• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Saturday, June 14, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Sep 11, 2024

नवी मुंबईमधील प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी केलेली बांधकामे नियमित होण्याचा मार्ग मोकळा

adminbyadmin
in मुंबई
0
नवी मुंबईमधील प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी केलेली बांधकामे नियमित होण्याचा मार्ग मोकळा

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतर नगरविकास विभागात स्थानिक भूमिपुत्र आणि सिडको अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक

खासदार नरेश म्हस्के यांची वचनपूर्ती

सुवर्णा खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com – ८३६९९२४६४६

मुंबई : नवी मुंबईमधील प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी केलेली बांधकामे नियमित करण्यासाठी दोन वर्षांपूर्वी शासन आदेश निघुनही अडचणी येत आहेत. मुख्यंत्री एकनाथ शिंदे यांनी याची दखल घेत तात्काळ बैठक घेण्याचे आदेश दिले होते. आज खासदार नरेश म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली नगरविकास विभागात सिडको अधिकारी आणि स्थानिक भूमिपुत्र यांची संयुक्त बैठक होऊन चर्चा झाली. अंतिम मसुदा आता लवकरच मुख्यमंत्र्यांकडे सादर केला जाणार असल्याने ही बांधकामे नियमित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

नवी मुंबई, रायगड जिल्ह्यातील पनवेल व उरण या तालुक्यांमधील अनेक गावांमधील भूमिपुत्रांनी गरजेपोटी रहिवास प्रयोजनार्थ बांधकामे केली आहेत. मात्र ही बांधकामे अनधिकृत म्हणून गणली जात आहेत. ही बांधकामे नियमित करण्यासंदर्भात २५ फेब्रुवारी २०२२ आणि ७ डिसेंबर २०२२ रोजी राज्य शासनाने धोरणात्मक निर्णय घेतला होता. दोन वर्ष झाले तरी निर्णयाची अंमलबजावणी करतांना अनेक अडचणी सिडको प्रशासन आणि भूमिपुत्रांना येत आहेत. स्थानिक लोकप्रतिनिधी, प्रकल्पग्रस्तांनी यासंदर्भात राज्य शासन, सिडको यांना अनेक निवेदने, अर्ज, सूचना केल्या आहेत. तसेच शासनानेही सिडको प्रशासनाला स्वयंस्पष्ट प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना वेळोवेळी केल्या आहेत. खासदार नरेश म्हस्के यांनी सुध्दा लोकसभा निवडणुकीतील प्रचारा दरम्यान प्राधान्याने हा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन प्रकल्पग्रस्तांना दिले होते.

प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशान्वये नगरविकास विभागात नगरविकास विभागाचे प्रधान सचिव असिम गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली एका बैठकीचे आयोजन केले होते.

या बैठकीला खासदार नरेश म्हस्के, सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, शिवसेना उपनेते विजय नाहटा, शिवसेना जिल्हाप्रमुख विजय चौगुले, माजी नगरसेवक शिवराम पाटील, किशोर पाटकर, स्थानिक शिवसैनिक आणि भूमिपुत्र भावेश पाटील,आतिष घरत,शिरीष पाटील,जयेश मढवी इत्यादी उपस्थित होते.

बैठकीत बांधकामे नियमित करण्यासंदर्भातील धोरणाबाबत चर्चा करण्यात आली. काही सूचना करण्यात आल्या. स्थानिक भूमिपुत्रांना कोणताही त्रास न होता बांधकामे नियमित करण्याबाबतचा प्रस्ताव तयार करण्यात येणार आहे. हा प्रस्ताव तात्काळ मुख्यमंत्र्यांकडे अंतिम मंजुरी पाठविण्यात येणार असल्याचे बैठकीत सांगण्यात आले. 

गेली अनेक वर्ष प्रकल्पग्रस्तांचा हा प्रश्न प्रलंबित होता. आता लवकरच शासन आदेश निघुन बांधकामे नियमित होतील, असा विश्वास खासदार नरेश म्हस्के यांनी व्यक्त केला आहे. प्रकल्पग्रस्त भूमीपुत्रांचा गरजेपोटी बांधलेली घरे कायम यावीत यासाठी शिवसेना उपनेते तथा माजी सनदी अधिकारी विजय नाहटा सातत्याने प्रयत्न करत असून दोन दिवसांपूर्वीही विजय नाहटा यांनी सिडकोचे उपाध्यक्षप वैजय सिंघल यांची भेट घेतली होती त्या भेटीदारम्यानच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने  नगर विकास विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता यांच्यासोबत मिटिंगचे नियोजन करण्यात आले होते.

Previous Post

झाडावरील किड्यांपासून होणाऱ्या त्रासातून जुईनगर सेक्टर २४ मधील रहीवाशांची सुटका करण्याची कॉंग्रेसची मागणी

Next Post

नेरूळ प्रभाग ९६/९७ मध्ये गणपती भक्तांना तांब्याच्या कलशासह श्री आरती संग्रह भेट

Next Post
नेरूळ प्रभाग ९६/९७ मध्ये गणपती भक्तांना तांब्याच्या कलशासह श्री आरती संग्रह भेट

नेरूळ प्रभाग ९६/९७ मध्ये गणपती भक्तांना तांब्याच्या कलशासह श्री आरती संग्रह भेट

पद्मभूषण गायक शंकर महादेवन, शिवसेना उपनेते विजय नाहटा यांनी केली गणरायाची पूजा

पद्मभूषण गायक शंकर महादेवन, शिवसेना उपनेते विजय नाहटा यांनी केली गणरायाची पूजा

पोर्ट ब्लेअर बंदर हे आता ‘श्री विजयपुरम’

पोर्ट ब्लेअर बंदर हे आता ‘श्री विजयपुरम’

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com