Home Uncategorized

0 43

नवी मुंबई : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून प्रभाग 82 व 84 या प्रभागातील नेरूळ सेक्टर 2,4 व जुईनगर नोडमधील महिलांसाठी निर्मला महिला मंडळाच्यावतीने आयोजित विविध उपक्रमांना महिला वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. नवी मुंबई जिल्हा काँग्रेसचे प्रवक्ते रवींद्र सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली व नवी मुंबई महिला जिल्हा काँग्रेसच्या सचिव विद्या भांडेकर व नेरूळ तालुका काँग्रेसच्या उपाध्यक्षा सौ. गौरी रवींद्र सावंत यांच्या नेतृत्वाखाली या उपक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आलेे.
निर्मला महिला मंडळाच्या या नवीन उपक्रमाला स्थानिक विभागातील महिलांचा चांगला प्रतिसाद मिळाला. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून योगा प्रशिक्षण,संस्कर भारती रांगोळी आणि चॉकलेट आदींचे प्रशिक्षण महिलांना मोफत दिले जाणार आहेे. त्याचा आज शुभारंभ झाला. यावेळी महिलांच्या मनोरंजनासाठी विविध खेळांचे आणि त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी अन्यही उपक्रमाचे आयोजन यावेळी करण्यात आलेे. यावेळी महिलांना सॅनिटरी नॅपकिन (पॅड) व मास्कचे वितरण करण्यात आलेे. यावेळी सौ. मंगल बागडे, सौ. सारिका धोंडे, सौ. स्वाती खिलारे, सौ. रेशमा पडवळ, सौ. शीतल सावंत, सौ. विमल सोनवणे,सौ. अश्विनी पंडित, सौ. दीपाली नलावडे, पूनम कांबळे आदी उपस्थित होत्या.

0 98

नवी मुंबई : महिला दिनानिमित्त राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या प्रभाग ८५-८६ च्या वतीने प्रभागातील महिलांसाठी आयोजित केलेले मोफत आरोग्य चिकित्सा शिविर उत्साहात पार पडले. या प्रभागातील विधवा महिलांचा राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून सन्मान करण्यात आला. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेरूळ तालुका अध्यक्ष  महादेव पवार आणि नुतन महिला बचत गटाच्या संयुक्त विद्यमाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या मोफत आरोग्य चिकित्सा शिबिरामध्ये महिलांसाठी मधुमेह तपासणी, ईसीजी, थॉयराईड, सीबीसी आदी तपासण्या पीआरएस डायग्नोस्टिकच्या माध्यमातून करण्यात आल्या. यावेळी शिबिरात सहभागी महिलांसाठी डॉ. शरयू माने यांच्या माध्यमातून आरोग्यविषयक मोफत सल्ला व मार्गदर्शन करण्यात आले. हे शिबिर महिलांसाठी आयोजित करण्यात आले असले तरी उपचारासाठी आलेल्या पुरूषांचीही आरोग्य तपासणी महादेव पवारांनी मोफत करून दिली.

सांयकाळी प्रभागातील विधवा  महिलांचा त्यांच्या गृहनिर्माण सोसायटीमध्ये जावून महादेव पवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी सन्मान केला. स्वत:वर पती निधनाचा आकाशाएवढा डोंगर कोसळलेला असतानाही स्वत:च्या दु:खाला आवर घालून या महिला घराच्या उभारणीत व मुलांच्या संसार वाटचालीत खंबीरपणे  साथ  देत असल्यामुळे या सत्काराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती महादेव पवार यांनी दिली. या उपक्रमाच्या आयोजनात महादेव पवार यांच्यासह नुतन महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. सुषमा महादेव पवार, प्रशांत सोळस्कर,  रोहिदास हाडवळे, रवींद्र सुर्वे, प्रमोद शेळके, यशवंत मोहिते, विनी राजाध्यक्ष, संतोष लोढे,  रवी पवार, रोहन वाघ, निखिल हांडे, दिपक शिंगाडे आदींनी परिश्रम घेतले.

