• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, June 15, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jan 11, 2018

ठाण्यात मिसळ महोत्सवाचे भव्य आयोजन

adminbyadmin
in ठाणे
0
ठाण्यात मिसळ महोत्सवाचे भव्य आयोजन

ठाणे- ठाण्यातील मिसळ शौकीनांना पुढील आठवड्याच्या अखेरीस विविध चवींच्या आणि विविध ठिकाणांच्या प्रसिद्ध अशा चटकदार मिसळी चाखण्याची संधीलाभणार आहे. सलग तीन वर्षे पुण्यातील खाद्यप्रेमी आणि खवय्यांच्या पसंतीस उतरल्यानंतर ‘बिईंग वुमन’ या संस्थेच्या संकल्पनेतून साकारलेल्यामिसळ महोत्सवाचे आयोजन आता ठाण्यात करण्यात येत आहे. ठाण्यातील स्थानिक नगरसेवक सामंत सरांच्या प्रयत्नाने ठाण्यातील घंटाळी देवीमंदीराजवळील घंटाळी मैदानात येत्या १९, २० आणि २१ जानेवारी रोजी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून तीनही दिवस सकाळी आठ ते रात्रौदहा वाजेपर्यंत हा महोत्सव खुला राहणार आहे.

नाशिक, कोल्हापूर, पुणे, अहमदनगर, पिंपरी चिंचवड, नारायणगाव, डोंबिवली, ठाणे या खास मिसळींसाठी प्रसिद्ध असणाऱ्या शहरातील सुप्रसिद्ध मिसळबनवणारे उद्योजक आपल्या चटकदार आणि झणझणीत मिसळींसह या महोत्सवाला हजेरी लावणार असून तब्बल ७० पेक्षा अधिक चवींच्या विविधमिसळ या महोत्सवात खवय्यांसाठी उपलब्ध असणार आहेत. याशिवाय दही, ताक, चहा, कॉफी,ज्यूस, आईसक्रीम, डेझर्टस, मोदक, खरवस, पुरणपोळी,कुल्फी, फालूदा अशा इतर पदार्थांचेही स्टॉल्स या महोत्सवात खवैय्यांची रसना तृप्त करण्यास सज्ज असणार आहेत. विशेष म्हणजे मिसळीचे छायाचित्रअसलेला भला मोठ्ठा बॅकड्रॉप असलेला सेल्फी पॉईंट या महोत्सवाचे आकर्षण असणार आहे. त्यामुळे तरूणाईची पावलेही या महोत्सवाकडे वळणार यातशंका नाही. बिईंग वुमन आयोजित पुण्यातील तीनही मिसळ महोत्सवांना तीस हजारांपेक्षा अधिक खवय्यांनी हजेरी लावली होती. पुण्याप्रमाणेचठाण्यातही खवय्यांची संख्या मोठी असल्याने ठाण्यातही या महोत्सवाला तुफान प्रतिसाद मिळेल, असा आयोजकांना विश्वास आहे. तीन दिवसांतसाधारण पंधरा हजार लोक या महोत्सवाला भेट देतील असा, आयोजकांचा अंदाज आहे.

Previous Post

वसंत डावखरे याना भावपूर्ण आदरांजली अर्पण

Next Post

नौदलाच्या अवमानाबद्दल नितीन गडकरी यांनी माफी मागावीः सचिन सावंत

Next Post
लाखो शेतक-यांच्या हक्कासाठी प्रसंगी रस्त्यावरचीच नाही तर न्यायालयीन लढाई ही लढणार : सचिन सावंत

नौदलाच्या अवमानाबद्दल नितीन गडकरी यांनी माफी मागावीः सचिन सावंत

सिडकोच्या चुकीमुळे व पालिकेच्या उदासिनतेमुळे ओमकारचे रहीवाशी भोगतात गेली २० वर्षे दुर्गंधींच्या नरक यातना

सिडकोच्या चुकीमुळे व पालिकेच्या उदासिनतेमुळे ओमकारचे रहीवाशी भोगतात गेली २० वर्षे दुर्गंधींच्या नरक यातना

महापालिकेच्या आधार कार्ड केंद्रावरील सावळागोंधळ कायम

महापालिकेच्या आधार कार्ड केंद्रावरील सावळागोंधळ कायम

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com