Home महाराष्ट्र

स्वयंम न्यूज ब्युरो : navimumbailive.com@gmail.com

शाळांना अनुदान देण्यास टाळाटाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कारवाई करा
मुंबई : राज्यातील कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीने आझाद मैदान येथे सुरू केलेले आंदोलन पोलिसांनी बळाचा वापर करुन दडपण्याचा प्रयत्न केला आहे.  शांततामय मार्गाने आंदोलन करणाऱ्या शिक्षकांवर लाठीमार करणाऱ्या पोलिसांना  तात्काळ निलंबित करा आणि शिक्षकांच्या मागण्यांना न्याय द्यावा अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
शिक्षक लाठीचार्जवर प्रतिक्रिया देताना वडेट्टीवार म्हणाले की, मराठी तसेच प्रादेशिक भाषेतील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या अनुदानाचा प्रश्न १९ वर्षांपासून प्रलंबित आहे, त्यांना अनुदान द्यावे तसेच ज्या माध्यमिक शाळांना २०% अनुदान सुरू केले आहे, त्यांना नियमानुसार १००% अनुदान द्यावे या मागण्यांसाठी शिक्षक संघटनेने आझाद मैदानात आंदोलन सुरू केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्देश देऊनही मंत्रालयातले काही अधिकारी कार्यवाही करण्यास जाणूनबुजून उशीर करत असल्याचे दिसत आहे. आपल्या न्याय मागण्यांसाठी शिक्षकांनी आंदोलनाचा मार्ग अवलंबला असताना त्यांच्यावर लाठीचार्ज करण्याची गरज का भासली?
आपल्या विविध मागण्यांसाठी २१ दिवसांपासून शिक्षक मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन करत आहेत. त्यांच्या मागण्यांचा सहानुभूतीने विचार करण्याऐवजी त्यांच्या मागण्या पोलीस बळाचा वापर करुन दडपून टाकणे हे अन्यायकारक असून या पोलीस लाठीचार्जचा वडेट्टीवार यांनी निषेध केला.   

स्वयंम न्यूज ब्युरो : navimumbailive.com@gmail.com

काँग्रेसच्या महापर्दाफाश सभांचा अमरावती येथून शुभारंभ

अमरावती : राज्य सरकारची एकही घोषणा अद्याप पूर्णपणे अंमलात आली नाही आणि जनतेला दिलासा मिळाला नाही. भाजप शिवसेना सरकार फक्त घोषणा करण्यात पटाईत आहे. अशी घणाघाती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ. बाळासाहोब थोरात यांनी केली आहे ते अमरावती येथे महापर्दाफाश सभेला मार्गदर्शन करताना बोलत होते.  

मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेची पोलखोल करण्यासाठी काँग्रेस पक्षाने महापर्दाफाश सभांचे आयोजन केले आहे. आज अमरावती येथे पहिली पर्दाफाश सभा पार पडली. यावेळी व्यासपीठावर, प्रदेश काँग्रेसच्या प्रचार समितीचे प्रमुख नाना पटोले,  महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्याध्यक्ष डॉ. नितीन राऊत, आ. यशोमती ठाकूर, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आशिष दुआ,  विधानपरिषदेचे माजी उपसभापती माणिकराव ठाकरे, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष चारुलता टोकस, आ. विरेंद्र जगताप, आ. वजाहत मिर्झा, अमरावती जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बब्लू देशमुख, अमरावती शहर काँग्रेसचे अध्यक्ष किशोर बोरकर, प्रदेश सरचिटणीस मोहन जोशी, माजी आ. केलराम काळे, आशिष देशमुख, जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन गोंडाणे, प्रदेश काँग्रेसचे सचिव व अमरावती जिल्हा प्रभारी प्रकाश देवतळे, रविंद्र दरेकर यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी बोलताना आ. थोरात म्हणाले की, राज्य सरकार सर्व आघाड्यांवर सपशेल अपयशी ठरले आहे. या सरकारची कर्जमाफी फेल झाली आहे. बहुतांश शेतक-यांना अद्याप कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही. शेतक-यांकडून पीक विम्याचे हप्ते भरून घेतले पण नुकसान भरपाई मिळाली नाही. पीक विम्याची मदत अद्यापही मिळाली नाही. विमा कंपन्या तुपाशी शेतकरी उपाशी अशी परिस्थिती आहे. शिवसेना सरकारमध्ये सहभागी आहे. शिवसेनेला शेतक-यांची एवढीच काळजी होती तर त्यांना रस्त्यावर उतरून बनवाबनवी करण्यापेक्षा विधानसभेत का मांडला नाही असा प्रश्न आ. थोरात यांनी उपस्थित केला.

धर्मा पाटील यांच्यासारख्या शेतक-यांना न्यायासाठी मंत्रालयात आत्महत्या करावी लागते हे दुर्दैव आहे. जलयुक्त शिवार भ्रष्टाचारयुक्त शिवार झाला आहे. अद्यापही राज्यात टँकर सुरु आहे. पूरग्रस्त भागातील ब्रम्हनाळ येथे बोट उलटून सतरा जीव गेले, त्यावेळी मंत्री जल्लोष करत होते. सरकारमध्ये संवेदनशीलता राहिली नाही. केंद्रातील आणि राज्यातील भाजप सरकार भांडवलशाही धार्जिणे आहे. बेरोजगारीचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे. हे सरकार पुढील काळात सत्तेत राहिले तर खूप मोठ्या अडचणी निर्माण होणार आहेत. खोट्या जाहिरातीच्या माध्यमातून सरकार दिशाभूल करत आहे. सरकारच्या या खोटेपणाची पोलखोल या महापर्दाफाश सभांच्या माध्यमातून काँग्रेस करेल असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

