Home Authors Posts by admin

admin

6465 POSTS 0 COMMENTS

0 137

नाना पटोले यांची मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी

स्वाती इंगवले : मुंबई

मुंबई पोलिसांनी शनिवारी रात्री रेमडेसिवीरची साठेबाजी करणाऱ्या एका कंपनीच्या व्यवस्थापकाला व मालकाला ताब्यात घेतले असताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रविण दरेकर यांनी हस्तक्षेप करून पोलिसांवर दबाव टाकून त्याला सोडवले आणि तो साठा भाजपाने केंद्रीय मंत्र्यांच्या परवानगीने मिळवल्याचा दावा केला. वास्तविक रेमडेसिवीरचा साठा खाजगी व्यक्तीला करता येत नाही तर मग फडणवीस यांनी परवानगी कशी काय मिळवली?  केंद्रीय मंत्र्यांने भाजप आणि फडणवीसांना रेमडेसीवीरचा साठा आणि काळाबाजार करण्याची परवानगी दिली आहे का? असा प्रश्न उपस्थित करून महामारीच्या काळात साठेबाजांवर पोलीस कारवाई करत असताना त्यात हस्तक्षेप करण्याच्या गंभीर प्रकाराची चौकशी करून दबाव टाकणा-या देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून केली आहे.

यासंदर्भात बोलताना पटोले म्हणाले की, ५० हजार रेमडेसिवीर इंजेक्शन मुंबईत येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी कारवाई केली व ब्रुक फार्मा कंपनीच्या एका अधिका-याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याची सखोल चौकशी करून ते रेमडेसिवीर इंजेक्शन तात्काळ जनतेला उपलब्ध करून दिले पाहिजेत.

आज राज्यात रेमेडीसीवर, ऑक्सिजनचा मोठ्या प्रमाणात तुडवडा असून केंद्र सरकार राज्याबरोबर आणि राज्यातील जनतेबरोबर जे घाणेरडे राजकारण करत आहे ते निषेधार्ह आहे. रेमडेसीवरच्या तीव्र टंचाईच्या पार्श्वभूमिवर काही कोटींचा रेमडेसीवरचा साठा कुठून आला ? याचा काळा बाजार करणारे ते कोण आहेत? या प्रश्नांची उत्तरे जनतेला मिळाली पाहिजेत आणि फडणवीस यांनी दाखवलेले ते पत्र सार्वजनिक केले पाहिजे. केंद्र आणि राज्य सरकारच्या भानगडीत जनता भरडली जाणार नाही याची खबरदारी घेऊन या संकटात आपण जनतेला सर्व प्रकरणाची आरोग्य सेवा उपलब्ध करून द्यावी आणि कोरोनाच्या या महामारीत जनतेचे जीव वाचवण्यासाठी आपण कसोशीने प्रयत्न करावेत असे पटोले यांनी पत्रात म्हटले आहे.

0 127

स्वाती इंगवले : नवी मुंबई

नवी मुंबई शहरात कोरोना महामारीने सुरू केलेले तांडव रविवारीही (दि. १८) कायम असल्याचे पहावयास मिळाले. नवी मुंबई शहरात रविवारी नव्याने ८२१ रूग्णांची भर पडली असून ११४४ रूग्णांना आज डिसचार्ज देण्यात आला आहे. आज शहरामध्ये कोरोनामुळे ८ जणांचा मृत्यू झाल्याने चिंतेचे सावट वाढीस लागले आहे.

आज नवी मुंबईत ३२७० नागरिकांनी रॅपिड अॅण्टीजेन टेस्ट केली असून आजवर शहरात १२६८ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. शहरातील वाशीमधील सेक्टर १४ येथील कोव्हिड केअर सेंटरमध्ये ९८ कोरोना रूग्णांवर,  नेरूळमधील आगरी कोळी भवनात ११७ कोरोना रूग्णांवर,  ऐरोली सेक्टर ५ मधील कोव्हिड केअर सेंटरमधील ७६ कोरोना रूग्णांवर, वाशीतील ईटीसी कोरोना केंद्रात १७९ कोरोना रूग्णांवर, कोपरखैराणे सेक्टर ५ मधील बहूउद्देशीय कोव्हिड केअर सेंटरमध्ये ९२ कोरोना रूग्णांवर, वाशी एक्झिबिशन सेंटरमधील कोव्हिड केअर सेंटरमध्ये  ६९१ कोरोना रूग्णांवर, ऐरोली सेक्टर १५ मधील सेवा पाटीदार सभागृहातील कोव्हिड केअर सेंटरमध्ये २०३ कोरोना रूग्णांवर,  तूर्भे सेक्टर १९ मधील निर्यात भवनातील कोव्हिड केअर सेंटरमध्ये ३२८ कोरोना रूग्णांवर,  तुर्भे सेक्टर २४ मधील राधास्वामी सत्संगमधील कोव्हिड केअर सेंटरमध्ये ३३५ कोरोना रूग्णांवर,  सानपाडा एमजीएम रूग्णालयातील कोव्हिड केअर सेंटरमध्ये ६७ कोरोना रूग्णांवर,  डीवायपाटील रूग्णालयातील महापालिका कोरोना केंद्रात ३२१ कोरोना रूग्णांवर उपचार सुरू आहेेत.

