Home ठाणे

0 190

स्वयंम न्यूज ब्युरो : navimumbailive.com@gmail.com

मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष आणि माजी मंत्री सचिन अहिर हे राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकत शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा आहे. त्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी एका वृत्तवाहिनीलादिली आहे. ते म्हणाले, सचिन अहिर यांना लहान वयातच पवारसाहेबांनी सर्वकाही दिलं. त्यांना आमदार, मंत्री बनवलं आणि मोठं केलं. त्यांना मंत्रिपद मिळावं यासाठी मीसुद्धा बऱ्याचदा मध्यस्थी केली.

पवारसाहेबांनी सामान्य कार्यकर्त्याला मोठं करण्याचं काम केलं आहे. सध्या राष्ट्रवादी सोडून जात असलेल्या नेत्यासंदर्भात ते म्हणाले, सत्ता देणारा नथुराम हा सर्वांनाचा आवडायला लागला आहे. गांधी आता सत्ता देऊ शकत नसल्यानं जनता नथुरामाच्या पायाशी लोळण घेत आहे. वय वर्षं 80 असतानाही पवारसाहेब दौरे करतायत. साहेबांनी आम्हाला कुठल्या कुठे नेऊन ठेवलं आहे, असंही जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.   

तर काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राफेल प्रकरणावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर निशाणा साधला होता. पंतप्रधान मोदींवर आव्हाड यांनी यावेळी एका गाण्याच्या माध्यमातून टीका केली होती. पाकिस्तानच्या राष्ट्रीय दिनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इम्रान खानला शुभेच्छा पाठवल्या, यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली होती. पाकिस्तान हा जर इतका बदमाश देश आहे तर मग त्याला हे चोरून प्रेमपत्र पाठवायची काय आवश्यकता आहे? असा सवाल आव्हाडांनी केला होता.

पाकिस्तानला शुभेच्छा देण्यात गैर काहीच नाही. पाकिस्तानने जर दहशतवाद्यांना पाठिंबा द्यायचा थांबवलं, तर आपल्यालाही पाकिस्तानशी वैर ठेवण्यात काहीही रस नाही. उलट मैत्रीच हवी आहे. मात्र पाकिस्तानला शुभेच्छांचा संदेश भारतातर्फे पाठवला गेला हे आपल्याला भारत सरकारकडून कळलेलं नाही. तर पाकिस्तान कडून कळलं आहे. चाणाक्ष इम्रान खानने ट्विट करुन मोदी यांनी आपल्याला हा संदेश पाठवल्याचं जाहीर केलं. मग नरेंद्र मोदी यांनी हे जाहीर का केलं नाही ? या गोष्टीचा विचार केला तर मोदी यांचा दुटप्पीपणा दिसून येतो. एकीकडे अहोरात्र पाकिस्तानच्या नावाने शिमगा करायचा आणि दुसरीकडे चोरुन लव्हलेटर पाठवत बसायचं हाच तो दुटप्पीपणा आहे असा आरोप जितेंद्र आव्हाडांनी केला होता. 

0 2090

स्वयंम न्यूज ब्युरो

ठाणे : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मातब्बर नेते व ठाण्याचे माजी पालकमंत्री गणेश नाईक यांनी ठाणे लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवली आहे. वयाची ६९ वर्ष गाठली असून आजही  मी ठाण्यापर्यंत जाऊ शकतो, असे सूचक वक्तव्य नाईकांनी रविवारी नवी मुंबईतील आयोजित सायक्लोथॉनच्या वेळी केले आहे. त्यामुळे राजकारला आता नवे वळण येणार का ? अशी चर्चा सुरू आहे. गणेश नाईकांनी ठाण्यातून लोकसभा लढल्यास शिवसेनेच्या गडाला हादरा बसण्याची राजकारणात भीती व्यक्त केली जात आहे. गणेश नाईक निवडणूक रिंगणात उतरल्यास ठाण्यातील एकनाथ शिंदे व राजन विचारेविरोधक पडद्याआडून व वेळ पडल्यास पडद्यावर येवूनही गणेश नाईकांचे काम करण्याची शक्यता नाकारता येत नाही.

