Home रायगड

0 774

* पावसाळी अधिवेशनात बेलापूरच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांची औचित्याच्या मुद्द्याद्वारे मागणी

नवी मुंबई : महाराष्ट्रात साडेतीन शक्तिपीठे मानली जातात. त्यापैकी पार्वती, यमाई, रेणुकामातेचा अवतार म्हणजेच एकविरा देवी होय. मुंबई, ठाणे, रायगड, कोकण भागातील कोळी, आगरी, माळी, कुणबी, सोनार, पाठारे, चांद्रसेनीय कायस्थ प्रभू, ब्राह्मण, चौकळशी, पाचकळशी अशा अनेक समाजांची कुलस्वामिनी आहे. मावळ तालुक्यातील वेहरगाव-कार्ला गडावरील आई एकवीरा देवी ही आदिशक्ती असून, पुरातनकालीन एक जागृत देवस्थान म्हणून या देवस्थानाची ख्याती आहे. आगरी-कोळ्यांच्या आराध्य दैवत व नवसाला पावणारी आई एकविरा मातेचे मंदिर वसलेले आहे. इसवी सनाच्या पहिल्या शतकातील शिल्पकला आणि लेणीकलेचा उत्तम नमुना म्हणजे लोणावळ्याजवळील कार्ला लेणी. या लेण्यांमध्ये ऐश्वर्य आहे, मात्र त्यात डामडौल नसून अभिजात कला आहे. पर्यटन व वर्षाविहारासाठी नावलौकिक असलेल्या लोणावळ्यापासून 12 किलोमीटर अंतरावर कार्ला गडावर एकवीरा देवीचे स्थान आहे. पुणे-मुंबई या महानगरांच्या मध्यभागी वसलेली कार्ला लेणी आणि एकवीरा मातेचे मंदिर म्हणजे विपुल निसर्गसंपदा, प्राचीन लेणी, गड-किल्ले, भरपूर जलसाठा अशा विविधतेने नटलेल्या मावळ तालुक्याच्या वैभवात भर टाकणारे आहे असे आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी सदर माध्यमांशी बोलताना सांगितले.
तसेच त्या पुढे म्हणाल्या की, महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यापासून सर्व जाती धर्माचे लोक, लोकप्रतिनिधी, भाविक भक्त दर्शनासाठी, नवस फेडण्यासाठी श्रद्धेने येत असतात परंतु पायथ्यापासून ते गडापर्यंत पायर्‍यांना संरक्षक लोखंडी रेलिंगची व्यवस्था, गडाच्या पायथ्याशी वाहनतळ, स्त्री-पुरुषांसाठी स्वच्छतागृहे, भाविकांच्या सुलभ दर्शनासाठी वातानुकूलित दर्शनरांगा, दर्शनरांगेत लहान मुलांना व वृद्धांना बसण्याची व्यवस्था, तसेच पायथ्यापासून गडापर्यंत असलेल्या पायर्‍यांची दुरावस्था असल्यामुळे पावसाळ्यात दरड कोसळणे, पाय निसटून पडणे अश्या दुर्घटना होत असतात. याच अनुषंगाने आगरी-कोळी भाविक भक्तांच्या सुरक्षेतेच्या दृष्टीकोनातून बेलापूरच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी पावसाळी अधिवेशनात औचित्याच्या मुद्याद्वारे तसेच महाराष्ट्र राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना पत्र देऊन शासनास सदरचे काम लवकरात लवकर दुरुस्त करावे अशी मागणी केली आहे.

0 478

 यादीत 18 वे मानांकन देऊन गौरवण्यात आले

अलिबाग : ‘अल अदील ट्रेडिंग’चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. धनंजय दातार यांना ‘अरेबियन बिझनेस’तर्फे संयुक्त अरब अमिरातीतील (युएई) सर्वांत श्रीमंत भारतीयांच्या यादीत वर्ष 2018 साठी 18 वे मानांकन देऊन गौरवण्यात आले आहे. या यादीत समावेश असलेले डॉ. दातार हे एकमेव महाराष्ट्रीय उद्योजक आहेत. 

