• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jun 7, 2019

शासकीय कर्मचाऱ्यांनो आता अर्ध्या तासातच जेवण उरका

adminbyadmin
in मुंबई
0
शासकीय कर्मचाऱ्यांनो आता अर्ध्या तासातच जेवण उरका

राज्य शासनाने दिला सरकारी कर्मचाऱ्यांना आदेश

स्वयंम न्युज ब्युरो

मुंबई : शासकीय कर्मचाऱ्यांना जेवणासाठी दुपारी एक ते दोनची वेळ दिलेली आहे. मात्र आता या दुपारच्या सुट्टीवर गंडातर आले आहे. शासकीय कर्मचाऱ्यांनी अर्ध्या तासातच जेवण उरकावे, असा शासन आदेशच निर्गमित करण्यात आला आहे. कामचुकार कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्यासाठी राज्य शासनाने ४ जूनला हा शासन आदेश जारी केला आहे. कर्मचाऱ्यांना सध्या सर्वत्र दुपारी एक ते दोन जेवणाची सुट्टी दिली जात आहे. मात्र, २१ ऑगस्ट १९८८ च्या शासन निर्णयानुसार शासकीय कार्यालयीन वेळेत दुपारच्या भोजनासाठी अर्धा तासाची सुट्टी आहे. हे निदर्शनाला आणण्यात आले आहे. अनेक ठिकाणी नागरीक सरकारी कार्यालयात आपल्या तक्रारी घेऊन आल्यास त्यांना अनेकदा अधिकारी आणि कर्मचारी दुपारच्या वेळेत उपलब्ध होत नाहीत. तसेच अनेकदा जेवणाची सुट्टीच्या नावाखाली कार्यलयात अनुपस्थित असल्याचे शासनाच्या निदर्शनाला आले आहे. त्यामुळे हा संबंधित आदेश जारी करण्यात आल्याचे सामान्य प्रशासन विभागातल्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

जेवणाची सुट्टी तासभर असली तरी अर्ध्या तासात जेवण उरकावे, असे आदेशात नमूद करण्यात आले आहेत. तसेच कर्मचाऱ्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या सूचनांचे पालन नियमित होण्यासाठी खबरदारी घ्यावी, असेही या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

राज्यातील सर्व शासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांच्याकरीता दुपारी १ ते २ या वेळेत जेवणासाठी जास्तीत जास्त अर्ध्या तासाची वेळ देण्यात आली आहे. त्याचबररोबर एकाच कार्यलयातील अधिकारी आणि कर्मचारी एकाच वेळी जेवणासाठी जाणार नाहीत, याची खबरदारी घेण्याच्या सूचनाही कार्यालय प्रमुखांना या आदेशात देण्यात आल्या आहेत.

Previous Post

विधानसभेचे निकाल लोकसभेपेक्षा वेगळे असतील!: अशोक चव्हाण

Next Post

शेतकऱ्याला पीक कर्जास नकार देणाऱ्या बॅकांवर कारवाई करणार : मुख्यमंत्री

Next Post
पंतप्रधानांच्या हत्येचा कट रचणारे गजाआड जातील – मुख्यमंत्री

शेतकऱ्याला पीक कर्जास नकार देणाऱ्या बॅकांवर कारवाई करणार : मुख्यमंत्री

यापेक्षा मला फासावर चढवा : साध्वीचा संताप उफाळला

यापेक्षा मला फासावर चढवा : साध्वीचा संताप उफाळला

पराभव समोर दिसू लागल्याने मोदी फडणवीसांकडून जुमलेबाजी पार्ट -२ सुरुः खा. अशोक चव्हाण

भाजपामधील असंतोष शमविण्यासाठी मंत्रीमंडळ विस्ताराचे गाजरः अशोक चव्हाण

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com