0 96

नवी मुंबई : महानगरपालिका क्षेत्रातील 49 केंद्रांवर कोव्हीड लसीकरण केले जात असून दररोज साधारणत: 7 हजाराहून अधिक नागरिकांचे लसीकरण केले जात आहे. लसीकरण केंद्रांमध्ये वाढ करीत महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनानुसार लसीकरण प्रक्रियेला अधिक गती देण्याचा प्रयत्न केला जात असून आत्तापर्यंत 1 लाख 75 हजार 873 नागरिकांचे लसीकरण पूर्ण झालेले आहे. त्यामध्ये आज शासनाकडून आणखी 20 हजार कोव्हीशील्ड लसींचा साठा प्राप्त झालेला असून सर्व लसीकरण केंद्रांवर चांगला प्रतिसाद लाभत आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेच्या वाशी, नेरूळ, ऐरोली या तीन रुग्णालयांत अहोरात्र 24 x 7 लसीकरण करण्यात येत आहे तसेच तुर्भे येथील रामतनु माता बाल रूग्णालय आणि सर्व 23 नागरी आरोग्य केंद्रे याठिकाणी सकाळी 9 ते सायं. 5 या वेळेत लसीकरण केले जात आहे. त्यासोबतच वाशी सेक्टर 5 येथील ईएसआयएस रूग्णालयामधील जम्बो लसीकरण केंद्रामध्ये 4 बूथ सकाळी 8 ते रात्री 8 या कालावधीत कार्यरत आहेत. नवी मुंबई महानगरपालिकेच्या सर्व  केंद्रांवर आठवड्याचे सातही दिवस मोफत लसीकरण करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे 21 खाजगी रुग्णालयांमध्येही शासनाने निश्चित केलेल्या रु. 250/- प्रति डोस दराने लसीकरणाची सुविधा उपलब्ध आहे.

      1 एप्रिलपासून 45 वर्षावरील नागरिकांचे लसीकरण सुरू करण्यात आलेले असून अशा 74124 नागरिकांचे लसीकरण झालेले आहे. सध्या नव्याने पहिलाच डोस घेणा-या नागरिकांना कोव्हीशील्ड लसीचा डोस दिला जात आहे. कोव्हीशील्ड लसीचा पहिला डोस घेऊन झाल्यानंतर दुसरा डोस 6 ते 8 आठवडे कालावधीमध्ये घ्यावयाचा आहे.

      ज्यांनी कोव्हॅक्सिनचा पहिला डोस घेतला आहे त्यांनी दुसराही डोस कोव्हॅक्सिनचाच घेणे आवश्यक असून तो 4 ते 6 आठवडे कालावधीमध्ये घ्यावयाचा आहे. कोव्हॅक्सिन लसीचा दुसरा डोस घेण्याची सुविधा वाशी, नेरूळ व ऐरोली येथील महापालिका रूग्णालयांमध्ये उपलब्ध आहे.

      यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कोव्हीशील्ड अथवा कोव्हॅक्सिन यापैकी ज्या लसीचा पहिला डोस घेतला आहे त्याच लसीचा दुसरा डोस विहित कालावधीमध्ये घ्यावयाचा आहे.

      45 वर्षावरील प्रत्येक नागरिकाने कोरोनापासून बचावासाठी अतिशय सुरक्षित असलेले कोव्हीड लसीकरण करून घ्यायचे असून याकरिता नागरिकांना प्रोत्साहित करण्यासाठी सर्व नागरी आरोग्य केंद्र पातळीवरही मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात येत आहे.         

0 116

काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र

मुंबई : महाराष्ट्र शासनाने कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर घोषित केलेल्या पॅकेजमध्ये शेतकरी, सलून दुकानदार, फुल विक्रेते, टॅक्सी चालक, मासळी विक्रेते, मुंबईतील डबेवाले व छोटे व्यावसायिक यांचा समावेश करण्यात आलेला नाही. कोरोनावर मात करण्यासाठी लागू करण्यात आलेल्या संचारबंदीत हे घटकही प्रभावित होणार असल्याने त्यांच्यासाठीही पॅकेजमध्ये तरतूद करून या घटकांनाही उचित न्याय द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.  