0 72

नवी मुंबई :  : नेरूळ सेक्टर २ मधील एलआयजी अंर्तगत गृहनिर्माण सोसायटीतील नादुरूस्त पथदिव्याची दुरूस्ती तसेच काही ठिकाणी नव्याने पथदिवे बसविण्याची मागणी नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसच्या सचिव विद्या भांडेकर यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर आणि महापालिका विभाग अधिकारी दत्तात्रय नांगरे यांच्याकडे लेखी निवेदनातून केली आहे.

नेरूळ सेक्टर २ मध्ये कष्टकरी श्रमिकांची एलआयजी वसाहत आहे. या ठिकाणी वारणा, सविनय, आम्रपाली, जयहिंद, घरकुल या पाच गृहनिर्माण सोसायट्या आहेत. या ठिकाणी असलेले महापालिकेचे पथदिवे बंद असल्याने रहीवाशाची गैरसोय होत आहे. तसेच एलआयजी परिसरातील विस्तिर्ण बैठ्या चाळी आणि त्या परिसरातील वाढती लोकसंख्या पाहता अनेक भागात पथदिवे नसल्याने स्थानिक रहीवाशांना अंधारातच ये-जा करावी लागते. त्यामुळे स्थानिक रहीवाशांची गैरसोय दूर करण्यासाठी एलआयजी परिसरातील पथदिव्यांची दुरूस्ती करण्यात यावी व त्या ठिकाणी नव्याने पथदिवे बसविण्याची मागणी नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेस  सचिव विद्या भांडेकर यांनी केली आहे.

0 107

संदीपखांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३

स्वयंमन्युजब्युरो : Navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई: सानपाडा नोडमधील महापालिका प्रभाग ७६ मध्ये भाजपाचे कार्यकर्ते व समाजसेवक पांडुरंग आमले आणि साईभक्त महिला फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त विविध सामाजिक व लोकोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

जागतिक महिला दिनानिमित्त सोमवार दिनांक ८ मार्च २०२१ रोजी महिलांसाठी मोफत संस्कार भारती रांगोळी प्रशिक्षण वर्ग आयोजित केले आहे  या प्रशिक्षण वर्गाचा शुभारंभ ८ मार्चपासून सुरु होईल. हे  प्रशिक्षण १५ दिवस दररोज २ तास चालणार आहे. महिलांनी रांगोळीचे प्रशिक्षण घेतल्यास विविध मोठ्या कार्यक्रमात या रांगोळीचा फायदा सर्वाना होईल आणि या माध्यमांतून महिलांना उद्योग  करण्याची व स्वबळावर आर्थिक सक्षम होण्याची संधी प्राप्त होणार असल्याची माहिती समाजसेवक पांडुरंग आमले यांनी दिली.

या प्रशिक्षणासाठी महिलांनी साईभक्त महिला फांऊडेशनकडे नावनोंदणी करणे आवश्यक असून त्यांनी प्रशिक्षणाला येताना सोबत रांगोळी घेवून येणे आवश्यक असल्याचे फांऊडेशनच्या संयोजिका सौ. शारदा पांडुरंग आमले यांनी दिली.