या सभेला मार्गदर्शन करताना प्रदेश काँग्रेसच्या प्रचार समितीचे प्रमुख नाना पटोले यांनी सरकारवर चौफेर टीका केली, ते म्हणाले की, भाजप शिवसेना सरकारच्या काळात गुन्हेगारांना क्लीन चीट दिली जात आहे. जनतेच्या पैशांवर डल्ला मारणारे मोकाट आहेत. घोटाळेबाजांना सरकारचे संरक्षण आहे. कामगारांना दिल्या जाणा-या साहित्यामध्ये, आदिवासी योजनांमध्ये, शिक्षण विभागाच्या खरेदीमध्ये राज्य सरकारच्या बहुतांश विभागामध्ये फक्त घोटाळेच सुरु आहेत. या घोटाळेबाज मंत्र्यांना सरकारचे संरक्षण आहे. पीक विमा कंपन्यांनी सरकारच्या मदतीने शेतक-यांचे हजारो कोटी लूटले. काँग्रेस सरकारच्या काळात देशाची अर्थव्यवस्था वेगाने वाढत होती. भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे अर्थव्यवस्था घसरत चालली आहे. राज्याचा गाढा रूळावर आणण्यासाठी हे सरकार घालवून काँग्रेसचे सरकार आणावे लागेल असे पटोले म्हणाले.

  • नवी मुंबईतून झाल्या ५ उमेदवारांच्या मुलाखती
  • लोकसभेसाठी नवी मुंबईतून झाले वंचितला २४, ९९३ मतदान
  • ऐरोलीतून खॉजामिया पटेल तर बेलापुरातून विरेंद्र लगाडेंची चर्चा
  • उमेदवार कोण याची सेना-भाजपसह कॉंग्रेस-राष्ट्रवादीला उत्सूकता

मुंबई : लोकसभेला महाराष्ट्रामध्ये भाजप-शिवसेनेला घवघवीत यश मिळून कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ‘पानिपता’हून भयानक पिछेहाट झाली.  महायुतीच्या यशात मोदी नावाचा करिश्मा असला तरी कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसला थोपविण्यातच नाही तर आघाडीच्या उमेदवारांना पराभूत करण्यात वंचित बहूजन आघाडीची भूमिका निर्णायक ठरली. महाराष्ट्रात तब्बल ४२ लाखाहून अधिक मते वंचित बहूजन आघाडीला मिळाली. अशोक चव्हाणांसह सुशीलकुमार शिंदेपर्यत कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉग्रेसचे रथी-महारथींना पराभवामुळे आज घरी बसावे लागले आहे. विधानसभा निवडणूक आता अवघ्या दीड महिन्यावर आलेल्या असताना उमेदवार निवड व मुलाखतीबाबत आघाडी व महायुतीत शांतता असली तरी वंचित बहूजन आघाडीने मंगळवारी ठाणे जिल्ह्यातील इच्छूक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्यामुळे निवडणूक लढवू पाहणाऱ्या प्रस्थापितांचे व इच्छूकांचे धाबे दणाणले आहेत.

नवी मुंबई कार्यक्षेत्रात ऐरोली व बेलापुर हे दोन विधानसभा मतदारसंघ मोडत असून सध्या या ठिकाणी ऐरोलीतून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे संदीप नाईक व बेलापुरातून भाजपच्या मंदा म्हात्रे या आमदार आहेत. संदीप नाईक यांनी नुकताच आपल्या आमदारकीचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीमध्ये वंचित बहूजन आघाडीला बेलापुर विधानसभेतून ९ हजार ८०८ तर ऐरोली विधानसभा मतदारसंघातून १५ हजार १८५ मते मिळाले. दोन्ही मतदारसंघातून  सुमारे २४ हजार ९९३ मते वंचित आघाडीला मिळाली आहेत. लोकसभा निवडणूकीच्या तोंडावरच वंचित बहूजन आघाडीची स्थापना झालेली होती आणि लोकसभेसाठी वंचितने उभा केलेला उमेदवार नवी मुंबईकरांना फारसा परिचित नसतानाही २५ हजार मते वंचितला नवी मुंबईतून मिळाली.

मंगळवारी वंचित बहूजन आघाडीकडून ठाणे जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघासाठी इच्छूकांच्या मुलाखती घेण्यात आल्या, त्यात नवी मुंबईतील ऐरोली व बेलापुर या दोन विधानसभा मतदारसंघाचाही समावेश आहे. बेलापुर मतदारसंघासाठी विरेंद्र लगाडेंसह अजून एकाने तर ऐरोली मतदारसंघासाठी रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष खॉजामियॉ पटेल यांच्यासह अजून दोघांनी अशा एकूण नवी मुंबईतून पाचजणांनी वंचितकडून उमेदवारी मिळावी म्हणून मुलाखती दिल्या आहेत. नवी मुंबईतून ऐरोलीसाठी खॉजामियॉ पटेल यांना तर बेलापुरसाठी विरेंद्र लगाडे यांनाच तिकिट मिळणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. लोकसभा निवडणूकीत वंचित बहूजन आघाडीचा उमेदवार नवी मुंबईकरांसाठी अपरिचित असला तरी विधानसभा निवडणूकीसाठी खॉजामियॉ पटेल व विरेंद्र लगाडे हे दोन्ही चेहरे परिचित असून त्यांची उमेदवारी आघाडी व महायुतीलाही त्रासदायक ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