स्वच्छ पर्यावरण पूरक आणि आरोग्यमय मुंबई चा संदेश देण्यासाठी रविवारी नवी मुंबई ‘महासायकलेथॉन’चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी मंत्री गणेश नाईक यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी या वयातही आपण ठाण्यापर्यंत जाऊ शकतो असे सूचक वक्तव्य केले. या वक्तव्याबाबत त्यांनी अधिक स्पष्टीकरण दिले नसले तरी आगामी लोकसभा निवडणूकीची ही तयारी असल्याचे म्हटले जात आहे.  ठाणे लोकसभेसाठी ठाणे मतदार संघातून निवडणूक लढवण्याची इच्छा खुद्द शरद पवारांनीच  केली होती. या पार्श्वभूमीवर गणेश नाईक यांच्या वक्तव्याला महत्त्व प्राप्त झाले आहे.

ठाणे लोकसभा मतदार संघातील सध्याची राजकीय परिस्थिती पाहता नाईक कुटुंब लोकसभा निवडणूक लढवणार का ? याबाबत शंका उपस्थित केली जात आहे.. मात्र आता नाईकांच्या या सूचक वक्तव्यानंतर स्वतः गणेश नाईक ठाण्याच्या निवडणूक रिंगणात उतरण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे. नाईक निवडणूक लढवणार का ? त्याचा राष्ट्रवादीला किती फायदा होईल ? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

गणेश नाईकांनी २००९च्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणूकीपर्यत बेलापूर विधानसभा मतदारसंघाचे राज्यात प्रतिनिधीत्व केलेले आहे. बेलापूर विधानसभा मतदारसंघ हा अशिया खंडातील सर्वाधिक मोठा मतदारसंघ म्हणून ओळखला जायचा. १९९०च्या , १९९५च्या आणि २००४च्या विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीत या बेलापुर मतदारसंघातून एक लाखापेक्षा अधिक विक्रमी मतांनी विजय मिळविला होता. २००९च्या विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीपूर्वी बेलापूर या विधानसभा मतदारसंघाचे पाच विधानसभा मतदारसंघात विभाजन झाले. त्यापैकी ऐरोली व बेलापूर हे दोन विधानसभा मतदारसंघ नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रातच निर्माण झाले. २००९ साली गणेश नाईक बेलापूर मतदारसंघातून विजयी झाले तर २०१४ साली झालेल्या विधानसभा निवडणूकीवर मोदी लाटेचा प्रभाव असल्याने १३०० मतांनी गणेश नाईकांना पराभूत व्हावे लागले.

लोकसभा निवडणूकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या राज्यातील मातब्बर नेत्यांनी लोकसभा निवडणूक लढवावी असा आग्रह राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पक्षसुप्रीमो शरद पवार यांनी सुरूवातीपासून धरला आहे. गणेश नाईक, छगन भुजबळ, दिलीप वळसेपाटील, जयंत पाटील यासारख्या मातब्बरांना लोकसभा लढविण्याचे निर्देशही पवारांनी दिले होते. सुरूवातीला सर्वानीच स्वारस्य दाखविले नसले तरी गणेश नाईकांनी रविवारी कार्यक्रमाच्या माध्यमातून निवडणूक लढविण्याचे सुतोवाच केले. त्यामुळे ठाणे जिल्ह्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. नवी मुंबई हे गणेश नाईकांचे ‘होमपीच’ असल्याने व मोदी लाटेचा २०१४च्या तुलनेत प्रभाव ओसरल्याने राजन विचारेंना नवी मुंबईतून मतदान काढणे अवघड होवून बसणार आहे. गत निवडणूकीत २०१४ साली नवी मुंबईतून शिवसेनेच्या राजन विचारेंना ४७ हजाराची आघाडी मिळाली होती. तथापि गणेश नाईक हे नवी मुंबईकर उमेदवार असल्याने स्थानिक उमेदवार म्हणून नवी मुंबईकर गणेश नाईकांची पाठराखण करण्याची शक्यता आहे. त्यातच भाईंदरच्या राजकीय व सामाजिक क्षेत्राशी गणेश नाईकांचा आजही व्यक्तीगत संपर्क असल्याने गणेश नाईकांची उमेदवारी राजन विचारेंसाठी पर्यायाने शिवसेनेसाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. गणेश नाईकांनी शिवसेनेत अनेक वर्ष काम केल्याने ठाण्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांशी, नगरसेवकांशी, नेत्यांशी आजही गणेश नाईकांचे घरोब्याचे संबंध आहेत. राजन विचारे व पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सख्य नसणारे शिवसेनेचे घटक गणेश नाईकांना मदत करण्याची भीती शिवसेनेच्या वर्तुळात व्यक्त केली जात आहे. गंणेश नाईकांच्या लोकसभा निवडणूकीतील सूतोवाचामुळे शिवसेनेचे अंर्तगत राजकारण ढवळून निघाले असून ‘गणेश नाईक की ललकारी, अब दिल्लीपर सवारी’ हा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या घटकांकडून सोशल मिडीयावर संदेश ‘व्हायरल’ होवू लागला आहे.

