• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Feb 27, 2018

महाराष्ट्र भवनसाठी मनसे आक्रमक

adminbyadmin
in नवी मुंबई
0
महाराष्ट्र भवनसाठी मनसे आक्रमक

मनसेने सिडको भूखंडावर महाराष्ट्र भवनचा नामफलक लावला

         दिपक देशमुख
नवी मुंबई :- वाशी सेक्टर-३०अ येथे सिडकोने महाराष्ट्र भवनसाठी दोन एकरचा भूखंड गेली १५ वर्षांपासून आरक्षित ठेऊनही तेथे महाराष्ट्र भवन न बांधल्याच्या निषेधार्थ आज मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून दि.२७ फेब्रुवारी २०१८ रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी सदर भूखंडावर “हा भूखंड महाराष्ट्र भवनसाठी आरक्षित आहे व सदर भूखंडावर कोणतेही अतिक्रमण करू नये” या आशयाचा नामफलक लावून सिडको व राज्य शासनाचा निषेध केला. यावेळी मोठ्या संख्येने मनसैनिक उपस्थित होते. मनसैनिकांनी सिडको व राज्य शासनाविरोधात घोषणा देऊन भूखंडाचा परिसर दुमुदुमून सोडला. यावेळी “महाराष्ट्र भवन झालेच पाहिजे, झालेच पाहिजे, सिडको आणि राज्य शासनाचा निषेध असो निषेध असो, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असो या घोषणा महाराष्ट्र सैनिकांनी दिल्या.

 सदर भूखंडावर काही महिन्यांपूर्वी ही जागा महाराष्ट्र भवनसाठी आरक्षित असल्याचा नामफलक सिडकोने लावला होता मात्र काही महिन्यांपासून तो फलक सदर भूखंडावर दिसत नसल्यामुळे सदर भूखंड सिडकोला बिल्डरच्या घशात घालण्याचा डाव असल्याचे मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे म्हटले आहे. तसेच सिडकोचा हा डाव हाणून पाडण्यासाठीच सदर भूखंडावर आज महाराष्ट्र भवनचा नामफलक लावल्याचे मनसेने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

  नवी मुंबई शहरात विविध राज्यातील लोकांना त्यांच्या संस्कृतीचा प्रचार-प्रसार करता यावा, विविध सांस्कृतिक कार्यक्रम पार पाडता यावेत यासाठी सिडकोने आता पर्यंत वाशी स्थानक परिसरात आत्तापर्यंत वाशी स्थानक परिसरात उत्तराखंड, ओडीसा, आसाम, केरळ, अरुणाचल प्रदेश, मेघालय, नागालँड आणि उत्तर प्रदेश भवनसाठी भूखंड सिडकोने दिले आहेत. मात्र महाराष्ट्र भावनच्या भूखंडावर अजून साधी वीटही रचलेली नाही. महाराष्ट्र भवन नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात कोकण, खानदेश, विदर्भ, मराठवाडा या ठिकाणांहूनविविध कामांसाठी मुंबई व आजूबाजूच्या शहरात येणाऱ्या ग्रामीण भागातील नागरिकांची मोठी गैरसोय होते. मोठ्या संख्येने तरुण-तरुणी परीक्षा, स्पर्धा परीक्षा, नोकरीच्या मुलाखतीसाठी मुंबईत येत असतात . मात्र मुंबईच्या आजूबाजूच्या परिसरात राहण्याची त्यांना कोणतीही सोय नसते. 

 या आंदोलनातून सिडकोने धडा घेऊन १ मे पर्यंत सदर भूखंडावर महाराष्ट्र भवनचे भूमिपूजन करावे अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने १ मे ला महाराष्ट्र सैनिक महाराष्ट्र भवनची वीट रचून भूमिपूजन करतील असा इशारा मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी प्रसिद्धीपाराकाद्वारे सिडको व राज्य शासनाला दिला आहे.

Previous Post

वाढत्या आवकमुळे भाजी मार्केटमध्ये आजही मंदीचे वातावरण कायम

Next Post

टी सीरीज तर्फे प्रकाशीत करण्यात आलेल्या व्हिडीओबद्दल मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण द्यावेः सचिन सावंत

Next Post
लाखो शेतक-यांच्या हक्कासाठी प्रसंगी रस्त्यावरचीच नाही तर न्यायालयीन लढाई ही लढणार : सचिन सावंत

टी सीरीज तर्फे प्रकाशीत करण्यात आलेल्या व्हिडीओबद्दल मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण द्यावेः सचिन सावंत

आमदार निधीतून ‘ओपन जिम’  उभारण्याची मागणी

आमदार निधीतून ‘ओपन जिम’ उभारण्याची मागणी

नवी मुंबईच्या शैक्षणिक गुणवत्ता विकासासाठी महानगरपालिका कटिबध्द – महापौर जयवंत सुतार

नवी मुंबईच्या शैक्षणिक गुणवत्ता विकासासाठी महानगरपालिका कटिबध्द - महापौर जयवंत सुतार

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com