‘मसालाकिंग’ या लोकप्रिय नावाने ओळखल्या जाणार्‍या डॉ. दातार म्हणाले, अरेबियन बिझनेस हे जगातील अत्यंत विश्‍वसनीय माध्यमांपैकी एक असून त्यांनी अरब विभागातील प्रगतीप्रती माझ्या आकांक्षेची व योगदानाची दखल घेऊन मला मानांकन दिले आहे. हा खरंच माझ्यासाठी मोठा सन्मान आहे. या यादीत नावाची नोंद करण्यामागे अशा ताकदवान व प्रभावी भारतीय नेतृत्वांचा गौरव करण्याचा हेतू आहे, जे आपला दृष्टीकोन व गुंतवणूक यांच्या माध्यमातून अरब जगताला आकार देत आहेत. या कर्तृत्ववान भारतीय उद्योजकांनी आपली दूरदृष्टी, अस्सलता व चमकदार नेतृत्वाचा वापर करुन आपल्या भागधारकांसाठी, तसेच अर्थव्यवस्थांसाठी भांडवल निर्मिती करुन पश्‍चिम आशियात अत्यंत यशस्वी कंपन्या स्थापन केल्या आहेत. 

हे मानांकन म्हणजे अरब जगतात वास्तव्यास असलेल्या किंवा व्यवसाय चालवणार्‍या भारतीय व्यावसायिकांचे सखोल संशोधन व विश्‍लेषण यांचे फलित आहे. 

डॉ. दातार पुढे म्हणाले, पुरस्कार व गौरव आपण करत असलेल्या कार्याची जबाबदारी वाढवतात. आम्हीही सामाजिक जबाबदारीचे भान ठेऊन आमच्या ग्राहकांना वर्धित मूल्य मिळवून देण्यासाठी निरंतर प्रयत्न करत राहू, मला मिळालेला सन्मान हे आमच्या संपूर्ण संघटनेच्या समर्पित सांघिक प्रयत्नांचे प्रतिबिंब आहे. आमच्या प्रयत्नांना पाठिंबा आणि प्रोत्साहन देणार्‍या संयुक्त अरब अमिरातीचीच्या शासकांचाही मी आभारी आहे. या यादीतील बहुसंख्य आघाडीचे उद्योजक व व्यवसाय मालक हे संयुक्त अरब अमिरातीतील आहेत. यावरुनच आम्हाला येथील नेतृत्वाकडून मिळत असलेल्या पाठबळाचा स्पष्ट प्रत्यय येतो. 

0 554

नवी दिल्ली : ‘आरक्षण दिलं तरी काही काहीच फायदा होणार नाही. आरक्षण मिळालं तरी नोकऱ्या आहेत कुठे?’, असं विधान केल्यानं केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी अडचणीत आले आहेत. या विधानावर सारवासारव करून त्यांनी हा विषय मिटवण्याचा प्रयत्न केला. पण काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी या विधानावरून गडकरींना सवाल करत भाजपला घेरण्याचा प्रयत्न केला आहे.

‘देशात नोकऱ्याच शिल्लक राहिलेल्या नाहीत, तर लोकांना आरक्षण हवंय तरी कशासाठी?’ असा सवाल नितीन गडकरी यांनी केला होता. त्यावर राहुल गांधी यांनी ट्विट करत गडकरींना घेरले आहे. ‘तेच म्हणतोय. संपूर्ण देशच विचारतोय नोकऱ्या आहेत कुठे? स्मार्ट प्रश्न विचारलात गडकरीजी’, असा टोला राहुल यांनी गडकरींना लगावला आहे. 