खॉजामियॉ पटेल हे अनेक वर्षापासून रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष म्हणून नवी मुंबईत कार्यरत असून दिघा ते बेलापुरदरम्यान ते परिचित आहेत. त्यांना कोणी पाहिले नसले तरी तुर्भेचे खॉजामियॉ पटेल या नावाने नवी मुंबईकर त्यांना जाणतात. तळागाळातील नवी मुंबईकरांमध्ये त्यांचा परिचय असून वंचितकडून ऐरोली विधानसभेसाठी त्यांचा दावा प्रबळ मानला जात आहे. बेलापुर विधानसभा मतदारसंघातून विरेंद्र लगाडे यांचा दावा प्रबळ मानला जात असून राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व सहकार क्षेत्रात लगाडेंचा असलेला संपर्क इच्छूकांसाठी व प्रस्थांपितांसाठी त्रासदायक ठरणार असल्याची चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस व आता वंचित बहूजन आघाडी असा त्यांचा राजकीय प्रवास असून त्यांनी शिवसेनेकडून पालिका निवडणूकही लढविलेली आहे. पतसंस्थेच्या माध्यमातून सहकार क्षेत्रात योगदान आहे. कला संस्थेच्या माध्यमातून संगीत व गायन क्षेत्रामध्ये त्यांनी तळागाळातील घटकांना नावारूपाला आणले आहे. वंचितचे नेते ही अल्पावधीत विरेंद्र लगाडेंची निर्माण झालेली ओळख बेलापुर विधानसभा निवडणूकीला कलाटणी देण्याची भीती राजकीय क्षेत्रात व्यक्त केली जात आहे.

 

साभार : दै. नवराष्ट्र

स्वयंम न्यूज ब्युरो : navimumbailive.com@gmail.com

केवळ १० किलो धान्य देण्याचा आदेश ही पुरग्रस्तांची थट्टा

मुंबई : माझ्या वक्तव्यांना तुम्ही गांभीर्याने घेत नसाल तरीही त्याचे स्वागत करतो मात्र तुमच्यापुढे सनदशीर मार्गाने मांडलेली राज्याची वास्तविक पुरपरिस्थिती तरी गांभीर्याने घ्या, ते ही जमत नसेल तर पुरात वाहून जाणाऱ्या जिवांना तरी तुमच्या गांभीर्याने घेण्याचा निकष लागु होतो का ते सांगा. किमान ज्या राज्याने तुम्हाला मुख्यमंत्रीपदावर बसविले त्या राज्याला तरी गांभीर्याने घेऊन तातडीने उपाययोजना करा व लोकांचे जीव वाचवा असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रचार प्रमुख नाना पटोले यांनी पत्रकार परिषदेत केले.

एकीकडे राज्यात पुरपरिस्थिती असतांना मुख्यमंत्री महाजनादेश यात्रेतून मतांची भिक मागण्यात व्यस्त होते. दरम्यान माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्या निधनामुळे ते यात्रा थांबवुन दिल्ली येथे गेले. अंत्यविधी नंतर दुसऱ्या दिवशी राज्याच्या संकटामुळे मुख्यमंत्र्यांनी महाजनादेश यात्रा थांबविल्याची जाहिरातबाजी भाजपाच्या आयटी सेलने सुरू केली. असा घृणित प्रकार राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच होत आहे असा आरोप नाना पटोले यांनी केला.

माजी केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज यांच्या बद्दल आम्हाला नितांत आदर आहे. त्यांच्या जाण्याने निश्चितच राष्ट्रीय हानी झाली आहे. मात्र एकीकडे सुषमा स्वराज यांच्या सारख्याच हजारो महिला, वृद्ध, लहान मुले महापुराच्या संकटात असतांना राज्य वाऱ्यावर सोडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अंत्ययात्रेसाठी दिवसभर दिल्ली येथे होते. आपल्या कार्याप्रती नेहमी सजग असलेल्या कर्तव्यनिष्ठ सुषमा स्वराज यांनाही कदाचित मुख्यमंत्र्यांची हि भुमिका आवडली नसेल. जनतेला संकटात सोडून मुख्यमंत्री अंत्ययात्रेला आले या गोष्टीमुळे त्यांच्या आत्म्याला नक्कीच कष्ट झाले असतील असे पटोले म्हणाले.

मुख्यमंत्री महाजनादेश यात्रेत मग्न असतांना राज्यातील परिस्थितीचं गांभीर्य लक्षात आणुन देण्याचा प्रयत्न आम्ही केला होता. मात्र यवतमाळ येथिल पत्रकार परिषदेत एका प्रश्नाला उत्तर देतांना मुख्यमंत्री म्हणाले की, ‘मी नाना पटोलेंना गांभीर्याने घेत नाही’. पेशवा दुसरा बाजीराव देखील अठरापगड जातींना गांभीर्याने घेत नव्हता. ते संकटात असतांना त्यांना मदतीचा हात देत नव्हता. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा राज्यातील जनतेला गांभीर्याने घेत नाहीत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांमध्ये दुसऱ्या बाजीरावांचा डीएनए असल्याचा आरोप पटोलेंनी केला.

