स्वयंम न्यूज ब्युरो
बातमीसाठी संपर्क : ८३६९९२४६४६ : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : सानपाडा नोडमधील भाजपाचे युवा नेते व समाजसेवक पांडुरंग आमले यांनी सानपाडावासियांसाठी बनविलेल्या दिनदर्शिकेचे उद्घाटन बेलापुरच्या भाजप आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या हस्ते महापालिका मुख्यालयात मंगळवारी केले.
दिनदर्शिकेचे प्रकाशन करताना आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी सानपाडा परिसरात कोरोना महामारीच्या काळातही पांडुरंग आमले यांनी केलेल्या सामाजिक कार्याची प्रशंसा करताना त्यांनी याहीपुढे जावून आपल्या सामाजिक कार्याच्या कक्षा विस्ताराव्यात असे आवाहन केले.
दिनदर्शिका प्रकाशन सोहळ्यात भाजपाचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, जिल्हा महामंत्री निलेश म्हात्रे, महामंत्री डॉ. राजेश पाटील, भाजपाचे ज्येष्ठ माजी नगरसेवक डॉ. जयाजी नाथ, अशोक गुरखे, आयटीसेलचे संयोजक पंकज दळवी, समाजसेवक देवनाथ म्हात्रे, भाजपाच्या सानपाडा-जुईनगर महिला आघाडी अध्यक्षा आज्ञा गव्हाणे, भाजपचे सानपाडा-जुईनगर मंडळ पदाधिकारी निलेश वर्पे, सुलोचना निंबाळकर, मंगल वाव्हळ, साईभक्त सेवा मंडळाचे खजिनदार प्रथमेश माने, सहसचिव विनायक काबुगडे उपस्थित होते.