साईभक्त महिला फाऊंडेशन आणि समाजसेवक पांडुरंग आमले यांच्या  माध्यमातून सानपाडा विभागातील कोरोना काळात काम करणाऱ्या महिला परिचारिका, डॉक्टर, पोलीस, शिक्षक, व स्वंयसेवक, सामाजिक कार्यकर्ते यांचा कोरोना योध्दा म्हणून जागतिक महिला दिनानिमित्त यांचा जाहीर  सत्कार करण्यात येणार आहे. याशिवाय जागतिक महिला दिनानिमित्त महिलांसाठी वक्तृत्व स्पर्धा, एकांकिका, महिलांची भाषणे, अभिनय स्पर्धा, सांस्कृतिक खेळ आदी स्पर्धाचे महिलांसाठी आयोजन करण्यात आले असून स्पर्धेतील विजेत्यांना  बक्षिसे देवून त्यांना गौरविण्यात येणार आहे. तसेच विजेत्यांसाठी साईभक्त महिला फांऊडेशनने मानाची पैठणीही देण्यात येणार आहे. साईभक्त महिला फाऊंडेशनच्या प्रत्येक सदस्यांना यावेळी भेटवस्तू देण्यात येणार आहे. ८ मार्च रोजी सांयकाळी ४.३० वाजता सानपाडा रेल्वे स्टेशन परिसरातील रॉयल हॉटेलच्या बाजूला असलेल्या समाजसेवक पांडुरंग आमले यांच्या जनसंपर्क कार्यालयात या स्पर्धा होणार असून प्रभाग ७६ मधील महिलांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमांमध्ये तसेच आयोजित स्पर्धामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन कार्यक्रमाच्या संयोजिका सौ. शारदा पांडुरंग आमले यांनी केले आहे.

0 70

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६९८२००९६७३

स्वयंम न्युज ब्युरोNavimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई : स्वच्छ सर्वेक्षणाच्या अनुषंगाने घनकचरा व्यवस्थापनातील कचऱ्याची योग्य रितीने विल्हेवाट हा अतिशय महत्वाचा घटक असून त्याकडेही बारकाईने लक्ष देत महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी नवी मुंबई महानगरपालिकेच्या तुर्भे येथील शास्त्रोक्त लँडफील पध्दतीवर आधारित घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पस्थळाला भेट देऊन तेथील कार्यप्रणालीची बारकाईने पाहणी केली. याप्रसंगी त्यांच्यासमवेत शहर अभियंता सुरेंद्र पाटील, घनकचरा व्यवस्थापन उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे, कार्यकारी अभियंता मनोज पाटील उपस्थित होते.

महानगरपालिकेचा तुर्भे येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प हा देशातील एक उल्लेखनीय प्रकल्प म्हणून सुरूवातीपासूनच नावाजला जात असून अनेक देशी, परदेशी पर्यावरण तज्ज्ञांनी त्याला भेट देत प्रशंसा केलेली आहे. या प्रकल्पस्थळी दररोज ७५० मेट्रिक टनाहून अधिक ओला व सुका कचरा शहरातील विविध ठिकाणांहून आणला जातो व त्यावर शास्त्रोक्त पध्दतीने प्रक्रिया केली जाते.

या प्रकल्प स्थळावरील पाच सेल क्षमता संपुष्टात आल्याने शास्त्रोक्त पध्दतीने बंद करण्यात आले असून सध्या सहाव्या सेलची क्षमता संपुष्टात येत असल्याने सातवा सेल तयार करण्यात आलेला आहे. आयुक्तांनी या सर्व सेलची पाहणी करीत तांत्रिकदृष्टया माहिती जाणून घेतली व महत्वाच्या सूचना केल्या.

प्रकल्पस्थळी ओल्या कचऱ्यापासून साधारणत: ३२ ते ३५ मेट्रिक टन सेंद्रीय खत तयार होत असून त्याचा उपयोग उद्यानांचे शहर म्हणून नावलौकिक असणाऱ्या महापालिका क्षेत्रातील उद्याने, बागा, पार्क फुलविण्यासाठी केला जातो. त्याचप्रमाणे यामधील १८ ते २० मेट्रिक टन प्लास्टिकवर प्रक्रिया केली जाते. यामधून प्लास्टिक ग्रॅन्युल्स बनवून डांबरी रस्ते तयार करताना त्यावर कोटींग म्हणून उपयोग केला जातो. यामुळे रस्त्यांमध्ये पाणी झिरपत नाही आणि डांबरी रस्त्यांचे आयुष्य वाढण्यास मदत होते. घनकचऱ्यातील द्रव लिचेटवर प्रक्रिया करून त्याचा उपयोग प्रकल्पस्थळावरील हरितपट्टा आणि उद्यानासाठी केला जातो.

