Home नवी मुंबई

स्वयंम न्यूज ब्युरो : navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई :  ठाणे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते सोमवारी  सांयकाळी ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान  व  विद्यार्थ्याचा गुणगौरव उत्साहात करण्यात आला. या  कार्यक्रमाचे नगरसेवक सुरज पाटील,  महिला व बालकल्याण समितीच्या सभापती व प्रभाग ८५च्या कार्यसम्राट नगरसेविका सौ. सुजाताताई सुरज पाटील आणि प्रभाग ८६च्या नगरसेविका सौ. जयश्री एकनाथ ठाकूर यांनी आयोजन  केले होते.

सालाबाद प्रमाणे याही वर्षी  नगरसेवक सुरज पाटील  यांच्या प्रमुख मार्गदर्शनाने आयोजित करण्यात आलेल्या “ सन्मान ज्येष्ठांचा, गुणगौरव विद्यार्थ्यांचा ’’  या कार्यक्रमाला प्रभाग क्र ८५ व ८६ मधील जेष्ठ नागरिक तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ठाणे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री गणेश नाईक, महापौर जयवंत सुतार, माजी परिवहन समिती सभापती प्रदीप गवस, नेरूळ गावचे नगरसेवक गिरीश म्हात्रे, अशोक त्रिपाठी, गणेश रसाळ आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी सर्व पाहुण्यांच्या हस्ते ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप तसेच १० वी,१२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना शालेय वस्तुचे वाटप करुन सन्मान करण्यात आला.  दोन्ही प्रभागात होत असलेल्या विकास कामांबद्दल तसेच सभागृहात करत असलेल्या नागरी कामांच्या पाठपुराव्या बाबत दोन्ही नगरसेविकांचा गणेश नाईक व महापौर जयवंत सुतार यांनी विशेष उल्लेख करत प्रशंसा केली. सारसोळे जेठीसमोर पामबीच येथे नगरसेविका व महिला व बालकल्याणच्या सभापती सौ. सुजाता सुरज पाटील यांच्या मागणीनुसार महापौर निधीमधून उभारल्या जात असलेल्या आगरी कोळी संस्कृती दर्शक शिल्पाबाबत महापौर जयवंत सुतारांनी सभापती सुजाता पाटील यांची प्रशंसा केली व लवकरच त्या शिल्पाचे अनावरण करण्याचे घोषित केले.

सभापती सुजाता पाटील या स्वत: वाणिज्य शाखेच्या द्विपदवीधर असून प्रभागातील दोन्ही महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांचा  त्या सातत्याने आढावा घेत असल्याची माहिती कार्यक्रमाला  उपस्थित असलेल्या स्थानिक रहीवाशांनी दिली.

सुजित शिंदे : ९६१९१९७४४४

नवी मुंबई : नेरूळमधील  आगरी-कोळी भवनचे शिल्पकार म्हणून ओळखले जाणारे सिडकोचे माजी संचालक व शिवसेना  नगरसेवक नामदेव भगत हे स्वच्छतेच्या  बाबतीत कमालीचे  आग्रही  व आक्रमक असल्याचे महापालिका कामकाजात नेहमीच पहावयास मिळते. नेरूळ सेक्टर २६ मधील वॉटर बॉडीमधील स्वच्छतेविषयी पालिका शहर अभियंत्याकडेच लेखी मागणी करत त्यांनी आपली शहर स्वच्छतेची आस्था पुन्हा एकवार नवी मुंबईकरांना दाखवून दिली आहे.

 नेरूळ सेक्टर २६ मध्ये असलेल्या वॉटर बॉडीमध्ये प्लॉस्टिकच्या बाटल्या, पिशव्या, शेवाळ, कुजलेला कचरा मोठ्या प्रमाणावर आहे. हा सर्व कचरा वॉटर बॉडीच्या किनाऱ्यावर असल्याने त्या ठिकाणी जॉगिंग ट्रॅकवर चालणाऱ्या रहीवाशांना दुर्गंधीचा सामना करावा लागत असून संबंधितांच्या आरोग्यास धोका निर्माण झालेला आहे. हा कुजलेला  कचरा, शेवाळ व  प्लॉस्टिक  तात्काळ काढून सुशोभीकरण करण्याची मागणी नामदेव भगत यांनी महापालिका शहर अभियंत्यांकडे केली आहे.