जर मुख्यमंत्र्यांनी वेळीच कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांच्याशी संपर्क करून अलमट्टी धरणातील पाणी सोडण्याची विनंती केली असती तर पुरपरिस्थिती एवढी भयंकर झाली नसती. मुख्यमंत्री पुरपरिस्थितीच्या उपाययोजनांबद्दल केवळ फोनवरून सुचना दिल्या आहेत असे उत्तर ठिकठिकाणी देत होते. मुख्यमंत्र्यांनी उंटावरून शेळ्या न हाकता प्रत्यक्ष काम हाती घेऊन प्रशासनाला योग्य त्या सुचना दिल्या असत्या तर एवढे बळी गेले नसते. एवढी गंभीर परिस्थिती सर्वत्र दिसत असूनही योग्य वेळ आल्यावर राष्ट्रीय आपत्ती जाहिर करू असे उत्तर मुख्यमंत्री देतात.त्यामुळे वास्तव डोळ्यासमोर असून देखिल मुख्यमंत्र्यांना राष्ट्रीय आपत्ती जाहिर करण्यास कोणता मुहुर्त हवा आहे ? हे जाहिर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना आणखी किती बळी हवे असा सवालही पटोले यांनी केला.

संतापजनक गोष्ट म्हणजे मुख्यमंत्र्यांनी शासन आदेश काढून ज्या घरात दोन दिवस पाणी होते केवळ त्यांनाच दहा किलो धान्य देण्याच्या सुचना दिल्या आहेत. पुरात सर्वस्व गमावलेल्या जनतेची हि खिल्ली उडविणे आहे. त्यामुळे आता पुरग्रस्त भागाचा दौरा करून तिथल्या जनतेच्या पाठीशी उभे राहणार असल्याचे नाना पटोले यांनी सांगितले.

या पत्रकार परिषदेला माजी प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस आ. मोहन जोशी, डॉ. संजय लाखे पाटील, संजय राठोड, शाम पांडे, प्रकाश सोनावणे, राजेश कैथवास आदी उपस्थित होते.  

नवी मुंबई :   प्रधानमंत्री जन आरोग्य योजने अंतर्गत नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील पात्र 40,363 कुटूंबातील लाभार्थींना प्रतिकुटूंब वार्षिक 5 लाख रुपयांपर्यंतचे आरोग्य विमा संरक्षण – वैद्यकीय उपचार उपलब्ध होणार असून नवी मुंबई महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे.

      प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ही महाराष्ट्र राज्यामध्ये दि. 23 सप्टेंबर 2018 पासून राबविण्यात येत असून या योजने अंतर्गत सामाजिक, आर्थिक व जातीय जनगणनेमधील कचरावेचक, घरकाम करणारे, फेरीवाले, बांधकाम मजूर, कारागीर अशा 11 वर्गातील एकूण 83.72 लक्ष कुटूंबाचा समावेश आहे. यामध्ये नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील 40,364 कुटूंबाचा समावेश असून 1,72,393 इतके लाभार्थी या योजनेकरिता पात्र आहेत. लाभार्थी कुटूंबाना प्रतिवर्ष रु. 5 लाखपर्यंत विमा संरक्षण राज्य आरोग्य हमी सोसायटीमार्फत हमी तत्वावर उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. यामध्ये सर्जिकल व मेडिकल उपचार मान्यताप्राप्त खाजगी व शासकीय रूग्णालयामार्फत उपलब्ध होणार आहेत.

      या योजनेमध्ये लाभार्थ्यांचा पाठपुरावा करुन ई-कार्ड देण्याकरिता महानगरपालिकेमार्फत नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांचे वैद्यकीय अधिकारी व आपले सरकार धारक यांची समन्वय सभा महापालिका  मुख्यालयात उपआयुक्त श्री. अमोल यादव यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पाडली. या सभेमध्ये वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. बाळासाहेब सोनावणे, सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. दयानंद कटके, अपघात वैद्यकीय अधिकारी डॉ. रत्नप्रभा चव्हाण, समन्वय राज्य हमी सोसायटी श्री. प्रविण मोटे, जिल्हा व्यवस्थापक ठाणे श्री. अमोल निमसे आदी अधिकारी उपस्थित होते. या मोहिमेमध्ये नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी व सिटीजन सर्व्हिस सेंटर यांनी एकत्रितपणे जबाबदारी स्विकारुन लाभार्थ्यांना ई-कार्ड मिळेपर्यंत पाठपुरावा करावा व ही मोहिम 100% यशस्वीपणे राबविण्याचे निर्देश उपआयुक्त श्री. अमोल यादव यांनी दिले. 

      या योजनेत पात्र लाभार्थ्यांनी गोल्डन ई-कार्ड मिळण्याकरीता शिधापत्रिका, आधारकार्ड व मा.प्रधानमंत्री यांचे स्वाक्षरीचे वितरीत केलेले पत्र असल्यास अशी कागदपत्रे आपल्या नजिकच्या सिटीजन सर्व्हिस सेंटर मध्ये जाऊन सादर करावयाची आहेत. याविषयीच्या अधिक माहितीकरीता पात्र लाभार्थ्यांनी त्यांच्या नजिकच्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे.

मुंबई : सांगली जिल्ह्यातील ब्रह्मनाळ येथे बोट उलटून गेलेले ११ बळी हे अपघाताचे नसून, सरकारची तुटपुंजी उपाययोजना व प्रशासकीय बेपर्वाईचे बळी असल्याची संतप्त टीका माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केली आहे.

