• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Wednesday, June 18, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Dec 24, 2017

नेरूळ येथील आर.टी.ओ. कार्यालयाला आमदार मंदाताई म्हात्रे यांचा विरोध

adminbyadmin
in नवी मुंबई
0
नेरूळ येथील आर.टी.ओ. कार्यालयाला आमदार मंदाताई म्हात्रे यांचा विरोध

सुजित शिंदे : ९६१९१९७४४४

अपघात होण्याच्या शक्यतेने स्थानिक नागरिकांनी केली निवेदनाद्वारे मागणी

 नवी मुंबई:- नेरूळ सेक्टर-19 येथे नियोजित उपप्रादेशिक परिवहन कार्यालय (आर.टी.ओ.) च्या कामास बेलापूरच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी विरोध केला. स्थानिक नागरिकांनी निवेदनाद्वारे केलेल्या मागणीमुळे आमदार मंदाताई म्हात्रे यांनी सदर ठिकाणी दौरा करून तेथील कार्यालयाला विरोध दर्शवून सदर ठिकाणी आर.टी.ओ. कार्यालय होऊन देणार नाही, अशी ग्वाही तेथील स्थानिक जेष्ठ नागरीक व उपस्थित महिलांना दिली.

 नवी मुंबईमधील वाशी येथे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय असून सर्व कामकाज एकाच ठिकाणी होत असल्यामुळे अजून एक स्वतंत्र कार्यालय असावे, याकरिता नेरूळ सेक्टर-19 येथे नियोजित उपप्रादेशिक परिवहन कार्यालय (आर.टी.ओ.) करिता भूखंड उपलब्ध करण्यात आला. परंतु सदर भूखंडाशेजारील सेवारस्ता हा अतिशय लहान असल्यामुळे तसेच समोरच वंडर्स पार्क उद्यान असल्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. आजूबाजूच्या परिसरात शाळा-कॉलेज असल्यामुळे विद्यार्थ्यांची संख्याही सदर परिसरात असंख्य प्रमाणात आहे. त्यामुळे तेथील स्थानिक जेष्ठ नागरिक तसेच महिलांनी बेलापूरच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांना सदर आर.टी.ओ. कार्यालय न होणेबाबत निवेदनाद्वारे मागणी केली. याच अनुषंगाने आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी सदर ठिकाणी दौरा केला असता सदर उपप्रादेशिक परिवहन कार्यालय झाल्यास अनेक समस्या निर्माण होऊ शकतील. वाहनांची संख्या वाढल्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढेल. तेथील स्थानिक नागरिक व महिलांचा आक्रोश ऐकताच सदर ठिकाणचे काम तत्काळ बंद करण्यात आले. तसेच वाशी येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांजबरोबर चर्चा करून सदर कार्यालयासाठी वेगळे ठिकाण देण्याचे आश्वासन आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी अधिकाऱ्यांना दिले.  

     यावेळी आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांजसह विजय घाटे, सुनील होनराव, दर्शन भारद्वाज तसेच असंख्य स्थानिक नागरिक व महिला वर्ग उपस्थित होते.

Previous Post

८० हजाराची लाच मागणार्‍या महावितरणच्या दोन लाचखोर अभियंत्याविरोधात गुन्हा दाखल

Next Post

एसएससी सराव परिक्षेत आतापर्यंत एक लाखापेक्षा जास्त विद्यार्थ्यांचा सहभाग

Next Post
एसएससी सराव परिक्षेत आतापर्यंत एक लाखापेक्षा जास्त विद्यार्थ्यांचा सहभाग

एसएससी सराव परिक्षेत आतापर्यंत एक लाखापेक्षा जास्त विद्यार्थ्यांचा सहभाग

निरोगी राष्ट्र हेच समृद्ध राष्ट्र- उपराष्ट्रपती एम.व्यंकय्या नायडू

निरोगी राष्ट्र हेच समृद्ध राष्ट्र- उपराष्ट्रपती एम.व्यंकय्या नायडू

झोपडपट्टी पुनर्विकास व पात्र झोपडपट्टी वासियांचे फोटोपास त्वरित वाटप करण्याचे आयुक्तांनी दिले आदेश

झोपडपट्टी पुनर्विकास व पात्र झोपडपट्टी वासियांचे फोटोपास त्वरित वाटप करण्याचे आयुक्तांनी दिले आदेश

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com