निल हॉस्पिटलच्या डॉक्टर शुभदा निल यांच्यासह सर्व अबोली महिला रिक्षा चालकांचा सत्कार यावेळी करण्यात येणार आहे.
यावेळी राबविण्यात येणाऱ्या वर्षपूर्ती कार्यक्रमाचे आयोजक अबोली रिक्षा चालक मालक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा पत्रकार संतोष भगत, उपाध्यक्षा सौ.शालिनी गुरव, सचिव विलास मोरे, खजिनदार ललिता राऊत, अश्विनी शितोले, सीमा नरबळे, ज्योती पिसाळ, वर्षा धरणे, जयश्री देशमुख, रेश्मा प्र. सोनी, मनिषा लकड़े, माधुरी कोळी, मनिषा देशमुख, वर्षा राजगुडे, तेजल जाधव, अर्चना पवार, विध्या पालकर, कल्पना सरळे, आशा घालणे, अरुणा धस, रेश्मा सोनी, भारती निगडूसे, सुनिता जाधव, मंगल पाटील, भारती श्रीराम, स्वाती गावडे, सविता सरवदे, आशा तगड, वृशाली रोजगे, इंदुमती बगारे, रोहिणी राजदेव, सुगंधा धबे, अनिता पाटील, सुनिता पवार आदीं महिला उपस्थित राहणार आहेत. यावेळी कार्यक्रमासाठी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सौ. हेमांगीनी पाटील, सुशांक केणी, दैनिक लोकमतचे पत्रकार मयूर तांबडे यांचे विशेष सहकार्य लाभत असल्याचे संतोष भगत यांनी सांगितले. यावेळी संघटनेत सहभागी असलेल्या ८५ महिला रिक्षाचालकांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी सदगुरू ऑटो पनवेल यांच्याकडून या महिलांना अबोली ऍप्रॉन तसेच संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संतोष भगत यांच्या तर्फे सर्व महिलांना वैद्यकीय विम्याची (मेडिकल पॉलिसी) व्यवस्था करण्यात आली आहे.

0 484

राजेंद्र पाटील

पनवेल:  कळंबोली वसाहतीत नवीन जलवाहिन्या टाकणेमलनिःसारण वाहिन्यांची हायफ्लो सफाई आदी कामे हाती घेण्यात आले आहेत. त्याचबरोबर येत्या काही महिन्यात सिडकोकडून इतर दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहेत. त्यामध्ये रस्ते, उद्यान, पदपथ आणि इतर सुविधांचा समावेश आहे.

कळंबोली वसाहतीत अनेक नागरी समस्यांनी डोके वर काढले होते. या आगोदर सिडकोने दुर्लक्ष केल्याने प्रश्नांची सोडवणुक झाली नाही. त्यामुळे रहिवाशांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. त्याचबरोबर महानगरपालिका अस्त्तित्वात आल्यानंतर सिडकोने आखडता हात घेतला होता. आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडे सिडकोचे अध्यक्षपद आल्यानंतर त्यांनी लक्ष्य टाकले आणि कामांचे प्रस्ताव तयार झाले. त्याला मान्यता मिळून काही कामांना सुरूवात सुध्दा झाली. सिडको वसाहतीच्या हस्तांतरणाच्या हालचाली सुरू आहेत. मात्र नोडल एजन्सी असलेल्या सिडकोने सर्व पायाभूत सुविधा विकसीत तसेच सुस्थितीत करून दिल्याशिवाय कळंबोली नोड तरी वर्ग करण्यात येवू नये अशी मागणी भाजपाच्या नगरसेविका मोनिका महानवरप्रमिला पाटीलअमर पाटील तसेच शहराध्यक्ष रवीनाथ पाटीलप्रशांत रणवरे यांनी केली होती. याबाबत प्रशासनाकडे पत्रव्यवहार सुध्दा करण्यात आला होता. त्याची दखल सिडकोने घेतली आहे. त्याचबरोबर सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी उर्वरीत आणि प्रलंबीत कामांचा आढावा घेवून ते पूर्ण करून देण्याच्या सुचना अधिकाऱ्यांना दिल्या. त्यानुसार अधीक्षक अभियंता सिताराम रोकडे आणि कार्यकारी अभियंता गिरीष रघुवंशी यांनी आराखडा तयार करून तो प्रशासकिय मंजुरीकरीता वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवला आहे. मंजुरीनंतर एजन्सी नियुक्त करून कामाला सुरूवात करण्यात येणार आहे.

