• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jan 25, 2023

महायुतीचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा विजय निश्चित- लोकनेते आ. गणेश नाईक

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
महायुतीचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा विजय निश्चित- लोकनेते आ. गणेश नाईक

नवी मुंबईतील प्रचार सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद , ज्ञानेश्वर म्हात्रे यांना विक्रमी मताधिक्क्याने जिंकून आणण्याचा निर्धार
नवी मुंबई  : अनंतकुमार गवई
शिक्षकांच्या कथा आणि व्यथा जाणून त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सातत्याने काम करणारे कोकण विभाग शिक्षक मतदार संघातील भाजप, बाळासाहेबांची शिवसेना, आरपीआय,शिक्षक परिषद व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार ज्ञानेश्वर बारकू म्हात्रे यांचा विजय निश्चित असल्याचा विश्वास लोकनेते आमदार गणेश नाईक यांनी व्यक्त केला आहे. शिक्षकांसाठी शिक्षकच उमेदवार हा आमदार झाला पाहिजे आणि ज्ञानेश्वर म्हात्रे हे शिक्षक असल्याने त्यांचा विजय आता केवळ औपचारिकता असल्याचेही लोकनेते नाईक यांनी सांगितले.
महायुतीचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या प्रचार सभेचे आयोजन आज लोकनेते आमदार गणेश नाईक यांच्या माध्यमातून नवी मुंबई भारतीय जनता पक्षाच्या वतीने कोपरखैरणे येथील रा फ नाईक विद्यालयामध्ये करण्यात आले होते. याप्रसंगी मोठ्या संख्येने शिक्षक वर्ग ठाणे जिल्ह्यातून उपस्थित होता. माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक, ऐरोली विधानसभा क्षेत्राचे प्रथम आमदार संदीप नाईक, माजी महापौर सागर नाईक, उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे, भाजपा समन्वयक प्राध्यापिका वर्षा भोसले यांच्यासह महायुतीचे ठाणे जिल्ह्यातील विविध पदाधिकारी, ‌ मुख्याध्यापक, शिक्षक व मुख्याध्यापक संघटनांचे प्रतिनिधी या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विकसित देश म्हणून भारताची दमदार वाटचाल सुरू आहे. महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकार शिक्षक वर्ग आणि संबंधित घटकांचे प्रश्न सोडवीत आहे, असे सांगत लोकनेते आमदार नाईक यांनी ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या रूपाने एक अभ्यासू आणि शिक्षकांसाठी अविरत कार्यरत असणारा उमेदवार कोकण विभाग मतदार संघासाठी आमदार म्हणून निवडून देण्याचे आवाहन उपस्थितांना केले. कोकणातील पाचही जिल्ह्यांमध्ये शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी ठाणे जिल्ह्यामध्ये सर्वाधिक मतदार नोंदणी झाली असून ठाणे जिल्हा ज्ञानेश्वर म्हात्रे यांना विजयासाठी आघाडी मिळवून देईल, अशी खात्री देखील याप्रसंगी लोकनेते नाईक यांनी दिली. याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी मागील आठ वर्ष सातत्याने शिक्षक वर्गांचे प्रश्न सोडवीत असल्याचे सांगितले. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करून शाळा अनुदानाचा प्रश्न मार्गी लावला आहे. सुमारे अकराशे कोटी रुपयांचे अनुदान मंजूर झाले असून शिक्षक मतदारसंघाची निवडणूक झाल्यावर यासंबंधीचा जीआर सरकार काढेल अशी माहिती त्यांनी दिली. अनुदानानंतरचा सर्वात महत्त्वाचा शिक्षकांच्या जिव्हाळ्याचा विषय निवृत्ती वेतन असून जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा सुरू असून शिंदे- फडणवीस सरकार या दृष्टीने सकारात्मक आहे. वरिष्ठ शासकीय अधिकारी स्तरावर या विषयाचा अभ्यास सुरू आहे. जुनी पेन्शन योजना देखील शिक्षकांना लागू होईल, असा विश्वास ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी बोलून दाखवला. 2017 च्या कोकण शिक्षक मतदार संघ निवडणुकीमध्ये मत विभाजनाचा फायदा मिळवून विरोधी पक्षाचा उमेदवार निवडून आला होता. मात्र मागील सहा वर्षे या आमदाराने शिक्षक हिताचे कोणतेच काम केले नाही अशी शिक्षक वर्गाची तक्रार आहे. यंदाच्या निवडणुकीमध्ये मात्र आम्ही सर्व एकजूट असून शिक्षक असलेला उमेदवारच आमदार म्हणून निवडून देण्याचा निर्धार शिक्षकांनी केलेला आहे आणि त्यामुळे मला विजयाची खात्री आहे, अशा भावना ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी व्यक्त केल्या. जिंकून आल्यानंतर विनाअनुदानित शिक्षक शिक्षकेतरांचा प्रश्न, संस्थाचालकांच्या समस्या सोडविण्यावर भर असणार आहे. शाळा संबंधित सर्व घटकांना न्याय देण्याची भूमिका राहणार असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. कोकणामध्ये शिक्षक सेनेला रुजविण्याचे आणि वाढविण्याचे काम मी केले आहे. शिक्षक सेनेचे सर्व पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्ते माझ्यासोबतच असल्याचा दावा देखील ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी याप्रसंगी केला. माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक यांनी प्रस्तावना करताना ज्ञानेश्वर म्हात्रे यांना जिंकून आणण्याची आपल्या सर्वांची जबाबदारी असल्याचे नमूद करून जास्तीत जास्त मताधिक्यासह विक्रमी विजय त्यांच्यासाठी सर्वांनी साकारावा, असे आवाहन केले. आज आपण ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्यासाठी प्रचाराची सभा घेतो आहोत. याच ठिकाणी पुढची सभा ही त्यांच्या विजयाची सभा असेल, असा विश्वास डॉक्टर नाईक यांनी यावेळी व्यक्त केला.

Previous Post

पांडुरंग आमले यांची भाजयुमोच्या नवी मुंबई जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

Next Post

मैदाने बळकावणाऱ्या शिक्षण संस्थांविरोधात मनविसे आंदोलनाच्या तयारीत

Next Post
मैदाने बळकावणाऱ्या शिक्षण संस्थांविरोधात मनविसे आंदोलनाच्या तयारीत

मैदाने बळकावणाऱ्या शिक्षण संस्थांविरोधात मनविसे आंदोलनाच्या तयारीत

स्मृतीदिनाच्या आडून देशाची पुन्हा फाळणी करण्याचा प्रयत्न : नाना पटोले

अहमदनगर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटी बरखास्त: नाना पटोले

पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वामुळे जगामध्ये भारताचा सन्मान वाढला : लोकनेते आ. गणेश नाईक

पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वामुळे जगामध्ये भारताचा सन्मान वाढला : लोकनेते आ. गणेश नाईक

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com