स्वंयम न्यूज ब्युरो :navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई : दहीहंडीच्या दिनी कुकशेत गावात लहान मुलांपासून खुल्या गटापर्यत सर्वासाठीच नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती प्रभाग ८५च्या कार्यसम्राट नगरसेविका आणि महापालिका महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सौ. सुजाताताई सुरज पाटील यांनी केले आहे.

कुकशेत गावातील जय गजानन मित्र मंडळाच्या वतीने दहीकाला उत्सव २०१९च्या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे यंदाही या नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. दुपारी ३ वाजल्यापासून रात्री शेवटचे दहीहंडी पथक येईपर्यत ही नृत्य स्पर्धा घेण्यात येणार आहे. या स्पर्धेत विविध पारितोषिकांची रेलचेल असून सहभागी प्रत्येक सहभागाला प्रोत्साहनात्मक विशेष पारितोषिकही दिले जाणार आहे.

या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी  सुचिता पाटील (९५९४९८८७५८), अलंका ठाकूर (९७०२८११३५९),  सुगंधा तळेकर (९३२०९६९६५१), श्रेया चौधरी (९८२०१९९०४९), जयश्री पाटील (९३२४२९६३६८),  प्रितेश पाटील (९८२१९९८६५५),  संदीप पाटील (७०२१४९९१६३), जया आतकरी (८१०८०५४७१६) यांच्याशी संपर्क साधून नेरूळ नोडमधील नृत्याची आवड असणाऱ्या सर्वांनीच मोठ्या संख्येने स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन सभापती सौ. सुजाताताई सुरज पाटील यांनी केले आहे.

नगरसेविका रूपाली भगत यांच्या पाठपुराव्याची घेतली दखल

सुजित शिंदे : navimumbailive.com@gmail.com / 9619197444

नवी मुंबई : प्रभागातील नागरी समस्यांचे गांभीर्य महापालिका प्रशासनाच्या निदर्शनास यावे यासाठी नेरूळ नोडमधील प्रभाग ९६च्या नगरसेविका सौ. रूपाली किसमत भगत यांनी प्रभागात पाहणी अभियान राबविण्याविषयी महापालिका प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्या पाठपुराव्याची दखल घेत महापालिका प्रशासनाकडून अखेर गुरूवारी प्रभाग ९६ मध्ये पाहणी अभियान राबविण्यात आले.

स्थानिक नगरसेविका सौ. रुपाली किस्मत भगत यांच्या मागणीनुसार नेरुळ प्रभाग क्रमांक-९६ मधील समस्यांची पाहणी करण्यासाठी नवी मुंबई महानगर पालिकेचे  सचिन नामवाड( कनिष्ठ अभियंता ),  राजेंद्र इंगळे ( स्वच्छता अधिकारी),  सुरेश लगदिवे( उपअभियंता पाणी पुरवठा),  महेश बाविस्कर ( कनिष्ठ अभियंता मलनिस्सारण ), संजयसिंग पाटील ( कनिष्ठ अभियंता विद्युत), सचिन अहेरकर( तारतंत्री विभाग) या अधिकारी वर्गाने पाहणी दौरा केला.

या वेळी नगरसेविका रुपाली किस्मत भगत यांनी प्रभागात असलेल्या रस्ते, गटर, पदपथ, स्ट्रीट लाईट, डेब्रिज कचरा, उद्यान,शाळा, ग्रंथालय अभ्यासिका, मार्केट, चौक , नामफलक व इतर नागरी सुविधाविषयक समस्या अधिकारी वर्गाच्या निर्दशनास आणून दिल्या आणि लवकरात लवकर सदर समस्या दूर करण्याच्या सूचना अधिकारी वर्गास केल्या. अधिकारी वर्गानेही सदर समस्या लवकरच सोडविण्यात येतील असे आश्वासन दिले.

या वेळी समाजसेवक गणेशदादा भगत,चंद्रकांत महाजन, सागर मोहिते, सूर्यकांत देसाई, मन्सूर कोतवडेकर, दिनेश कणसे, रविंद्र भगत उपस्थित होते.