यासंदर्भात पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले असून या पत्रात पुढे असे म्हटले आहे की, राज्यात कोरोना महामारीची भयंकर स्थिती पाहता महाराष्ट्र शासनाने कोरोनाची साखळी तोडण्यासाठी संचारबंदी घोषित केली आहे, त्याचे काँग्रेस पक्षाच्या वतीने स्वागत आहे. लोकांचे जीव वाचविणे ही आपली प्राथमिकता असून त्यासाठी काँग्रेस पक्ष खंबीरपणे आपल्यासोबत उभा आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत झालेल्या चर्चेनुसार संचारबंदी कालावधीसाठी छोट्या व्यावसायिकांकरिता आपण पॅकेज जाहीर केले आहे, त्याबद्दल काँग्रेस पक्षाच्या वतीने आपले मनस्वी स्वागत आहे. मात्र या पॅकेजमध्ये अजून काही घटकांचा समावेश करणे गरजेचे आहे आणि त्यासाठी काँग्रेसची आग्रही भूमिका राहणार आहे.

संचारबंदीच्या कालावधीत भाजीपाला, फळबागायती व फुलांच्या शेती व्यवसायावर मोठा परिणाम होणार आहे. या कालावधीत मार्केटमध्ये मालाचा उठाव मोठया प्रमाणावर होत नाही, परिणामी शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होणार तसेच सलूनचे दुकान बंद असल्याने या व्यावसायिकांचेही मोठे आर्थिक नुकसान होणार आहे आणि या कालावधीत सर्व धार्मिक स्थळांवर बंदी असल्याने फुल विक्रेत्यांवरही उपासमारीची वेळ येणार आहे. मुंबईतील महत्वाचा घटक असलेल्या डबेवाल्यांचाही या पॅकेजमध्ये समावेश करून या घटकांना लाभ द्यावा, असे पटोले यांनी पत्रात म्हटले आहे.

0 198

नवी मुंबई : सारसोळे गाव आणि नेरूळ सेक्टर सहा परिसरात कमी दाबाने होत असलेल्या पाणीपुरवठ्याची समस्या दूर न झाल्यास महापालिकेच्या नेरूळ  विभाग अधिकारी कार्यालयावर बिसलेरी मोर्चा काढणार असल्याचा इशारा महापालिका ब प्रभाग समितीचे माजी सदस्य आणि सारसोळे गावातील कोलवाणी माता मित्र मंडळाचे अध्यक्ष मनोज यशवंत मेहेर यांनी नेरूळ विभाग अधिकाऱ्यांना लेखी निवेदनातून दिला आहे. यासंदर्भात मनोज मेहेर यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनाही निवेदन देवून कमी दाबाच्या पाण्याची समस्या दूर करण्याची मागणी केली आहे.

सारसोळे गाव आणि नेरूळ सेक्टर ६ परिसरात गेल्या दीड महिन्यापासून कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे महापालिकेच्या मालकीचे मोरबे धरण असतानाही सारसोळेच्या ग्रामस्थांना व नेरूळ सेक्टर ६ च्या रहीवाशांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. रात्री पालिका प्रशासनाकडून ३ तास पाणी येत असे, आता जेमतेम एक तासच पाणी येत आहे. बायपास लाईनला सर्वात जास्त पाणीपुरवठा कमी येत आहे. दोन दिवसापासून जलकुंभाच्या (टाकीच्या) लाईनकडूनही पाणीपुरवठा कमी दाबाने होवू लागला आहे. कोरोना तसेच लॉकडाऊनमुळे घरात राहणाऱ्यांची संख्या वाढू लागल्याने पाणी कमी पडू लागले आहे. २४ तास पाणी यामुळे घरातील हंडे नामशेष झाले आहेत.  २५ एप्रिलपर्यत या समस्येचे निवारण न झाल्यास कोरोनाबाबतीत महापालिका प्रशासनाने आखून दिलेल्या सर्वच नियमांचे पालन करून २६ एप्रिलला नेरूळ विभाग अधिकारी कार्यालयावर स्थानिक रहीवाशांचा मोर्चा काढण्याचा इशारा मनोज यशवंत मेहेर यांनी पालिका प्रशासनाला दिला आहे.

