Home ई - पेपर्स

कार्यकर्ता हा शेवटी कार्यकर्ताच राहतो,

नेत्यासाठी भांडतो, नेत्यासाठी राबतो,
नेता विजयी व्हावा म्हणून
रात्रीचा दिवसही हाच करतो
याची अपेक्षा तरी काय असते?
माझा नेता निवडून यावा,
नगरसेवक, आमदार, खासदार बनावा
नेता हेच याचे दैवत असते,
नेत्याप्रतीच याचे आयुष्यही समर्पित असते.
निवडणूकीत झोपत नाही
दिवसा प्रचार व रात्रीचा पहारा करतो
नेता मात्र काय करतो?
निवडणूक झाली की त्याला
कार्यकर्त्याचा विसर पडतो.
कार्यकर्त्याचा फोन जरी आला
तरी हा उचलण्याची तसदी घेत नाही,
कार्यकर्त्याला गरज भासली तरी
नेता धावून येत नाही,
कार्यकर्ता मात्र याच समजात असतो की
माझा साहेब ‘बिझी’ असेल
कार्यकर्ता हा कार्यकर्ताच असतो.
अशा प्रामाणिक कार्यकर्त्यांच्या बळावर
नेत्याचा माज असतो,
कार्यकर्ता राबतो म्हणून नेत्याचा
रूबाब असतो.
कार्यकर्त्याला नेत्याची सत्यता कळत नाही,
कारण डोळ्यावर नेत्याच्या प्रेमाची झापडं
लावलेली असतात.
निवडणुकीत सहजासहजी उपलब्ध होणारा नेता
निवडणूकीनंतर कार्यकर्त्यासाठी वेळ देत नाही.
कार्यकर्ता मात्र साहेबांच्या प्रेमात
भक्तीच्या महासागरात त्याचेच गोडवे गात असतो.

– सौ. स्वाती इंगवले
नेरूळ

मुंबई : १९९६ ची मुंबई मुंबईतील तेव्हाची परिस्थिती रुपेरी पडद्यावर पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. त्या दिवसात गाजलेली ‘दगडी चाळ’ तिच्या नावाचा दरारा आणि रुतबा काही औरच होता याच दगडी चाळीवर आधारित ‘दगडी चाळ’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
त्याकाळी ज्यांनी दगडी चाळीचा अनुभव प्रत्यक्ष अनुभवला आहे. त्यांच्या मनात त्या आठवणी नेहमीसाठी घर करून बसल्या आहेत. मंगलमूर्ती फिल्म्स आणि साई पूजा फिल्म्स यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. मंगलमूर्ती फिल्म्सने यापूर्वी देखील बर्‍याच हिंदी सिनेमांची निर्मिती केली असून मराठी चित्रपट निर्मितीचा त्यांचा हा पहिलाच प्रयत्न आहे. सिनेमाचे दिग्दर्शक चंद्रकांत कणसे यांनीही या सिनेमाच्या निमित्ताने पहिल्यांदाच दिग्दर्शन करण्याचे शिवधनुष्य हाती घेतलंय.
हा सिनेमा २ आँक्टोबर २०१५ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. मराठी चित्रपटातील आघाडीचा अभिनेता अंकुश चौधरी, पूजा सावंत, संजय खापरे अशी तगडी स्टारकास्ट असलेल्या या सिनेमात धडाकेबाज आणि जोशपूर्ण असं गणपती बाप्पावर चित्रित केलेलं गाणंदेखील आहे. गाणं ऐकताक्षणीच पाय थिरकतील असं दमदार संगीत देणारे अमितराज आणि गायक आदर्श शिंदे या जोडगोळीला ऐकण्याची संधी दगडी चाळच्या निमित्ताने पुन्हा मिळणार आहे.
एकूणच मराठीतील हा पहिला वाहिला स्टाईलिश ‘दगडी चाळ’प्रेक्षकांच्या मनात नक्कीच घर करेल त्याकाळात मुंबईवर आपली सत्ता प्रस्थापित करू पहात होते. त्यांचं सुरक्षा कवच असलेली दगडी चाळ सर्वश्रुत आहे, कारण गँग्ज आणि गँगवॉर्सच्या सर्कलमध्ये अडकलेली मुंबई. प्रतिकूल परिस्थितीत अपघाताने वाममार्गात अडकलेल्या एका सामान्य तरुणाच्या आयुष्याची कथा सिनेमात चित्रित करण्यात आली आहे.
मराठी सिनेसृष्टीच्या कारकिर्दीत दगडी चाळ हा पहिला वहिला मराठी सिनेमा प्रेक्षकांसाठी उत्कंठावर्धक असेल यात शंका नाही. या चित्रपटाचं केंद्रबिंदू गँगवॉर नसून त्यातील हळुवार फुलत जाणारी प्रेमकथा आहे. त्यामुळे यंगस्टर्ससाठी ही एक पर्वणीच असेल.