या घटनेबद्दल त्यांनी तीव्र दुःख व्यक्त केले असून, मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांच्या दुःखात आपण सहभागी असल्याचे म्हटले आहे. या अपघाताचे वृत्त आल्यानंतर अशोक चव्हाण यांनी ब्रह्मनाळमध्ये संपर्क साधून संपूर्ण माहिती घेतली. त्याआधारे प्रतिक्रिया व्यक्त करताना ते म्हणाले की, स्थानिकांनी तहसील प्रशासनाकडे बोटीची मागणी केली होती. परंतु, ग्रामपंचायतकडे बोट असल्याने ब्रह्मनाळला बोट देण्याची गरज नाही, असे बेपर्वाईचे उत्तर देऊन ही मागणी फेटाळण्यात आली. प्रशासनाने हात वर केल्यामुळे गावकऱ्यांना नाईलाजास्तव ग्रामपंचायतची गळकी बोट वापरावी लागली व हा अपघात घडला. प्रशासनाने वेळीच बोट पुरवली असती किंवा ग्रामपंचायतची बोट वापण्यासाठी प्रशिक्षित कर्मचारी पाठवले असते तर ११ निरपराध नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले नसते. त्यामुळे सरकारला या अपघाताची जबाबदारी नाकारता येणार नाही. एक तर राज्य सरकारने पुरेशी उपाययोजना केली नाही. आवश्यक तेवढ्या बोटी जिल्हा प्रशासनाला उपलब्ध करून दिल्या नाहीत. शिवाय प्रशासकीय अधिकाऱ्यांनी बेपर्वाई केल्याने हा अपघात झाला असून, सरकारने याची नैतिक जबाबदारी स्वीकारली पाहिजे, असे अशोक चव्हाण यांनी सांगितले.

स्वयंम न्यूज ब्युरो :  navimumbailive.com@gmail.com

मृतांच्या वारसांना प्रत्येकी १० लाख रुपयांची मदत द्यावी.

मुंबई : मराठवाडा व विदर्भातील काही भाग वगळता राज्याच्या इतर भागात मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागात पुराचा मोठ्या प्रमाणात फटका बसलेला आहे. या महापुरामुळे शेतमालासह खाजगी संपत्तीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सरकारने तातडीने या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देऊन विनाविलंब नुकसान भरपाई द्यावी तसेच पूरग्रस्त भागात आरोग्य पथके तैनात करावीत, अशा मागण्या विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

राज्यातील पूरस्थितीवर बोलताना वडेट्टीवार म्हणाले की, मागील काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. मुंबई शहर, परिसर तसेच ठाणे जिल्हा, सांगली, सातारा, कोल्हापूर, नाशिक, कोकणासह नगर जिल्ह्यातही सर्वदूर पाऊस झाला आहे. या भागातील नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून नदीकाठावरील घरे, वाहने, दुकानातील साहित्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नदीकाठच्या शहरातील गृहसंकुलातही पाणी शिरून नुकसान झाले आहे. या पुरामुळे खरिप हंगावर पाणी फेरले आहे. कापूस, मका, तूर, तांदूळ, ऊस, भूईमूग, घेवडा, सोयाबीन या शेतमालाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.  पाण्याचा निचरा न झाल्यामुळे हजारो हेक्टरवरची पीके पिवळी पडू लागली आहेत. अनेक शेतकऱ्यांनी खरिपासाठी कर्ज काढून बी-बियाणं, खताची खरेदी केलेली पण मुसळधार पावसाचा मोठा फटका बसल्याने शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे.

कोयना, कृष्णा, वारणा, पंचगंगा या नद्यांना आलेल्या पुरात नदीकाठच्या हजारो घरांना, पिकांना जलसमाधी मिळालेली आहे. पुराचा फटका बसलेल्यांच्या स्थलांतराबरोबर व्यापारी पेठांमधील साहित्यही हलवण्यात आले आहे. कोकणात मुसळधार पावसामुळे झाडांची पडझड झाली तसेचशेतीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काही भागात पुराच्या पाण्यात जनावरे वाहून गेली आहेत तसेच काही ठिकाणी जिवीतहानीही झालेली आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीचा आकडा मोठा असल्याने तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश द्यावेत आणि पीडितांना विनाविलंब नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली आहे.  

पूरग्रस्त भागात रोगराई पसरण्याची शक्यता लक्षात घेता सार्वजनिक आरोग्य विभागाने तातडीने मोठ्या प्रमाणात आरोग्य पथके तैनात करण्याची आवश्यता आहे. एकीकडे राज्याच्या बहुतांश भागावर नैसर्गिक आपत्ती ओढवली असताना सत्तेतील दोन प्रमुख पक्ष भाजप व शिवसेना मात्र प्रचारयात्रा काढण्यात व्यस्त आहेत. राज्यावरचे संकट लक्षात घेता आठ दिवसांपासून महाजनादेश यात्रेच्या माध्यमातून आपली सत्ता टिकवण्यात मुख्यमंत्री मग्न आहेत हे असंवेदनशीलपणाचे लक्षण आहे. मुख्यमंत्र्यांनी ही राजकीय प्रचार यात्रा रद्द करुन मंत्रालयातून परिस्थीतीवर देखरेख करणे तसेच योग्य ती मदत पोहचवण्याला प्राथमिकता द्यावी, असेही वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.

स्वयंम न्यूज ब्युरो : navimumbailive.com@gmail.com

मुंबई : मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी गाऱ्हाणे सांगणाऱ्या मुलीचा हात धरून तिला धमकावण्याचा केलेला प्रकार हा संताप आणणारा असून त्यांना सत्तेचा माज चढल्याचे लक्षण आहे. या महापौरावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्याध्यक्ष आमदार यशोमती ठाकूर यांनी केली आहे.