याशिवाय महानगरपालिका क्षेत्रातील बांधकाम व पाडकाम कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी २० मेट्रिक टन प्रति तास क्षमतेचा सी अँड डी प्रक्रिया प्रकल्प त्याठिकाणी कार्यान्वित आहे. यामध्ये बांधकाम व पाडकाम कचऱ्यावर प्रक्रिया करून त्यापासून तयार झालेली खडी व रेती महानगरपालिकेच्या वतीन रस्ते, गटारे, पदपथ यांच्या बांधकामात वापरण्यात येते. त्याचप्रमाणे स्लजपासून पेव्हर ब्लॉक स्वरूपातील विटा तयार करण्यात येत असून त्याचाही उपयोग बांधकामाप्रसंगी होतो.

या प्रकल्पस्थळावरील सर्व यंत्रणेची त्या त्या जागी जाऊन पाहणी करीत आयुक्तांनी त्याठिकाणची स्वच्छता अधिक वाढविण्याचे निर्देश दिले. त्याचप्रमाणे भविष्यातील प्रकल्पस्थळाच्या नियोजनाविषयी कार्यवाही करण्याच्या सूचना शहर अभियंता सुरेंद्र पाटील यांना दिल्या.

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील दैनंदिन कचऱ्याचे संकलन, वाहतुक आणि शास्त्रोक्त पध्दतीने विल्हेवाट याची प्रणाली व्यवस्थित राबविली जात असली तरी त्यामध्ये अधिक सुधारणा करणेबाबत जागरूकतेने कार्यवाही करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या.

त्याचप्रमाणे नवी मुंबईकर नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर खत टोपलीसारख्या उपयोगी गोष्टीचा वापर करून घरातील ओल्या कचऱ्याची घरातच विल्हेवाट लावली तर त्यांना कुंडीतील झाडे फुलविण्यासाठी सेंद्रीय खतही मिळेल तसेच शहरातील घनकचरा व्यवस्थापनाला अधिक बळ मिळून देशात पहिल्या नंबरचे शहर म्हणून आपण केलेला निश्चय पूर्ण होईल असा विश्वस व्यक्त करीत समस्त नवी मुंबईकर नागरिकांनी माझा कचरा ही माझी जबाबदारी मानत घनकचरा व्यवस्थापन प्रक्रियेत मौलिक योगदान द्यावे असे आवाहन महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी केले आहे. 

0 131

नवी मुंबई : महापालिका प्रभाग 96 मधील नेरूळ सेक्टर 16 मधील सनशाईन रूग्णालयात प्रथमच कोरोना लस घेणार्‍या वृध्द दांपत्याचा जनसेवक गणेश भगत यांच्या हस्ते शनिवारी दुपारी सत्कार करण्यात आला.
शनिवार, दि. 6 मार्च रोजी नेरूळ सेक्टर 16 मधील सनशाईन रूग्णालयात ज्येष्ठ नागरिकांना कोरोना लस देण्याच्या अभियानाचा शुभारंभ झाला. या रूग्णालयात विभागातील सीब्रीज या गृहनिर्माण सोसायटीतील कैलास शर्मा (वय वर्ष 78) आणि त्यांच्या पत्नी उमा शर्मा (वय वर्ष 71) यांनी सर्वप्रथम कोरोना लस घेतली. समाजात कोरोना लस बाबत अनेक समज-गैरसमज असताना शर्मा दांपत्यानेे लस घेवून एक आदर्श निर्माण केेल्याचे सांगत जनसेवक गणेश भगत सनशाईन रूग्णालयात जावून या ज्येष्ठ नागरिक असलेेल्या वयोवृध्द दांपत्याचा सत्कार केेला. यावेळी सीब्रिज सोसायटीचे अध्यक्ष सुमित अग्रवाल उपस्थित होते. शहरात कोरोनाचे वाढते प्रमाण पाहता ज्येष्ठ नागरिकांनी लवकरात लवकर कोरोना लस घेवून शहर कोरोना मुक्त होण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन यावेळी जनसेवक गणेश भगत यांनी यावेळी केलेे.