‘बँकात माहिती तंत्रज्ञान आल्याने नोकऱ्या कमी झाल्या आहेत. सरकारी नोकरभरती बंद आहे. नोकऱ्या आहेत कुठे?’, असा सवाल गडकरी यांनी केला होता. ‘गरीब गरीब असतो. त्याला जात आणि धर्म नसतो. पंथ आणि भाषाही नसते. हिंदू, मुस्लिम कोणत्याही धर्माचा असो प्रत्येकाला अन्न, वस्त्र आणि निवारा मिळालाच पाहिजे, असा एक विचार सांगतो. ते त्यांना द्यायलाच हवं’, असं सांगत गडकरींनी अप्रत्यक्षपणे आर्थिक निकषावर आरक्षण देण्यावर जोर दिला. दरम्यान, गडकरींच्या या विधानावरून गदारोळ निर्माण झाल्यानतंर त्यांनी घाईघाईत ट्विट करून सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. ‘आरक्षण धोरणात बदल करण्याचा सरकारचा कोणताही विचार नाही’, असं गडकरींनी स्पष्ट केलं. 

0 344
पनवेल संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांचे प्रतिपादन
पनवेल :-  देशाचे संरक्षण करताना सीमेवर धारातीर्थ पडलेल्या जवानांना कोरड्या शब्दांनी श्रद्धांजली अर्पण करणार्‍या सरकारने डोके खाजवून त्यांच्यासाठी काही ठोस निर्णय घेण्याची गरज आहे. काही राज्यात आजी, माजी सैनिकांसाठी मालमत्ता करात पूर्णतः सुट देण्यात आली आहे, दूर्दैवाने तो निर्णय महाराष्ट्र सरकार अद्यापही घेवू शकलेला नाही, अशी खंत व्यक्त करून सैनिक आणि त्यांच्या नातेवाईकांच्या पालकत्वाची जबाबदारी सरकारने उचलावी, असे प्रतिपादन पनवेल संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी केले.
 उलवे नोडमधील मशाल सामाजिक सेवा संस्थेच्या सातव्या वर्धापनदिनानिमित्त साईनगर, वहाळ येथील श्री साईनाथ मंदिराच्या प्रांगणात आयोजित केलेल्या कार्यक्रमातून आजी, माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
 आंध्रप्रदेश, छत्तीसगड, हरियानासारख्या राज्यात आजी, माजी सैनिकांना मालमत्ता करात पूर्णतः सुट देण्यात आली आहे. तेथील सरकार सैनिकांबाबत सजग आहे. महाराष्ट्र सरकारला अद्याप ती सुबुद्धी सुचत नाही असे सांगून कडू म्हणाले की, त्या राज्यांकडून काही बोध घेवून राज्य व केंद्र सरकारने सैनिकांसाठी ठोस निर्णय घेवून त्याची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे.