मुंबई : श्रृती हासनने चक्क अजय देवगणसोबतच्या एका मोठ्या बॅनरचा चित्रपट नाकारलाय. मिलन ल्युथरा सध्या अजय देवगणसोबत ‘बादशाहो‘ हा चित्रपटाची निर्मिती करीत आहे.
‘निर्मात्यांशी सुरवातीला झालेल्या चर्चांदरम्यान चित्रपटाच्या कथेवर आणि त्यातील तिच्या भूमिकेबद्दल श्रृती हासन खूश होती. म्हणून तिने तोंडी होकार कळविला होता. परंतु, चित्रपटाच्या करारावर स्वाक्षर्‍या करण्यापूर्वी तिने अंतिम स्क्रिप्ट पाहण्यासाठी मागितले,‘ असे सूत्रांनी सांगितले.
अंतिम स्क्रिप्ट पाहिले तेव्हा तिला सांगण्यात आलेली भूमिका त्यात नव्हती, त्यामुळे दिग्गज अभिनेते कमल हासन यांच्या या लाडक्या कन्येने सरळ चित्रपट नाकारला.
श्रृतीच्या हातात सध्या बॉलिवूड आणि दक्षिण चित्रपटसृष्टीतील मोठे प्रोजेक्ट आहेत. त्या तुलनेत ‘बादशाहो‘च्या स्क्रिप्टमध्ये मोठी भूमिका न मिळाल्याने तिने हा चित्रपट नाकारण्याचा निर्णय घेतला.

मुंबई : ट्विटरवर ‘द अल्टिमेट ड्रामेबाझ ऍन्ड नौटंकी’ अशी स्वत:ची ओळख करून देणार्‍या मॉडेल आणि अभिनेत्री अर्शी खाननं आता आपण पाकिस्तानचा क्रिकेटर शाहिद आफ्रिदी यांच्याशी सेक्स केला नाही, असा खुलासा केलाय.
‘होय, शाहिद आफ्रिदीशी मी सेक्स केला होता… आणि मला सेक्स करण्यापूर्वी भारतीय मीडियाच्या परवानगीची गरज नाही’ असं यापूर्वी अर्शीनं ट्विटरवर म्हणत एकच खळबळ उडवून दिली होती. शिवाय आपल्या काही ट्विटसमध्ये तिनं शाहिद आफ्रिदीलाही टॅग केलंय.
त्यानंतर मात्र, शाहिद आणि आपण केवळ फ्रेन्ड आहोत… आणि आमची बर्‍याचदा भेटही होते, असं तिनं आता ट्विटरवर म्हटलंय.
मला शाहिद आफ्रिदीसाठी न्यूड पोझ द्यायला काहीही हरकत नाही. पण, रोझलिन खान आणि पुनम पांडेप्रमाणे हे फोटो तुम्ही पाहू शकणार नसल्याचंही तिनं ट्विटरवर म्हटलंय.
आपल्या बर्‍याच ट्विटसमध्ये अर्शीनं अभिनेता आणि ’बिग बॉस’ या कार्यक्रमाचा होस्ट सलमान खान यालाही टॅग केलंय.
यामुळे आता अर्शी बिग बॉसच्या पुढच्या सत्रात दिसणार का? अशी चर्चा सुरू झालीय. अर्शीनंही आपल्याला या कार्यक्रमात सहभागी होण्याची इच्छा जाहीर केलीय.