ठेकेदाराचे बिल थांबवावे व त्यास काळ्या यादीत टाकण्याची मनोज मेहेर यांची मागणी
नवी मुंबई : नेरूळ सेक्टर चार येथील सारसोळे शांतीधाम स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी वापरण्यात येणाऱ्या लोखंडी चौथऱ्याचे काम निकृष्ठ दर्जाचे असल्याचे सांगत या कामाची चौकशी करून ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी सारसोळे गावातील कोलवाणी माता मित्र मंडळाचे अध्यक्ष व महापालिका ब प्रभाग समितीचे माजी सदस्य मनोज यशवंत मेहेर यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.
नवी मुंबई महापालिका प्रशासनाकडून सध्या नेरूळ सेक्टर ४ येथील सारसोळे शांतीधाम स्मशानभूमीत अंत्यविधीच्या लोखंडी चौथऱ्याचे काम सुरू आहे. या स्मशानभूमीत एकाच वेळी पाच मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची सुविधा आहे. तसेच बाजूलाच लहान मुलांचीही दफनभूमी आहे. या चौथऱ्याचे काम अंत्यत निकृष्ठ पध्दतीचे सुरू असून पालिका प्रशासनाच्या डोळ्यात धुळफेक करण्याचा प्रकार सुरू आहे. काम गलथान व निकृष्ठ दर्जाचे होत असतानाही पालिका प्रशासन कानाडोळा करत असताना या कामाला पालिका अधिकाऱ्यांचाही आर्शिवाद असल्याचा संशय व संताप आम्हा सारसोळे ग्रामस्थांना येत असल्याचे मनोज मेहेर यांनी तक्रारपत्रात म्हटले आहे.
आज या स्मशानभूमीतील अंत्यविधीच्या चौथरा कामाची मी पत्रकारांसमवेत पाहणी केली असता, पाचपैकी चौथ्या चौथऱ्याचे कोणत्याही प्रकारचे काम झाले नसल्याचे निदर्शनास आले आहे. अंत्यविधीसाठी वापरण्यात आलेला पाचवा चौथरा हा जुनाच असून त्यावर केवळ रंगरंगोटी करण्यात आलेली आहे. या पाचव्या चौथऱ्यावर रंगरंगोटीशिवाय काहीही काम करण्यात आलेले नाही. पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या चौथऱ्यावर अंत्यविधीच्या ठिकाणी मृतदेहाखाली येणारा भाग हा नव्याने लोखंडी जाळी बसविण्यात आली आहे. तथापि या तीनही चौथऱ्यावर अंत्यविधीसाठी मृतदेह ठेवल्यावर बाजूच्या दोन्ही ठिकाणचे कठडे हे जुनेच असून त्यावरही केवळ रंगरंगोटीचा मुलामा देण्यात आला आहे. हे बाजूकडच्या दोन्ही भागातील कठडे आताच ठिकठिकाणी तुटल्याचे मी पत्रकारांना निदर्शनास आणून दिले. आजच्या पत्रकारांसमवेतच्या पाहणी अभियानात समस्येचे फोटो व चित्रीकरणही केलेले असल्याचे मनोज मेहेर यांनी पालिका प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले आहे.
समस्येचे गांभीर्य व कामातील गलथानपणा पाहता निवेदन मिळताच आपण घटनास्थळी येवून समस्येची पाहणी करून या कामाबाबतचा जाब काम करत असलेल्या ठेकेदाराला व कामाची पाहणी करणाऱ्या पालिका अधिकाऱ्यांना विचारावा. काम व्यवस्थित झाल्याशिवाय कामाचे देयक देवू नये. काम पूर्ण झाल्यावरच या कामाची पाहणी सारसोळे ग्रामस्थांना करून द्यावी. कारण ही स्मशानभूमी आम्हा सारसोळेच्या ग्रामस्थांची आहे. कामामध्ये हाच प्रकार कायम राहील्यास या ठेकेदाराचा काळ्या यादीत समावेश करून हे काम नव्या ठेकेदाराकडून करून घ्यावे. आपण जेव्हा पाहणी करायला जाल त्यावेळी आम्हालाही घेवून जावे अशी मागणी मनोज मेहेर यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.
०००००००००० ००००००००००००० ०००००००००००००० ००००००००००००००००००००
ज्या ठिकाणी अंत्यविधी होतात, किमान त्या ठिकाणचे कामतरी चांगले असावे. त्या कामात कोणत्याही प्रकारचा गलथानपणा नसावा व थुकपट्टी नसावी, इतकीच आमची माफक अपेक्षा आहे. चौथऱ्यावरील कठडे आताच काम सुरु असताना ठिकठिकाणी तुटल्याचे निदर्शनास आले आहे. या कामाची पाठराखण करून पालिकेने कानाडोळा केल्यास याप्रकरणी उपलब्ध फोटो व चित्रीकरणाच्या आधारावर मुख्यमंत्री, पालकमंत्री व मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यांच्या निदर्शनास हा प्रकार आम्ही आणून देणार आहोत.
:- मनोज यशवंत मेहेर

