• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Feb 26, 2018

नवी मुंबई महापौर चषक फोर्टी प्लस क्रिकेट स्पर्धेत कोपरखैरणेगांव तसेच युना़ईटेड, ऐरोली विजेतेपदाचे मानकरी

adminbyadmin
in नवी मुंबई
0
नवी मुंबई महापौर चषक फोर्टी प्लस क्रिकेट स्पर्धेत कोपरखैरणेगांव तसेच युना़ईटेड, ऐरोली विजेतेपदाचे मानकरी
दिपक देशमुख
नवी मुंबई : वयाच्या चाळीशीनंतर आपल्या आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याचा वैद्यकीय सल्ला दिला जातो मात्र नवी मुंबईतील फोर्टी प्लस क्रिकेट या नाविन्यपूर्ण संकल्पनेने यादृष्टीने आधीच जागरूकता दाखवित आरोग्य आणि स्वास्थ्य रक्षणाचा एक चांगला संदेश मागील अनेक वर्षांपासून प्रसारित केला आहे याबद्दल गौरवोद् गार काढत नवी मुंबईचे महापौर श्री. जयवंत सुतार यांनी महापौर चषक फोर्टी प्लस क्रिकेट स्पर्धेमध्ये यावर्षी 32 ग्रामीण व 14 शहरी संघानी तसेच 3 निमंत्रित संघांनी सहभागी होत मागील वर्षीपेक्षा अधिक उत्स्फुर्त प्रतिसाद दिल्याबद्दल अभिनंदन केले.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने वाशीतील नवी मुंबई स्पोर्टस् असोसिएशनच्या मैदानावर 24 व 25 फेब्रुवारी 2018 रोजी संपन्न झालेल्या नवी मुंबई महापौर चषक फोर्टी प्लस स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्याप्रसंगी ते आपले मनोगत व्यक्त करीत होते. याप्रसंगी महापौर महोदयांसमवेत मंचावर क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम समितीचे सभापती तथा स्पर्धा निमंत्रक श्री. विशाल डोळस, नगरसेवक श्री.सुनिल पाटील, क्रीडा अधिकारी श्री. रेवप्पा गुरव, फोर्टी प्लस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष मास्टर प्रदीप पाटील, सचिव श्री. लिलाधर पाटील, कार्यकारिणी सदस्य श्री. भालचंद्र दळवी, श्री. विकास मोकल, श्री.सुरेश राणी, श्री.संतोष शेट्टी, श्री.अजित कांडर, श्री.रवी भोसले आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना स्पर्धा निमंत्रक तथा क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम समितीचे सभापती श्री. विशाल डोळस यांनी आपल्या मनोगतात नवी मुंबई महानगरपालिका विविध खेळांना प्रोत्साहित करण्याचे काम करीत असून पुढील वर्षी फोर्टी प्लस क्रिकेट सामने प्रकाशझोतात आयोजित करण्याचा मानस असल्याचे सांगितले.
नवी मुंबई महापौर चषकांतर्गत झालेल्या फोर्टी प्लस क्रिकेट सामन्यांत ग्रामीण विभागात कोपरखैरणे फोर्टी प्लसच्या संघाने बेलापूर फोर्टी प्लस संघावर 25 धावांनी मात करत विजेतेपदाचा महापौर चषक पटकाविला.
शहरी विभागात युनाईटेड ऐरोली संघाने सत्यमेव ऐरोली संघावर अंतिम सामन्यात मात करीत नवी मुंबई महापौर चषकावर आपला विजेतेपदाचा ठसा उमटवला.
निमंत्रितांच्या प्रदर्शनीय सामन्यात संजीवन ग्रूप विजेतेपदाचे मानकरी ठरले. प्रदर्शनीय सामन्यात प्रकाश म्हात्रे यांना उत्कृष्ट फलंदाज व महादेव डुंबरे यांना उत्कृष्ट गोलंदाज म्हणून स्मृतीचिन्ह देऊन सन्मानीत करण्यात आले.
ग्रामीण विभागात गावदेवी फोर्टी प्लस, सानपाडा व वाशीगाव फोर्टी प्लसचे संघ तसेच शहरी विभागात नेरूळ फ्रेंडस् फोर्टी प्लस संघ तिस-या क्रमांकाचे मानकरी ठरले.
ग्रामीण विभागात कोपरखैरणे फोर्टी प्लस संघातील रविकांत म्हात्रे तसेच शहरी विभागात युनाईटेड ऐरोलीचे राम पोळ मालिकावीर चषकाचे मानकरी ठरले.
ग्रामीण विभागात बेलापूर फोर्टी प्लस संघाचे प्रकाश बंदरे यांना उत्कृष्ट फलंदाज, सानपाडा फोर्टी प्लस संघाचे प्रकाश मढवी यांना उत्कृष्ट गोलंदाज तसेच वाशी फोर्टी प्लस संघाचे मनोज म्हात्रे यांना उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून स्मृतीचिन्हे प्रदान करण्यात आली.      
शहरी विभागात नेरूळ फ्रेंडस् फोर्टी प्लस संघाचे जितू परदेशी यांना उत्कृष्ट फलंदाज, सत्यमेव ऐरोली फोर्टी प्लस संघाचे अनिल नाकते यांना उत्कृष्ट गोलंदाज तसेच युनायटेड ऐरोली फोर्टी प्लस संघाचे महेंद्र शिंदे यांना उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून स्मृतीचिन्हे प्रदान करण्यात आली.
Previous Post

सोहराबुद्दीन बनावट चकमक प्रकरणातील अधिका-यांच्या सुटकेविरोधातील याचिकेची सुनावणी करणा-या न्यायमूर्तींची अचानक झालेली बदली चिंताजनकः सचिन सावंत

Next Post

वाढत्या आवकमुळे भाजी मार्केटमध्ये आजही मंदीचे वातावरण कायम

Next Post
बाजार समितीमधील भाजी मार्केटमध्ये परराज्यातील भाज्यांचाच बोलबाला

वाढत्या आवकमुळे भाजी मार्केटमध्ये आजही मंदीचे वातावरण कायम

महाराष्ट्र भवनसाठी मनसे आक्रमक

महाराष्ट्र भवनसाठी मनसे आक्रमक

लाखो शेतक-यांच्या हक्कासाठी प्रसंगी रस्त्यावरचीच नाही तर न्यायालयीन लढाई ही लढणार : सचिन सावंत

टी सीरीज तर्फे प्रकाशीत करण्यात आलेल्या व्हिडीओबद्दल मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण द्यावेः सचिन सावंत

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com