• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Wednesday, June 18, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jun 20, 2018

मंजुळाची हत्या केल्याचा पोलिसांवर आरोप

adminbyadmin
in मुंबई
0
मंजुळाची हत्या केल्याचा पोलिसांवर आरोप

मंजुळा शेट्ये मृत्यूप्रकरणी जेल अधीक्षकांसह सहा जणांवर आरोप निश्चित!
मुंबई : भायखळा जिल्हा कारागृहात मंजुळा शेट्ये या महिला आरोपीच्या झालेल्या मृत्यूने महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. इंद्राणी मुखर्जीचा जबाब आणि सीसीटीव्ही फूटेजच्या आधारावर महिला पोलिसांनी केलेल्या मारहाणीत झाल्याचा निष्कर्ष मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने काढला आहे. मंजुळा शेट्ये प्रकरणात पोलिसांवरच आरोप निश्चित झाल्याने पोलिसांची प्रतिमा मलीन झाली आहे.
मंजुळा शेट्ये प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयाने जेल अधीक्षक मनिषा पोखरकर यांच्यासह सहा जणांविरोधात आरोप निश्चित केले आहेत. कलम ३०२ नुसार हत्या करणे, कलम १२० ब नुसार हत्येचा कट रचणे, कलम २०१ नुसार पुरावा नाहीसा करणे आणि कलम ५०१ नुसार मरेपर्यंत मारहाण करणे या कलमांखाली हे आरोप निश्चित करण्यात आले आहेत.
जेल अधीक्षक मनीष पोखरकरसह महिला जेल पोलिस बिंदू नाईकवडे, वसिमा शेख, शितल शेगावकर, सुरेखा गुळवे आणि आरती शिंगणे या सहा जेल पोलिसांनी हेतुपुरस्सर मंजुळाची हत्या केल्याचा आरोप आरोपपत्रात ठेवण्यात आला आहे. भायखळा जेलमध्ये महिला कैदी मंजुळा शेट्येचा खूनच झाला होता, असे गुन्हे शाखेच्या तपासात समोर आले आहे. साक्षीदार आणि वस्तूजन्य पुराव्यांच्या आधारे स्पष्ट झाल्याचे मुंबई गुन्हे शाखेने आपल्या आरोपपत्रात नमूद केले आहे.
२३ जूनच्या रात्री मंजुळा शेट्ये या महिला कैदीला अमानुष मारहाण करण्यात आली आणि यातच तिचा मृत्यू झाला. पण मारहाण करणार्‍या महिला जेल पोलिस अधिकार्‍यांना पूर्ण कल्पना होती की, आपण जे कृत्य करतोय त्यामुळे एखादी गंभीर घटना घडू शकते, असे असतानाही मंजुळाला मारहाण करण्यात आली, ती तिची हत्या करण्याच्या उद्देशानेच असे आरोपपत्रात नमूद करण्यात आल्याचं क्राईम ब्रांचने म्हटले आहे.
एकूण ९९० पानांचे हे आरोपत्र असून यात १८२ साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले असून यात ९७ कैद्यांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. यात शिना बोरा हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीचा जबाब आरोपपत्रात समाविष्ट करण्यात आला आहे. तर सीसीटीव्ही फुटेज या प्रकरणात महत्त्वाचा पुरावा असल्याचे आरोपपत्रात नमूद करण्यात आला आहे.

Previous Post

झेंडा व धोंडा याचाच कित्ता गिरविणार

Next Post

महापालिका अतिक्रमण अधिकारी व कर्मचार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी

Next Post
घणसोली बसडेपोच्या ठेकेदाराला हाकलण्याची मागणी

महापालिका अतिक्रमण अधिकारी व कर्मचार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी

मुंबईतील अतिधोकादायक ७०७ इमारती केव्हाही कोसळणार

मुंबईतील अतिधोकादायक ७०७ इमारती केव्हाही कोसळणार

आव्हाडांनी कृष्णकुंजला का भेट दिली? याचीच चर्चा

आव्हाडांनी कृष्णकुंजला का भेट दिली? याचीच चर्चा

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com