 देशातील आजी, माजी सैनिकांसाठी प्रत्येक राज्यात रूग्णालये आहेत. परंतु, तिथेही त्यांची ससेहोलपट होत आहे. त्यांच्या पाल्यांसाठी सरकारने शिष्यवृत्ती योजना देवून त्यांच्या उच्च शिक्षणाची जबाबदारीही घेतली पाहिजे, असे मत व्यक्त केले.
 देशाच्या सीमा सुरक्षित आहेत, असे म्हणताना सैनिकांच्या रक्ताचा रोज होणारा अभिषेक अस्वस्थ करणारा आहे. त्यांचे बलिदान वाया जाऊ न देण्याची सरकारची मानसिकता असेल तर सर्जिकल स्ट्राईकचे गुणगाण गाण्यापेक्षा आजी, माजी सैनिकांना ऊर्जा देण्यासाठी त्यांच्या कुटूंबाची जबाबदारी पालक म्हणून केंद्र अथवा संबंधित राज्यातील सरकारने स्वीकारणे महत्वाचे ठरणार असल्याचा दावा कडू यांनी केला.
 पारतंत्र्याची जळमटं काढून टाकताना ज्यांनी ज्यांनी प्राणाची आहुती दिली, त्यांच्यात परमेश्‍वरी अंश होता. आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके असतील, लोकमान्य टिळक असो की, अलिकडच्या काळातील डॉ. राम भोसले यांना साक्षात अवतारी महापुरूषांचे दर्शन घडले होते. त्यांना मिळालेल्या अध्यात्मिक अनुभूतीमुळे देशाचा कायापालट करून ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून देशाला स्वातंत्र्य मिळवून दिल्याचा दाखलाही याप्रसंगी कडू यांनी दिला. 
 सैनिकांच्या त्यागाचे मोल शब्दात मांडू शकणार नाही, तर त्यांच्या ऋृणात कायमचे राहण्यास आवडेल, असे मत श्री साई संस्थानचे विश्‍वस्त रविशेठ पाटील यांनी मांडले.
 मशाल सामाजिक सेवा संस्थेने आजी, माजी सैनिकांना त्यांच्या कुटूंबासह गौरविल्याने आपल्याला आनंदाचे भरते आले असल्याची कृतज्ञता पाटील यांनी व्यक्त केली. ते म्हणाले की, आजच्या धावपळीच्या युगात प्रत्येक माणूस स्वतःला कशात तरी गुरफटून घेत आहे. त्याही स्थितीत समाजाचे भान असणार्‍या काही संस्था आणि सैनिकांसारख्या योद्यांचे दर्शन जेव्हा घडते, तेव्हा त्यांच्यातील अनामिक ऊर्जा आपल्याला मिळते, असेही पाटील यांनी सांगून सैनिकांना कडक सलाम ठोकला.
 नवी मुंबईच्या नगरसेविका भारती कोळी, रविंद्र कासूकर, संस्थेचे अध्यक्ष पदाजी कासूकर, नंदकुमार ठाकूर आदींची यथोचित भाषणे झाले.
 व्यासपिठावर ज्येष्ठ गायक निवृत्तीबुवा चौधरी, हभप पारिंगे, बाळारामशेठ पाटील, गव्हाणच्या सरपंच जिज्ञासा कोळी, वहाळचे उपसरपंच रामदास नाईक, मो. का. मढवी आदी  उपस्थित होते. 

