• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 14, 2023

न्यायालयीन खटल्याबाबत चुकीची माहिती देणाऱ्या पिंपळगावच्या सरपंचासह ग्रामपंचायत सदस्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
पिंपळगावच्या सरपंचासह ग्रामपंचायत सदस्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करून कारवाई करा : संदीप खांडगेपाटील

मुंबई : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील नारायणगाव – जुन्नर रोडवरील पिंपळगावच्या मराठा समाजातील दोघा वयोवृद्ध शेतकरी भावाच्या जमिनीवर विना भूसंपादन करता पिंपळगावच्या सरपंच व अन्य ग्रामपंचायत सदस्यांनी जिल्हा परिषदेच्या मदतीने पोलिसी पाठबळावर अतिक्रमण केले आहे.  थेट २६ गुंठे जागेतील अतिक्रमणावर पोलीसी पाठबळावर डागडूजी करत न्यायालयीन केसबाबत जनतेला व प्रसिद्धीमाध्यमांना केस जिंकल्याची खोटी माहिती देणाऱ्या पिंपळगावचे सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करून तातडीने कारवाई करून तुरूंगात टाकण्याची मागणी ज्येष्ठ पत्रकार संदीप खांडगेपाटील यांनी १४ ऑगस्ट २०२३ रोजी  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.

नारायणगाव-जुन्नर रोडवर पिंपळगाव या ठिकाणी मराठा समाजाच्या  उत्तम विष्णू खांडगे (वय वर्ष ७७) आणि चंद्रकांत विष्णू खांडगे (वय वर्ष ७१) या दोन भावांची पाच एकर जमिन आहे. या शेतातील तब्बल २६ गुंठे जमिनीवर अतिक्रमण झालेले आहे. गेली काही वर्षे दहशतीच्या बळावर व गावातील एका घटकाच्या मंत्रालयीन ओळखीच्या बळावर या दोघा वयोवृद्ध मराठा समाजाच्या शेतकऱ्यांच्या जमिनीवर पोलीसी पाठबळावर अतिक्रमण करून मराठा समाजातील दोन कुटूंब उद्धवस्त करण्याचे षडयंत्र सुरू आहे. एका मंत्र्यांच्या दालनातून (उत्तर महाराष्ट्रातील) मंत्रालयीन घटक ओळखीच्या बळावर दबाव आणत असल्याचे चौकशीत उघडही झालेले असल्याचे संदीप खांडगेपाटील यांनी निवेदनात म्हटले आहे.

या याबाबत हे दोघे वयोवृद्ध भाऊ प्रशासकीय पातळीवर शेताचे भूसंपादन झालेले नसताना आणि सातबाऱ्यावर कोठेही या अतिक्रमणाबाबत नोंद नसताना व एक रूपयाचाही मोबदला आजतागायत मिळालेला नसताना अतिक्रमण विस्तारत चालले आहे व त्यावर झुंडशाहीच्या बळावर पोलिसी पाठबळावर खतपाणी घातले जात आहे. याबाबत न्यायालयात सुनावणीही सुरु आहे. हे दोघे वयोवृद्ध शेतकरी भाऊ यासंदर्भातील कोणतीही न्यायालयीन केस हारलेले नाहीत, असे खोटे सांगून गावातील अन्य ग्रामस्थांची दिशाभूल करण्याचे काम गावच्या सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी चालविले आहे. न्यायालयात ६ डिसेंबर २०२२, ३ जानेवारी २०२३, १७ जानेवारी २०२३, १७ फेब्रुवारी २०२३, १४ मार्च २०२३, २६ एप्रिल २०२३, ३ मे २०२३, ६ मे २०२३, १ जुलै २०२३, १७  जुलै २०२३, ४ ऑगस्ट २०२३ अशा याप्रकरणी सुनावण्या झाल्या असून न्यायालयाने आगामी तारीख १८ ऑगस्ट २०२३ दिलेली असल्याचे सांगत संदीप खांडगेपाटील यांनी निवेदनातून मुख्यमंत्र्यांना न्यायालयीन माहिती सादर केली आहे.

