• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 28, 2018

पनवेल महानगर पालिकेच्या हद्दीतील पाणी पुरवठा योजनांच्या कामाला गती द्या – बबनराव लोणीकर

adminbyadmin
in पनवेल
0
पनवेल महानगर पालिकेच्या हद्दीतील  पाणी पुरवठा योजनांच्या कामाला गती द्या  – बबनराव लोणीकर

मुंबई : पनवेल महानगर पालिकेच्या हद्दीतील नागरिकांना वेळेत व पुरेसा पाणी पुरवठा होण्यासाठी महानगर पालिकेच्या हद्दीतील पाणी पुरवठा योजनांच्या कामाला गती देण्याचे निर्देश पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे मंत्री बबनराव लोणीकर यांनी आज येथे दिले.

पनवेल महानगरपालिकेच्या हद्दीतील पाणी पुरवठा सुरळीत करण्याबाबत मंत्रालयात आज बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी श्री. लोणीकर बोलत होते. यावेळी आमदार प्रशांत ठाकुर, पनवेल महानगर पालिकेच्या महापौर डॉ. कविता चौतमोल, पनवेल म.न.पा.चे सभागृह नेता परेश ठाकुर, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे अप्पर मुख्य सचिव श्यामलाल गोयल, पनवेल महानगर पालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रसाळ, पनवेल महानगर पालिकेचे व पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी  उपस्थित होते.

मंत्री श्री. लोणीकर म्हणाले, पनवेल महानगर पालिकेच्या हद्दीतील पाणी पुरवठा योजना सुरळीत ठेवण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत प्रयत्न करण्यात येत आहे. पाणी पुरवठा करणाऱ्या पाईप लाईन जुन्या झाल्या असल्याने पाणी गळतीचे प्रमाण वाढले आहे. गळतीचे प्रमाण रोखण्यासाठी एक महिन्यांच्या आत प्रयत्न केले जातील. पाणी पुरवठा योजनांना होणारा खंडित वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले जातील. महानगर पालिकेच्या हद्दीत वेळीच व पुरेसा पाणी पुरवठा करण्यासाठी न्हावा –शेवा पाणी पुरवठा योजना टप्पा क्रमांक -3 तयार करण्यात आली असून योजनेची मंजुरी अंतिम टप्प्यात आहे.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत अमृत योजनेतून सादर करण्यात आलेल्या पनवेल महानगर पालिका क्षेत्रातील 29 गावाच्या शहरी निकषाप्रमाणे दरडोई 135 लिटर / दिन / माणसी या प्रमाणे सेवास्तर उंचविण्यासाठी पाणी पुरवठा योजनेची अंदाजपत्रके व आराखडे तयार करण्यात आले आहेत. ते नगर विकास विभागाला पाठविण्याच्या सूचनाही यावेळी श्री. लोणीकर यांनी दिल्या.

Previous Post

वाशी गाव येथील कोळी बांधवाकरिता उभारण्यात आलेल्या जेट्टी, जोड रस्ता, सभामंडप व कॉक्रीट रँपचे उद्घाटन आ. सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या हस्ते संपन्न

Next Post

केरळ पूरग्रस्तांना नवी मुंबई मनसेचा मदतीचा हात

Next Post
केरळ पूरग्रस्तांना नवी मुंबई मनसेचा मदतीचा हात

केरळ पूरग्रस्तांना नवी मुंबई मनसेचा मदतीचा हात

अतिक्रमण विभागाची बेलापूर व तुर्भे विभागात अनधिकृत बांधकामांवर कारवाई

अतिक्रमण विभागाची बेलापूर व तुर्भे विभागात अनधिकृत बांधकामांवर कारवाई

या सरकारचं करायचं काय…खाली डोकं वर पाय…गगनभेदी घोषणांनी मुंबई दणाणली

या सरकारचं करायचं काय…खाली डोकं वर पाय…गगनभेदी घोषणांनी मुंबई दणाणली

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com