0 112

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६७३

स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई : महापालिका प्रशासनात काम करणाऱ्या मुषक नियत्रंण कामगारांची वेतन विलंबामुळे होणारी ससेहोलपट आजही सुरूच आहे. मार्च महिन्याची ४ तारीख उलटली तरी मुषक नियत्रंण कामगारांच्या हातात अजुन जानेवारी २०२१ महिन्याचे वेतन पडलेले नाही. वेतनास  विलंब होत असतानाही पालिका प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्याने कामगार वर्गाकडून संतापाचा सूर आळविला जात आहे.

गेल्या अनेक वर्षापासून महापालिकेत कायम, ठोक तसेच कंत्राटी सर्वच कामगारांचे वेतन वेळेवर होत असतानाही केवळ मुषक नियत्रंण विभागाच्या कामगारांचेच वेतन दोन ते तीन कधीकधी चार महिने विलंबाने होत आहे. काही दिवसापूर्वीच सिडकोचे माजी संचालक व शिवसेनेचे माजी ज्येष्ठ नगरसेवक नामदेव भगत यांनी महापालिका आयुक्तांकडे याप्रकरणी निवेदन देवून मुषक नियत्रंण कामगारांच्या वेतन विलंबाकडे लक्ष वेधले होते. भगत यांच्या पत्राची दखल घेत एक महिन्याचे वेतन तात्काळ या मुषक नियत्रंण कामगारांना देण्यात आले. परंतु पुन्हा तोच सावळागोंधळ सुरू राहील्याने आज पुन्हा एकवार मुषक नियत्रंण कामगारांचे वेतन रखडले आहे.

0 110

सभ्य माणसांचा काळ सांगा कोणता? असा प्रश्न एका गझलेत इलाही जमादार यांनी विचारला होता. निवडणुका जवळ आल्या की राजकारण आणि पुढार्‍यांना शिव्या देणे ऐकायला आले की समजून जावे हाच सभ्य माणसांचा काळ आहे. महानगर असो की नगर त्यातल्या राजकारणापासून अंतर राखून, नेते म्हणजे बदमाश अन् राजकारण घाणेरडे असे ज्यांना वाटते त्या वर्गाने राजकारण घाण करण्यात खरंतर मोठी भूमिका बजावलेली असते.
नोकरदारांना राजकारण करता येत नाही परंतु समाजातला असा 50 टक्के नोकरदार वर्ग बाजूला काढला तर उरलेल्या 50 टक्के वर्गाने आपला उद्योग, धंदा सांभाळून थेट राजकारण करायला काय हरकत आहे? सज्जन, प्रामाणिक आणि नेहमी सरळ मार्गाने जाणारा मोठा समूह सगळ्याच जाती धर्मात कार्यरत आहे. तो सतत विविध कारणांनी राजकारण आणि नेत्यांना शिव्या देण्यात धन्यता मानतो. राजकारण हे बदमाशांचे क्षेत्र आहे, तिथे गुन्हेगारांना सन्मान मिळतो, ते आपल्यासारख्या साध्या, सरळ माणसांचे काम नव्हे असा समज जवळपास सर्व स्तरातल्या सामान्य माणसांनी करवून घेतला आहे.