0 108

नवी मुंबई : कंटेंन्मेंट झोन व हॉटस्पॉट क्षेत्रात महापालिका प्रशासनाने सुरू केलेली अॅण्टीजेन टेस्ट नवी मुंबई शहरातील इतर भागातही सुरू करण्याची मागणी भाजपच्या युवती मोर्चाच्या अध्यक्षा सुहासिनी नायडू यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे लेखी निवेदनातून केली आहे.

 नवी मुंबई महापालिकेने अँटिजेन टेस्ट करण्यास सुरुवात केली आहे. मात्र कंटेंन्मेंट झोन व हॉटस्पॉट क्षेत्रातच ही टेस्ट केली जात आहे. मात्र शहराच्या कानाकोपऱ्यात कोरोनाचे वाढत असलेले रूग्ण पाहता कंटेंन्मेंट झोन वगळता देखील अनेक भागांत या टेस्ट होणे गरजेचे आहे. अनेक नागरिक स्वतःहून या टेस्ट करून घेण्यासाठी तयार आहेत. त्यामुळे कोरोनाची साखळी तोडण्याचसाठी पालिकेलाच मदत होणार आहे. पालिकेने प्रभाग क्र. ८४ मधील नेरूळ सेक्टर २ व ४ मध्ये अँटिजेन टेस्टचे कॅम्प लावावेत. सामाजिक कार्यकर्ते म्हणून आम्हीही पालिकेला मदत करून नागरीकांची जनजागृती करण्यास मदत करू. पालिकेने कोरोनाची साखळी तोडण्यासाठी व कोरोना महामारी नियत्रंणात आणण्यासाठी नवी मुंबई शहराच्या कानकोपऱ्यात अॅण्टीजेन टेस्ट सुरू करावी असे सुहासिनी नायडू यांनी निवेदनात म्हटले आहे.

0 114

नवी मुंबई : राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घटत चाललेला रक्तसाठा आणि रक्तासाठी रूग्ण व रूग्णाच्या नातेवाईकांना करावी लागणारी धावपळ पाहता महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसच्या सुचनेनुसार व भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसचे प्रवक्ते व नेरूळ ब्लॉक कॉंग्रेसचे अध्यक्ष रवींद्र सावंत यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेले रक्तदान शिबिर उत्साहात पार पडले.

नेरूळ सेक्टर २ येथील कॉंग्रेस जनसंपर्क कार्यालयात सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत आयोजित केलेल्या रक्तदान कार्यक्रमाला महाराष्ट्र प्रदेश कॉंग्र्रेसचे सचिव संतोष शेट्टी, नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसचे प्रवक्ते आणि नवी मुंबई इंटक अध्यक्ष रवींद्र सावंत, जिल्हा कॉंग्रेसच्या सचिव विद्या भांडेकर, जिल्हा कॉंग्रेसचे उपाध्यक्ष संतोष सुतार यांच्यासह सचिन वाघमारे, विवेक बनसोडे, दीपक थोरात, ओंकार सुकदिवे, संतोष धिवर, ताळेकर, माने, मंगेश गायकवाड, नितीन वाघमारे ,सुधीर पांचाळ, सुमित लंबे, सुदर्शन सावंत ,गौरव महापुरे, स्वप्नील सोरटे, ऋषिकेश राऊत, मंगल बागडे, विनायक तळेकर आदींनी भेटी दिल्या. या रक्तदान कार्यक्रमात स्थानिक रहीवाशी उत्साहाने सहभागी झाले होते. या कार्यक्रमात ६० हून अधिक बाटल्या रक्तसंकलन झाले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नेरूळ ब्लॉक कॉंग्र्रेसच्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

0 121

नवी मुंबई :  भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सानपाडा रेल्वे स्टेशनलगतच्या सेक्टर ३ येथील भाजपचे पांडुरंग आमले यांच्या जनसंपर्क कार्यालयात स्थानिक रहीवाशांच्या सहभागाने उत्साहात साजरी करण्यात आली.

या जयंती कार्यक्रमात पांडुरंग आमले, समाजसेविका सौ. शारदा आमले, भाजपाचे सानपाडा तालुका सरचिटणिस रमेश शेटे, सानपाडा महिला  मोर्चा तालुकाध्यक्षा आज्ञा गव्हाणे, सानपाडा तालुका महिला मोर्चा सचिव दिशा केणी, नाना शिंदे यांच्यासह स्थानिक रहीवाशी मोठ्या संख्येने हजर होते.

या कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार प्रदान करून यावेळी उपस्थितांना पेढे वाटण्यात आले. यावेळी रमेश शेटे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनपटाचा व कार्याचा आढावा घेतला.

