• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Apr 10, 2018

चार वर्षात राज्यातील राष्ट्रीय महामार्गाची लांबी चौपटीने वाढली हे गडकरी आणि त्यांची टीमचे यश – मुनगंटीवार

adminbyadmin
in मुंबई
0
चार वर्षात राज्यातील राष्ट्रीय महामार्गाची लांबी चौपटीने वाढली हे गडकरी आणि त्यांची टीमचे  यश – मुनगंटीवार

मुंबई :- चार वर्षात राज्यातील राष्ट्रीय महामार्गाची लांबी चौपटीने वाढली. 2014 साली राज्यात 5 हजार 700 कि.मी लांबीचे राष्ट्रीय महामार्ग होते ते 2017-18 मध्ये वाढून 22 हजार 436 कि.मी एवढे झाले. केंद्रीय बांधकाम मंत्री नितीन गडकरी आणि त्यांच्या टीमचे हे यश आहे, असे प्रतिपादन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट ॲण्ड हायवेज च्या वतीने काल अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी-कर्मचारी आणि अभियंत्यांचा सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री मदन येरावार, प्रधान सचिव अशिष सिंह, रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांच्यासह केंद्र तसेच राज्यातील इतर वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

आपल्या हातून राज्य आणि राष्ट्र निर्माणाचे उत्तम काम व्हावे ही अपेक्षा व्यक्त करून श्री. मुनगंटीवार यांनी गौरव झालेल्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. ते म्हणाले की,  केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील रस्त्यांचा विकास झपाट्याने होत आहे. एकूण तरतूदीच्या 45 टक्के रक्कमेची कामं महाराष्ट्रात होत आहेत. सावित्री नदीवरील पूल 165 दिवसांच्या रेकॉर्ड टाईममध्ये बांधून वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाला गती देण्यात आली आहे. मंत्री उत्तम आहेतच परंतु त्यांना साथ देणारी टीम उत्तम असेल तर विकासाच्या कामात कोणतेही अडथळे येत नाहीत. आज काही अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव झाला आहे. भविष्यात महाराष्ट्रातील सर्व अधिकाऱ्यांना अशी प्रमाणपत्रे मिळतील यादृष्टीने उत्तम काम व्हावे ही अपेक्षा ही त्यांनी व्यक्त केली.

रस्त्यांच्या माध्यमातून विकास वेगाने पूर्णत्वाला- एकनाथ शिंदे

श्री. गडकरी राज्यात बांधकाम मंत्री असताना त्यांनीच रस्ते विकास महामंडळाची निर्मिती करून अनेक महत्वपूर्ण प्रकल्प पूर्ण केले. त्यामध्ये मुंबई- पुणे एक्सप्रेस वे असेल, मुंबईतील उड्डाण पूल असतील, त्यांचा समावेश आहे. राज्य आणि देशाचा विकास रस्त्यांच्या माध्यमातून वेगाने पूर्णत्वाला जातो. म्हणून हा राज्यातील सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय असल्याचेही ते म्हणाले. रस्ते विकास महामंडळाकडे केंद्रीय बांधकाम मंत्रालयाने जवळपास 3 हजार कि.मी लांबीच्या रस्त्याचे काम दिले आहे,  ही सर्व कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी आपण अतिशय जबाबदारीने काम करू, असा विश्वास देत असल्याचेही ते म्हणाले.

काल सत्कार झालेल्या अधिकाऱ्यांमध्ये बांधकाम विभागाचे प्रधान सचिव अशिष सिंह, राधेश्याम मोपलवार, चीफ इंजिनिअर ए.बी. गायकवाड, यांच्यासह 21 अधिकारी- अभियंत्यांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

Previous Post

ऐरोली विभागातील अनधिकृत बांधकामांवर हातोडा

Next Post

ऐरोली येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडर स्मारकावर जयंती निमित्त विद्युत रोषणाई ला मान्यता

Next Post
‘ऐरोली येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडर स्मारकावर जयंती निमित्त विद्युत रोषणाई करा’

ऐरोली येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडर स्मारकावर जयंती निमित्त विद्युत रोषणाई ला मान्यता

वीज बिलांची समायोजित रक्कम माफ करणार

वीज बिलांची समायोजित रक्कम माफ करणार

पोलीस भरतीच्या मुलांसाठी मनसे आली धावून

पोलीस भरतीच्या मुलांसाठी मनसे आली धावून

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com