ही कामे होणार

उघडे असलेले पावसाळी गटारे झाकले जाणार. कळंबोलीतील उदयानांची दुरूस्थी करून त्याचे सुशोभिकरणरस्ते खड्डेमुक्त करून देणार. त्याचबरोबर कळंबोलीकरांच्या चालण्याकरीता पदपथांची दुरूस्ती करून दिली जाणार आहेत.

कोट-

कळंबोली वसाहतीतील सर्व दुरूस्थीचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यानुसार आम्ही सर्व्हे केला त्यानंतर इस्टिमेट तयार केले आहे. त्याला मंजुरी मिळाल्यानंतर लगेचच निविदा काढून प्रत्यक्ष कामाला सुरूवात केली जाईल. – गिरीष रघुवंशी, कार्यकारी अभियंता

कोट-

या कामांकरीता सिडकोकडे आम्ही वारंवार पाठपुरावा करीत होतो. मात्र आमदार प्रशांत ठाकूर सिडकोचे अध्यक्ष झाल्यानंतर प्रलंबीत कामांना वेग आला. कळंबोलीत कोटयावधी रूपयास विकास कामे हाती घेण्यात आले आहेत. कळंबोलीकरांनी खऱ्या अर्थाने दिलासा मिळण्यास सुरूवात झाली आहे. 

        – प्रशांत रणवरे, युवा कार्यकर्ते, भाजप-कळंबोली

0 317

राजेंद्र पाटील : ९९६७२८५६१८

पनवेल : पनवेल महानगरपालिका हद्दीतील भाजपच्या नगरसेवकांनी पाठपुरावा करून केलेल्या कामांचे श्रेय मिळवण्यासाठी शेकापकडून  पूर्वीच झालेल्या कामांचे भूमिपूजन करण्याचा केविलवाणा प्रयत्न करण्यात आला. आपला निधी कोठे वापरता येतो, याबाबतचे शेकापच्या नगरसेविकेचे अज्ञान यानिमित्ताने उघड झाले असल्याचे भाजपचे प्रवक्ते नगरसेवक प्रकाश बिनेदार यांनी म्हटले आहे.

पनवेल महापालिका हद्दीतील विकासकामाचा शुभारंभ माजी आणि आजी आमदारांच्या हस्ते करण्याचा घाट शेकापतर्फे घालण्यात आला. महापालिकेच्या प्रभाग ९ मधील ही कामे शेकाप नगरसेवकांच्या पाठपुराव्यामुळे होत असल्याचे सांगण्याचा हा केविलवाणा प्रयत्न करण्यात येत आहे. यामध्ये दाखवण्यात आलेली कामे प्रत्यक्षात भाजप नगरसेवकांच्या पाठपुराव्यामुळे झालेली आहेत. टेंभोडे गणेश विसर्जन घाट हा सप्टेंबरमध्ये गणेश उत्सवापूर्वीच पूर्ण झाला होता. त्या ठिकाणी या वर्षी सहा महिन्यांपूर्वी लोकांनी गणेश विसर्जनही केले. असे असताना या घाटाचे पुन्हा उद्घाटन करून आम्हीच काम केले दाखवण्याचा निंदनीय प्रयत्न केला जात आहे.

टेंभोडे स्ट्रीट लाईटसाठी भाजपचे नगरसेवक महादेव मधे यांनी २८ सप्टेंबर २०१७ रोजी पत्र दिले होते. हे कामही आम्हीच केले असे दाखवण्यासाठी त्या कामाचाही उद्घाटनामध्ये शेकापने समावेश केला आहे. नगरसेवक निधीची प्रत्येकी दोन-दोन कामे एकूण तीन लाख रुपयांची केली असताना भाजपच्या नगरसेवकांनी केलेली कामे आपणच केली असे दाखवताना प्रभाग समिती अध्यक्ष असलेले भाजपचे नगरसेवक एकनाथ गायकवाड आणि नगरसेवक महादेव मधे यांना न विचारताच त्यांची नावे या निमंत्रण पत्रिकेत छापण्यात आली असल्याचे सांगून प्रकाश बिनेदार यांनी लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल खोटे बोलणार्‍यांना गणपती बाप्पा शिक्षा करेल, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.