• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 29, 2018

कोपरखैरणेत महिला सक्षमीकरण केंद्राच्या तीन मजली वास्तूचे उद्घाटन संपन्न

adminbyadmin
in नवी मुंबई
0
कोपरखैरणेत महिला सक्षमीकरण केंद्राच्या तीन मजली वास्तूचे उद्घाटन संपन्न

नवी मुंबई : महानगरपालिकेच्या वतीने महिला सक्षमीकरणासाठी विविध योजना, उपक्रम राबवून ठोस काम केले जात असून महिला सक्षमीकरण केंद्राच्या माध्यमातून महिलांना एकत्र येण्यासाठी हक्काचे ठिकाण उपलब्ध होत असल्याचे सांगत नवी मुंबईचे महापौर श्री. जयवंत सुतार यांनी हे केंद्र लवकरच कार्यान्वित करून याठिकाणी विविध प्रकारचे प्रशिक्षण कार्यक्रम, उपयोगी उपक्रम राबविण्यास सुरूवात होईल तसेच महिलांनी निर्मिलेल्या विविध साहित्य विक्रीसाठी जागा उपलब्ध करून देण्यात येईल अशा शब्दात आपले मनोगत व्यक्त केले.

नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सेक्टर 10, कोपरखैरणे येथे भूखंड क्र. 9 वर उभारण्यात आलेल्या तीन मजली महिला सक्षमीकरण केंद्र इमारतीच्या उद्घाटन समारंभप्रसंगी ते आपले मनोगत व्यक्त करीत होते. यावेळी ऐरोली विधानसभा सदस्य आमदार श्री. संदीप नाईक, परिवहन समिती सभापती श्री. रामचंद्र दळवी, इ प्रभाग समितीच्या अध्यक्ष श्रीम. लता मढवी, स्थानिक नगरसेवक श्री. रामदास पवळे, नगरसेवक श्री. लिलाधर नाईक, श्री. रमेश डोळे, ॲड. भारती पाटील, श्रीम.संगीता म्हात्रे, इ प्रभाग समिती सदस्य श्री. मारूती सकपाळ, माजी नगरसेवक श्री. कोंडीबा तिकोने, श्री. रविकांत पाटील, श्रीम. इंदुमती तिकोने, कोपरखैरणे विभागाचे सहा. आयुक्त श्री. अशोक मढवी, कार्यकारी अभियंता श्री. संजय देसाई आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना आमदार श्री. संदीप नाईक यांनी नवी मुंबईृ शहराने नेहमीच नावाप्रमाणे नव्या गोष्टींना प्राधान्य दिले असून महिलांचे सक्षमीकरण करताना जागतिक पातळीवरील बदलांचा अंदाज घेऊन त्याला साजेसे प्रशिक्षण कार्यक्रम, योजना, उपक्रम राबवावेत असे सूचित केले. नवी मुंबई महानगरपालिका महिला सक्षमीकरणासाठी भरीव काम करीत असून या वास्तूमधून महिलांना सर्वार्थाने सक्षम करणारे नानाविध उपक्रम राबविले जावेत अशी अपेक्षा व्यक्त करीत आपण त्यासाठी 15 लक्ष रूपयांचा आमदार निधी देत असल्याचे आमदार श्री. संदीप नाईक यांनी जाहीर केले.

स्थानिक नगरसेवक श्री. रामदास पवळे यांनी आपल्या प्रभागात एक चांगली वास्तू उपलब्ध होत असल्याचा आनंद व्यक्त करीत महिला भगिनींनी त्याचा मोठ्या प्रमाणावर उपयोग करून घ्यावा असे आवाहन केले.

नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सेक्टर 10, कोपरखैरणे येथे रामचंद्र नाईक चौकाशेजारी डी मार्ट जवळ भूखंड क्र. 9 वर मोक्याच्या ठिकाणी 2 कोटी 85 लक्ष रूपये खर्च करून ही तीन मजली महिला सक्षमीकरण वास्तू उभारण्यात आली असून प्रत्येक मजल्यावर 7.5 X  7.5 मीटरची सभागृह व्यवस्था आहे. या इमारतीचा वापर महिलांसाठी विविध उपक्रम राबविण्यासाठी होणार असून याप्रसंगी महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Previous Post

सरकार उपासमारीला निमंत्रण देत आहे : आ. डॉ. निलम गोऱ्हे

Next Post

कोपरखैरणे सेक्टर 7 नवी मुंबई महानगरपालिका शाळेत वाढीव वर्गखोल्यांचे उद्घाटन

Next Post
कोपरखैरणे सेक्टर 7 नवी मुंबई महानगरपालिका शाळेत वाढीव वर्गखोल्यांचे उद्घाटन

कोपरखैरणे सेक्टर 7 नवी मुंबई महानगरपालिका शाळेत वाढीव वर्गखोल्यांचे उद्घाटन

बॅकांना लुटून फरार झालेल्या विजय माल्याच्या स्वागतासाठी आर्थर रोड कारागृहाची जंगी तयारी

बॅकांना लुटून फरार झालेल्या विजय माल्याच्या स्वागतासाठी आर्थर रोड कारागृहाची जंगी तयारी

ओबीसी वर्गाचा नोकरीचा अनुशेष भरण्यास कोकण रेल्वे सकारात्मक

ओबीसी वर्गाचा नोकरीचा अनुशेष भरण्यास कोकण रेल्वे सकारात्मक

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com