0 454
 पनवेल संघर्ष समितीने फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा दिला लेखी इशारा
उरण :-   उरण तालुक्याला ग्रासणार्‍या प्रदुषणाविषयी आंदोलन छेडणार्‍या तरूणाला लेखी आश्‍वासन देवूनही त्याच्या तोंडाला पाने पुसणार्‍या तहसीलदारांविरोधी पनवेल संघर्ष समितीने आक्रमक भूमिका घेतली आहे. येत्या ७२ तासात दिलेल्या आश्‍वासनांच्या पूर्ततेची कार्यवाही न झाल्यास तहसीलदारांविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा लेखी इशारा देण्यात आला आहे. 
 बेलपाडा येथील सामाजिक कार्यकर्ते अजित म्हात्रे यांनी नोव्हेंबरमध्ये प्रदुषणासह काही महत्वाच्या प्रश्‍नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी पत्रव्यवहारानंतर दास्तानफाटा येथे उपोषण छेडले होते. त्यावेळी उरणच्या तहसीलदार कल्पना गोडे यांनी उपोषण मागे घेण्यासाठी मागण्यांची पूर्तता करणारे आश्‍वासनांचे लेखी पत्र तसेच त्यासंदर्भात तहसीलदार आणि संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांसोबत झालेल्या बैठकांचे इतिवृत्त म्हात्रे यांच्याकडे सुपूर्द केले आहे.
 दरम्यान, पाच महिन्यानंतरही तहसीलदार कल्पना गोडे यांना, त्यांनीच दिलेल्या लेखी आश्‍वासनांचा विसर पडल्याने अजित म्हात्रे यांनी पुन्हा चार दिवसांपासून दास्तान फाटा येेथे उपोषण सुरू केले आहे. गोडे यांनी कालच त्यांची भेट घेवून उपोषण मागे घेण्याची विनंती म्हात्रे यांना केली. परंतु, जोपर्यंत कार्यवाहीला प्रारंभ होत नाही, तोपर्यंत उपोषण मागे न घेण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केल्याने तहसीलदारांना रिकाम्या हाताने परतावे लागले आहे. तरीदेखील प्रदुषण नियामक मंडळाच्या नियम, अटी व शर्थीचे पालन करण्यावर तहसीलदारांचे निर्बंध नसल्याने तहसीलदार नेमके कुणासाठी कार्यरत आहेत, असा प्रश्‍न म्हात्रे विचारत आहेत.
 यासंबंधी पनवेल संघर्ष समितीने अजित म्हात्रे यांच्या सामाजिक उपोषणास  आज प्रत्यक्ष भेटून पाठिंबा दिला आहे. संपूर्ण उरण तालुक्यातून म्हात्रे यांना पाठिंबा मिळत आहे. हाच धागा पकडून तहसीलदारांनी कर्तव्य बजावताना हलगर्जीपणाचा अक्षम्य गुन्हा केल्याने येत्या ७२ तासात लेखी आश्‍वासनांची पूर्तता न केल्यास त्यांच्याविरोधात महाराष्ट्र शासनाच्या अध्यादेशानुसार फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा इशारा कांतीलाल कडू यांनी लेखी स्वरूपात दिला आहे. गोडे आज कार्यालयात उपस्थित नसल्याने, हे निवेदन महसूल विभागाचे नायब तहसीलदार नरेश पेडवी यांच्याकडे संघर्षने सुपूर्द केले.
 उरणला अपघाताचा मोठा धोका जाणवत असताना अवजड वाहनांवरही प्रशासनाचे बंधन राहिले नाही. दगड माती उतखनन आणि वाहतुकीला रात्री बंदी असताही बिनदिक्कितपणे उत्खनन सुरू आहे. धुळीचा होणारा त्रास वाचविण्यासाठी सक्शन पंपाची व्यवस्था करण्याचेही आश्‍वासन गोडे यांनी पाच महिन्यांपूर्वी म्हात्रे यांना दिले होेते, त्याचे स्मरण करून देत संघर्ष समितीने गोडे यांच्याविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. तसेच यापुढे अपघात घडल्यास तहसीलदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जाईल, असे त्या निवेदनातून कडू यांनी स्पष्ट केले आहे.
 याप्रसंगी संघर्षचे उज्वल पाटील, चंद्रकांत शिर्के, मंगल भारवाड, पत्रकार घनःश्याम कडू, राजकुमार भगत, जीवन केणी आदी जण उपस्थित होते.