मुलीचा हात पकडून तिच्यावर दादागिरी करणाऱ्या महापौरांचा समाचार घेताना यशोमती ठाकूर म्हणाल्या की, मुंबईत मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक भागात नागरी समस्या मोठ्या प्रमाणात असताना त्याकडे महापालिकेला लक्ष द्यायला वेळ नाही वरून महापौर लोकांच्या समस्या जाणून घेण्याचे औदार्यही दाखवू शकत नाहीत. सांताक्रुझमधील पटेल नगरमध्ये विजेचा शॉक लागून आई व मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेची तातडीने दखल न घेता महापौर दुसऱ्या दिवशी पटेलनगर मध्ये आले यावेळी संतप्त रहिवाशांनी त्यांना घेराव घालून जाब विचारला. यावेळी जाब विचारणाऱ्या एका मुलीला हात पडकून महापौर महाडेश्वर यांनी तिला दमही भरला हे अशोभनीय आहे.

महिलांचा आदर करण्याचे साधे तारतम्यही शिवसेनेच्या या महापौराकडे नाही, समस्या ऐकून घेण्याची सहनशिलता नाही अशा महापौरावर कारवाई करण्याची गरज आहे.शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या बेजबाबदार व उद्धट महापौरावर आता काय कारवाई करतात हेही पाहावे लागेल, असे यशोमती ठाकूर म्हणाल्या.

स्वयंम न्यूज ब्युरो : navimumbailive.com@gmail.com

शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यास भाग पाडले
नाना पटोले यांचा आरोप

मुंबई : एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाजनादेश यात्रा काढत असतांना दुसरीकडे त्याच भागात सात शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयात आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतात. हि अत्यंत दुर्दैवी गोष्ट असून हे मुख्यमंत्र्यांचेच महापाप आहे असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रचार प्रमुख व माजी खासदार नाना पटोले यांनी केला आहे.
मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा आज अकोला येथे असतांना सात शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आत्महत्येचा प्रयत्न केला. महामार्गामध्ये अधिग्रहीत करण्यात आलेल्या जमिनिचा अत्यंत तोकडा मोबदला त्यांना मिळाला होता. इतर शेतकऱ्यांना मिळालेला जमिनीचा मोबदला व या शेतकऱ्यांना मिळालेली रक्कम यामध्ये प्रचंड तफावत आहे असा शेतकऱ्यांचा आरोप होता. त्यांनी वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासनाने त्यांची दखल न घेतल्याने त्यांनी एवढे मोठे पाऊल उचलले. 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कारभाराचे हे अपयश आहे. महाजनादेश यात्रेमध्ये मुख्यमंत्री करत असलेल्या मोठमोठ्या गप्पा किती पोकळ आहे हे या घटनेतून सिद्ध होते असेही नाना पटोले म्हणाले.

स्वयंम न्यूज ब्युरो : navimumbailive.com@gmail.com

 

नाना पटोलेंचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणविसांना प्रतिआव्हान

आव्हान न स्विकारल्यास पर्दाफाश महामेळावे आयोजीत करणार

मुंबई : गेल्या पाच वर्षात फडणवीस सरकारने दुप्पट काम केले असून त्यावर कुठल्याही व्यासपीठावर वाद-विवाद करायला तयार असल्याचा धादांत खोटारडेपणा राज्याचे मुख्यमंत्री जाहिर सभांमधुन करत आहेत. मुख्यमंत्र्यांचे हे आव्हान महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रचार प्रमुख या नात्याने स्विकारले असून आता मुख्यमंत्र्यांनी दुप्पट कामाचे क्षेत्र/खाते/विभाग सांगुन चर्चेसाठी वेळ व स्थळ निश्चित करावे असे आव्हान माजी खासदार नाना पटोले यांनी दिले आहे.

आज आयोजीत पत्रकार परिषदेत बोलतांना ते पुढे म्हणाले की, आता हे आव्हान मुख्यमंत्र्यांनी न स्विकारल्यास राज्यात ज्या ज्या ठिकाणी देवेंद्र फडणवीसांनी महाजनादेश यात्रा आयोजीत केल्या आहे तेथेच काँग्रेसच्या वतीने ‘फडणवीस दामदुप्पट पर्दाफाश महामेळावे’आयोजीत करून मुख्यमंत्र्यांचा खोटारडेपणा पुराव्यानीशी जनतेसमोर मांडणार असल्याचे पटोले यावेळी म्हणाले.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या वास्तव्याने आणि कर्माने पुण्यभुमी बनलेल्या गुरूकुंज मोझरी येथुन भाजप सेनेचे ‘फसवणीस’नावाने ओळखले जाणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाजनादेश यात्रांची सुरूवात केली. या जाहिर सभांना संबोधीत करतांना ते’फडणवीस सरकारने’ दुप्पट काम केल्याचे सांगत आहेत. मात्र त्यांचे हे वक्तव्य म्हणजे गावोगावी फिरून भोळ्याभाबड्या जनतेला’दुप्पट सोने’ करून देतो असे सांगुन फसवणुक करणाऱ्यांची हि सुधारीत आवृत्ती आहे असा आरोप नाना पटोले यांनी केला.

