• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jan 31, 2018

आदिवासी समाजाचे ज्येष्ठ आणि समर्पित असे नेतृत्व हरपले : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

adminbyadmin
in नवी मुंबई
0
आदिवासी समाजाचे ज्येष्ठ आणि समर्पित असे  नेतृत्व हरपले : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

खासदार चिंतामण वनगा यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

पालघर  :- पालघरचे खासदार अॅड. चिंतामण वनगा यांच्या निधनाने जिल्ह्याच्या  सर्वांगीण विकासासाठी झटणारा, आदिवासींचा कैवारी, अभ्यासु खासदार, ज्येष्ठ आणि समर्पित असे  नेतृत्व हरपले,अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली.

   खासदार अॅड. चिंतामण वणगा यांचे मंगळवारी (दि.30 जानेवारी) दिल्ली येथे निधन झाले.  मुळगावी कवाडा, येथे वनगा यांच्या  पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलीसांनी त्यांना मानवंदना दिली. प्रारंभी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुष्पचक्र अर्पण केले. यावेळी शालेय शिक्षणमंत्री  विनोद तावडे, पालकमत्री तथा आदिवासी विकास मंत्री  विष्णू सवरा, गुजरातचे आदिवासी विकास राज्यमंत्री रमण पाटकर, सिल्व्हासाचे खासदार नटुभाई पटेल, भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, खासदार कपील पाटील, माजी मंत्री मधुकर पिचड, गणेश नाईक, सर्वश्री आमदार हितेंद्र ठाकूर आनंदभाई ठाकूर,  अमित घोडा,पास्कल धनारे,  विलास तरे, मनिषा चौधरी,  रविद्र फाटक ,संजय केळकर  ,माजी खासदार सिताराम गवळी,बळीराम जाधव, जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे, मुख्य कार्यकारी अधिकारी मिंलिंद बोरीकर, पोलीस अधिक्षक मंजुनाथ सिंगे यांसह जिल्हा परिषद   सदस्य,  पंचायत समिती  सदस्य, स्थानिक कार्यकर्ते, शासकीय अधिकारी कर्मचारी, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर यांसह नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

 यावेळी श्रद्धांजली अर्पण करताना मुख्यमंत्री म्हणाले की खा. वनगा यांचे  निधन हे अतिशय धक्कादायक आणि चटका लावून जाणारे आहे. अथक संघर्ष करून त्यांनी समाजकारण आणि राजकारणामध्ये स्वत:चे स्थान निर्माण केले होते.  दुर्गम  भागात राष्ट्रीय विचार पेरण्याचे महत्त्वाचे काम त्यांनी केले.   वंचित, आदिवासींना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी सातत्याने संघर्ष केला. त्यांचा स्वभाव जिद्दी असल्यामुळे हाती घेतलेले काम समाजोपयोगी असेल तर त्यासाठी सदैव संघर्ष करण्याची त्यांची तयारी होती. पदाचा हव्यास त्यांनी कधीच केला नाही. सोपविलेली पदे व जबाबदारी निष्ठेने पार पाडली . त्यांच्या  जाण्याने तयार झालेली पोकळी कधीही भरुन न येणारी आहे.

यावेळी बोलताना पालकमंत्री तथा आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा म्हणाले वनगा साहेबांच्या व माझ्या राजकीय व सामाजिक जीवनाची सुरुवात एकत्र सुरु झाली. खांद्याला खांदा लावून आम्ही अनेक वर्ष संघर्ष करत आम्ही इथपर्यंत पोहचलो मात्र आमची साथ अर्थवट सोडून आमचा साथीदार गेल्याचे आम्हाला अतीव दुःख आहे. पक्षाची भरून न येणारी हानी झाली असून पालघर जिल्ह्याची जनता पोरकी झाली आहे. ग्रामीण – दुर्गम भागातील जनतेच्या प्रश्नांसाठीसाठी सदैव जागरूक असणारा लोकप्रतिनिधि आपण गमावला असून आपल्यावर असणारे भावाचं छत्र हरपले आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी राजकारणाच्याही पलीकडे जाऊन लोकांसाठी काम करणाऱ्या  नेत्यांपैकी ते एक होते. अतिशय विनम्र स्वभाव हा त्यांचा गुण सर्वानीच घेण्यासारखा आहे अशा शब्दात श्रद्धांजली वाहिली.  यावेळी गुजरात चे  आदिवासी विकास मंत्री रमण पाटकर, खा. कपिल पाटील आ. मनीषा चौधरी, आ. संजय केळकर,  माजी मंत्री जगन्नाथ पाटील यांनीं  श्रद्धांजली वाहिली.  अंत्यदर्शनसाठी त्यांचे पार्थिव त्यांच्या कवाडा निवासस्थानी   ठेवण्यात आले होते. हजारो पालघर वासियांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले.

Previous Post

कोपरी येथील 291 घरे नियमित करणे संदर्भात आ. मंदाताई म्हात्रे यांची नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांजसह बैठक संपन्न

Next Post

सारसोळेच्या शांतीधाम स्मशानभूमीत दफनभूमीत वखारवाल्याच्या लाकडाचे अतिक्रमण

Next Post
सारसोळेच्या शांतीधाम स्मशानभूमीत दफनभूमीत वखारवाल्याच्या लाकडाचे अतिक्रमण

सारसोळेच्या शांतीधाम स्मशानभूमीत दफनभूमीत वखारवाल्याच्या लाकडाचे अतिक्रमण

खारघर व शिरढोण येथे गुटखा विक्रीच्या गोदामावर छापे

खारघर व शिरढोण येथे गुटखा विक्रीच्या गोदामावर छापे

काँग्रेस पक्षाने लढवय्या कार्यकर्ता गमावला

अर्थसंकल्प म्हणजे स्वप्नांची मालिका आणि घोषणांचा पाऊसः खा. अशोक चव्हाण

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com