• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Wednesday, June 18, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 21, 2017

गणेशोत्सवापूर्वी खड्डे न बजविल्यास खड्ड्यांना अभियंते व कंत्राटदारांची नावे देण्याचा मनसेचा इशारा

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
गणेशोत्सवापूर्वी खड्डे न बजविल्यास खड्ड्यांना अभियंते व कंत्राटदारांची नावे देण्याचा मनसेचा इशारा

स्वयंम न्युज ब्युरो : 8082097775 / 8369924646
नवी मुंबई : गणेशोत्सवाला अवघे काही दिवस उरले असताना नवी मुंबईतील रस्ते खड्डेमय बनले आहेत. त्यामुळे गणेशभक्तांना आपल्या लाडक्या गणरायाला खड्ड्यांतून वाट काढत आणावे लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे नवी मुंबई महापालिकेने अंतर्गत रस्त्यांवरील खड्डे तात्काळ बुजवावे अन्यथा या खड्ड्यांना मनपा अभियंते व कंत्राटदारांची नावे देऊ असा इशारा नवी मुंबई मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी नवी मुंबई महानगरपालिका शहर अभियंता मोहन डगावकर यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
गणरायाच्या स्वागतासाठी घरगुती व सार्वजनिक मंडळांची जय्यत तयारी सुरु झाली आहे. मात्र मनपाच्या उदासीनतेमुळे नेरूळ, सीवूड्स, जुईनगर, सानपाडा, वाशी, घणसोली, कोपरखैरणे, ऐरोली येथील रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. त्याचा फटका बाप्पाची मूर्ती आणताना गणेश भक्तांना बसणार आहे. गॅसलाईन टाकण्यासाठी खोदलेले खड्डे बुजविण्याचे तकलादू काम केल्याने पहिल्या पावसातच तेथे पुन्हा खड्डे पडले आहेत. अनेक कंत्राटदारांनी आवश्यकतेपेक्षा कमी जाडीचा खडीचा थर रस्त्याखाली टाकल्यामुळे सगळ्या खडी रस्त्यावर आल्या आहेत. रस्त्यांच्या डांबरीकरण व दुरुस्तीसाठी वापरलेले साहित्य निकृष्ट दर्जाचे होते कि काय अशी शंका येत असल्याचा आरोप नवी मुंबई मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी निवेदनात केला आहे.
एकदा बनविलेले रस्ते काही दिवसांमध्ये कसे खड्डेमय होतात असा प्रश्‍न नवी मुंबई मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी उपस्थित केला आहे. इतकेच काय आयुक्त निवासस्थानाबाहेर व शहर अभियंत्याच्या सोसायटी बाहेरील रस्त्यालाही खड्डे पडलेले आहेत असा आरोप नवी मुंबई मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी पत्रकाद्वारे केला आहे.

Previous Post

श्रावणी सोमवारनिमित्त सीवूड्सला महारूद्राअभिषेक

Next Post

नवी मुंबई महानगरपालिका 656 पदनिर्मितीस व महानगरपालिकेच्या आकृतीबंधास शासन मान्यता

Next Post
नवी मुंबई महानगरपालिका 656 पदनिर्मितीस व महानगरपालिकेच्या आकृतीबंधास शासन मान्यता

नवी मुंबई महानगरपालिका 656 पदनिर्मितीस व महानगरपालिकेच्या आकृतीबंधास शासन मान्यता

गणपती आठवड्यावर आले तरी मूषक नियत्रंणचा जुन-जुलैचा पगार नाही..

मूषक नियत्रंकाच्या थकीत वेतनासाठी ‘भिक मागो’ आंदोलनाचा काँग्रेसचा इशारा

महापालिकेच्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज विद्यालयास राष्ट्रीय पातळीवरील स्वच्छ विद्यालय पुरस्कार जाहिर

महापालिकेच्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज विद्यालयास राष्ट्रीय पातळीवरील स्वच्छ विद्यालय पुरस्कार जाहिर

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com