सुजित शिंदे : navimumbailive.com@gmail.com

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात लोकसभा निवडणूकीपूर्वी सुजय विखेंच्या भाजपप्रवेशानंतर ‘मुले पळविणारा पक्ष’ असा विरोधी पक्षांकडून भाजपवर आरोप करण्यात आला. त्या आरोपाला उत्तर देताना फोडाफोडीमधील भाजपचे राज्यपातळीवर ‘मास्टरमाईंड’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गिरीश महाजन यांनी मुलेच काय पण आपण आजोबाही पळविणार असल्याचा इशारा देत विरोधी पक्षांना आणखी हादरे देण्याचा इशारा दिला होता. यानंतरही कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये फोडाफोडी करत राज्याच्या शहरी व ग्रामीण भागात भाजपला बळकटी आणण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व फोडाफोडीचे तज्ज्ञ गिरीश महाजन यांनी सातत्यानी चालविला आहे. ठाण्याच्या राजकारणात राष्ट्रवादी कॉंग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवी मुंबईलाच हादरा देत ऐरोलीचे आमदार संदीप नाईक यांना भाजपात घेत सुजय विखेपाटील प्रकरणाची पुनरावृत्ती केली आहे. महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणूका अवघ्या दीड ते पावणे दोन महिन्यावर येवून ठेपलेल्या असताना गणेश नाईक भाजपमध्ये कधी प्रवेश करणार, याचीच चर्चा ठाण्याच्या राजकारणात सुरू असून मोदी व अमित शहा यांच्या उपस्थितीत नाईकांचा भाजपप्रवेश होणार असल्याच्या चर्चेवर आता राजकारणातील चावडी गप्पांमध्ये पैंजाही झडू लागल्या आहेत.

आपल्या आमदारकीचा राजीनामा देत संदीप नाईकांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवा नेतृत्व व नवी मुंबईचे माजी महापौर सागर नाईक यांनीही संदीप नाईकांसवेत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. नवी मुंबई महानगरपालिकेत राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे ५२ नगरसेवकांचे संख्याबळ असून ५ अपक्ष नगरसेवकांचे त्यांना समर्थन आहे. संदीप नाईकांपाठोपाठ ठाणे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री गणेश नाईक व ठाण्याचे माजी खासदार संजीव नाईक तसेच महापालिकेतील किमान ४५ ते ४८ नगरसेवकांचा ताफा नजीकच्या काळात कोणत्याही क्षणी भाजपात विलिन होण्याची कुणकुण लागताच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी नवी मुंबईतील राष्ट्रवादी कॉंग्रेसची डागडूजी करताना आपले विश्वासू साथीदार व नवी मुंबईचे माजी उपमहापौर अशोक गावडे यांची नवी मुंबई जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. अशोक गावडे, सपना गावडे, सानपाड्यातील बोऱ्हाडे, तुर्भेतील पाटील व सुरेश कुलकर्णीसह त्यांचे तीन नगरसेवक असे आठ नगरसेवक आज राष्ट्रवादीकडे असून ५२ पैकी ४४ नगरसेवक खुलेआमपणे गणेश नाईक समर्थक म्हणून नवी मुंबईत वावरत आहेत. अपक्षांमध्ये पाचही नगरसेवक नाईकांसोबत जाणार असल्याचे एव्हाना निश्चित झाले आहे.

