• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Wednesday, June 18, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Dec 22, 2017

८० हजाराची लाच मागणार्‍या महावितरणच्या दोन लाचखोर अभियंत्याविरोधात गुन्हा दाखल

adminbyadmin
in नवी मुंबई
0
८० हजाराची लाच मागणार्‍या महावितरणच्या दोन लाचखोर अभियंत्याविरोधात गुन्हा दाखल

दिपक देशमुख
नवी मुंबई ः ‘महावितरण’चे कोपरखैरणे येथील उप कार्यकारी अभियंता मधुकर कांबळे यांनी तसेच कनिष्ठ अभियंता महेश पाटील या दोघांनी महापे एमआयडीसीतील एका कंपनीच्या ऑफीससाठी नवीन लाईट मीटरसाठी लागणारा फिजीबिलीटी रिपोर्ट तसेच लाईट मीटर रिलीज करण्यासाठी तब्बल ८० हजार रुपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे ‘महावितरण’च्या या दोन अभियंत्यावर नवी मुंबई ऍन्टी करप्शन ब्युरोने गुन्हे दाखल केले आहेत. २२ डिसेंबर रोजी सायंकाळी चौकशीसाठी या दोघा अधिकार्‍यांना ताब्यात घेण्यात आले होते.
सदर प्रकरणातील तक्रारदार यांची महापे एमआयडीसीमध्ये ऍरामक्स इंडिया कंपनी असून त्यांनी या कंपनीने नवीन ऑफीस सुरु केले आहे. या कंपनीच्या ऑफीससाठी ‘महावितरण’कडून लाईट मीटरची आवश्यकता असल्याने त्यांनी ‘महावितरण’च्या कार्यालयात अर्ज केला होता. मात्र, ‘महावितरण’चे कोपरखैरणे येथील उपकार्यकारी अभियंता मधुकर कांबळे यांनी नवीन लाईट मीटरसाठी लागणारा फिजीबिलीटी रिपोर्ट तसेच लाईट मीटर रिलीज करण्यासाठी ३० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तर महापे येथील कनिष्ठ अभियंता महेश पाटील यांनी तक्रारदार यांच्याकडे साहेबराव शिवाजी देवरे यांच्या नावाने चेकद्वारे ५० हजार रुपयांची मागणी केली होती.
दरम्यान, ऍरामक्स इंडिया कंपनीच्या प्रतिनिधीने नवी मुंबई ऍन्टी करप्शन ब्युरोकडे याबाबत दाखल केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने ऍन्टी करप्शन ब्युरोच्या पथकाने त्याबाबत खातरजमा केली असता, सदर दोघां अभियंत्यांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे या दोघांवर कोपरखैरणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार २२ डिसेंबर रोजी सायंकाळी चौकशीसाठी या दोघा अधिकार्‍यांना ताब्यात घेण्यात आले होते. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक धनंजय जळक करीत आहेत.

Previous Post

मनसेचा पुन्हा अनधिकृत फेरीवाल्यांविरुद्ध एल्गार..

Next Post

नेरूळ येथील आर.टी.ओ. कार्यालयाला आमदार मंदाताई म्हात्रे यांचा विरोध

Next Post
नेरूळ येथील आर.टी.ओ. कार्यालयाला आमदार मंदाताई म्हात्रे यांचा विरोध

नेरूळ येथील आर.टी.ओ. कार्यालयाला आमदार मंदाताई म्हात्रे यांचा विरोध

एसएससी सराव परिक्षेत आतापर्यंत एक लाखापेक्षा जास्त विद्यार्थ्यांचा सहभाग

एसएससी सराव परिक्षेत आतापर्यंत एक लाखापेक्षा जास्त विद्यार्थ्यांचा सहभाग

निरोगी राष्ट्र हेच समृद्ध राष्ट्र- उपराष्ट्रपती एम.व्यंकय्या नायडू

निरोगी राष्ट्र हेच समृद्ध राष्ट्र- उपराष्ट्रपती एम.व्यंकय्या नायडू

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com