• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jun 27, 2015

महापालिकेच्या पावसाळी पाण्याचे व्यवस्थापन प्रणालीची राष्ट्रीय स्तरावर विशेष दखल

adminbyadmin
in नवी मुंबई
0
महापालिकेच्या पावसाळी पाण्याचे व्यवस्थापन प्रणालीची राष्ट्रीय स्तरावर विशेष दखल

नवी मुंबई : नगर विकास मंत्रालय, भारत सरकार यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या अमृत अर्थात अटल परिवर्तन आणि शहरी परिवर्तन मिशन तसेच स्मार्ट सिटी मिशनच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालेल्या नवी दिल्ली येथील शुभारंभप्रसंगी नवी मुंबई महानगरपालिकेच्या पावसाळी पाण्याचे व्यवस्थापन प्रणालीची माहिती विशेष स्टॉलद्वारे प्रसारीत करण्याचा बहुमान नवी मुंबई महानगरपालिकेस लाभला.
नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त दिनेश वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर अभियंता मोहन डगांवकर आणि त्यांच्या सहकार्‍यांनी या विशेष माहितीप्रद स्टॉलची निर्मिती केली असून दोन दिवसांत संपूर्ण देशभरातून आलेल्या विविध शासकीय, निमशासकीय संस्थांच्या, प्राधिकरणांच्या हजारो पदाधिकारी, अधिकारी व जिज्ञासू नागरिकांनी या स्टॉलला भेट दिली.
पावसाळी पाण्याचे सुयोग्य व्यवस्थापन राबविल्याबद्दल नवी मुंबई महानगरपालिकेस केंद्र सरकारमार्फत राष्ट्रीय नागरी जलपुरस्काराने यापुर्वीच सन्मानीत करण्यात आले असून या अनुकरणीय कार्यप्रणालीची माहिती सर्वांनाच व्हावी यादृष्टीने अमृत व स्मार्ट सिटी मिशनच्या शुभारंभप्रसंगी देशाच्या राजधानीत नवी दिल्ली येथे या कार्यप्रणालीचा माहितीप्रद स्टॉल मांडण्याचा बहुमान नवी मुंबई महानगरपालिकेस देण्यात आला होता.
या सादरीकरणामुळे नवी मुंबई महानगरपालिकेच्या वैशिष्ट्यपूर्ण कामांची दखल आणखी एकवार राष्ट्रीय पातळीवर घेतली जात असल्याचा आनंद व्यक्त करीत महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सर्व नवी मुंबईकर नागरिकांसाठी ही अभिमानाची गोष्ट असल्याचे मत व्यक्त केले आहे. महापौर सुधाकर सोनवणे यांनीही या विशेष कामगिरीबद्दल अभिनंदन केले आहे.

Previous Post

आरोप सिद्ध झाले तर राजकारण सोडेन : पंकजा

Next Post

शाळाबाह्य बालकांचे सर्वेक्षण कार्यशाळा

Next Post
शाळाबाह्य बालकांचे सर्वेक्षण कार्यशाळा

शाळाबाह्य बालकांचे सर्वेक्षण कार्यशाळा

प्रभाग ८५-८६ मध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

प्रभाग ८५-८६ मध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

माहितीच्या अधिकाराचे अवघ्या दोन दिवसांत उत्तर

माहितीच्या अधिकाराचे अवघ्या दोन दिवसांत उत्तर

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com