 

 

0 583

     स्वराज्याच्या स्थापनेपासून अनेक महत्त्वाच्या ऐतिहासिक घटनांना रायगड हा मूर्त साक्षीदार आहे. किल्ल्यावरील जगदिश्वर मंदिर, छत्रपती शिवरायांची समाधी, राजवाडा, वाडे, महादरवाजा, राजदरबार, अष्टप्रधान वाडे व सप्त मंजिली बुरुज तर पाचाड येथील राजमाता जिजाऊ यांचा वाडा व समाधी इत्यादी ठिकाणे आजही या परिसरात इतिहासाची साक्ष देत आहेत. हे देशाचे वैभव आहे.     छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याची राजधानी असलेला रायगड किल्ला हा महाराष्ट्राच्या दैदिप्यमान इतिहासाचा अनमोल असा ठेवा आहे. त्यामुळे या ऐतिहासिक अभिमानाच्या वारशाचे भावी पिढीसाठी जतन व्हावे तसेच त्याचा पर्यटनाच्या दृष्टिकोनातून समग्र विकास व्हावा यासाठी मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांच्या प्रेरणेने महाराष्ट्र शासनाने रायगड किल्ला जतन, संवर्धन व पर्यटन विकास करण्याचे काम हाती घेतले.

     रायगड किल्ला हा भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या 11 मार्च 1909 च्या अधिसुचनेनुसार “राष्ट्रीय स्मारक” म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. त्यामुळे तो पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या संरक्षणात असून त्यानुसारच्या मर्यादा तेथे लागू पडतात.

     रायगड महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी मा.मुख्यमंत्री महोदयांनी घोषित केले की, गड किल्ल्यांचे गतवैभव परत मिळवून दिले पाहिजे, त्याकरीता किल्ले संवर्धनाच्या पहिल्या टप्प्यात रायगडसह पाच किल्ल्यांचा समावेश करण्यात येईल. पर्यटकांना/नागरीकांना किल्ल्यांचा इतिहास जिवंत करून दाखविण्यासाठी शिवसृष्टी सारख्या सुविधा निर्माण करण्यात येतील. केंद्र शासनाच्या पुरातत्त्व विभागाशी सामंजस्य करार (MOU) करून महाराष्ट्रातील किल्ल्यांचे संवर्धन व परिसराचा विकास करण्यात येईल.

     मा.पंतप्रधान महोदयांनी दि.24 डिसेंबर 2016 रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अरबी समुद्रातील स्मारकाच्या भुमीपुजन सोहळयाच्या वेळी घोषणा केली. छत्रपती शिवाजी महाराज व अन्य राजकर्त्यांनी रायगडसह भारतात बांधलेल्या अशा सर्व किल्ल्यांना भारतीय पुरातत्व विभागामार्फत गतवैभव प्राप्त करून देणे आवश्यक आहे. रायगड किल्ला जतन व संवर्धन प्रस्तावित रु.606.09 कोटी रकमेच्या आराखडयास मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली शिखर समितीने दि.31 मार्च 2017 रोजी मान्यता दिली. त्यामध्ये पुढील कामे समाविष्ट आहेत. भारतीय पुरातत्व विभागामार्फत/त्यांच्या पर्यवेक्षणाखाली करावयाची कामे रु.12414.93 लाख, रायगड किल्ला/पाचाड येथील जिजाऊ समाधी/वाडा परिसरात पुरातत्व विभागाच्या पूर्व अनुमतिने घ्यावयाची कामे रु.4952.91 लाख, रायगड किल्ला परिसरात घ्यावयाची पर्यटनाची कामे रु.7991 लाख, रायगड किल्ला व परिसरातील मुलभूत सुविधांची व विकासाची कामे (7 कि.मी परिघातील 21 गावे व त्याअंतर्गत वाडया) रु.4260 लाख, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व केंद्रीय भूतलपरिवहन मंत्रालयामार्फत आणि सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करावयाची कामे रु.20604 लाख, पाचाड येथे शिवसृष्टी व पर्यटक सुविधा केंद्र उभारण्यासाठी भूसंपादन रु.2500 लाख, रज्जू मार्ग रु.5000 लाख, आकस्मित खर्च रु.2886.13 लाख, एकूण आराखडा रु.60608.97 लाख आहे.

     आराखडयातील समाविष्ट प्रमुख कामे- रायगड किल्ल्यातील सर्व प्राचिन वास्तुचे संवर्धन, तत्कालीन पध्दतीच्या मार्गिका, तत्कालीन पध्दतीचे सागाचे दरवाजे, तटबंदिला पाईटिंग व अडरपिनींग करणे, तलावातील गाळ काढणे, लॅन्डस्केपिंग, पर्यटकांच्या सोयी सुविधा, पोलीस चौकी व निवास व्यवस्था, राजमाता जिजाऊंच्या वाडयाचे संवर्धन, राजमाता जिजाऊंच्या समाधीचे संर्वधन, पाणीपुरवठा योजना, वृक्षलागवड, किल्ला प्रदिपन आणि ध्वनी व प्रकाश योजना, शिवसृष्टी, परिक्रमा मार्ग, रज्जूमार्ग इत्यादी.