ज्या व्यक्ती राजकारण, नेते किंवा पक्षाला सतत शिव्या देत असतात त्या व्यक्तींना वारंवार अशा अप्रिय व्यवस्थेशी काम पडत असते. कधी नगरपालिका, महानगरपालिका, बँक, कृउबास किंवा सोसायटी नव्हे हाउसिंग सोसायटींच्या निवडून आलेल्या पदाधिकार्‍यांशी सतत काहीतरी काम पडत असते. अशावेळी मात्र राजकारणातील या वाईट लोकांनी आपली कामे पटापट करून द्यावीत अशी अपेक्षा हा वर्ग ठेवत असतो. चांगल्या आणि सज्जन लोकांनी राजकारणापासून स्वत:ला दूर ठेवल्याचे दुष्परिणाम आज आपण सगळेच भोगत आहोत. चार वर्ष, अकरा महिने नेत्यांना शिव्या देणारा हा कथित सज्जन व्यक्ती निर्णायक क्षणाला डोळ्यात तेल घालून सजग राहात नसतो. परिणामी पुन्हा गुंड, बदमाश आणि खोर्‍याने पैसा ओढण्याची मनीषा बाळगणारे लोक निवडणुकात सज्जनांच्या नाकावर टिच्चून विजयी होतात.
चिखलात उगवलेले कमळ प्रत्येकाला आवडते. मात्र ते आपल्याला हवे असेल तर चिखलात उतरण्याची, कपडे चिखलाने माखून घेण्याची तयारी असावी लागते. शहर, महानगर किंवा कोणत्याही राजकारणात नवे बदल घडवून आणायचे असतील तर व्यवस्थांना शिव्या देऊन चालणार नाही. त्या व्यवस्थेत शिरून, राजकारणात उडी घेऊन आपल्याला बदल घडवावा लागेल. आणखी किती काळ काठावर राहून राजकारण किंवा पुढार्‍यांना आपण शिव्या देणार आहोत? कुणी अपघाताने राजकारणात पडला तर तो यशस्वी होण्याची शक्यता कमी असते. त्यासाठी राजकारणात पडू नका, जाणीवपूर्वक उडी घ्या असे यशवंतराव चव्हाण नेहमी सांगत असत. लोक म्हणतात आम्हाला, उद्योग, धंदे आणि आमचे करिअर आहे म्हणून इकडे लक्ष द्यायला वेळ नाही, मग राजकारण काय आहे? हा सुद्धा अलीकडे पूर्णवळ व्यवसाय बनला आहे. कल्पक तरुणांचे हे क्षेत्र करिअर बनले आहे.
गल्ली ते दिल्लीच्या राजकारणात जोवर शिक्षित, अभ्यासू आणि प्रामाणिक व्यक्तींचे प्रमाण वाढणार नाही तोवर राजकारणाच्या शुद्धीकरणाला सुरुवात होणार नाही. त्यासाठी अगदी महापालिकेच्या राजकारणात वकील, डॉक्टर, इंजिनिअर, सीए, उद्योजक, कलावंत, निवृत्त अधिकारी, आर्थिक सक्षम तरुणांनी सक्रिय सहभाग घेतला पाहिजे. ज्यांच्याकडे विकासाची दूरदृष्टी आणि काहीतरी नवे करून दाखविण्याची जिद्द असेल अशी माणसं जोवर एकत्र येऊन शहराचे राजकारण हाती घेत नाहीत तोवर आपल्या शहराला चांगले दिवस येणार नाही. लक्षात घ्या शहराला पर्यायाने आपल्या परिवाराला उत्तम नागरी सुविधा मिळून प्रत्येकाचे जगणे सुसह्य करण्यासाठी कुणी परग्रहावरून येणार नाही. आपल्यातूनच कुणाला तरी त्यासाठी पुढाकार घ्यावा लागेल. उत्तम नियोजन करून कुणाला तरी या चिखलात उतरून, सज्जनशक्तीचा सहभाग वाढवत चिखल साफ करावा लागेल.
आम आदमी पक्षाला कुणी काही म्हणत असले तरी गेल्या काही वर्षात या पक्षाच्या माणसांनी नव्या राजकीय बदलाची प्रक्रिया सुरू केली आहे. समाजातील शिक्षित वर्ग जाती, धर्माच्या भिंती ओलांडून राजकारण बदलण्यासाठी पुढे येत आहेत, मात्र वर्‍हाडात तसे काही होताना दिसत नाही. परंपरागत राजकारण आणि सडलेल्या व्यवस्थेच्या दलदलीत आपण पुरते फसलो असूनही त्याची सवय झाली आहे. राजकारणाचे मोठे क्षेत्र जाणीवपूर्वक आम्ही अप्रामाणिक माणसांच्या हवाली करून टाकले आहे. त्यात जी मूठभर सज्जन माणसं राहिली असतील त्यांना सोबत घेऊन प्रामाणिक माणसांनी शहराच्या राजकारणात सक्रिय व्हायला हवे.

