• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Nov 10, 2021

नवी मुंबईत रूग्णदुपटीचा कालावधी ३१९६ दिवसांवर

adminbyadmin
in टॉप न्यूज, नवी मुंबई
0
नवी मुंबईत रूग्णदुपटीचा कालावधी ३१९६ दिवसांवर

सौ. स्वाती इंगवले : ८३६९९२४६४६

Navimumbailive.com

नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कोरोना बाधितांचे प्रमाण सध्या कमी झाल्याचे निदर्शनास येत असून रूग्णदुपटीचा कालावधी ३१९६ दिवसांइतका झालेला आहे. तथापि कोरोना अजून पूर्ण संपलेला नाही आणि तिसऱ्या लाटेचा धोका अजून टळलेला नाही हे लक्षात घेत महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांचे निर्देशानुसार अगदी दिवाळीच्या ४ दिवसातही दररोज सरासरी साडेचार हजार इतके टेस्टींगचे प्रमाण ठेवलेले होते. दिवाळीनंतर आता पुन्हा दैनंदिन साडेसात हजारापर्यंत टेस्टींग सुरू करण्यात आलेले आहे.

रेल्वे स्टेशन, राज्यातील विविध ठिकाणाहून येणाऱ्या व्यापारी, कामगारांची वर्दळ असणारे एपीएमसी मार्केट अशा कोव्हीड प्रसारासाठी जोखमीच्या ठिकाणी विशेष टेस्टींग बूथ कार्यरत आहेत. त्याचप्रमाणे ज्या सोसायटी, वसाहती याठिकाणी कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळतो तेथील प्रत्येक व्यक्तीचे टेस्टींग करून टारगेटेड टेस्टींगवर भर दिला जात आहे. तसेच कोरोना रुग्णांच्या संपर्कातील व्यक्ती शोधाचे प्रमाणही ३१ इतके राखले जात आहे आहे. त्याचप्रमाणे नागरिकांना कोव्हीड लसीकरणात अडचण होऊ नयेत यादृष्टीने दिवाळीच्या काळातही ४ रूग्णालयांमध्ये लसीकरण करण्यात आले.

सध्या ॲक्टिव्ह रूग्णसंख्येतही घट झाल्याचे दिसून येत असून दुसऱ्या लाटेच्या अत्युच्च काळात ११ एप्रिल २०२१ रोजी ११६०५ इतकी असलेली ॲक्टिव्ह रूग्णसंख्या आता ८ नोव्हेंबर २०२१ रोजी ३०८ इतकी घटलेली दिसत आहे. दिवाळीत ५ नोव्हेंबर २०२१ रोजीची १६ ही दैनंदिन कोरोना बाधितांची संख्या सर्वात कमी होती.

सध्या कोरोनाची रूग्णसंख्या घटताना दिसत असली तरी पहिल्या व दुसऱ्या लाटेतील रूग्णसंख्या कमी होत ठराविक कालावधीनंतर झपाट्याने वाढण्याचा यापूर्वीचा अनुभव लक्षात घेता तसेच चीन, युके, रशिया व इतर देशांतील तिसऱ्या व चौथ्या लाटेत रूग्णसंख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर कोणत्याही प्रकारे अतिआत्मविश्वास न दाखविता काळजी घेत कोव्हीड सुरक्षा नियमांचे पालन करणे अत्यंत गरजेचे आहे. त्यादृष्टीने प्रत्येकाने मास्कचा वापर करावाच शिवाय इतरांनाही त्यांच्या व आपल्या आरोग्य सुरक्षेसाठी मास्क वापरण्याचे आवाहन करावे त्याचप्रमाणे कोव्हीड लसीचा दुसरा डोस विहित वेळ झाल्यानंतर त्वरित घ्यावा असे आवाहन महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.

Previous Post

प्रभाग ९६ मध्ये आरोग्य व रक्तदान शिबिर उत्साहात

Next Post

एसटी बस संपाबाबत कामगारांवर अन्याय होणार नाही याची काळजी घ्या : हाजी शाहनवाझ खान

Next Post
एसटी बस संपाबाबत कामगारांवर अन्याय होणार नाही याची काळजी घ्या : हाजी शाहनवाझ खान

एसटी बस संपाबाबत कामगारांवर अन्याय होणार नाही याची काळजी घ्या : हाजी शाहनवाझ खान

‘हर घर दस्तक अभियान’अंतर्गत आता कोव्हीड लसीकरण नागरिकांच्या घरापर्यंत

‘हर घर दस्तक अभियान’अंतर्गत आता कोव्हीड लसीकरण नागरिकांच्या घरापर्यंत

कंत्राटी कर्मचाऱ्यांना २८ ऑक्टोबरपर्यंत बोनस व ऑक्टोबरचे वेतन अदा करण्याचे आयुक्तांचे निर्देश

१३,१४ आणि २७,२८ नोव्हेंबर रोजी मतदार नोंदणी विशेष मोहीम

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com