सर्वसामान्य जनतेला वास्तव माहिती नसल्याने जनता भुलथापांना बळी पडू शकते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी न केलेल्या विकासकामांचा फुगा कितीही फुगवला तरी सत्याची एक टाचणीच त्यातील हवा काढण्यास पुरेशी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाच वर्षातील दुप्पट कामे केलेले क्षेत्र, वाद विवादाच्या विषयांचा अजेंडा आणि तारीख, वेळ व ठिकाण त्यांच्या सोयीनुसार महाजनादेश यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यापुर्वी ठरवून जाहिर करावी. या ठिकाणी चर्चेला येऊन आकडेवारीनिशी पर्दाफाश करायला आम्ही तयार आहोत असे पटोले म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी सरकारी अधिकारी आणि आकृतीबंधाच्या बाहेर जाऊन मुख्यमंत्री कार्यालयात ट्रेनी म्हणुन भरती केलेल्या संघी कार्यकर्त्यांकडून टिप्स घेऊन सर्व तयारीनिशी वाद विवादाला यावे अन्यथा महाजनादेश यात्रेचा सरकारी खर्चाने  व शासकीय यंत्रणेचा गैरवापर करून चालु असलेला फार्स तातडीने बंद करावा, गुरूकुंज मोझरी या पवित्र स्थळी दिलेला ‘जनादेश न मागण्याच्या’ वक्तव्यावर ठाम राहात घरचा रस्ता धरावा असे थेट आव्हान नाना पटोले यांनी दिले. मुख्यमंत्र्यांनी ‘सवयीप्रमाणे’ आपला शब्द न पाळल्यास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी, मित्रपक्ष आणि विवीध संघटनांच्या माध्यमातून पर्दाफाश महामेळावे आयोजीत करण्यात येतील अशी माहिती त्यांनी दिली.

२०१४ पासून जर फडणवीस सरकारने खरोखरच सिंचन, शेती, शहर विकास, दुष्काळ, बेरोजगारी निर्मुलन, आदिवासी, मागासवर्गीय,अल्पसंख्यांक, विविध जातीसमुह यांच्या विकासासाठी व समस्या सोडविण्यासाठी काही टक्के जरी काम केले असते तर भाजप सेना  सरकारला राज्यात पंचतारांकीत सुविधा उपभोगत महाजनादेश यात्रेची नौटंकी करण्याची गरज भासली नसती. जनता आपल्या कारभारावर प्रचंड नाराज आहे हे या सरकारला पोलीस यंत्रणेकडून समजले आहे. त्यामुळेच हा अवाढव्य खर्च करून जनतेला भुलथापा देण्याचा कार्यक्रम सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने हे आव्हान स्विकारून चर्चेला यावे अन्यथा पर्दाफाश होण्यासाठी तयार राहावे असे आव्हान यावेळी माजी खासदार नाना पटोले यांनी केले.

 १) २०१४-१५, २०१५-१६, २०१६-१७, २०१७-१८ व २०१९-२० या वर्षात नैसर्गिक आपत्तीसाठी एस.डी.आर.ए./ एन.डी.आर.ए. मधुन जी १६५०० कोटी रू.पेक्षा जास्त मदतनिधी विशेषतः दुष्काळग्रस्तांसाठी आला तो आपत्ती मदत निधी मा.मुख्यमंत्री- चेअरमन असलेल्या राज्य आपत्ती निवारण प्रधिकरण (एस.डी.एम.ए.) ने एस.डी.आर.एफ.च्या स्वतंत्र खात्यात (नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट २००५ सेक्शन ४८ नुसार बंधनकारक असतांना) न ठेवता तसेच एस.डी.आर.एफ.मधुन प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अथॉरिटी जो (डी.डी.एम.ए.) चेअरमन संबंधीत मा.जिल्हाधिकारी यांच्या नियंत्रणाखाली डी.डी.आर.एफ खात्यात वर्ग करून त्यातूनच जिल्ह्यातील आपत्ती निर्धारणासाठी केंद्राच्या आपत्ती विभागाने ठरवून दिलेल्या निकषाप्रमाणे खर्च न करता हा संपुर्ण पैसा १६ हजार ५०० कोटीपेक्षा जास्त बीडीएस (अर्थसंकल्पीय विवरण प्रणाली) द्वारे बेकायदेशीर का खर्च केला याचा तातडीने खुलासा करावा आणि या महाघोटाळ्याची तातडीने चौकशी करून आपली स्वतःची जबाबदारी निश्चित करावी/करून घ्यावी अन्यथा मा.उच्च न्यायालयाच्या माध्यमातून हे सत्कर्म आम्हाला करावे लागेल.

२) २०१४-१५ पासून राज्यसरकारने राज्यातील जनतेवर पेट्रोल डिझेलवर दुष्काळ कर ४.५० ते ६.५० रूपयांचा जो जिझीया कर लावला आहे तो दरवर्षी आणि गेल्या पाच वर्षात दर वर्षी किती गोळा झाला? एकुण किती गोळा झाला? तो दुष्काळावरच खर्च केला का?नेमका कुठे खर्च केला? त्याची अधिकुत आकडेवारी जाहिर करावी. आमच्या माहितीप्रमाणे दुष्काळ कर म्हणुन राज्य सरकारकडे दरवर्षी ४२०० ते ४८०० कोटी रूपये आणि ५ वर्षात जवळपास १६ हजार ते १८ हजार कोटी रूपये पेट्रोल डिझेल करातून आलेले आहे. हे पैसे नेमके कुठल्या खात्यात जमा केले? कोणत्या नावाने जमा केले? आणि कशासाठी जमा केले याचा हिशोब महाराष्ट्रातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला पाहिजे.

