अनंतकुमार गवई : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : प्रभाग ७६ मधील पावसाळीपूर्व कामांचा आढावा घेण्याची मागणी भारतीय जनता युवा मोर्चाचे नवी मुंबई जिल्हा उपाध्यक्ष व अखिल भारतीय माथाडी कामगार संघटनेचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष पांडुरंग आमले यांनी एका निवेदनातून महापालिका आयुक्त डॉ. कैलाश शिंदे यांच्याकडे केली आहे.
पावसाळा आता जेमतेम महिन्यावर आलेला आहे. सानपाडा नोडमधील महापालिका प्रभाग ७६ मधील सानपाडा सेक्टर २,३,७,८ या विभागाचा समावेश होत आहे. पावसाळीपूर्व कामांच्या पार्श्वभूमीवर
१) पाणी कोठेही चोकअप होऊ नये यासाठी प्रभागातील सर्व गटारांची तळापासून तातडीने सफाई करण्यात यावी. २) रस्त्यावरील खड्ड्यात पावसाळ्यात पाणी साचून रस्ते जलमय होतात. ये-जा करणाऱ्या रहीवाशांच्या अंगावर पाणी उडते. साचलेल्या पाण्यात डासांची अंडी निर्माण होत असल्याने साथीच्या आजाराला खतपाणी मिळते. त्यामुळे प्रभागातील अंर्तगत व बाह्य रस्त्यावरील खड्डे बुजवून त्या ठिकाणी तातडीने डांबरीकरण करण्यात यावे. ३) प्रभागातील अंर्तगत व बाह्य रस्त्यावरील, पदपथावरील पथदिव्यांची तपासणी करुन बंद पडलेले पथदिवे दुरुस्त करावे तसेच अंधूक प्रकाश देणारे दिवे बदली करण्यात यावे. ४) पदपथावर कोठेही विद्युत केबल्स दिसणार नाहीत यासाठी त्या भूमिगत करण्यात याव्यात, पावसाळ्यात शार्ट सर्कीटचा धोका होऊन जिवितहानीची भीती आहे. ५) प्रभागातील अंर्तगत व बाह्य रस्त्यावर, पदपथावर तसेच गृहनिर्माण सोसायटीच्या संरक्षक भिंतींच्या बाहेर डोकावणाऱ्या धोकादायक व ठिसूळ फांद्यांची तसेच वृक्षांची तातडीने छाटणी करणेबाबत, ६) उद्याने व क्रिडांगणातील पथदिव्यांची तपासणी करणेबाबत, ७) पावसाळ्यात धूरफवारणी होत नसल्याने किमान महिनाभर तरी प्रभागातील गृहनिर्माण सोसायट्यांच्या अंर्तगत भागात धूरीकरण करणेबाबत:-
यासह पावसाळीपूर्व अन्य कामे प्रभागामध्ये तातडीने करुन घेण्यात यावीत, या कामांचा निवेदनात पांडुरंग आमले यांनी निवेदनात उल्लेख केला आहे.
तसेच आपण स्वत: मेअखेरिस प्रभागात पाहणी अभियान करुन पावसाळी कामे कितपत झाली आहेत, याचा आढावा घेण्यासाठी पाहणी दौरा आयोजित करावा अशी मागणी पांडुरंग आमले यांनी निवेदनाच्या अखेरीस पालिका आयुक्तांकडे केली आहे.