• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Feb 26, 2018

सोहराबुद्दीन बनावट चकमक प्रकरणातील अधिका-यांच्या सुटकेविरोधातील याचिकेची सुनावणी करणा-या न्यायमूर्तींची अचानक झालेली बदली चिंताजनकः सचिन सावंत

adminbyadmin
in महाराष्ट्र
0
लाखो शेतक-यांच्या हक्कासाठी प्रसंगी रस्त्यावरचीच नाही तर न्यायालयीन लढाई ही लढणार : सचिन सावंत

मुंबई :- सोहराबुद्दीन बनावट चकमक प्रकरणात आरोपी असलेल्या भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी डी. जी. वंजारा, दिनेश एम. एन. आणि राजकुमार पांडियान यांच्या सुटकेविरोधात सोहराबुद्दीनचा भाऊ रुबाबुद्दीन यांनी दाखल केलेल्या पुनर्विचार याचिकेची सुनावणी करणा-या न्यायमूर्तींची अचानक झालेली बदली चिंताजनक असल्याचे मत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी व्यक्त केले आहे.

सदर न्यायमूर्ती रूबाबुद्दीन यांच्या याचिकेबरोबरच सीबीआयने दाखल केलेल्या गुजरात केडरचे भारतीय पोलीस सेवेचे अधिकारी एम. के. अमिन आणि राजस्थान पोलीसचे कॉन्स्टेबल दलपत सिंग राठोड यांच्या सुटकेविरोधातील याचिकेची सुनावणीही करत होत्या. या याचिकेची सलग तीन आठवडे सुनावणी घेऊन त्यांनी विविध पक्षांची बाजू ऐकून घेतली होती.  सदर याचिकांवरील सुनावणी अंतिम टप्प्यात होती. या सुनावणी दरम्यान न्यायमूर्तींनी सीबीआयच्या कार्यपध्दतीवर ताशेरे ओढत सीबीआय न्यायालयाला सहकार्य करित नाही, असे सुनावले होते. यासंदर्भात माध्यमांनी सोहराबुद्दीन खटल्याच्या कामकाजाचे वृत्तांकन करू नये अशा त-हेचे बंधन सदर न्यायमूर्तींनी उठवले होते.

या अगोदर सीबीआय कोर्टात सोहराबुद्दीन बनावट चकमक  खटल्याची सुनावणी सुरु असताना सदर खटल्याची संपूर्ण सुनावणी एकाच न्यायमूर्तीसमोर व्हावी असे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश असतानाही प्रथम न्यायमूर्ती जे. टी. उत्पत यांची अचानक बदली झाली होती. त्यानंतर सदर खटल्याची सुनावणी करणा-या न्यायमूर्ती ब्रिजगोपाल लोया यांचा गूढ मृत्यू झाला होता. न्यायमूर्ती लोया यांच्या मृत्यूनंतर आलेल्या न्यायमूर्तीनी सोहराबुद्दीन बनावट चकमक प्रकरणातील  10 हजार पानांचे आरोपपत्र 15 दिवसांत वाचून भाजपाध्यक्ष अमित शाह यांची या प्रकरणातून सुटका केली होती.  सोहराबुद्दीन बनावट चकमक प्रकरणातील गुंतागुंत, बड्या राजकीय नेत्यांची यात गुंतलेली नावे, सुनावणी घेणा-या न्यायमुर्तींच्या अचानक होणा-या बदल्या व योगायोग दर्शवणा-या अनेक घटना या प्रकरणातील गूढ दिवसेंदिवस वाढविणा-या आहेत. 

Previous Post

महापालिका आयुक्तांची मुदतपूर्व बदली केल्यास मंत्र्यांना पनवेलमध्ये फिरकू देणार नाही

Next Post

नवी मुंबई महापौर चषक फोर्टी प्लस क्रिकेट स्पर्धेत कोपरखैरणेगांव तसेच युना़ईटेड, ऐरोली विजेतेपदाचे मानकरी

Next Post
नवी मुंबई महापौर चषक फोर्टी प्लस क्रिकेट स्पर्धेत कोपरखैरणेगांव तसेच युना़ईटेड, ऐरोली विजेतेपदाचे मानकरी

नवी मुंबई महापौर चषक फोर्टी प्लस क्रिकेट स्पर्धेत कोपरखैरणेगांव तसेच युना़ईटेड, ऐरोली विजेतेपदाचे मानकरी

बाजार समितीमधील भाजी मार्केटमध्ये परराज्यातील भाज्यांचाच बोलबाला

वाढत्या आवकमुळे भाजी मार्केटमध्ये आजही मंदीचे वातावरण कायम

महाराष्ट्र भवनसाठी मनसे आक्रमक

महाराष्ट्र भवनसाठी मनसे आक्रमक

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com