0 95

मुंबई : कोरोनाने थैमान घातले असून राज्यातील सध्याची परिस्थिती अत्यंत भयावह आहे. रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असून रुग्णालयात बेड्स उपलब्ध नाहीत. ऑक्सीजन, रेमडेसीवीर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहे. राज्य सरकार त्यांच्या पातळीवर काम करत आहे परंतु पक्ष म्हणून काँग्रेसने या कठीण काळात लोकांच्या मदतीला धावून जाण्याचा संकल्प केला आहे, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.

क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या ‘राज्य कोविड मदत व सहाय्य केंद्राचे’ व्हर्च्युअल उद्घाटन नाना पटोले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुंबई विभागीय काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप, कार्याध्यक्ष शिवाजीराव मोघे, चंद्रकांत हंडोरे, बस्वराज पाटील, आ. प्रणिती शिंदे, आ. कुणाल पाटील, उपाध्यक्ष माणिकराव जगताप, आ. धीरज देशमुख आदींनी व्हीसीद्वारे भाग घेऊन आपली मतं मांडली व सुचनाही केल्या.

नाना पटोले म्हणाले की, कोरोना महामारीने मोठे संकट उभे ठाकले आहे. लोकांना वैद्यकीय मदतीची नितांत गरज आहे, अशा कठीण प्रसंगी काँग्रेस नेहमीच लोकांच्या मदतीला धावून जात असते. देशासाठी काम करण्यात काँग्रेस नेहमीच अग्रभागी राहिला आहे. आजच्या कोविड संकटातही लोकांना मदत करण्यासाठी काँग्रेसचा कार्यकर्ता तालुका, जिल्हा, वार्डा-वार्डातून दुःखीकष्टी जनतेच्या मदतीला धावून जाईल. जिल्हा काँग्रेसची सर्व कार्यालये २४ तास या मदत कार्यात उघडी राहतील. मुंबईतील टिळक भवन या पक्ष कार्यालयात मुख्य मदत केंद्र आहे. या मदत केंद्रावर येणाऱ्या फोनची नोंद घेऊन स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून त्यांना वैद्यकीय मदत मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाईल.

राज्यात सध्या रक्तचा भयंकर तुटवडा आहे. रक्ताची गरज लक्षात घेऊन महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनापासून ‘रक्तदान सप्ताह’ करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला आहे. राज्यभर काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून रक्तदान शिबिरे घेतली जातील. याकामात युवक काँग्रेस, एनएसयुआय, सर्व सेल व फ्रटंलचे सदस्य सहभाग घेतील. या माध्यमातून जमा करण्यात आलेले रक्त हे शासकीय रक्तपेढ्यांना दिले जाईल. मुंबईतून १० हजार रक्तपिशव्यांचे संकलन करण्याचा संकल्प मुंबई काँग्रेसने केल्याचे मुंबईचे अध्यक्ष भाई जगताप यांनी सांगितले.

0 99

नवी मुंबई : दैनिक सामना वृत्तपत्राचे मुख्य वृत्त प्रतिनिधी बाळासाहेब दारकुंडे यांचे वडील अप्पासाहेब पांडुरंग दारकुंडे यांचे आज सकाळी नगर येथील खाजगी रुग्णालयात अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्युसमयी त्यांचे वय ८३ वर्षे होते. त्यांच्या पश्चात मुलगा बाळासाहेब, मुलगी, जावई, सुना व नातवंडे असा मोठा परिवार आहे.

आप्पासाहेब दारकुंडे अहमद नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील सुरेगाव येथील एक प्रसिद्ध बागायतदार होते.  संपूर्ण अहमदनगर जिल्यात एक प्रयोगशील व प्रगतशील  बागायतदार म्हणून त्यांचा नावलौकिक होता. विविध प्रकारच्या मिरचीच्या उत्पन्नात त्यांचा हातखंडा होता. त्यांनी विकसित केलेले मिरचीचे वाण पाहण्यासाठी विविध ठिकाणच्या कृषी विद्यालयाचे विद्यार्थी त्याच्या शेतात गर्दी करीत असत. सामाजिक कार्याची आवड असलेले अप्पासाहेब हे विद्यार्थ्यांना सदैव मार्गदर्शन करीत असत. अप्पासाहेब यांचा अध्यात्माचाही गाढा व्यासंग होता. ते विठ्ठलाचे निस्सीम भक्त असल्याने ते गेली अनेक वर्षे आळंदी पंढरीची नेमाने वारी करीत असत. 

काल अस्वस्थ वाटू लागल्याने नगर येथील खाजगी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले होते. आज पहाटे त्यांचे निधन झाले. दुपारी सुरेगाव येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, कला क्रीडा क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

STAY CONNECTED