• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Wednesday, June 18, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jul 23, 2021

चला एक मदतीचा हात पुढे करूया आपल्या कोकणवासियांसाठी !

adminbyadmin
in Uncategorized
0
विमानतळाच्या आवारात अंतुलेंससह दि. बा. पाटील यांचे स्मारक (पुतळा) उभारण्याची एमआयएमची मागणी

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३

Navimumbailive.com@gmail.com – Sandeepkhandgepatil@gmail.com

नवी मुंबई : राज्यामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा सर्वाधिक तडाखा कोकण भागाला बसला असून कोकणवासियांची खुप हानी झाली आहे. कोकणवासियांना मदत करून पुन्हा सावरण्यासाठी एमआयएमच्या विद्यार्थी आघाडी  प्रदेश कार्यकारिणीने पुढाकार घेतला असून प्रदेश महासचिव हाजी शाहनवाझ खान यांनी  ‘चला एक मदतीचा हात पुढे करूया आपल्या कोकणवासियांसाठी’ हे अभियान सुरू केले असून महाराष्ट्रातील जनतेला, सामाजिक संघटनांना व सर्वच राजकीय पदाधिकारी, कार्यकर्ते यांना त्यात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

कोकणची माणसे साधी भोळी. दरवर्षी निसर्गाशी पावसाळ्यात दोन हात करत आपल्या जीवनात चेहऱ्यावर हास्य ठेवत कोकणवासिय वाटचाल करताना आपण जवळून पाहिला आहे, अनुभवला आहे. यंदाच्या  पावसाळ्यात गेल्या काही  दिवसापासून संततधार स्वरूपात मुसळधार पावसाने कोकणवासियांचे अतोनात नुकसान झाले आहे. जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. कोकणवासियांचे संसार आपणास पुन्हा उभे करायचे आहे. त्यांचे संसार पुन्हा फुलवायचे आहेत. एमआयएम विद्यार्थी आघाडीने कोकणवासियांना मदत करण्याचा संकल्प करत पुढाकार घेतला आहे. कोकण पुन्हा फुलवायची जबाबदारी आता महाराष्ट्राची आहे. महाराष्ट्राचे खरे निसर्ग सौंदर्य कोकणात आहे. महाराष्ट्राच्या भूमीवर काश्मिर कोठे असेल तर तो या कोकणातच आहे. चला तर मग, एक मदतीचा हात आता पुढे करूया आपल्या कोकणवासियांसाठी! हा मदतीचा जगन्नाथाचा रथ हाकण्यासाठी सर्वाचेच योगदान हवे. चला तर या कामात संघठीत होवू या. मदत आर्थिक  स्वरूपात नाही तर जीवनावश्यक वस्तूंच्या स्वरूपात, धान्याच्या स्वरूपात केली जाणार आहे. तांदू, वेगवेगळ्या डाळी, तेलाची पाकिटे, खोबरेल तेल,मिठ, पोहे, वेगवेगळे मसाले, अंगाचे तसेच कपड्याचे साबण, फिनाईल बॉटल, चहा पावडर, दुध पावडर, गव्हाचे पिठ, पाणी बॉटल, टूथ ब्रश, टूथ पेस्ट, कपडे, टॉवेल, सॅनिटरी नॅपकिन यासह महिला, पुरूष, मुलांची कपडे आदी स्वरूपात मदत करण्यात येणार आहे. ज्या कोणाला कोकणवासियांना मदत करायची असेल  त्यांनी एमआयएम विद्यार्थी आघाडीचे प्रदेश महासचिव हाजी शाहनवाझ खान यांच्याशी ७७१००८६७८६ संपर्क साधावा, असे  एमआयएमच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.

Previous Post

मालमत्ता कर भरण्यासाठी बँका, पतपेढीमध्ये मिळणार सुविधा

Next Post

महापालिकेतील वाहनचालकांचा इंटकमध्ये प्रवेश

Next Post
महापालिकेतील वाहनचालकांचा इंटकमध्ये प्रवेश

महापालिकेतील वाहनचालकांचा इंटकमध्ये प्रवेश

प्रभाग ९६ मध्ये महापालिकेकडून ब्लिचिंग पावडरच्या फवारणीस प्रारंभ

प्रभाग ९६ मध्ये महापालिकेकडून ब्लिचिंग पावडरच्या फवारणीस प्रारंभ

प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे कल्याण डोंबिवलीतील नागरिक त्रस्त : आ. रवींद्र चव्हाण

प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे कल्याण डोंबिवलीतील नागरिक त्रस्त : आ. रवींद्र चव्हाण

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com