पनवेल : देशांतर्गत आघाडीवर रुपयाचे मूल्य वधारल्याने स्थानिक बाजारपेठेत सोन्याच्या किंमती कमी झाल्या आहेत. सलग चौथ्या आठवड्यात सोन्याच्या दरात घसरण सुरु आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलरसह रुपयाही मजबूत झाल्यामुळे सोन्याच्या किंमतीवर प्रतिकूल परिणाम होत आहे. सध्या सोने प्रति दहा ग्रॅमसाठी 25,498 रुपयांवर व्यवहार करत असून भावामध्ये 273 रुपयांनी म्हणजेच 1.07 टक्क्यांंनी घसरण झाली आहे. देशांतर्गत आघाडीवर रुपया सावरल्याने देशातील स्थानिक बाजारपेठेत सोन्याच्या किंमती आणखी कमी झाल्या आहेत. अमेरिकेची फेडरल रिझर्व्ह या वर्षी व्याजदर वाढ करण्याची शक्यता आहे. त्यामुळे इतर चलनांच्या तुलनेत डॉलर दिवसेंदिवस मजबूत होतो आहे. जसजसा डॉलर मजबूत होईल तसा सोन्याच्या किंमतीवर दबाव वाढत जाणार आहे. देशांतर्गत बाजारात सोन्याचे दर 25 हजारांखाली जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.