• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jun 20, 2018

मुंबईतील अतिधोकादायक ७०७ इमारती केव्हाही कोसळणार

adminbyadmin
in मुंबई
0
मुंबईतील अतिधोकादायक ७०७ इमारती केव्हाही कोसळणार

दिपक देशमुख
मुंबई – पावसाळ्यात दरवर्षी धोकायदायक इमारतींचा प्रश्न एैरणीवर येतो. यंदा मुंबईत सुमारे ५३३ खासगी इमारती अतिधोकादायक झाल्या आहे. प्रशासनाने वारंवार नोटीसा बजावूनही रहिवाशी इमारती रिकाम्या करण्यास तयार नाहीत. त्यामुळे अशा धोकादायक इमारतींबाबत पालिका प्रशासनाला चिंता वाटत आहे.
मुंबईत इमारत दुर्घटना घडू नये तसेच लोकांच्या जिवित आणि मालमत्तेचे नुकसान होवू नये यासाठी पालिका सतर्क झाली आहे. मुंबईत ३० वर्षे पूर्ण झालेल्या आणि आयुर्मान संपलेल्या इमारतींचे सर्वेक्षण करण्यात येते. यंदा अतिधोकायक सी १ श्रेणीमध्ये असलेल्या ५३३ खासगी व महापालिकेच्या १७४ इमारती असून, त्या कधीही कोसळतील अशा स्थितीत आहेत. त्या सर्व इमारती रिकाम्या करण्याच्या नोटीसा पालिकेने संबंधितांना दिल्या आहेत. तर १५६ खासगी इमारती पाडण्यास स्थिगिती मिळाली आहे. मात्र, उर्वरित इमारती आजही उभ्या असून या इमारतीत रहिवाशी वास्तव्य करत आहेत.
नियमानुसार पोलीस बळाचा वापर करून रहिवाशांना स्थलांतरीत करण्यात येते. परंतु, खासगी इमारतींमधील रहिवाशी घरे सोडण्यास नकार देत असल्याने अतिधोकादायक इमारतींचा पेच पालिकेसमोर निर्माण झाला आहे. महापालिकेच्या १७४ इमारती धोकादायक ठरल्या आहेत. त्यापैकी ११५ इमारतींचे वीज, पाणी पुरवठा खंडीत केला आहे. तांत्रिक बाबींमध्ये ३९ इमारती अडकलेल्या आहेत. पालिकेच्या इमारतींची जबाबदारी प्रशासनाची आहे. मात्र, खासगी इमारतींना वारंवार नोटीस बजावूनही रहिवाशी रिकाम्या करत नाहीत. त्यामुळे खासगी इमारतींमध्ये दुर्घटना झाल्यास जबाबदारी कोण घेणार, असा प्रश्न पालिका अधिकार्‍यांना पडला आहे.

Previous Post

महापालिका अतिक्रमण अधिकारी व कर्मचार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी

Next Post

आव्हाडांनी कृष्णकुंजला का भेट दिली? याचीच चर्चा

Next Post
आव्हाडांनी कृष्णकुंजला का भेट दिली? याचीच चर्चा

आव्हाडांनी कृष्णकुंजला का भेट दिली? याचीच चर्चा

‘सेल्फी’साठी शिवसैनिकाना नार्वेकरंच हवेत

‘सेल्फी’साठी शिवसैनिकाना नार्वेकरंच हवेत

स्वत:चे अनधिकृत बांधकाम पाडण्याची महापालिकेवर नामुष्की

महापालिकेने स्वत:च उभारून स्वत:च पाडलेल्या अनधिकृत मार्केटचे डेब्रिज तात्काळ उचलण्याची मागणी

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com