• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Wednesday, June 18, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jul 3, 2022

मूषक नियत्रंण कर्मचाऱ्यांना कोव्हिड भत्ता मिळणार कधी ? : संदीप खांडगेपाटील

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
नेरूळ सेक्टर सहामधील सीव्ह्यू उद्यान स्थानिक रहीवाशांसाठी खुले करा : संदीप खांडगेपाटील

अनंतकुमार गवई

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका प्रशासनात काम करणाऱ्या मुषक नियत्रंण कर्मचाऱ्यांना तातडीने कोव्हिड भत्ता उपलब्ध करुन देण्याची लेखी मागणी समाजसेवक संदीप खांडगेपाटील यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे एका निवेदनातून करताना सर्व कर्मचाऱ्यांना कोव्हिड भत्ता मिळालेला आहे. मग याच मूषक नियत्रंण कामगारांवर प्रशासन अन्याय का करत आहे? या कर्मचाऱ्यांना कोव्हिड भत्ता मिळणार कधी असा प्रश्न संदीप खांडगेपाटील यांनी महापालिका प्रशासनाला व राज्य सरकारला विचारला आहे.

गेल्या काही दिवसांपासुन नवी मुंबईत कोरोनाच्या नव्या रूग्णांचा आकडा वाढत असल्याची चिंताजनक बाब आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांचा आकडा वाढू लागला आहे. कोरोना महामारीच्या काळात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना महापालिका प्रशासनाने कोव्हिड भत्ता दिलेला आहे, अपवाद फक्त पालिका प्रशासनात काम करणाऱ्या मूषक नियत्रंण कर्मचाऱ्यांचा. कोरोना महामारीच्या काळात व आताही मूषक नियत्रंण कर्मचारी कार्य करत आहेत. रात्र-दिवस मुषक नियत्रंण कर्मचारी काम करत असूनही पालिका प्रशासनाने इतरांना कोव्हिड भत्ता दिलेला असताना मुषक नियत्रंण कर्मचाऱ्यांना कोव्हिड भत्त्यापासून वंचित ठेवण्यात आले आहे. एकतर मुषक नियत्रंण कर्मचाऱ्यांना कधीही वेतन वेळेवर मिळालेले नाही. ठेकेदार या कर्मचाऱ्यांना दोन ते चार महिने गेल्या काही वर्षापासून वेतन विलंबानेच देत आहे. अनेक वर्षे या कर्मचाऱ्यांनी अवघ्या ५ हजार हजार रुपये वेतनावर काम केल्यानंतर व या समस्या निवारणासाठी आणि कर्मचाऱ्यांना समाधानकारक वेतन मिळावे यासाठी केवळ मी एकट्याने सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर या कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ झालेली आहे. एरियससाठीही पाठपुरावा केल्यावरच या कर्मचाऱ्यांच्या खात्यात एरियस जमा झालेला आहे.

 

मूषक नियत्रंण कामगारांना कोव्हिड काळात केलेल्या कामाचा मोबदला म्हणून त्यांना प्रशासनाकडून कोव्हिड भत्ता मिळणे आवश्यक आहे. महापालिका प्रशासनातील अन्य सर्व विभागातील कर्मचाऱ्यांना कोव्हिड भत्ता मिळालेला असताना आजवर केवळ मूषक नियत्रंण कामगारांना कोव्हिड भत्ता देण्यास पालिका प्रशासनाकडून सातत्याने चालढकल केली जात आहे. वेळकाढूपणा दाखविला जात आहे. या कर्मचाऱ्यांना कोव्हिड भत्ता मिळावा म्हणून सातत्याने पालिका प्रशासनाकडे व आपणाकडे पत्रव्यवहार करत आहे. आपल्या कार्यालयाकडून केवळ निवेदन संबंधितांना फॉरवर्ड केले जात आहे. पुढे काहीही कार्यवाही केली जात नाही. आपण फॉरवर्ड केलेल्या निवेदनांचे पुढे काय झाले आहे अथवा निवेदनांना केराची टोपली दाखविली आहे, याबाबत माहिती जाणून घ्यावी. मूषक नियत्रंण कर्मचाऱ्यांची वेतनाबाबतही सातत्याने ससेहोलपट होत असून गेल्या अनेक वर्षापासून केवळ याच कर्मचाऱ्यांचे वेतन विलंबाने होत आहे. आता तर कोव्हिड भत्ता मिळण्यासही पालिका प्रशासनाकडून विलंब केला जात आहे.

मूषक नियत्रंण कर्मचाऱ्यांना कोव्हिड भत्ता मिळावा यासाठी मी आपणाकडे यापूर्वी ३० मे, ८ जुन, १६ जुन व २३ जुन रोजीही निवेदन सादर केले आहे. तसेच या समस्येचे गांभीर्य राज्य सरकारच्या निदर्शनास यावे यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांना ३० मे, ८ जुन, १६ जुन व २३ जुन रोजी तर विद्यमान मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनाही १ जुलै रोजी निवेदन सादर केले आहे. त्यांनीही महापालिका प्रशासनाला निर्देश दिले आहेत.

पुन्हा कोरोना महामारीने डोके वर काढले आहे. मागील दोन वर्षात कोरोना महामारीमध्ये काम करणाऱ्या मुषक नियत्रंण कर्मचाऱ्यांना कोव्हिड भत्ता मिळालेला नाही. कोव्हिड भत्ता मिळण्यास विलंब झाल्याच्या प्रकाराची चौकशी करून संबंधित कर्मचाऱ्यांना न्याय मिळणे आवश्यक आहे. मुषक नियत्रंण कर्मचाऱ्यांना लवकरात लवकर कोव्हिड भत्ता देण्यासाठी नवी मुंबई महापालिका प्रशासनातील संबंधितांना निर्देश देण्याची मागणी संदीप खांडगेपाटील यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

Previous Post

आज सांयकाळी नेरूळ गावातील व्यायामशाळेचे उद्घाटन

Next Post

नेरूळ सेक्टर सहामध्ये महापालिकेचे आरोग्य शिबिर संपन्न

Next Post
नेरूळ सेक्टर सहामध्ये महापालिकेचे आरोग्य शिबिर संपन्न

नेरूळ सेक्टर सहामध्ये महापालिकेचे आरोग्य शिबिर संपन्न

मुंबई मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी नरेंद्र वाबळे यांची हॅटट्रीक

मुंबई मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी नरेंद्र वाबळे यांची हॅटट्रीक

परिवहन कर्मचाऱ्यांना कोविड कालावधीतील कार्याबाबत विशेष भत्ता अदा करा : रविंद्र सावंत

नेरूळ (पूर्व-पश्चिम), जुईनगर, शिरवणे नोडमध्ये ब्लिचिंग पावडर फवारणी अभियान राबवा : रविंद्र सावंत

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com