     मनुष्यबळ उपलब्धता- सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत या कामासाठी चार उपभियांत्यांचा समावेश असलेल्या विशेष स्थापत्य पथकाची नियुक्ती महाड येथे करण्यात आलेली आहे. कार्यकारी अभियंता, एम.टी.डी.सी या कामी नोडल अधिकारी असतील. या पथकात 1 अधीक्षक अभियंता, 2 कार्यकारी अभियंते व 4 उप कार्यकारी अधियंते यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना भारतीय पुरातत्व खात्यामार्फत प्रशिक्षण देण्यात येत आहे.

     महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडील कामे- पुरवणी मागणीद्वारे मंजूर 40 कोटी निधी पैकी 50 टक्के निधी MTDC कडील कामांना उपलब्घ करून देण्यात येईल. त्यानुसार त्यांच्याकडून अंदाजपत्रक मागविण्यात आलेली आहेत.

     रायगड किल्ला येथे पर्यटनाच्यादृष्टीने विकास करणेकामी, शिवसृष्टी, पर्यटकांसाठी निवास व्यवस्था, पार्कींग इत्यादी कामे करण्याकरीता भुसंपादन करण्याकरीता रु.21.18 कोटी एवढया रक्कमेस मान्यता व रु.10.50 कोटी निधी उपविभागीय अधिकारी महाड यांना वितरीत करण्यात आला आहे. आराखडयातील कामासाठी आवश्यक असलेल्या भूसंपादनापैकी 88 एकर क्षेत्रास शेतक-यांची सहमती प्राप्त झाली आहे. राष्ट्रीय महामार्ग महाड ते पाचाड करीता आवश्यक 18 हेक्टर भूसंपादनासाठी एकूण खातेदारापैकी 228 खातेदारांची सहमती प्राप्त झाली आहे. महाड ते पाचाड या 25.50 कि.मी. राष्ट्रीय महामार्गाचा भूसंपादनासह रु.258 कोटींचा DPR तयार करून केंद्र शासनास मान्यतेस सादर केला आहे.

     मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद रायगड यांनी रायगड किल्ल्यावरील अस्तित्वात असलेल्या नळ पाणीपुरवठा योजनेच्या मजबुतीकरण व दुरुस्ती तसेच किल्ल्यावरील जिल्हा परिषद विश्रामगृह व इतर इमारतींचे नुतनीकरण करणे (धर्मशाळा, कर्मचारी निवासस्थान, उपाहारगृह, गोदाम, अभ्यागत कक्ष) या कामांचे सविस्तर अंदाजपत्रक तयार करून भारतीय पुरातत्व विभाग, मुंबई सर्कल यांच्यामार्फत भारतीय पुरातत्व विभाग, नवी दिल्ली यांच्याकडे मान्यतेसाठी सादर केले आहे.

     महाराष्ट्र पर्यटन महामंडळाने रायगड किल्ल्यावरील अस्तित्वात असलेल्या पर्यटक निवासाची दुरुस्ती व नुतनीकरणासाठी सविस्तर अंदाजपत्रक तयार करून भारतीय पुरातत्व विभाग, मुंबई सर्कल यांच्यामार्फत भारतीय पुरातत्व विभाग, नवी दिल्ली यांच्याकडे मान्यतेसाठी सादर केले आहे. रायगड परिक्रमा मार्ग करीताचे रु.2.04 कोटींचे सविस्तर अंदाजपत्रक तयार केले आहे. जिजामाता समाधी परिसर बागबगीच्याकरीता सविस्तर अंदाजपत्रक सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत तयार केले आहे. रायगड किल्ल्यावरील कुशावर्त तलाव व इतर तलावातील गाळ काढण्याचे काम स्वयंसेवी संस्था तसेच महसूल विभागाच्या मदतीने श्रमदानातून सुरु करण्यात आले आहे. पुरातत्व विभागामार्फत छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी, वाडेश्वर मंदिराकडे जाणारी पायवाट, राजसदर, गंगासागर तलावातील गाळ काढणे ही कामे सुरु असून महादरवाजाचे काम पूर्ण झाले आहे.