ठाणे लोकसभा २०१४ निकाल

  • रांजन विचारे (शिवसेना) – ५ लाख ९५ हजार ३६४
  • संजीव नाईक (राष्ट्रवादी) – ३ लाख १४ हजार ६५
  • अभिजीत पानसे (मनसे) – ४८ हजार ८६३

0 250

अॅड, महेश जाधव

कल्याण : उन्हाळ्याचे दिवस सुरू होण्यास आठवडाच उरला आहे. राज्याच्या ग्रामीण भागात दुष्काळामुळे आताच पाणी टंचाई जाणवू लागली आहे. शुक्रवारी उल्हासनगरमध्ये जलवाहिनी फुटल्याने लाखो लीटर पाणी वाया जाण्याची घटना घडली आहे. उल्हासनगर येथील भरतनगर परिसरातील रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरण काम वेगाने सुरू असताना जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले होते. यामुळे आधीच पाणीटंचाईने ग्रासलेल्या लोकांना दुष्काळात तेरावा महिना अशा परिस्थितीचा सामना करावा लागला आहे. अचानक फुटलेल्या जलवाहिनीमुळे संपूर्ण परिसर जलमय झाला आहे. एमआयडीसी मार्फत रस्त्याचे खोदकाम होत असताना अनेकदा जलवाहिन्या फुटण्याच्या घटना घडल्याचे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.

उल्हासनगर – ४ येथील सिमेंट काँक्रीटकरण रस्त्याच्या कामात जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाण्याची नासाडी गेल्या बऱ्याच दिवसांपासून त्याठिकाणी होत आहे. याशिवाय जवळपास हजाराहून अधिक नागरीकांनी घेतलेल्या नळजोडण्या या रस्त्याच्या कामामुळे तुटल्या गेल्याने त्यातून देखील मोठयाप्रमाणात पाण्याची नासाडी होत आहे. सकाळ संध्याकाळ फुटलेल्या जलवाहिनीतून पाणी वाहत असल्यामुळे भरतनगर परिसरात तलावाचे स्वरूप निर्माण झाले. याशिवाय फुटलेल्या जलवाहिनीतून माती आणि इतर सांडपाणी जात असल्यामुळे परिसरातील नागरीकांना गढूळ पाणी प्यावे लागत आहे. त्यामुळे त्या परिसरात रोगराई पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रस्त्याचे खोदकाम करताना कोणतीही दक्षता घेतली जात नसल्यामुळे ती पाण्याची मुख्य जलवाहिनी फुटल्या गेल्याने होणाऱ्या लाखो लिटर पाण्याच्या नासाडीकडे पाणीपुरवठा विभागाचे दुर्लक्ष केले जात आहे. फुटलेल्या जलवाहिनीतून पाणी थांबविण्यासाठी नागरीकांनी प्लास्टिक लावून पाण्याची गळती थांबविण्याचा प्रयत्न करत आहेत.