नाशिक : देशोन्नती’चे शहर संपादक व ज्येष्ठ पत्रकार देवेन्द्र वानखेडे (४७) यांचे आज वर्धेतील विनोबा भावे रुग्णालयात निधन झाले. गेल्या पंचेवीस वर्षांमध्ये त्यांनी आपल्या दमदार लेखणीने पत्रकारितेच्या क्षेत्रात वेगळे स्थान निर्माण केले होते. महापालिका, जिल्हाधिकारी कार्यालय आणि विशेषतः राजकीय क्षेत्रातील वृत्तांकनातून मोठा जनसंपर्क त्यांनी तयार केला. विशेष म्हणजे राजकीय, सामाजिक आणि शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांसंदर्भातील वृत्तमालिका आणि विश्‍लेषणांच्या माध्यमातून त्यांनी आपला दबदबा निर्माण केला होता. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यांच्यावर आठवड्याभरापासून उपचारही सुरू होते. पण, मंगळवारी (ता.८) रात्री नऊच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.

मुंबई : स्वयंघोषित अध्यात्मिक राधे मॉं ही सेक्स रॅकेट चालवत होती असा धक्कादायक आणि गंभीर आरोप मॉडेल आणि दाक्षिणात्य अभिनेत्री अर्शी खानने केला आहे. राधे मॉंने मला सेक्स रॅकेटमध्ये ढकलण्याचा प्रयत्न केला, असा आरोप अर्शी खानने केला आहे.
अर्शी हिने मुंबई पोलिसांत शनिवारी तक्रार दाखल केली असून तिला आता फोनवरुन धमकी दिली जात असून तिला अश्लील फोनही येत असल्याचे आर्शीने केलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
राधे मॉंची सहा- सात महिन्यांपूर्वी भेट झाली होती. त्यावेळी राधे मॉंच्या एका सहकार्‍याने तुला पैसा आणि प्रसिद्ध हवी असल्यास आमच्या सेक्स रॅकेटच्या धंद्यात सहभागी व्हावे लागेल, अशी ऑफर दिल्याचा आरोप अर्शी खानने केला आहे. तसेच राधे मॉंने अन्य मुलींनाही सेक्स रॅकेटमध्ये गुंतवले असल्याचा दावाही अर्शीने केला आहे.
अर्शी खान ही भारतीय मॉडेल आणि अभिनेत्री असून तिने अनेक दाक्षिणात्य चित्रपटात काम केले आहे. तसेच पाकिस्तानचा माजी क्रिकेटर शाहिद आफ्रिदीसोबत अर्शी खानचे अफेअर सुरु असल्याची चर्चा आहे. अर्शी ही मुळची अफगाणिस्तानमधील असली तरी ती अगदी लहान असताना वयाच्या चार वर्षापासून आईवडिलांसह भारतात आली. ते भोपाळ येथे रहातात.
डॉली बिंद्रानंतर आता या मॉडेल- अभिनेत्री अर्शी खानने राधे मॉंवर गंभीर आरोप केल्याने राधे मॉं आणखी गोत्यात सापडली आहे.

लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्याच्या चळवळीचा प्रसार आणि लोकजागरणासाठी सार्वजनिक गणेशोत्सव सुरु केला. पण गेल्या काही वर्षात गणेशोत्सव आणि दहीहंडीच्या धार्मिक सोहळ्याचे बाजारीकरण झाले आहे. मुंबई उच्च न्यायालायानेच या दोन्ही उत्सवासाठी काही नियम लागू करून, संयोजकांना चाप लावला आहे.
गणेशोत्सवासाठी रस्त्यावर उभारण्यात येणारे मंडप आणि दहीहंडीबाबत मुंबई उच्च न्यायालयाने काही निर्बंध घातले असून सर्वसामान्यांकडून या निर्णयाचे स्वागत होत असले तरी राजकीय पक्ष आणि काही संघटना मात्र कमालीच्या नाराज झाल्या आहेत. न्यायालयााच्या निर्णयाचा आणि त्यांची अंमलबजावणी करणार्या सरकाराचा निषेध म्हणून काही बड्या दहीहंडी आयोजकांनी यंदाचा उत्सवच रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. काही पक्ष/संघटना संस्कृतीवर घाला (?) घालणारे निर्णय धाब्यावर बसवून नेहमीच्या उत्साहात उत्सव साजरे करण्याचा निर्धार व्यक्त करून संघर्षाची भूमिका घेत आहेत. त्यामुळे सध्या गोंधळाचे वातावरण आहे. हिंदुत्ववादाचे राजकारण करणारे सरकारही द्विधा मनस्थितीत आहे. एकीकडे न्यायालयाचा दट्ट्या आणि दुसरीकडे आयोजकांचा राजकारणाचा रेटा अशा कात्रीत सत्ताधारी पक्ष अडकला आहे. मुंबई-ठाणे महापालिकेच्या निवडणुका सव्वा वर्षावर आल्या असल्याने या विषयाचे महत्त्वही वाढले आहे.
गेल्या काही वर्षात शहरी भागात आणि विशेषत: मुंबई-ठाणे परिसरात दहीहंडी आणि गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जात आहे. दहीहंडीचा थरार पहायला तर देश विदेशातले पर्यटक मुंबईत आवर्जून येतात. लाखो रुपयांची बक्षिसं, उंचावर बांधल्या जाणार्‍या हंड्या, त्या फोडण्यासाठी 10/12 थर लावणारी व्यावसायिक गोविंदा पथके, जमीन हादरवणारे संगीत त्यांच्या तालावर थिरकणारे बॉलिवूड कलाकार आणि बेहोष तरुणाई असे चित्र दहीहंडीला मुंबई-ठाण्यात जागोजागी असते.
या उत्सवावर कोट्यवधी रुपये उधळले जातात. त्यासाठी प्रचंड मोठ्या स्पान्सरशिप मिळवल्या जातात. एकट्या मुंबई आणि ठाणे शहरात दहीहंडीवर 100 कोटी रुपयांहून अधिक खर्च होतो असा अंदाज आहे. त्याचे परिणामही दिसत आहेत. गेल्या वर्षी दहीहंडी उत्सवात दोन गोविंदांचा मृत्यू झाला. 150 हून अधिक जण जखमी झाले. त्यातील काही जण कायमचे जायबंदी झाले. त्यामुळे गोविंदांच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला. सरकारकडून कोणतीच दखल घेतली जात नसल्याने अखेर प्रकरण न्यायालयात गेले आणि न्यायालयाने दिलेल्या दणक्यानंतर सरकारने याबाबतची मार्गदर्शक तत्वे जाहीर केली आहेत. दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा देऊन निर्बंधातून मार्ग काढण्यात आला असला तरी 12 वर्षाखालील मुलांच्या सहभागाला बंदी घालण्यात आली आहे. 5 च्या वर थर लावू नयेत, दहीहंड्याचे आयोजन मैदानावर करावे अशाही अटी घातल्या गेल्याने आयोजकांचा पुरता हिरमोड झाला आहे. या खेळातला थरार संपला तर त्यामागची व्यावसायिक गणितं चुकणार याची त्यांना अधिक चिंता आहे. गेल्या काही वर्षात या उत्सवाचे पूर्ण बाजारीकरण झालो आहे. निर्बंध आल्यानंतर ज्या संस्कृतीच्या नावाने टाहो फोडला जात आहे, त्याचा मागमूसही कुठे दिसत नव्हता. सनी लिऑनला आणून तिचे उत्तान नृत्य आयोजित करणारे नेमके कोणत्या संस्कृतीचे रक्षण करतात हा प्रश्‍न आहेच. न्यायालयाने चाप लावला असला तरी या निर्बंधाची अंमलबजावणी सरकार किती प्रभावीपणे करणार याबद्दल शंका व्यक्त होते. त्याचे उत्तर येत्या काही दिवसात मिळेलच.
गणेशोत्सवासाठी रस्त्यावर आणि फुटपाथवर मंडप उभे करून रस्ते अडवायला परवानगी देऊ नका असे आदेश न्यायालयाने दिलेले आहेत. त्यावरूनही सध्या बरेच गोंधळाचे वातावरण आहे. लोकमान्य टिळकांनी ब्रिटिशांविरुध्द जनमत संघटित करण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सवाचा पाया रोवला. पण अलीकडच्या काळात त्याचेही स्वरुप बदलले आहे. समाज प्रबोधन, जनजागृती हे शब्द इतिहासजमा झाले असून कोट्यवधी रुपये खर्चून उभे केलेले देखावे, संपूर्ण परिसराला केलेली रोषणाई यावर अमाप खर्च केला जातो. त्यांचे मार्केटिंगही व्यवस्थित सुरु असून नवसाला पावणार्या बाप्पाच्या जाहिराती देणारी मंडळेही वाढली आहेत. त्यामुळे शहरातील व्यवस्थेचा 15 दिवस बोजवारा उडतो. न्यायालयाने हस्तक्षेप करताना रस्त्यावर उत्सव साजरा करण्याचा नव्हे तर चालणार्याला पहिला हक्क असल्याचे सांगत मंडपाला परवानगी