• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jan 20, 2023

वाशी रुग्णालयातील कर्मचारी समस्या सोडविण्यासाठी इंटकची धडक

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
वाशी रुग्णालयातील कर्मचारी समस्या सोडविण्यासाठी इंटकची धडक

 नवी मुंबई :  महापालिकेच्या वाशीतील प्रथम संदर्भ रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष रविंद्र सावंत यांनी कर्मचाऱ्यांसोबत रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिक्षक डॉ. प्रशांत जंवादे यांच्या दालनात धडक देत कर्मचारी समस्येचा पाढा वाचला. रुग्णालयात कर्मचाऱ्यांचे अपुरे मनुष्यबळ याबाबत पालिका मुख्यालयाला कल्पना दिली असून तिकडून संख्याबळ येताच तात्काळ या समस्येचे निवारण करण्याचे आश्वासन डॉ. जंवादे यांनी कामगार नेते रविंद्र सावंत यांना दिले.

पालिकेच्या प्रथम संदर्भ रुग्णालयात वॉर्ड बॉय (कक्षेवक), आया यांची संख्या कमी आहे. काही आया व ववॉर्ड बॉय यांचे निधन झाले आहे, काही सेवानिवृत्त झाले आहेत. अनेक जण सेवानिवृत्तीच्या वाटेवर आहेत. त्यामुळे रुग्णालयात संख्याबळ कमी असल्याने कर्मचारी संख्येवर ताण पडत आहे. तसेच अन्य काही जण सेवानिवृत्तीच्या जवळ आले आहेत. त्यामुळे रुग्णालयात कर्मचाऱ्यांचा तुटवडा व कामावर पडणारा ताण याबाबत  रुग्णालय प्रशासनाच्या निदर्शनास समस्येचे गांभीर्य आणून देण्यासाठी कामगार नेते रविंद्र सावंत यांनी रुग्णालयीन कर्मचारी व महाराष्ट्र कर्मचारी युनियनच्या रुग्णालयीन युनिट पदाधिकाऱ्यांसमवेत रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिक्षक डॉ. प्रशांत जवांदे यांच्या कार्यालयात धडक देत त्यांच्यासमोर अपुरे कर्मचारीबळ व अन्य समस्यांचा पाढा वाचला.

अपुऱ्या कर्मचारी संख्येमुळे उपलब्ध कर्मचाऱ्यांना हक्काच्या रजा भेटत नाहीत, अतिरिक्त वेळ (ओव्हर टाईम) काम करावे लागत आहे. या कामाचेही प्रशासनाकडून पैसे दिले जात नाहीत. बदली कर्मचारी मिळत नाहीत. पूर्वी कामामध्ये रुग्णालयीन कर्मचाऱ्यांना बहूउद्देशीय संवर्गातील कर्मचाऱ्यांचे सहकार्य मिळायचे, पण आता बहूउद्देशीय कर्मचाऱ्यांच्या संख्येतही कपात करण्यात आली आहे. उपलब्ध संख्याबळावर कामाचा तान वाढल्याने ते आजारी पडण्याचे व चीडचीड होण्याचे प्रमाण वाढीस लागल्याचे कामगार नेते रविंद्र सावंत यांनी चर्चेदरम्यान डॉ. जवांदे यांच्या निदर्शनास आणून दिले.

या समस्या जाणून घेतल्यावर डॉ. जवांदे यांनी अपुऱ्या मनुष्यबळावर पालिका मुख्यालयात कळविण्यात आले असून लवकरच मनुष्यबळ उपलब्ध होवून या समस्येचे निवारण होणार असल्याचे त्यांनी कामगार नेते रविंद्र सावंत व त्यांच्या शिष्टमंडळाला सांगितले.

यावेळी रविंद्र सावंत यांच्या समवेत शिष्टमंडळात वाहन विभागाचे युनिट अध्यक्ष  राजेंद्र सुतार , वाशी हॉस्पिटल युनिट पदाधिकारी  सुहास म्हात्रे, सुधीर पुत्रन, आनंद शिंदे, राजेंद्र सातपुते, मधुकर झुंझारडे, महिला पदाधिकारी  प्रतिभा नाईक, सुनीता दातार, सुनंदा पवार, गुलाब पवार, असू सुसोदीया उपस्थित होते.

Previous Post

राजमाता जिजाऊ उद्यानात सुरू असलेल्या कामाचा माहिती फलक लावा : महादेव पवार

Next Post

कॉंग्रेसच्या प्रभाग १६च्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन

Next Post
कॉंग्रेसच्या प्रभाग १६च्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन

कॉंग्रेसच्या प्रभाग १६च्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन

सानपाडामधील गृहनिर्माण सोसायट्यांच्या अंर्तगत भागातील मल:निस्सारण वाहिन्यांची सफाई करा : पांडुरंग आमले

पांडुरंग आमले यांची भाजयुमोच्या नवी मुंबई जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

महायुतीचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा विजय निश्चित- लोकनेते आ. गणेश नाईक

महायुतीचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा विजय निश्चित- लोकनेते आ. गणेश नाईक

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com