भूंपसादन झालेले नसताना मराठा समाजातील वयोवृद्ध शेतकऱ्यांच्या शेतातील तब्बल २६ गुंठे जागेवर अतिक्रमण झालेले आहे. या शेतकऱ्यांना व्यवस्थित चालता येत नाही. वयोमानानुसार चालताना तोल जातो. दोन्ही शेतकऱ्यांना व त्यांच्या पत्नींना अनेक आजार आहेत.  ३० मे २०२३ रोजी जिल्हा परिषद अधिकारी, पिंपळगावचे सरपंच व ग्रामपंचायत सदस्य थेट जेसीपी घेवून आले. हे अतिक्रमण याच दोघा वयोवृद्ध शेतकऱ्यांच्या शेतीत झालेले असून प्रशासनाने या जमिनीचे कधीही भूसंपादन केलेले नाही व या दोन शेतकऱ्यांना कोणतीही कल्पना न देता २०१३-१४ मध्येही दडपशाही व झुंडशाहीच्या बळावर अतिक्रमणाची डागडूजी केली व ३० मे २०२३ रोजी जिल्हा परिषद अधिकारी, पिंपळगावचे सरपंच व ग्रामपंचायत सदस्य थेट जेसीपी घेवून अतिक्रमण झालेल्या विनाभूसंपादीत जागेवर डागडूजी (डांबरीकरण) केली आहे व दिवाळीनंतर पुन्हा काम करणार असल्याचे सांगत आहेत.

जिल्हा परिषद अधिकारी तसेच ग्रामपंचायत सरपंच व सदस्य आम्ही न्यायालयात केस जिंकलो आहोत, खांडगे कंपनी केस हारली असे धडधडीत पोलिसांसमोर व प्रसिद्धीमाध्यमांसमोर व ग्रामस्थांसमोर असत्य बोलत होते. त्यांनी प्रसिद्धी माध्यमांना प्रतिक्रियाही दिल्या. स्वत:चे आमच्या शेतातील अतिक्रमणावर फोटोसेशनही केले. न्यायालयीन सुनावणी सुरू असताना केस हारल्याचे धडधडीत असत्य वक्तव्य करून न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीबाबत चुकीची दिशाभूल करणाऱ्या पिंपळगावच्या सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांवर तातडीने फौजदारी गुन्हे दाखल करून कारवाई करा. मराठा समाजातील दोघा वयोवृद्ध शेतकऱ्यांच्या जमिनीवर वर्षानुवर्षे भूसंपादन न करता एक पैसाचाही मोबदला न देता अतिक्रमण सातत्याने करण्याचे व अतिक्रमण विस्तारण्याचे धाडस या गावपुढाऱ्यांकडून सुरू आहे. आमच्या गावातील एक घटक मंत्रालयात असल्याने त्या ओळखीच्या बळावर तो ग्रामस्थांना अतिक्रमणाला साथ देत खतपाणी घालत आहे. आम्ही दोन शेतकरी भाऊ व परिवार संघर्ष करत आहे. न्यायालयीन सुनावणी सुरू असताना धडधडीतपणे बेमुलाम असत्य माहिती ग्रामस्थ व प्रसिद्धीमाध्यमांना देणाऱ्या पिंपळगावचे सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांवर तातडीने फौजदारी गुन्हे दाखल करून आम्हाला याप्रकरणी न्याय द्यावा. आम्ही पुरोगामी महाराष्ट्रात राहतोय की चंबळच्या खोऱ्यात? आमच्या शेतात दिवसाढवळ्या न्यायालयीन प्रक्रियेची खोटी माहिती देणाऱ्या पिंपळगावच्या सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व मंत्रालयात काम करून त्या ओळखीच्या बळावर आमच्या परिवाराची मुस्कटदाबी करणाऱ्या घटकापासून आमच्या परिवाराच्या जीवाला धोका आहे. यासंदर्भात आपल्या कार्यालयात निवेदने सादर करूनही केवळ ती निवेदने फॉरवर्ड करण्याचे काम झाले आहे. आमच्या परिवाराच्या जीवाला या अतिक्रमण करणाऱ्यांपासून धोका आहे. आमचे दोन्ही परिवार कमालीच्या मानसिक दबावाखाली वावरत असून उद्या कोणाचा मानसिक धक्क्याने मृत्यू झाल्यास त्यास हेच घटक जबाबदार राहतील, याची आपण नोंद घ्यावी. साहेब, आमच्या परिवाराला न्याय हवाय, असे साकडे संदीप खांडगेपाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना घातले आहे.

Previous Post

श्री गोवर्धनी सार्वजनिक सेवा संस्था आयोजित मंगळागौरी कार्यक्रम उत्साहात : आ. मंदाताई म्हात्रे

Next Post

शिवम सोसायटीत स्वातंत्र्य दिन उत्साहात

Next Post
शिवम सोसायटीत स्वातंत्र्य दिन उत्साहात

शिवम सोसायटीत स्वातंत्र्य दिन उत्साहात

कोपरखैराणेत भाजपकडून मूक रॅली

कोपरखैराणेत भाजपकडून मूक रॅली

सानपाडा व जुईनगरमध्ये आरोग्य शिबिरांसह जनजागृती शिबिरांचे आयोजन करा : पांडुरग आमले

सानपाडा नोड, सानपाडा गाव, सानपाडा पामबीच परिसरात साथीच्या आजारांविषयी माहिती संकलित करा : पांडुरंग आमले

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com