देण्यावर बंधनं आणली आहेत. पण या आदेशाची शब्दश: अंमलबजावणी केली तर जनक्षोभ होईल या भीतीने सरकार आणि महापालिकेने त्यातून मार्ग काढण्यासाठी धडपड चालवली आहे. खरे तर नागरिकांचे अधिकार आणि उत्सवाची परंपरा याची सांगड घालून त्यातून सुवर्ण- मध्य काढता येणे शक्य आहे. वाहतुकीचा ताण असलेले प्रमुख रस्ते आणि अरुंद रस्त्यावर कोणत्याच उत्सवाची परवानगी न देण्याचे धोरण स्वीकारले जाणे आवश्यक आहे. त्यामुळे ज्यामुळे रहदारीला आणि सर्वसामान्य लोकांना त्रास होणार नाही, अशाच ठिकाणी मंडप उभारण्यासाठी परवानगी देणे आवश्यक आहे. मुंबई शहराचा विचार केला तर एकेका गल्लीत चार चार मंडळे आणि त्यांचे चार चार गणपती उत्सव असतात. त्यापैकी कोणाला परवानगी द्यायची असा प्रश्‍न येत असेल तर नोेंदणी झालेल्या मंडळांना एकत्र आणून मार्ग काढला पाहिजे. तोडगा निघत नसेल तर दरवर्षी एका मंडळाला रोटेशनप्रमाणे परवानगी देता येऊ शकते. पण आज तरी सरकार कोणता कटू निर्णय घेण्याच्या विचारात दिसत नाही. त्यामुळे न्यायालयाच्या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी होते की नाही, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यावरून गेले काही दिवस महाराष्ट्राचे वातावरण तापले होते. इतिहासकार, विचारवंत राजकीय पक्ष अशा सर्वच क्षेत्रात यावरून उभी फूट पडली होती. परंतु त्याची दखल न घेता राज्य शासनाने बुधवारी पुरंदरे यांना हा पुरस्कार प्रदान केल्यामुळे या वादावर तूर्तास पडदा पडला असला तरी भावनिक विषय राजकीय फायद्यासाठी ते चिघळवले गेले तर तथाकथित पुरोगामी महाराष्ट्राची सामाजिक विण कशी उसवते ही बाब या निमित्ताने पुन्हा एकदा पुढे आली आहे. गेले 15 दिवस महाराष्ट्र भूषण हाच विषय राज्यभर गाजत राहिला. पुरंदरे यांच्या नावावर वादळ उठणार याची जाणीव असतानाही हा निर्णय घेऊन भाजपने आपली विचारधारा आणखी पुढे रेटली. राष्ट्रवादी काँग्रेसने अन्य संघटनांच्या मागे उभे राहून, पक्षातील काही नेत्यांना पुढे करून मधल्या काळात विस्कळीत झालेला आपला जनाधार संघटित केला. राज ठाकरे यांनी या वादात उडी घेऊन आपल्या पक्षाची विस्कटलेली घडी बसवायचा प्रयत्न केला. भावनिक विषयावर राजकारण केंद्रित होणे सर्वांच्याच सोईचे असते त्यामुळे आताच्या किंवा आधीच्या सत्ताधार्यांना अनेक प्रश्‍नांची उत्तरं द्यावी लागत नाहीत.
महाराष्ट्र भूषण पुरस्कारासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती आहे. ही समिती दरवर्षी पुरस्कार कोणाला द्यायचा याचा निर्णय घेते. अचानक तब्बेत बिघडल्याने मुख्यमंत्री समितीच्या बैठकीला आले नाही आणि सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखालाी बैठक झाली. या बैठकीत पुरंदरे यांचे नाव निश्‍चित झाल्यावर मुख्यमंत्र्यांनी त्यावर शिक्कामोर्तब केल्यावर पुरदंरे यांचे नाव जाहीर करण्यात आले. ही घोषणा कोणी करावी यावरूनही रामायण झाले. याचाच अर्थ पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण देणाच्या निर्णयावर वाद होऊ शकतो याची पूर्व कल्पना सरकारला होती हे स्पष्ट होते. तरीही हा निर्णय घेतला असेल तर त्यामागे ठामपणे उभे राहून समर्थन करण्याची जबाबदारी सरकारची होती. पण तसे न करता सरकार ढिम्मपणे बसून राहिले.
पुरंदरे यांच्या योगदानाबद्दल कोणाला आक्षेप नसला तरी त्यांनी छत्रपती शिवरायांचे एकांगी चित्र रंगवले असा अनेकांचा आक्षेप आहे. पुरंदरेंनी छत्रपतींची हिंदुत्ववादी राजा अशी प्रतिमा रंगवली. त्यांचा इतिहास शाहिस्तेखानाची बोटं आणि अफजलाखानाच्या फाडलेल्या पोटाभोवतीच फिरत राहिला, असे काहींना वाटते. तर काहींना या आक्षेपात तथ्य वाटत नाही. हा वाद चिघळल्यानंतर तो मिटवण्यासाठी सरकारने काही पुढाकार घ्यायला हवा होता. राष्ट्रवादी काँग्रेसने पक्ष म्हणून यात थेट भूमिका घेतली नव्हती तरी पक्षाचे नेते शरद पवार यांनी आ. जितेंद्र आव्हाड यांच्यामागे पाठबळ उभे केल्यावर विरोधाची धार वाढली, हे वास्तव आहे. साखर उद्योगाचे प्रश्‍न सोडवण्यासाठी पंतप्रधानांचे सचिव पवारांच्या घरी जाऊन बैठक घेऊ शकतात. तर मग हा वाद समन्वयाने सोडवण्यासाठी त्यांची मदत का घेतली गेलाी नाही, असा प्रश्‍न निर्माण होणे स्वाभाविक आहे. जनतेने बहुमताने निवडून दिलेल्या सरकारला निर्णय घेण्याचे पूर्ण अधिकार असले तरी संवादाचा, समन्वयाचा मार्ग बंद करण्याची भूमिका योग्य ठरत नाही. पण तसे घडले नाही आणि हा वाद चिघळला आणि महाराष्ट्राच्या प्रतिमेला तडा गेला.