-पुरुषोत्तम आवारे पाटील
दै.अजिंक्य भारत अकोला
संवाद -9892162248

0 89

नवी मुंबई : गेल्या अनेक वर्षापासून रिक्षा व्यवसायात येणार्‍या समस्यांविरोधात संघर्ष करत रिक्षा चालक मालकांना सुविधा देण्यासाठी कार्यरत असणार्‍या समाजसेवक दिलीप आमलेे यांनी नुकतेच नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रमाच्या चालक-वाहकांचे व्यसनमुक्तीवर प्रबोधन केलेे असून त्यांच्या या कार्याबाबत परिवहन उपक्रमाकडून त्यांना प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आलेे आहेे.
नवी मुंबई रिक्षा चालक मालक सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून दिलीप आमलेे हेे अनेक वर्षे या क्षेत्रातील समस्या सोडवित आहेत. चालकांना असलेल्या व्यसनामुळेे वाढते अपघात आणि त्यामुळे त्या चालकासह समस्त घरालाच येणारे अपंगत्व या बाबी दिलीप आमलेे यांच्या निदर्शनास आल्यावर त्यांनी वाहन चालकांमध्ये व्यसनमुक्तीसाठी प्रबोधन करण्याचा उपक्रम सुरू केेला. ठाणे जिल्हा व रायगड जिल्ह्यात त्यांनी हेे अभियान राबविताना असंख्य चालकांना व्यसनमुक्तीसाठी प्रवृत्त केलेे आहेे.
फेब्रुवारी महिन्यात 4 ते 10 फेब्रुवारीमध्ये महापालिका परिवहन उपक्रमामधील चालकांना दिलीप आमलेे यांनी व्यसनमुक्तीवर प्रबोधन करताना कार्यशाळा घेतली. यामध्ये दिलीप आमलेे यांनी चालकांना व्यसनाचे दुष्परिणाम आणि कुंटूबाची यामुळे होणारी वाताहत याबाबत मार्गदर्शन केलेे. यामुळे आपणाला व्यसनापासून परावृत्त होण्यास मदतच झाली असल्याची कबुली दिलीप आमलेे यांच्याजवळ अनेक चालकांनी दिली.
दिलीप आमलेे यांच्या कार्याची दखल घेत महापालिका परिवहन उपक्रमाने त्यामना प्रमाणपत्र देवून त्यांच्या व्यसनमुक्ती अभियानाचा गौरव केला आहेे.

0 159

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६७३

स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई : प्रभाग ७६ मधील भाजपाचे कार्यकर्ते व  समाजसेवक पांडुरंग आमले यांचा वाढदिवस सोमवारी (दि. १ मार्च) उत्साहात साजरा करण्यात आला. या वाढदिवसानिमित्त साई भक्त महिला फांऊडेशनच्यावतीने सानपाडा रेल्वे स्टेशननजीक ‘पुर्णब्रम्ह पोळी भाजी केंद्रा’चा शुभारंभ करण्यात आला. यावेळी समाजसेवक पांडुरंग आमले यांच्यासमवेत भाजपाचे विजय घाटे, आबा जगताप, श्रीमंत जगताप, निलेश वर्पे, आज्ञा गवाणे, निता आंग्रे, संचिता जोइल, प्रतिभा पवार, मंगल वाव्हळ, सुलोचना निंबाळकर, विमल पाटील, दिशा केणी, शारदा आमले, मनिषा पाटील यांच्यासह निसर्गप्रेमी फांऊडेशनचे सदस्य, भाजपाचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

STAY CONNECTED