• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 19, 2015

राजभवनातील दिमाखदार सोहळ्यात बाबासाहेब पुरंदरेंना ‘महाराष्ट्र भूषण’ प्रदान

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
राजभवनातील दिमाखदार सोहळ्यात बाबासाहेब पुरंदरेंना ‘महाराष्ट्र भूषण’ प्रदान

मुंबई : संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा आणि वादाचा विषय ठरलेला महाराष्ट्र भूषण पुरस्कार शिवशाहिर बाबासाहेब पुरंदरे यांना राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते आज (बुधवार) अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला. बाबासाहेब पुरंदेर यांचा आज 94 वा वाढदिवस आहे. त्याच दिवशी राज्य शासनाच्या वतीने त्यांचा राज्याच्या सर्वोच्च सन्मानाने गौरव करण्यात आला.
यावेळी मुख्येमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे, उद्योग मंत्री सुभाष देसाई, मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर, अरविंद सावंत आणि मंगल प्रभात लोढा उपस्थित आहेत. मराठी भाषा खर्‍या अर्थाने पुरंदरे यांच्यामुळे समृद्ध होईल, असे राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी सांगितले.
****
कोणाच्या भीतीने कार्यक्रम राजभवनात नाही – मुख्यमंत्री
कोणाच्या भीतीने हा कार्यक्रम राजभवनात घेण्यात आलेला नाही, असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, देशाचे सर्वोच्च सन्मान हे राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रपती भवनातील सोहळ्यात प्रदान केले जातात. तिच प्रथा राज्यात असावी यासाठी राज्याचा सर्वोच्च सन्मान राज्यपालांच्या हस्ते दिला जातो, त्यामुळे तो राजभवनात घेण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे फडणवीस म्हणाले. छत्रपतींच्या खर्‍या सेवकाला सन्मानित करण्याचे काम राज्य शासनाच्या वतीने झाले आहे, असेही ते म्हणाले.
****
शिवाजी महाराजांवरील नाटक-चित्रपटाला करणार मदत
शिवाजी महाराज हे आजच्या भाषेत सांगायचे झाले तर मॅनेजमेंट गुरु होते. त्यांचा प्रभाव आजच्या तरुणांवर असला पाहिजे यासाठी राज्य सरकार त्यांच्या जीवनावर नाटक, चित्रपट तयार करेल त्यांना मदत केली जाईल.
***
सत्काराला उत्तर देताना बाबासाहेब पुरंदरे म्हणाले…
संशोधन, चिकित्सा आणि मूल्यमापन करुन मी शिवाजी महाराजांवरील पुस्तक लिहिले आहे.
मला मार्गदर्शक आणि गुरु म्हणून बुध्दीमान असे गणेश हरी खरे हे संशोधक लाभले. मी नऊ लेख लिहिले. पण त्यावर कोणीही प्रतिक्रिया पाठवल्या नाही. खूप दिवस वाट पाहिली.
मला ज्ञानेश्‍वर माउली आणि तुकाराम महाराज यांच्या सारखे सोपे लिहिता यावे यासाठी प्रयत्न केले. मेहनत घेऊनही महाराजांचे कार्य लोकांपर्यंत पोहोचत नसेल, तर त्याचा उपयोग काय… लोकांना सोप्या भाषेत इतिहास वाचायला मिळाला पाहिजे.
तळागाळातील लोकांना शिवरायांचा इतिहास समजावा यासाठी सोप्या भाषेत लिहण्यासाठी मी सहा महिने विचार केला. त्यानंतर लिहायला लागतो. हे अगदी सहज घडले असे नाही. त्याच्या मागे एक मोठी प्रक्रिया आहे. इतिहास लिहिताना सर्व बाजूंचा विचार करुनच लिहायला हवे. त्यातही काही चुका झाल्या तर त्या लगेच दुरुस्त करायला हव्यात. केवळ मी महाराष्ट्र भूषण नाही तर महाराष्ट्र घडविणारा प्रत्येक व्यक्ती हा महाराष्ट्र भूषण आहे. त्याचा हा सन्मान आहे.

Previous Post

प्रभाग 96मध्ये नागपंचमीचा सण उत्साहात

Next Post

झुलेलाल मंदीरात नागपंचमी उत्सव उत्साहात

Next Post
झुलेलाल मंदीरात नागपंचमी उत्सव उत्साहात

झुलेलाल मंदीरात नागपंचमी उत्सव उत्साहात

आमच्यात सिरीजमध्ये कमबॅक करण्याची क्षमता – विराट कोहली

आमच्यात सिरीजमध्ये कमबॅक करण्याची क्षमता - विराट कोहली

दोन वर्षे झाली तरी नरेंद्र दाभोलकरांचे मारेकरी मोकाट

दोन वर्षे झाली तरी नरेंद्र दाभोलकरांचे मारेकरी मोकाट

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com