संदीप नाईक व सागर नाईक भाजपात गेले असतानाच गणेश नाईक, संजीव नाईक व महापालिकेतील नगरसेवक भाजपात कधी प्रवेश करणार याचीच ठाणे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळाला उत्सूकता लागलेली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात गणेश नाईकांची प्रतिमा मातब्बर राजकारण्यात मोडत असून १९९० ते १९९९ आणि २००४ ते २०१४ या काळात त्यांनी महाराष्ट्राच्या विधानभवनात आमदार म्हणून काम केले आहे. १९९५ ते १९९७ या काळातही त्यांनी शिवशाही सरकारच्या काळात त्यांनी मंत्री व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून काम केले आहे. २००४ ते २०१४ या काळात त्यांनी आघाडी सरकारचे मंत्री व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून काम सांभाळले आहे. गणेश नाईकांचे जनता दरबार हा महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेचा विषय बनलेला आहे. गणेश नाईक आमदार असताना १९९० साली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नावारूपालाही नव्हते. १९९५ ला गणेश नाईक मंत्री व पालकमंत्री असताना फडणवीस हे नागपुर शहराचे महापौर होते.  सध्या भाजपमध्ये राज्यस्तरावर देवेंद्र फडणवीस, चंद्रकांतदादा पाटील, गिरीश महाजन हे आघाडीचे नेतृत्व असले तरी राज्याच्या राजकारणात हे गणेश नाईकांना ‘ज्युनिअर’ आहेत. त्यामुळे फडणवीस व पाटलांच्या हातून गणेश नाईकांचा भाजप प्रवेश राजकीय संकेतांना व राजकीय नीतीमूल्यांना धरून उचित नसल्याने लवकरच नवी मुंबईत विशेष भव्य दिव्य कार्यक्रम सोहळ्याचे आयोजन करून पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजप अध्यक्ष आणि देशाचे गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत गणेश नाईकांचा, संजीव नाईकांचा  व राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील ४५ पेक्षा अधिक नगरसेवकांचा भाजपप्रवेशाचा कार्यक्रम घेतला जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात येत आहे. पंतप्रधान मोदींचा महाराष्ट्रातील कार्यक्रम अजून निश्चित झाला नसला तरी विविध तारखांबाबत वावड्या उठत आहेत. त्यामुळे गणेश नाईकांचा संभाव्य भाजप प्रवेश हा सध्या तरी ठाणे जिल्ह्यातील चर्चेचा व उत्सूकतेचा विषय बनला आहे.

 

सुजित शिंदे : navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या नेरूळ तालुकाध्यक्षपदी महादेव पवार यांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष अशोक गावडे यांनी त्यांना आज नियुक्तीपत्रही दिले. पश्चिम महाराष्ट्रातील माणसाची नेरूळ तालुकाध्यक्षपदी निवड करताना जिल्हाध्यक्ष अशोक गावडे यांनी आक्रमक मोर्चेबांधणीला सुरूवात केल्याचे बोलले जात आहे.

गेली १३ वर्षे नेरूळच्या सामाजिक व राजकीय क्षेत्रात महादेव पवार सक्रिय असून यापूर्वी ते राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या प्रभाग ८६च्या अध्यक्षपदाचा कार्यभार सांभाळत होते. २०१५च्या महापालिका निवडणूकीदरम्यान त्यांनी मनसेतून राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला होता. २०१० साली त्यांनी मनसेकडून सारसोळे व नेरूळ सेक्टर सहा परिसरातून त्यांनी महापालिकेची निवडणूकही लढविली होती. ते स्वत: एक व्यावसायिक असून सामाजिक कार्यातून तळागाळातील वर्गाशी तसेच व्यवसायाच्या निमित्ताने त्यांचा घरटी जनसंपर्क चांगल्यापैकी आहे. दत्तकृप्पा सामाजिक संस्था, गणेशोत्सव मंडळ, नवरात्रौत्सव मंडळ या माध्यमातून ते सांस्कृतिक व धार्मिक कार्यातही आपले योगदान देत आहेत.