 

0 431

मुंबई : ठाणे, मुंबईला पाठवण्यात येणारा मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. ठाणे गुन्हे शाखा युनिट 1 ने ही कारवाई केली आहे. अमरावती येथून हा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला असून दोघा आरोपींनाही अटक करण्यात आली आहे. आरोपींकडे १४० पिस्तूल आणि ४० जिवंत काडतूसं सापडली आहेत. शोएब इसाक शेख आणि रहीम शेख अशी या आरोपींची नावे आहेत.

ठाणे पोलिसांना शोएब इसाक शेख आणि रहीम शेख अमरावती येथील शीतल हॉटेलमध्ये श्स्त्र विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. यानंतर पोलिसांनी सापळा रचून दोन्ही आरोपींना अटक केली. 10 ते 70 हजारांपर्यंत या बेकायदेशीर शस्त्रांची विक्री केली जात होती अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. शस्त्रांसहित पोलिसांनी आरोपींकडून तीन लाख रोकड आणि 10 मोबाइल जप्त केले आहेत.

0 622

राफेलचे भूत मोदींच्या मानगुटीवरून उतरणार नाही

ठाणे : राफेल लढाऊ विमान खरेदी व्यवहारात डसॉल्ट कंपनी आणि फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांशी केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच चर्चा केलेली आहे. या चर्चेमध्ये परराष्ट्र मंत्री, संरक्षण मंत्री, संरक्षण सचिव, हवाई दलाचे प्रमुख आदी कोणीही सहभागी झालेले नव्हते. या खरेदी व्यवहारात देशाच्या इतिहासातील सर्वात मोठा घोटाळा झाला असून हा घोटाळा उघडकीस येण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अनिल अंबानी यांची नार्को टेस्ट करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत केली आहे.

ठाणे शहर काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात पत्रकार परिषदेला संबोधित करताना सावंत म्हणाले की, संयुक्त संसदीय समितीच्या चौकशीमध्ये पितळ उघडं पडणार असल्याने घर घर मोदीचा नारा देणारे आता डर डर आणि थर थर मोदी झाले आहेत. युपीए सरकारने आंतरराष्ट्रीय स्तरावर खुल्या निविदा मागवून एका राफेल विमानाची किंमत 526.10 कोटी निश्चित केली होती. म्हणजेच 36 विमानांची एकूण किंमत 18 हजार 940कोटी होती. पण मोदी सरकारने एका विमानाची किंमत 1670. 70 कोटी रुपये किंमत मोजली. म्हणजेच मोदी सरकारने 36 विमानासाठी एकूण60 हजार 145 कोटी रुपयांना खरेदी केले. या खरेदी व्यवहारात मोदी सरकारने देशाचे 41 हजार 205 कोटींचे नुकसान केले. नरेंद्र मोदी यांनी हिंदुस्थान एरॉनॉटिक्स या सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीला मिळणारे 30 हजार कोटींचे कंत्राट, राफेल खरेदी कराराच्या 12 दिवसापूर्वी स्थापन झालेल्या रिलायन्स डिफेन्स या खाजगी कंपनीला देऊन तसेच 1 लाख कोटी रुपयांचे लाईफ सायकल कंत्राट देऊन अंबानीला फायदा केला. राफेल लढाऊ विमान खरेदीत देशाच्या इतिहासातील सर्वात मोठा घोटाळा झाला आहे. या प्रकरणी मोदी सरकारने सर्वोच्च न्यायालयात खोटी माहिती देऊन व असत्य बोलून न्यायालयाची दिशाभूल तर केली आहे. सोबतच संसदेच्या विशेष अधिकाराचे उल्लंघन केले आहे. राफेल घोटाळा हा देशाचे नुकसान करणारा, देशाची सुरक्षा धोक्यात आणणारा, देशाहिताचे नुकसान करणारा, सरकारी कंपनी हिंदुस्थान एरॉनॉटिक्स लिमिटेडचे नुकसान करणारा व मोदींच्या उद्योगपती मित्रांच्या फायद्याचा आहे. 2014 च्या निवडणुकीत जनतेला खोटे बोलून ठगवणा-या मोदींनी राफेलप्रकरणी सर्वोच्च न्यायालयालाही ढगवले आहे. 

कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटीला डावलून राफेल विमान खरेदी केले गेले. कॉन्ट्रक्ट निगोसिएशन कमिटी व प्राईज निगोसिएशन कमिटीकडून किंमतीची पडताळणी करुन घेण्याच्या प्रक्रियेचे पालन करण्यात आले नाही. डिफेन्स एक्विजिशन कौन्सिलला डावलले. कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटीची पूर्वपरवानगी घेण्यात आली नाही. हवाई दलाला 126 लढाऊ विमानांची गरज असताना मोदींनी विमानांची संख्या कमी करुन 36केली गेली. विमानाचे तंत्रज्ञान हस्तांतरण करण्यात येणार नाही. संरक्षण मंत्रालयाच्या अर्थ विभागाचे प्रमुख सुधांशु मोहंती यांनी बेंचमार्क किंमत5.2 बिलियन युरोवरुन 8.2 बिलियन करण्यामागे मोदी सरकारने केलेला भ्रष्टाचार हेच कारण असल्याचे म्हटले आहे. त्याचे उत्तर का दिले जात नाही? सोवरेन गॅरेंटीची अट का काढली? देशहिताशी तडजोड का केली ? असे प्रश्न सावंत यांनी उपस्थित केले.

 राफेल प्रकरणी मोदी सरकारने सर्वोच्च न्यायालयाची दिशाभूल करुन स्वतःला क्लीन चीट देण्याचा प्रयत्न केला आहे. राफेल प्रकरणात नरेंद्र मोदी यांनी खाजगी कंपनीचे मध्यस्थ म्हणून काम केल्याचे सिद्ध झाले आहे. यासाठी त्यांनी सर्वोच्च न्यायालयात चुकीचे प्रतिज्ञापत्र दाखल करुन सर्वोच्च न्यायालयाचा अवमान केला आहे. मोदी यांना जनतेच्या न्यायालयातच शिक्षा होईल, यासाठी राफेल घोटाळा प्रकरणाचा पर्दाफाश करण्यासाठी येत्या काळात जनतेत जाऊन पाठपुरावा करणे, प्रबोधन करणे, पत्रकार परिषदा आयोजित करणे, आंदोलन करणे याद्वारे काँग्रेस पक्ष कार्यरत राहील, असे सचिन सावंत यांनी सांगितले.

या पत्रकारपरिषदेला ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मनोज शिंदे, राम भोसले, सदानंद भोसले, बी एन सिंग, महेंद्र म्हात्रे, रमेश इंदिसे,जे बी यादव, रवींद्र आंग्रे आदी उपस्थित होते.

0 385

ठाणे : ठाण्यात स्थानिक वृत्तवाहिनी संचालक म्हणून ठाण्यात दुसऱ्या क्रमांकावर असलेले जेष्ठ स्थानिक वृत्तवाहिनी संपादक आणि अनेक कॆमेरामॅन, पत्रकारांच्या कार्यशाळाचे संचालक असलेले श्रीराम भिडे मास्तर यांचे सोमवारी सकाळी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी आणि मुलगा असा परिवार आहे.

स्थानिक वृत्तवाहिनी सुरु करण्याचा दुसरा मान पटकाविणारे स्वर्गीय भिडे मास्तर हे गेल्या २५ वर्षांपासून जास्त काळ स्थानिक वृत्तवाहिनी संचालक म्हणू कार्यरत होते. ठाण्यात स्थानिक वृत्तवाहिनी “ठाणे समाचार” हि सुरु करून दुसरा क्रमांक मिळवला होता. ठाणे समाचार या वृत्तवाहिनीतून अनेक कॆमेरामॅन आणि पत्रकाराची निर्मिती भिडे मास्तर यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. कालांतराने त्यांनी “ठाणे परिक्रमा” नावाची स्थानिक वृत्तवाहिनी सुरु केली. आज मोठ्या राष्ट्रीय वृत्तवाहिनीच्या कॆमेरामॅन किंवा पत्रकार म्हणून वावरणाऱ्या पत्रकारांचे :ठाणे समाचार” हे उगमस्थान होते. तर या निर्मितीच्या कार्यशाळेचे संचालक स्वर्गीय भिडे मास्तर होते. सोमवारी त्यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाल्याने वृत्तपत्र आणि स्थानिक वृत्तवाहिनीच्या पत्रकारांमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या पार्थिव देहावर सोमवारी संध्याकाळी माजिवडा येथील स्मशानभूमीत त्यांच्या पत्रकार मित्र, सहकारी आणि शिष्याच्या उपस्थित अंत्यसंस्कार करण्यात आले.

