• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Nov 12, 2021

१३,१४ आणि २७,२८ नोव्हेंबर रोजी मतदार नोंदणी विशेष मोहीम

adminbyadmin
in टॉप न्यूज, नवी मुंबई
0
कंत्राटी कर्मचाऱ्यांना २८ ऑक्टोबरपर्यंत बोनस व ऑक्टोबरचे वेतन अदा करण्याचे आयुक्तांचे निर्देश

सौ. सुवर्णा खांडगेपाटील : संपादक : ८३६९९२४६४६

बातमीसाठी संपर्क : Navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई : मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र यांचे वतीने दि. ०१ ते ३० नोव्हेंबर २०२१ या कालावधीत छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम घोषित केला आहे. या अंतर्गत १ जानेवारी २०२२ रोजी वयाची १८ वर्षे पूर्ण करणारे नागरीक मतदार नोंदणीस पात्र असल्याचे जाहीर करत या कार्यक्रमांतर्गत मतदार नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे व कार्यवाहीस प्रारंभ झालेला आहे.

या कार्यक्रमांतर्गत मतदार नोंदणीपासून कोणीही वंचित राहू नये याकरिता १३ व १४ नोव्हेंबर २०२१ तसेच दिनांक २७ व २८ नोव्हेंबर २०२१ या शनिवार व रविवार अशा शासकीय सुट्यांच्या दिवशी मतदार नोंदणी विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.

या दिवशी सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत या आधीपासून कार्यान्वित असलेल्या पदनिर्देशित नोंदणीच्या ठिकाणी म्हणजेच नवी मुंबई महानगरपालिका शाळांमध्ये मतदार नोंदणी विषयक केंद्रस्तरीय अधिकारी उपस्थित असणार आहेत. येथे मतदार नोंदणीबाबत विहित नमुन्यातील अर्ज उपलब्ध असणार असून ते त्याच ठिकाणी स्विकारले जाणार आहेत.

उपलब्ध अर्जांमध्ये अर्ज नमुना-६ नुसार मतदार यादीत नाव समाविष्ट करता येईल, अर्ज नमुना-७ नुसार मतदार यादीतील नावास आक्षेप घेणे किंवा नाव वगळता येईल, अर्ज नमुना-८ नुसार मतदार यादीतील नोंदीच्या तपशीलामध्ये दुरूस्ती करता येईल तसेच अर्ज नमुना -८अ नुसार मतदार यादीतील नोंदीचे स्थानांतर करता येईल.

आगामी नवी मुंबई महानगरपालिका निवडणूकीत मतदान करण्यासाठी मतदार नोंदणी करण्याची ही महत्वाची संधी असून १ जानेवारी २०२२ पर्यंत वयाची १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या नागरिकांनी आपले नाव मतदार यादीत नोंदवावे. तसेच यापूर्वी मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट असलेल्या मतदारांनीही आपले नाव मतदार यादीत समाविष्ट आहे याबाबत खात्री करून घेणे गरजेचे आहे. तरी वयाची १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या नवी मुंबई नागरिकांनी या मतदार नोंदणी विशेष मोहिमेचा लाभ घ्यावा व आपले नाव त्वरीत समाविष्ट करून घ्यावे व असलेले नाव तपासून घ्यावे असे आवाहन महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.

 

Previous Post

‘हर घर दस्तक अभियान’अंतर्गत आता कोव्हीड लसीकरण नागरिकांच्या घरापर्यंत

Next Post

१५ ते २५ नोव्हेंबर कालावधीत ‘सक्रिय क्षयरुग्ण शोध मोहीम’

Next Post
१५ ते २५ नोव्हेंबर कालावधीत ‘सक्रिय क्षयरुग्ण शोध मोहीम’

१५ ते २५ नोव्हेंबर कालावधीत ‘सक्रिय क्षयरुग्ण शोध मोहीम’

दिघ्यात खोदकाम करताना गॅस पाईन लिकेज होऊन आग : एक भाजला; एक गाडी जळाली

दिघ्यात खोदकाम करताना गॅस पाईन लिकेज होऊन आग : एक भाजला; एक गाडी जळाली

कंगणा राणावत विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा : नसिम खान

कंगणा राणावत विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा : नसिम खान

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com