• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Sep 8, 2023

आई गोवर्धनी माता मंदिराचा १६ वा जीर्णोद्धार सोहळा उत्साहात साजरा

adminbyadmin
in नवी मुंबई
0
आई गोवर्धनी माता मंदिराचा १६ वा जीर्णोद्धार सोहळा उत्साहात साजरा

गणेश इंगवले : Navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई : कृष्णाष्टमी निमित्त बेलापूर किल्ले गावठाण येथील ‘आई गोवर्धनी’ माता मंदिराचा १६ वा जीर्णोद्धार सोहळा थाटामाटात संपन्न झाला. यावेळी मंदिरात हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. दरम्यान, सर्व भक्तांची सर्व संकटे दूर होऊन त्यांना सुख, शांती आणि समृद्धी जीवन लाभो, अशी प्रार्थना “आई गोवर्धनी मातेला केली असल्याचे बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले.

तसेच त्या पुढे म्हणाल्या की, नवी मुंबईतील सुमारे ३०० वर्षापूर्वीचे पुरातन पेशवेकालीन एकमेव मंदिर म्हणून आई गोवर्धनी माता मंदिराची आख्यायिका आहे. तसेच नवी मुंबईच्या नावलौकीकाला साजेशा व चिमाजी अप्पांपासून ३०० हून अधिक वर्षाच्या इतिहासाला उजाळा देण्याऱ्या आई गोवर्धनी माता मंदिर असून   आई गोवर्धनी मातेची प्राणप्रतिष्ठापना पेशवेकाळात झाली आहे. नवी मुंबईतीलच नव्हे तर संपूर्ण पंचक्रोशातील ठाणे, रायगड, पालघर, जिल्ह्यातील सर्व भाविक भक्तांना नवसाला पावणारी आई गोवर्धनी माता प्रसिद्ध आहे. नवी मुंबईतील सोनार, ब्राम्हण, आगरी-कोळ्यांची कुलदेवता असलेली आणि भक्तांच्या हाकेला धावणारी अशी आई गोवर्धनी मातेची जनमाणसात ख्याती आहे. आई गोवर्धनी माता मंदिर हे निसर्गाने मुक्तहस्ताने उधळण केलेल्या निसर्गरम्य टेकडीवर वसलेले असून हिरवळीने नटलेले आहे. मंदिराच्या पाठीमागे विस्तीर्ण असा समुद्र लाभलेला असून तसेच या पुरातन मंदिराचा जीर्णोद्धार १५ वर्षापूर्वी उद्योजक श्री. विजय म्हात्रे व आमदार मंदाताई म्हात्रे शुभहस्ते गोकुळाष्टमीच्या दिवशी करण्यात आला होता. त्यानुसार दरवर्षी गोकुळाष्टमीच्या दिवशी यथोचित पूजा-अर्चा करून येथे उत्सव साजरा केला जातो. यावेळी असंख्य भाविक भक्तांनी व पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने महिलांनी  उपस्थित राहून “महाप्रसादाचा” लाभ घेतला.

Previous Post

सानपाड्यातील भाजपची मानाची सोन्याची दहीहंडी माझगावच्या ‘संघर्ष’ने फोडली

Next Post

थर मराठी चित्रपटाच्या  पोस्टरचे प्रसिद्ध अभिनेते विजय पाटकर यांच्या हस्ते अनावरण

Next Post
थर मराठी चित्रपटाच्या  पोस्टरचे प्रसिद्ध अभिनेते विजय पाटकर यांच्या हस्ते अनावरण

थर मराठी चित्रपटाच्या  पोस्टरचे प्रसिद्ध अभिनेते विजय पाटकर यांच्या हस्ते अनावरण

नरेंद्र मोदींनी ९ वर्षात देशावर १०० लाख कोटी रुपयांच्या कर्जाचा डोंगर उभारला : नाना पटोले

नरेंद्र मोदींनी ९ वर्षात देशावर १०० लाख कोटी रुपयांच्या कर्जाचा डोंगर उभारला : नाना पटोले

आयुक्त महोदय, नेरूळ सेक्टर सहाच्या वाहतुक कोंडीवर कायमस्वरुपी तोडगा काढा : संदीप खांडगेपाटील

प्रथम संदर्भ रुग्णालयाची बकालपणाच्या विळख्यातून मुक्तता करा : संदीप खांडगेपाटील

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com