लंडन: हॉलिवूडमध्ये प्रसिद्ध असलेली अभिनेत्री अँजेलिना ज्युली हिचा एक दुर्मिळ असलेला नग्न फोटो विकला गेला आहे. लंडनमधील ’झेब्रा वन गॅलरी’ इथं अँजेलिना ज्युली हिचा वयाच्या वीसाव्यावर्षी काढण्यात आलेला असा दुर्मिळ फोटो प्रदर्शनाला लावण्यात आला होता. तिचा हा दुर्मिळ फोटो १८ हजार पाउंडला विकण्यात आला.
’ब्लॅक ऍन्ड व्हाईट’ असलेला हा फोटो केट गार्नर यांनी १९९५ मध्ये काढला होता. यामध्ये ती पायाची घडी घालून बसलेली आहे.
हॉलिवूडमध्ये टॉपवर असलेल्या या अँजेलिना ज्युलीनं दिग्दर्शनात पाऊल टाकलं आहे. तिचा ’द सी’ हा आगामी चित्रपट येत असून यामध्ये तिच्यासोबतच तिचा नवरा अभिनेता ब्रॅड पीटनं सुद्दा काम केलं आहे.

मुंबई : अनीस बज्मी दिग्दर्शित ‘वेलकम बॅक’ या चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवसापासून बॉक्स ऑफिसवर सुस्साट कमाई केली आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 34. 35 कोटी रुपयांची कमाई केली आहे. पहिल्याच दिवशी सर्वाधिक कमाई करणारा ‘वेलकम बॅक’ हा तिसरा चित्रपट आहे.
‘वेलकम बॅक’ हा 2007 मध्ये प्रदशित झालेल्या ‘वेलकम’ या चित्रपटाचा सिक्वल आहे. शुक्रवारी एकच चित्रपट प्रदर्शित झाल्यामुळे ‘वेलकम बॅक’ला स्पर्धा नव्हती. या चित्रपटातून अभिनेता शायनी अहुजाने कमबॅक केला आहे.
‘वेलकम बॅक’ चित्रपटात अनिल कपूर, श्रृती हसन, नाना पाटेकर, जॉन अब्राहम, नसिरुद्दीन शाह प्रमुख भूमिकेत आहेत. हा चित्रपट चार सप्टेंबरला सर्व चित्रपटगृहात प्रदर्शित करण्यात आला आहे.