• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Apr 5, 2018

बेलापूर, घणसोली विभागातील अनधिकृत बांधकामांवर हातोडा

adminbyadmin
in नवी मुंबई
0
बेलापूर, घणसोली विभागातील अनधिकृत बांधकामांवर हातोडा

 नवी मुंबई – महानगरपालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामे, अतिक्रमणे यावर महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांच्या मार्गदर्शनानुसार कठोर कारवाई करण्यात येत असून बेलापूर व घणसोली विभागातील अनधिकृत बांधकामांवर कारवाईचा हातोडा उचलण्यात आला.

यामध्ये बेलापूर विभाग कार्यालय क्षेत्रांतर्गत करावे मधील साईवाडी येथे चंद्रकांत कोळी यांचे तीन मजली 80.00 चौ.मी. क्षेत्रफळाचे व अराफत शेख यांचे तीन मजली 95.00 चौ.मी. क्षेत्रफळाचे अनधिकृत बांधकाम तोडून टाकण्यात आले. या अनधिकृत बांधकामांस महाराष्ट्र नगररचना अधिनियम 1966 मधील कलम 54 अन्वये रितसर नोटीस बजावण्यात आली होती. तथापि या नोटिशीस प्रतिसाद न दिल्याने अतिरिक्त आयुक्त श्री. अंकुश चव्हाण यांच्या मार्गदर्शनानुसार, अतिक्रमण विभागाचे उप आयुक्त डॉ. अमरिश पटनिगिरे यांच्या नियंत्रणाखाली, बेलापूर विभागाचे विभाग अधिकारी श्री. शशिकांत तांडेल यांनी विभागातील सहकारी अधिकारी-कर्मचारी यांच्या सहयोगाने ही धडक कारवाई केली. या कारवाईत 4 ब्रेकर, 3 गॅस कटर व 25 मजुरांसह पोलीस पथक कायदा व सुव्यवस्थेसाठी तैनात होते.

अशाचप्रकारे घणसोली विभाग कार्यक्षेत्रामधील अर्जुनवाडी येथे वसीम खान यांनी अनधिकृतरित्या केलेले  तळमजल्याचे इमारत बांधकाम निष्कासीत करण्यात आले. घणसोली विभागाचे सहा. आयुक्त श्री. दत्तात्रय नागरे यांनी विभागातील सहकारी अधिकारी-कर्मचारी यांच्या सहयोगाने बांधकाम निष्कासनाची धडक कारवाई केली. या कारवाईत 2 ब्रेकर, 2 गॅस कटर अतिक्रमण विभागाचे पोलीस पथक तैनात होते.

महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांच्या निर्देशानुसार विविध विभाग क्षेत्रात अतिक्रमण बांधकाम विरोधी कारवाया अधिक प्रभावीपणे राबविल्या जाणार आहेत.

 

Previous Post

शाखा समन्वयक नितीन कदमांकडून सभागृहनेत्या विशाखा राऊत यांचे अभिनंदन

Next Post

सन 2017-18 चा अर्थसंकल्प वास्तववादी तसेच चौथ्यांदा आर्थिक सक्षमतेचा ‘डबल ए प्लस स्टेबल (AA+ STABLE)’ पत मानांकन बहुमान

Next Post
कोपरखैराणे नागरी आरोग्य केंद्रात महिला परिचारिकांना शिविगाळ, मारहाण

सन 2017-18 चा अर्थसंकल्प वास्तववादी तसेच चौथ्यांदा आर्थिक सक्षमतेचा ‘डबल ए प्लस स्टेबल (AA+ STABLE)’ पत मानांकन बहुमान

आरटीईचे थकीत पैसे मिळणेकरिता केंद्र सरकारकडे  आवाज उठविणेविषयी युवा सेनेचे खासदार राजन विचारेंना साकडे

आरटीईचे थकीत पैसे मिळणेकरिता केंद्र सरकारकडे आवाज उठविणेविषयी युवा सेनेचे खासदार राजन विचारेंना साकडे

आयपीएलमध्ये न खेळल्यामुळे आपल्या खेळाडुंचे पाय जमिनीवर – वकार युनूस

आयपीएलमध्ये न खेळल्यामुळे आपल्या खेळाडुंचे पाय जमिनीवर - वकार युनूस

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com