0 639

ठाणे : राज्याच्या ग्रामीण भागात वास्तव्याला असलेल्या अनुसूचित जाती आणि जमातीच्या प्रत्येक कुटुंबाला २०१९ अखेरपर्यंत पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत हक्काचे घर दिले जाईल. तर, शहरी भांगातील कुटुंबासाठी २०२२ पर्यंत घरांचे नियोजन केले आहे. महात्मा फुले मागासवर्गीय महामंडळाचे राज्यमंत्री पदाच्या दर्जाचे अध्यक्षपद आरपीआयच्या एका नेत्याला येत्या तीन दिवसांत दिले जाईल, या घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी ठाण्यातील आरपीआयच्या (आठवले गट) मेळाव्यात केल्या. 

ठाण्यातील हायलॅण्ड येथील मैदानात हा मेळावा आयोजित करण्यात आला होता. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यासह आयपीआयचे नेते व्यासपीठावर उपस्थित होते. देशाला स्वातंत्र्य मिळून ७० वर्षे लोटली, तरी अनुसूचित जाती आणि जमाती वाईट अवस्थेत जगत आहेत. काँग्रेस आघाडीने त्यांना कायम वाऱ्यावर सोडले. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, राजीव गांधी यांचे पुतळे गावागावांत उभारले. काँग्रेसच्या काही नेत्यांनी आपल्या वडिलांचे पुतळेसुध्दा उभारले. मात्र, बाबासाहेब आंबोडकरांच्या पुतळ्यासाठी एक इंच जागा किंवा निधी त्यांनी दिला नाही. ते आम्हाला जातीयवादी म्हणून हिणवायचे. मात्र, आम्हीच बाबासाहेबांच्या पुतळ्यासाठी ठोस निर्णय घेतल्याने त्यांची राजकीय दुकानदारी बंद व्हायची वेळ आली आहे, असा हल्लाबोलसुध्दा मुख्यमंत्र्यांनी केला. 

……….. 

… तर राज्य गहाण ठेवू 

महामानवाला मानवंदना देण्यासाठी त्यांचे स्मारक उभारण्यास आमचे सरकार कटिबद्ध आहे. त्यासाठी राज्य गहाण ठेवायला लागले, तरी तशी तयारी आमची आहे, असे विधानही मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलताना केले. 

…….. 

गुन्हे मागे घेऊ 

भीमा कोरेगाव हिंसेप्रकरणी दाखल झालेले गुन्हे मागे घेतले जातील, असा शब्द मी दिलेला आहे. मात्र, त्यासाठी जी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करायची आहे त्यात विलंब होत असून मी दिलेला शब्द कधी खोटा ठरणार नाही याची खात्री बाळगा ,असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. 

