• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Nov 12, 2021

‘हर घर दस्तक अभियान’अंतर्गत आता कोव्हीड लसीकरण नागरिकांच्या घरापर्यंत

adminbyadmin
in टॉप न्यूज, नवी मुंबई
0
‘हर घर दस्तक अभियान’अंतर्गत आता कोव्हीड लसीकरण नागरिकांच्या घरापर्यंत

संपादक : सौ. सुवर्णा खांडगेपाटील

बातमीसाठी संपर्क : ८३६९९२४६४६ : Navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांच्या पहिल्या डोसचे १०० टक्के लसीकरण पूर्ण झाल्यानंतर आता दुसऱ्या डोसचे लसीकरण वेगाने व्हावे याकरिता महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनानुसार विविध माध्यमांचा वापर करण्यात येत आहे. सद्य:स्थितीत ५८.२५ टक्के नागरिकांनी कोव्हीड लसीचे दोन्ही डोस घेतले असून उर्वरित नागरिकांपर्यंत जलदरित्या पोहचून त्यांना संपूर्ण लस संरक्षित करण्याकडे विशेष लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे.

या अनुषंगाने केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार नवी मुंबई महानगरपालिकेने ‘हर घर दस्तक अभियान’ प्रभावीपणे राबविण्यास सुरुवात केली असून या अंतर्गत घरोघरी भेटी देऊन लसीकरण राहिलेल्या नागरिकांचे लसीकरण करण्यावर भर दिला जात आहे. यासाठी नागरी आरोग्य केंद्र पातळीवर आशा स्वयंसेविका, एएनएम यांच्यामार्फत गृहभेटी दिल्या जात असून त्यांच्या लसीकरणाबाबतची स्थिती जाणून घेण्यात येत आहे. ज्या नागरिकांचा पहिला किंवा दुसरा डोस राहिलेला आहे अशा नागरिकांची माहिती संकलीत करून त्यांचे त्याच ठिकाणी लसीकरण करण्यात येत आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने नियमितपणे राबविल्या जाणाऱ्या मिशन इंद्रधनुष्य मोहिमेच्या धर्तीवर कोव्हीड लसीकरणाविषयीची माहिती घेऊन मिशन इंद्रधनुष्य अंतर्गत सुरु असलेल्या विविध भागातील ३४३ लसीकरण जागांवर नियमित लसीकरणाचे दिवस वगळून उर्वरीत दिवशी कोव्हीड लसीकऱण सत्रांचे आयोजन करण्यात येत आहे. या सत्रांच्या दिवशी त्या भागामध्ये ध्वनीक्षेपकाव्दारे आवाहन करण्यात येत असून आशा स्वयंसेविका व एएनएम यांच्यामार्फत संकलीत यादीतील लाभार्थ्यांच्या घरी जाऊन त्यांना लसीकरणासाठी पाचारण करण्यात येणार आहे.

महानगरपालिकेची ४ रुग्णालये, वाशी इएसआयएस रुग्णालय येथील जम्बो सेंटर, २३ नागरी आरोग्य केंद्रे, इनॉर्बिट मॉल वाशी व ग्रॅट सेंट्रल मॉल सीवूड येथील ड्राईव्ह इन लसीकरण, दाणा मार्केट व एपीएमसी मार्केट, जुईनगर रेल्वे कॉलनी हेल्थ युनिट याठिकाणी नियमितपणे लसीकरण सुरु असून याशिवाय रुग्णवाहिकांमध्ये रुपांतरित केलेल्या १० एनएमएमटी बसेसव्दारे मार्केट, डेपो अशा वर्दळीच्या ठिकाणी कोव्हीड लसीकरण केले जात आहे. यामध्ये आता ‘हर घर दस्तक अभियान’ अंतर्गत घरोघरी जाऊन लसीकरणाला वेग दिला जात असून विहित वेळेत नागरिकांनी दुसरा डोस घ्यावा याकरिता थेट नागरिकांच्या घरापर्यंत पोहचून प्रयत्न केले जात आहेत.

शासनाने सूचित केलेल्या ‘हर घर दस्तक’ अभियानामुळे नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांच्या लसीकरणाला अधिक वेग येईल व लवकरात लवकर दोन्ही डोस घेऊन नवी मुंबईकर नागरिक संरक्षित होतील असा विश्वास व्यक्त करीत महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी नागरिकांनी कोव्हीड पासून संपूर्ण संरक्षण मिळण्याकरिता लसीकऱणाचे दोन्ही डोस विहित कालावधीत लगेच घ्यावेत व हर घर दस्तक अभियानांतर्गत आपल्या घरी येणाऱ्या महापालिका आरोग्य कर्मचाऱ्यांना सत्य माहिती द्यावी असे आवाहन केले आहे.

Previous Post

एसटी बस संपाबाबत कामगारांवर अन्याय होणार नाही याची काळजी घ्या : हाजी शाहनवाझ खान

Next Post

१३,१४ आणि २७,२८ नोव्हेंबर रोजी मतदार नोंदणी विशेष मोहीम

Next Post
कंत्राटी कर्मचाऱ्यांना २८ ऑक्टोबरपर्यंत बोनस व ऑक्टोबरचे वेतन अदा करण्याचे आयुक्तांचे निर्देश

१३,१४ आणि २७,२८ नोव्हेंबर रोजी मतदार नोंदणी विशेष मोहीम

१५ ते २५ नोव्हेंबर कालावधीत ‘सक्रिय क्षयरुग्ण शोध मोहीम’

१५ ते २५ नोव्हेंबर कालावधीत ‘सक्रिय क्षयरुग्ण शोध मोहीम’

दिघ्यात खोदकाम करताना गॅस पाईन लिकेज होऊन आग : एक भाजला; एक गाडी जळाली

दिघ्यात खोदकाम करताना गॅस पाईन लिकेज होऊन आग : एक भाजला; एक गाडी जळाली

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com