• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jun 2, 2018

पामबीच रोडवरील अनधिकृत पार्किंगवर धडक मोहिम

adminbyadmin
in नवी मुंबई
0
पामबीच रोडवरील अनधिकृत पार्किंगवर धडक मोहिम

हॉटेल पाम्स अटलांटिक मधील अनधिकृत पोटमाळा निष्कासित 

नवी मुंबई :- महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागामार्फत महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांच्या निर्देशानुसार धडक मोहिमा राबविल्या जात असून अनधिकृत बांधकामे, रस्ते – पदपथांवरील फेरीवाले, मार्जिनल स्पेसचा गैरवापर, विनापरवानगी होर्डींग – बॅनर्स यावर कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.

महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांच्या निर्देशानुसार, अतिरिक्त आयुक्त श्री. मोहन डगांवकर यांच्या मार्गदर्शनाखाली, अतिक्रमण विभागाचे उप आयुक्त डॉ. अमरिश पटनिगिरे व परिमंडळ 1 विभागाचे उप आयुक्त श्री. दादासाहेब चाबुकस्वार यांच्या नियंत्रणाखाली, वाशी विभागाचे विभाग अधिकारी श्री. महेंद्रसिंग ठोके, तुर्भे विभागाच्या सहा. आयुक्त श्रीम. अंगाई साळुंखे यांनी विभागातील अधिकारी, कर्मचारी यांच्या सहाय्याने ही धडक मोहीम पार पाडली.

वाशी व तुर्भे विभागातील कोपरी गांव येथे पामबीच रोडलगत असलेल्या रस्ते व पदपथावर चार चाकी गाड्या अनधिकृतपणे उभ्या केल्या जात होत्या. या रस्ते व पदपथावर गाड्या उभ्या केल्या जात असल्यामुळे वाहतुकीला अडथळा व नागरिकांना ये-जा करण्यासाठी अडचण निर्माण होत होती. त्यामुळे याठिकाणी उभ्या करण्यात येत असलेल्या गाड्यांवर नवी मुंबई महानगरपालिकेच्या वाशी व तुर्भे विभाग कार्यालयाच्या वतीने कारवाई करण्यात आली. यामध्ये 20 गाड्या हटविण्याची कारवाई करण्यात आली असून एकूण 28 हजार 300 इतकी रक्कम वसूल करण्यात आली आहे. या मोहिमेमध्ये 3 टोईंग व्हॅन, 15 लेबर यांच्या सहाय्याने ही कारवाई करण्यात आली.

त्याचप्रमाणे तुर्भे सेक्टर 19 डी, सतरा प्लाझा येथील हॉटेल पाम्स अटलांटिक हुक्का पार्लर मध्ये अनधिकृत पोटमाळ्याचे बांधकाम करण्यात आलेले होते. त्याबाबत संबंधितांना एम.आर.टी.पी. कायद्यामधील कलम 53(1) अन्वये रितसर नोटीसही देण्यात आली होती. तथापि याबाबत कोणतीही दखल संबंधितांनी घेतली नाही वा स्वत:हून पोटमाळा काढला नाही त्यामुळे आज तुर्भे विभागाच्या सहा. आयुक्त श्रीम. अंगाई साळुंखे व त्यांच्या सहकारी अधिकारी, कर्मचारी पथकाने 15 कामगार व गॅस कटरच्या सहाय्याने पोटमाळा निष्कासित केला व 30 हजार रूपये रक्कम वसूल केली. या मोहिमेत 15 कामगारांसह 2 गॅस कटरच्या सहाय्याने ही धडक कारवाई करण्याती आली. यापुढील काळातही अशाप्रकारच्या धडक कारवया आठही विभागांमध्ये करण्यात येणार आहेत.

Previous Post

स्पंदना महिला उद्योगाचे उदघाटन बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांच्या हस्ते संपन्न

Next Post

हार तुरे घेण्यास आलो नाहीत तर सर्वसामान्यांचे प्रश्न सोडण्यास आलो आहोत – विजय नाहटा

Next Post
हार तुरे घेण्यास आलो नाहीत तर सर्वसामान्यांचे प्रश्न सोडण्यास आलो आहोत – विजय नाहटा

हार तुरे घेण्यास आलो नाहीत तर सर्वसामान्यांचे प्रश्न सोडण्यास आलो आहोत - विजय नाहटा

उपप्रादेशिक परिवहन कार्यालयच अस्वच्छतेच्या विळख्यात

उपप्रादेशिक परिवहन कार्यालयच अस्वच्छतेच्या विळख्यात

हवे तर कोठडीत घाला, पण अडचणीचे प्रश्न विचारतच राहणार!: सचिन सावंत

मुख्यमंत्र्यांविरोधात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करा

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com