     रायगड किल्ल्याच्या संवर्धनासाठी  प्रशासकीय यंत्रणांनी सहभाग नोंदविला आहे. महसूल आयुक्त, महसूल व इतर विभागाचे शासकीय अधिकारी, स्वयंसेवी संस्था यांनी तलावातील गाळ काढण्याच्या कामी श्रमदान केले. गतवर्षी 2 कोटी वृक्ष लागवड मोहिमेंतर्गत रायगड किल्ल्यावर वृक्ष लागवडीचा विशेष उपक्रम राबविण्यात आला होता.

     राज्यातील सर्व किल्ले, ऐतिहासिक वास्तूचे जतन आणि पर्यटनदृष्टया त्यांचा विकास करणे हे राज्य शासनाचे धोरण आहे. त्याचाच एक भाग म्हणून रायगड किल्ल्याचे जतन आणि संवर्धन करण्याबरोबराच किल्ला परिसरात पर्यटन विकासाच्यादृष्टीने विविध पायाभूत सुविधांची उभारणी करण्यासाठी कामे गतीने सुरु आहेत.

—————

 विभागीय माहिती कार्यालय,   कोंकण विभाग, नवी मुंबई

0 537
  • अलिबाग – महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्नी वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्तच्या कृषी दिनाचे औचित्य साधून राज्य शासनाने आयोजित राज्यातील दोन कोटी वृक्ष लागवडीच्या बुधवारच्या महत्वपूर्ण उपक्रमात रायगड जिल्ह्याने तब्बल 4 लाख 87 हजार 798 रोपांची लागवड करुन मोठे योगदान दिले आहे. जिल्ह्यातील 15 तालुक्यांत सर्वाधिक 82 हजार 249 रोपांची लागवड माणगांव तालुक्याने केली असून माणगाव रोप लागवडीत प्रथम ठरला आहे.
  • उवर्रित तालुक्यांत पेण मध्ये 68 हजार 196, कर्जत मध्ये 41 हजार 826,अलिबाग मध्ये 38 हजार 447, मुरुड मध्ये 37 हजार 522, खालापूर मध्ये 36 हजार 402,रोहा मध्ये 35 हजार, पनवेल मध्ये 27 हजार 900,महाड मध्ये 26 हजार 975, म्हसळा मध्ये 19 हजार 653, श्रीवर्धन मध्ये 17 हजार 710, पोलादपूर मध्ये 17 हजार 135,उरण मध्ये 16 हजार906, सुधागड-पाली मध्ये 15 हजार 317 तर तळा तालुक्यांत 6 हजार 760 रोपांची लागवड करण्यात आली असल्याची माहिती सामाजिक वनीकरण विभागाच्या सुत्रंनी दिली आहे.

0 564

अलिबाग : रायगड पोलिसांनी नवीन वर्षाचे स्वागत आपला संकल्प प्रत्यक्षात आणत केलाय. रायगड पोलीस विभाग आता ऑनलाईन झालाय. यापुढे जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यात तक्रार ऑनलाईन नोंदवून घेण्यात येईल.
विशेष म्हणजे तक्रारीची प्रत तुमच्या इमेल आयडी किंवा व्हॉट्सऍपवर मिळू शकणार आहे. क्राईम क्रिमीनल ट्रॅकींग सिस्टीम प्रकल्पाअंतर्गत जिल्ह्यातील सर्व २७ पोलीस ठाणी तसेच पोलीस खात्याशी संबंधित सर्व कार्यालये ऑनलाईन करण्यात आली आहेत.
त्यामुळे पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या कुठल्याही घटनेची किंवा गुन्ह्यांची नोंद आता कागदोपत्री राहणार नाही. पोलीस ठाण्याची दैनंदिनी बरोबरच पोलीस ठाण्याचे गुन्हेविषयक कामकाज देखील पेपरलेस करण्यात आले आहे.