0 571

ठाणे : महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चा ६१ वा वर्धापन दिन सोहळा ३ ऑक्टोबरला ठाण्यातील ढोकाळी येथील हायलँड मैदानात आयोजित करण्यात आला असून या सोहळ्यास महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हश प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्यास रिपाइं च्या कार्यकर्त्यांनी मोठया संख्यने उपस्थित राहून महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकारांच्यासंकल्पनेतील व्यापक रिपब्लिकन पक्ष उभरण्याचा संकल्प करा असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी केले आहे.
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पक्ष ३ ऑक्टोबर १९५७ रोजी स्थापन करण्यात आला. तत्कालीन सत्ताधारी कॉंग्रेस पक्षाविरुद्ध देशातील प्रबळ व्यापक विरोधी पक्ष म्हणून सर्व समावेशकरिपब्लिकन पक्ष उभारण्याची महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांची संकल्पना होती. त्यानुसार सर्व जाती धर्मीयांचा पक्ष म्हणून सर्वसमावेशक रिपब्लिकन पक्ष साकारण्याचा आमचा प्रयत्न असून त्यामुळेच दरवर्षीआपण रिपब्लिकन पक्षाचा स्थपना दिवस आपण साजरा करतो. यंदाचा रिपाइंचा ६१ वा वर्धापन दिन असून हा सोहळा ठाण्यातील हायलँड मैदानात ३ ऑक्टोबरला दुपारी ३ वाजता आयोजित करण्यात आला असून या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रिपाइं चे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले असून प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ; ठाण्याचे पालक मंत्री एकनाथ शिंदे ; राज्यमंत्री रवींद्र चव्हाण; महापौर मीनाक्षी शिंदे; खासदार कपिल पाटील; खा.राजन विचारे; आमदार संजय केळकर; आ . निरंजन डावखरे; आ. प्रताप सरनाईक ; आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष रामभाऊ तायडे असतील अशी माहिती रिपाइं तर्फे प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे .

 

0 453

ठाणे: मुंब्र्यातील शिळफाटा रोडवरील प्लास्टिक गोदामाला आग लागली आहे. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या चार गाड्या सध्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. सध्या अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अजून एक ते दोन तास लागण्याची शक्यता आहे. 

शिळफाटा रस्त्यावरील खान कंपाऊंडमधील प्लास्टिक गोदामाला सकाळी 6 च्या सुमारास आग लागली. गोदाम बंद असल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. या परिसरात अनेक गोदामं असल्यानं आग पसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. 

0 584

श्रीकांत पिंगळे

ठाणे : इनरव्हील क्लब ऑफ ठाणे नॉर्थ एंड व रोटरी क्लब ठाणे नॉर्थ यांच्या संयुक्त विद्यमाने वागळे इस्टेट कामगार हॉस्पिटल येथील ठाणे महानगर पालिकेच्या स्मशानभुमीत सुवासिक रातराणीचे वृक्षारोपण करण्यात आले, 
रात्रीच्यावेळी स्मशानात किरवंतानी दिलेला भडाग्नीचा धूर व नातेवाईकांची भावनिक कालवाकालव.अशा वेळी स्मशानभुमीत रातराणीच्या फुलांचा गंध दुःखाच्या ताणतणावातून रिल्याक्स करतो. यासाठी यावेळी प्रमुख पाहुणे ठाणे महापौर मीनाक्षी शिंदे ,रोटरीचे माजी गव्हर्नर कुमार केवलरमाणी, स्थानिक नगरसेविका एकता भोईर ,एकनाथ भोईर व दिलीप बारटक्के यांच्या उपस्थित रातराणीचे वृक्षारोपण करण्यात आले. तसेच महापौरांच्या हस्ते रातराणीचे वृक्षारोपणचे संवर्धन करणारे स्मशानभुमीतील माळी तुकाराम खेडकर व रुपेश पाटील यांच्या सत्कार व विशेष आभार मानण्यात आले. 
इनरव्हीलच्या अध्यक्षा मनीषा कोंडसकर यांच्या संकल्पनेतून हा प्रकल्प हाती घेण्यात आला. यावेळी चंद्रशेखर चिटणीस यांच्या स्मरणार्थ वैभवी चिटणीस यांच्या सहकार्यातून स्मशानभुमीत पाणपोईच्या ठिकाणी पाणी शुद्धीकरण यंत्र बसविण्यात आले. या वेळी रोटरीच्या प्रेसिडेंट शानोबार मुरली, विजयन नायर, प्रकाश ठाकूर ,विजय वाणी ,गिरीश नायर ,मीनल झेंडे, गीतांजली जगताप ,सुजाता ठाकूर, चांदणी मारवाह, शोभा डॅनियल, संगीता नागवंशी, शक्ती रवींद्र ,रवींद्र ,भावना वाणी डॉ कल्पना सुरडकर, आदी मान्यवर उपस्थित होते