• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 29, 2018

कोपरखैरणे सेक्टर 7 नवी मुंबई महानगरपालिका शाळेत वाढीव वर्गखोल्यांचे उद्घाटन

adminbyadmin
in Uncategorized
0
कोपरखैरणे सेक्टर 7 नवी मुंबई महानगरपालिका शाळेत वाढीव वर्गखोल्यांचे उद्घाटन

नवी मुंबई : शिक्षण व्हिजनची योग्य अंमलबजावणी करीत नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळांतून गुणवत्तापूर्ण शिक्षणावर भर दिला जात असल्याने इतरांच्या तुलनेत नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळांची पटसंख्या वाढत असून यावर्षीही पटसंख्येत 1 हजारहून अधिक विद्यार्थ्यांची वाढ झाल्याचे अभिमानाने सांगत त्या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळा इमारतीत वर्गखोल्या वाढवाव्या लागत आहेत याचे समाधान वाटते अशा शब्दात नवी मुंबईचे महापौर श्री. जयवंत सुतार यांनी मनोगत व्यक्त केले.

नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सेक्टर 7, कोपरखैरणे येथील नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्र. 32 व 114 इमारतीच्या दुस-या मजल्याच्या वाढीव बांधकामाच्या उद्घाटन समारंभप्रसंगी ते आपले मनोगत व्यक्त करीत होते.  याप्रंसगी ऐरोली विधानसभा सदस्य आमदार श्री. संदीप नाईक, परिवहन समिती सभापती श्री. रामचंद्र दळवी, इ प्रभाग समितीच्या अध्यक्ष तथा स्थानिक नगरसेविका श्रीम. लता मढवी, नगरसेवक श्री. लिलाधर नाईक, श्री. रमेश डोळे, श्रीम.संगीता म्हात्रे, इ प्रभाग समिती सदस्य श्री. मारूती सकपाळ, माजी नगरसेवक श्री. कोंडीबा तिकोने, श्री. रविकांत पाटील, कोपरखैरणे विभागाचे सहा. आयुक्त श्री. अशोक मढवी, कार्यकारी अभियंता श्री. संजय देसाई आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमधून आधुनिक शिक्षणपध्दतीचा अंगिकार केला जात असून अनेक गोष्टींतील पहिल्या नंबरप्रमाणे डिजीटल स्कुल संकल्पना राबविणारी नवी मुंबई ही पहिली महानगरपालिका असल्याचा आनंद आणि अभिमान वाटतो अशा शब्दात ऐरोली विधानसभा सदस्य आमदार श्री. संदीप नाईक यांनी भावना व्यक्त केल्या.

सेक्टर 7, कोपरखैरणे येथील नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्र. 32 व 114 इमारतीमध्ये वाढीव वर्गखोल्यांची गरज लक्षात घेऊन 1 कोटी 64 लक्ष रक्कम खर्च करून 754.90 चौ.मी. चे दुस-या मजल्याचे वाढीव बांधकाम करण्यात आले असून यामध्ये 8 वर्गखोल्या, भांडार कक्ष, मुख्याध्यापक कक्ष, शिक्षक कक्ष, प्रयोगशाळा, कृतीकक्ष व बहुउद्देशीय वर्ग अशी सुविधा 6 प्रसाधनगृहांसह उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामधील सर्वच वर्गखोल्या प्रशस्त व प्रकाशमान आणि हवेशीर असल्याने मुलांना व शिक्षकांना अभ्यासासाठी उत्साहवर्धक वातावरण उपलब्ध होणार आहे. 

Previous Post

कोपरखैरणेत महिला सक्षमीकरण केंद्राच्या तीन मजली वास्तूचे उद्घाटन संपन्न

Next Post

बॅकांना लुटून फरार झालेल्या विजय माल्याच्या स्वागतासाठी आर्थर रोड कारागृहाची जंगी तयारी

Next Post
बॅकांना लुटून फरार झालेल्या विजय माल्याच्या स्वागतासाठी आर्थर रोड कारागृहाची जंगी तयारी

बॅकांना लुटून फरार झालेल्या विजय माल्याच्या स्वागतासाठी आर्थर रोड कारागृहाची जंगी तयारी

ओबीसी वर्गाचा नोकरीचा अनुशेष भरण्यास कोकण रेल्वे सकारात्मक

ओबीसी वर्गाचा नोकरीचा अनुशेष भरण्यास कोकण रेल्वे सकारात्मक

मूषक नियत्रंण कामगारांचे वेतन पुन्हा रखडले

मूषक नियत्रंण कामगारांचे वेतन पुन्हा रखडले

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com