• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Sep 9, 2023

प्रथम संदर्भ रुग्णालयाची बकालपणाच्या विळख्यातून मुक्तता करा : संदीप खांडगेपाटील

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
आयुक्त महोदय, नेरूळ सेक्टर सहाच्या वाहतुक कोंडीवर कायमस्वरुपी तोडगा काढा : संदीप खांडगेपाटील

गणेश इंगवले : Navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई : महापालिकेच्या वाशीतील संदर्भ रुग्णालयाची बकालपणाच्या विळख्यातून तातडीने मुक्तता करण्याची मागणी समाजसेवक संदीप खांडगेपाटील यांनी महापालिका आयुक्त राजेश नार्वेकरांकडे एका निवेदनातून केली आहे.

नवी मुंबई महापालिकेचे वाशीमध्ये प्रथम संदर्भ रुग्णालय आहे. नवी मुंबईच्या कानाकोपऱ्यातून रुग्ण येथे उपचारासाठी येतात. नागरी आरोग्य केंद्र, माता बाल रूग्णालयातूनही उपचारासाठी येथे रुग्ण पाठविले जातात, इतकेच नाही तर मानखुर्द, गोवंडी, पनवेल, उरण भागातूनही रुग्ण येथे उपचारासाठी येत असतात. दर्जेदार आरोग्य सुविधा येथे उपलब्ध आहेत. या रुग्णालयात रूग्णासोबत रुग्णांचे  नातेवाईकही येत असतात. आपण स्वत: रुग्णालयाला महापालिका आयुक्त म्हणून नाही तर सर्वसामान्य नवी मुंबईकर म्हणून रिक्षातून भेट द्या. रूग्णालय बकालपणाच्या विळख्यात व वाहतुक कोंडीच्या विळख्यात अडकलेले पहावयास मिळेल, असे संदीप खांडगेपाटील यांनी निवेदनात म्हटले आहे.

प्रवेशद्वारातून  रुग्णालयात प्रवेश करण्यापूर्वीच दोन्ही बाजूला रिक्षांच्या रांगा लागलेल्या दिसून येतील. हा अंर्तगत रस्ता असून दोन्ही बाजला रिक्षा उभ्या असल्याने अन्य वाहनांना या ठिकाणाहून ये-जा करताना वाहतुक कोंडीचा सामना करावा लागत आहे. याशिवाय महापालिका  रुग्णालयाच्या प्रवेशद्वारापाशी पदपथावरच दुचाकी वाहनांची पार्किग  असल्याने रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना पदपथाचा वापर करता येत नाही. त्यांना रस्त्यावरूनच चालावे लागते. दोन्ही बाजूला रिक्षा उभ्या असताना तसेच ये-जा करणारी अन्य वाहने ही कोंडी चुकवत रुग्ण व रुग्णांच्या नातलगांना रुग्णालयात ये-जा करावी लागते. आपण स्वत: या ठिकाणी येवून पाहणी करावी. पाहणी करायला येणार आहे म्हणून कोणालाही सूचना देवू नका. आरटीओचे वाहतुक अधिकारी सोबत आणा. समस्येचे गांभीर्य प्रत्यक्ष अनुभवता येईल. पदपथ दुचाकी वाहनांच्या पार्किगमधून मुक्त करावा. रिक्षांना उभी करण्यासाठी शिस्त लावावी. कारण  बाजूला शाळा असल्याने तेथून शालेय बसही ये-जा करतात. कचरा घेवून जाणारे वाहन आल्यावर त्या वाहनाला बाहेर काढेपर्यत कचरा वाहक वाहनाच्या चालकाला तारेवरची कसरत करावी लागते. समस्या गंभीर स्वरूप धारण करत असून पालिकेच्या रुग्णालयाला वाहतुक कोंडीचा व बकालपणाचा विळखा पडला आहे. संबंधितांना या समस्येचे निवारण करण्याचे निर्देश देण्याची मागणी संदीप खांडगेपाटील यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

Previous Post

नरेंद्र मोदींनी ९ वर्षात देशावर १०० लाख कोटी रुपयांच्या कर्जाचा डोंगर उभारला : नाना पटोले

Next Post

झाशीची राणी खेळाचे मैदान या क्रिडांगणाच्या नामफलकाची दुरावस्था दूर करा : पांडुरंग आमले

Next Post
झाशीची राणी खेळाचे मैदान या क्रिडांगणाच्या नामफलकाची दुरावस्था दूर करा : पांडुरंग आमले

झाशीची राणी खेळाचे मैदान या क्रिडांगणाच्या नामफलकाची दुरावस्था दूर करा : पांडुरंग आमले

महापालिका निवडणूकीत बेलापुर मतदारसंघच भाजपाला अनुकूल

आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश, नवी मुंबईत साकारणार महाराष्ट्र भवन

‘नवी मुंबई इको नाइट्स’ संघाच्या बोधचिन्हाचे आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या हस्ते अनावरण

‘नवी मुंबई इको नाइट्स’ संघाच्या बोधचिन्हाचे आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या हस्ते अनावरण

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com