३) मोझरी जिल्हा अमरावती येथे बोलतांना देवेंद्र फडणवीस यांनी २ हजार पेक्षा जास्त गावे राळेगण सिद्धी सारखी आदर्श पाणलोट क्षेत्र म्हणुन विकसीत केली असून २५ हजार पेक्षा जास्त गावात पाणलोट विकासाची कामे सुरू आहेत अशी दामदुप्पट थाप ठोकुन दिली.त्यामुळे माझे त्यांना आव्हान आहे की त्यांनी त्या २ हजार गावांची यादी जाहिर करावी जेणेकरून महाराष्ट्रातील पत्रकार व या क्षेत्रातील जाणकारांना त्याचा अभयास करता येईल. तसेच त्या गावाचे शास्त्रीय पाणलोट आराखडे, वाटर बॅलन्स आणि वाटर ऑडिटही जाहिर करावे आणि त्या पाणलोट क्षेत्र विकसीत आदर्श गावांना सरकारचे मंत्री, अधिकारी, संबंधीत जिल्ह्यातील विरोधी पक्षाचे आमदार अथवा पदाधिकारी, पत्रकार असा संयुक्त अभयासदौरा आयोजीत करून वस्तुस्थिती दाखवून द्यावी. अन्यथा या २ हजार व २५ हजार गावांचे महापोलखोल अभियान काँग्रेस तर्फे राबविण्यात येईल.

४) पाणी फाऊंडेशन, अनुलोम, औषधी-वैद्यकीय मदत कक्ष, मुख्यमंत्री कार्यालय या आणि अशा संस्था/योजना हा राज्यसरकारचा भाग आहे की कसे? यांच्या माफत राबविण्यात येणाऱ्या विवीध योजना या शासकीय आहेत की, एनजीओ की हायब्रीड (शासन यंत्रणा+ फंडींग=वैय्यक्तीक संस्था) याचा खुलासा करावा. या संस्था योजनेचे श्रेय आणि फंडींग नेमके कोणाचे? राज्य सरकार, आणि या संस्था यांचे नेमके नाते संबंध/आर्थिक व्यवहार/ श्रेय व्यवहार/स्पधिेर्शवाय तांत्रिक मनुष्यबळ-कौशल्य, पुर्वानुभवाशिवाय इतरांना डावलून यांच्यावर मेहरनजर असण्याची कारणे काय?

५) दुष्काळमुक्ती-सिंचन क्षमता वाढ- नदीजोड प्रकल्प याच्या ज्या दामदुप्पट गप्पा मा.देवेंद्र फडणवीस यांनी मोझरी-अमरावती येथे आणि महाजनादेश यात्रेच्या पुढील टप्प्यात वर्धा येथे मारल्या त्या संबंधात…

अ) पश्चिम वाहिनी नद्या खोऱ्यातून नारपार गिरणा, पार गोदावारी, दमनगंगा, वैतरना गोदावरी, दमनगंगा, एकदरे गोदावरी हे राज्यांतर्गत प्रकल्प आणि दमनगंगा पिंजाळ हा आंतरराज्यीय प्रकल्पा संदर्भात आपण जी घोषणा केली आणि मराठवाडा खान्देशला काही टि.एम.सी.पाणी देऊन दुष्काळमुक्त करू अशी जी घोषणा केली त्या संदर्भात महाराष्ट्र राज्याकडे पश्चिमी वाहिनी नदी खोऱ्यामध्ये एकंदरीत किती टिएमसी पाणी उपलब्ध आहे याचे सर्वेक्षण झाले आहे काय? पाण्याची नेमकी निश्चिती झाली आहे का?असेल तर तो सर्वेक्षण रिपोर्ट आणि एकंदर पाणी उपलब्धता राज्य सरकारने तातडीने जाहिर करावी.

ब) दमनगंगा पिंजाळ हा प्रकल्प वेगळा काढून त्याला गुजरात सरकार एक रूपयाही निधी उपलब्ध करून देत नसतांना त्यापैकी एक लिटरही पाण्यावर गुजरातचा हक्क नसतांना सदर प्रकल्प आंतरराज्यीय प्रकल्प जाहिर करायचे कारण काय? या प्रकल्पातून राज्य सरकार महाराष्ट्रातील जनतेची दिशाभुल करून महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त जनतेच्या हक्काचे नेमके किती पाणी राज्य सरकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गिरीष महाजन हे गुजरातला आणि मुंबईहुन पळवून गुजरातला नेलेल्या डोलेरा या आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र शहराला किती पाणी देणार आहे याचा खुलासा राज्य सरकारने करावा. मा.मुख्यमंत्री टाटा धरणातील ५० टि.एम.सी पाणी तसेच कोयनेतील ८९ टि.एम.सी.पाणी दुष्काळग्रस्त भिमाखोऱ्यात वळविण्यासंदर्भात का गप्प आहे? टाटाचा असा धसका मुख्यमंत्र्यांनी का घेतला?

क) वर्धा येथे बोलतांना मुख्यमंत्र्यांनी तेलंगणाला वाहुन्ा जाणाऱ्या पाण्यापैकी पाईपलाईनने वाहुन आणुन ५० टि.एम.सी. पाणी गोदावरी खोऱ्यामध्ये वळवून पिढ्यांपिढ्यांचा दुष्काळ संपविण्याचे स्वप्न दाखविले आहे. त्या संदर्भात तेलंगणा आणि महाराष्ट्राच्या पाणी वाटप कराराप्रमाणे एकंदर २६७ टिएमसी पाणी खरंच उपलब्ध आहे का? आणि या पाणी उपलब्धतेचा सर्व्हे सिंचन विभागाने/राज्य सरकारने केला आहे का? आणि मुख्यमंत्री जबाबदारीने बोलले असे समजुन त्यांनी तो २६७ टिएमसी पाणी उपलब्धता सर्वे रिपोर्ट महाराष्ट्रातील जनतेसाठी तातडीने जाहिर करावा. वरील सर्व दुष्काळमुक्तीचे नद्याजोड प्रकल्प केवळ निवडणुक जुमला ठरू नयेत यासाठी वरील सर्व प्रकल्पाची पाणी उपलब्धता आणि सर्व रिपोर्ट तातडीने जाहिर करावे.