नेरूळ पश्चिमला सेक्टर परिसरात तसेच गावठाणातही पश्चिम महाराष्ट्राचा वर्ग निवासी स्वरूपात मोठ्या प्रमाणावर विखुरलेला आहे. हा वर्ग प्रामुख्याने शरद पवारांना मानणारा आहे. महादेव पवार यांच्या घरापासून हाकेच्या अंतरावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे लढवय्ये नेतृत्व व माथाडी नेते आमदार शशिकांत शिंदे यांचे नेरूळ सेक्टर ६ परिसरात निवासस्थान आहे. सातारा भागातील महादेव पवारांची नेरूळ तालुकाध्यक्षपदी झालेली निवड पश्चिम महाराष्ट्रातील जनतेला दिलासा देणारी असून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अशोक गावडे यांनी पक्षबांधणीची आक्रमक केलेली सुरूवात पाहता आगामी निवडणूकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस ताकदीनिशी उतरणार असल्याचे चित्र एव्हाना स्पष्ट झाले आहे.

सुवर्णा खांडगेपाटील : navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई : महाराष्ट्रातील पूरग्रस्त बंधू भगिनींना मदत करुन त्यांच्या जीवनातील हरवलेले सूर पुन्हा एकदा जुळण्यासाठी  नगरसेविका सौ.रुपाली किस्मत भगत आणि समाजसेवक गणेशदादा भगत यांनी स्थानिक जनतेला आणि मित्र परिवारास पुरग्रस्तांच्या मदतीसाठी केलेल्या आव्हानाला  सर्व नागरिकांनी माणुसकीच्या नात्याने उत्तम प्रतिसाद देत सढळ हाताने शक्य ती मदत केली.

नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर कपडे, बिस्किटे, पाणी, धान्य, औषधे व इतर वस्तू नेरुळ सेक्टर-१६ नगरसेविका जनसंपर्क कार्यालयात जमा केले. १२ ऑगस्ट१९ रोजी जमा झालेल्या वस्तू ट्रक मध्ये भरून मदत संकलन केंद्र-माथाडी भवन पहिला मजला,एपीएमसी,तुर्भे येथे समन्वयक यांच्याकडे सुपूर्द केल्या.

शिवाजी पिंगळे, आनंदराव पवार, दिलीप खांडे,गोरक्षनाथ गांडाल, प्रमोद प्रभु, शांताराम मातेले, शांताराम कुऱ्हाडे, अशोक गांडाल, सागर मोहिते, सूर्या पात्रा, जिमी सप्रा, रविंद्र भगत, संतोष शिंदे, संजय गांडाल, मंगेश कदम, विनय शेडगे, श्रीधर मोरे, मन्सूर कोतवडेकर, रोहित चव्हाण, सुभाष यादव, अरुण यादव, गौरव सूर्यवंशी, सुदीप बांद्रे, सुमित गायकवाड, अमर मोरे, मयुर पवार, सिद्धेश गुरव, रोहित भोसले,पवन पवार, राजेश घाडी, संदेश घाडी, नवीन पातेरे, संकेत क़ुर्लेकर, विजय पातेरे, विजय पिंगळे, समीर परबलकर, अविनाश तिकोणे, स्वप्निल परंडवल, संतोष पावसकर, रितेश मांदाडकर यांनी मदत फेरी काढण्यापासून ते जमा झालेल्या वस्तू मदत संकलन केंद्रापर्यंत पोहचविण्यापर्यंत विशेष मेहनत घेतली.

सुवर्णा खांडगेपाटील : navimumbailive.com@gmail.com

राष्ट्रवादीच्या नगरसेविका सौ. रूपाली किसमत भगतांचा पालिका आयुक्तांकडे पाठपुरावा

नवी मुंबई : प्रभागातील नेरूळ सेक्टर १८ परिसरातील मीनाताई ठाकरे दैनंदिन मार्केट, ग्रंथालय व अभ्यासिकेतील समस्या दूर करण्याची मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रभाग ९६ मधील नगरसेविका सौ. रूपाली किसमत भगत यांनी महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्याकडे लेखी निवेदनातून केली आहे.

