• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, June 15, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Sep 12, 2024

पद्मभूषण गायक शंकर महादेवन, शिवसेना उपनेते विजय नाहटा यांनी केली गणरायाची पूजा

adminbyadmin
in नवी मुंबई
0
पद्मभूषण गायक शंकर महादेवन, शिवसेना उपनेते विजय नाहटा यांनी केली गणरायाची पूजा

स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com – ८३६९९२४६४६

नवी मुंबई :  शिव छाया मित्र मंडळ तुर्भे  आणि सानपाडा येथील सानपाड्याचा राजा  सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ, सानपाडा येथे महाआरतीसाठी पद्मभूषण, श्रेष्ठ गायक  शंकर महादेवन व शिवसेना उपनेते विजय नाहटा यांनी उपस्थित राहून महाआरती केली आणि सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. शंकर महादेवन व विजय नाहटा हे महाआरतीसाठी उपस्थित झाल्याने तुर्भे आणि सानपाडा गणेश उत्सव मंडळात भक्तीचे आणि  उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

तुर्भे येथील शिवछाया मित्र मंडळाची गणेशोत्सवाची गेली ५४ वर्षे अविरत परंपरा जेष्ठ समाजसेवक, पत्रकार अंकुश वैती यांच्या कुशल नेतृत्वात सुरु आहे. बुधवारी जेष्ठ लोकप्रिय गायक, पद्मभूषण नवी मुंबईकर गायक शंकर महादेवन यांच्यासह  शिवसेना उपनेते विजय नाहटा यांनी शिवछाया मित्र मंडळाच्या नवी मुंबईचा राजा या नवसाला पावणाऱ्या गणरायास भेट देऊन बाप्पांचरणी नतमस्तक होत बाप्पांची महाआरती केली. यावेळी भाविक भक्तांनी संपूर्ण परिसर गर्दीने फुलून गेला होता. गणपती बाप्पाच्या जयघोषाने आसमंत दुमदुमून गेला होता. सानपाडा सेक्टर आठ येथील सानपाड्याचा राजा सार्वजनिक गणेश उत्सव मंडळास शंकर महादेवन आणि उपनेते विजय नाहटा यांनी भेट देऊन महाआरती केली. यावेळी शंकर महादेवन यांनी गणपती बाप्पाची संगीतमय आरती गाऊन उपस्थित भक्तांना मंत्रमुग्ध केले. यावेळी शिवछाया मित्र मंडळाचे अध्यक्ष अंकुश वैती आणि सानपाड्याचा राजा सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाचे अध्यक्ष शिवाजी ढमाले आणि सचिव बाबाजी इंदोरे यांनी शंकर महादेवन आणि विजय नाहटा यांचे आभार व्यक्त केले. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी आणि गणेश भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

नेरूळ प्रभाग ९६/९७ मध्ये गणपती भक्तांना तांब्याच्या कलशासह श्री आरती संग्रह भेट

Next Post

पोर्ट ब्लेअर बंदर हे आता ‘श्री विजयपुरम’

Next Post
पोर्ट ब्लेअर बंदर हे आता ‘श्री विजयपुरम’

पोर्ट ब्लेअर बंदर हे आता ‘श्री विजयपुरम’

१४०२२ श्रीगणेशमूर्तींसह २५६९ गौरींचे भावपूर्ण विसर्जन

१४०२२ श्रीगणेशमूर्तींसह २५६९ गौरींचे भावपूर्ण विसर्जन

नवी मुंबई महापालिका अतिक्रमण विभागामार्फत ऐरोली विभागात तोडक कारवाई

नवी मुंबई महापालिका अतिक्रमण विभागामार्फत ऐरोली विभागात तोडक कारवाई

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com