जयेश खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com
पुणे :सोमवार, दि. ५ मेपासून गोकुळ दुधाच्या दरात २ रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुणे, मुंबईत म्हशीचे दूध प्रतिलिटर ७४ रुपये तर उर्वरित महाराष्ट्रात ६८ रुपये प्रतिलिटर असणार आहे. तर गायीच्या दुधातही २ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. मुंबई, पुण्यात ५८ रुपये तर उर्वरित राज्यात ५० रुपये प्रतिलीटर दर होणार आहे.
गायीच्या दूध दरात देखील प्रति लिटर दोन रुपयांनी केली वाढ करण्यात आली आहे. याचा फायदा राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना होणार आहे. मात्र, ग्राहकांच्या खिशाला जळ बसणार आहे.
दरम्यान, दूध संस्था आपल्या दुधाच्या दरात वाढ करत आहेत. याचा शेतकऱ्यांना कितपत फायदा होतो हे पाहणं देखील महत्वाचं आहे. कारण सध्या दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दुधाला कमी दर मिळत आहे. एका बाजुला चाऱ्याच्या, पशुखाद्याच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. तर दुसरीकडे दुधाला अपेक्षीत दर मिळत नसल्यानं दूध उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. अशातच दुसरीकडे मात्र, दूध संस्था दुधाच्या दरात वाढ करत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या दुधाला चांगला दर न देता संस्था त्यांनी विक्री केलेल्या दुधाच्या दरात वाढ करत असल्याचे बोललं जात आहे.
दरम्यान, सध्या गोकूळने जरी दुधाच्या दरात वाढ केली असली तरी, अद्याप दुसऱ्या कोणत्या दूध संघाने दरात वाढ केलेली नाही. ते दूध संघ सुद्धा दुधाच्या दरात वाढ करण्याची शक्यता असल्याचे बोललं जात आहे. दरम्यान, या दरवाढीमुळ ग्राहकांच्या खिशाला जळ बसणार आहे. मात्र, दूध संघाने दरात वाढ केली खरी पण दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या पदरात नेमके किती पैसे पडणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. दूध संघानी वाढवलेला दर दूध उत्पादकांना खरचं मिळणार का? असा सवाल देखील काही शेतकरी करत आहेत.