नेरूळ सेक्टर १६,१६ए, १८, १८8 ए व सभोवतालच्या परिसरातील रहीवाशांसाठी मीनाताई ठाकरे दैनंदिन मार्केट, ग्रंथालय, अभ्यासिका  निर्माण केली. त्याबाबत महापालिका प्रशासनाचे आभार मानावे व कृतज्ञता व्यक्त करावी, तितकी कमीच आहे. परंतु दुर्दैवाने  त्या ठिकाणी डागडूजी करण्यास व समस्या सोडवून सुविधा देण्यास महापालिका प्रशासनाकडून दाखविली जाणारी उदासिनता, केली जाणारी चालढकल यामुळे समस्यांचा उद्रेक झालेला आहे. या इमारतीचा रंग पूर्णपण उडाला असून बकालपणाचे स्वरूप प्राप्त झालेले आहे.  या  इमारतीची  लवकरात लवकर डागडूजी होणे आवश्यक आहे. छताला  गळती  लागली असून ठिकठिकाणी पाणी गळत  आहे. ओलावा  आलेला  आहे. या  इमारतीचे मुख्य प्रवेशद्वार तुटलेले आहे. डागडूजी होणे आवश्यक आहे. या ठिकाणी असलेल्या वॉटर पंपही लिकेज असून  याचीही वेळीच  दुरूस्ती होणे आवश्यक आहे. या ठिकाणी गटरव्यवस्थाही दुरावस्थेत आहे. येथील खिडक्या तुटल्या असून खिडक्यांची दुरूस्ती करून जाळ्या बसवाव्यात की जेणेकरून डास आतमध्ये प्रवेश करणार नाहीत. याशिवाय त्या ठिकाणी इतरही  अनेक समस्या असून त्याचे लवकरात लवकर निवारण होणे  आवश्यक  आहे. या ठिकाणच्या  समस्या सोडवून स्थानिक रहीवाशांना दिलासा देण्याबाबत तात्काळ सकारात्मक कार्यवाही करण्याची मागणी नगरसेविका सौ. रूपाली किसमत भगत यांनी केली आहे.

नवी मुंबई : महापालिकेच्या महिला व बालकल्याण समिती, समाजकल्याण व झोपडपट्टी सुधार समिती, इतर योजना या माध्यमातून नवी मुंबई महापालिका प्रशासन दरवर्षी वेगवेगळया जनकल्याणकारी योजना राबविते. प्रसिध्दीअभावी या योजना अनेकदा नगरसेवक कार्यालयापुरत्या अथवा नगरसेवकांच्या ओळखीच्या कुटूंबापर्यत सिमित असायच्या. मात्र प्रभाग 96च्या नगरसेविका सौ. रूपाली किसमत भगत या अपवाद ठरल्या आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही महापालिकेच्या जनकल्याणकारी योजनांची 5000 पत्रके काढून प्रभाग 96 व 97 मध्ये घरोघरी वितरीत करण्यास सुरूवात केली आहेे.
2015 साली महापालिका सभागृहात आल्यावर नगरसेविका रूपाली किसमत भगत यांनी महापालिकेच्या योजना जाणून घेतल्या. या योजना त्यांनी स्वत:च्या कार्यालयापुरत्या अथवा पक्षाच्या कार्यकर्त्यापुरत्याच मर्यादीत न ठेवता स्वखर्चाने त्या योजनांची 5 ते 6 हजार पत्रके काढून आपल्या व शेजारच्या 97 या प्रभागातही वितरीत केली. महापालिकेच्या जनकल्याणकारी योजना या नवी मुंबईकरांसाठी आहे, त्याची माहिती त्यांना मिळालीच पाहिजे. करदात्या नागरिकांना योजनांचा लाभ हा भेटलाच पाहिजे अशी भूमिका घेत नगरसेविका सौ. रूपाली किसमत भगत यांनी घरोघरी स्वखचार्र्ने प्रसिध्दीपत्रके छापून वितरीत केली.
गेली 5 वर्षे त्या हा उपक्रम राबवित असूून घरोघरी स्वखर्चाने जनजागृती करत आहेत. पूर्वीच्या तुलनेत महापालिकेच्या योजनांचे लाभार्थी नेरूळ सेक्टर 16, 16ए, 18, 18 ए व 24 परिसरातून वाढलेे असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडूनही देण्यात येत आहे. अनेक नगरसेविकां व नगरसेवकांच्या कार्यालयापुरतीच सिमित राहीलेल्या जनकल्याणकारी योजना नगरसेविका रूपाली भगत यांच्या जनजागृतीच्या उपक्रमातून घराघरात पोहोचल्या असल्याची प्रतिक्रिया नेरूळ पश्चिमला घराघरात चर्चिली जात आहे.