• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Wednesday, June 18, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 22, 2017

महापालिकेच्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज विद्यालयास राष्ट्रीय पातळीवरील स्वच्छ विद्यालय पुरस्कार जाहिर

adminbyadmin
in नवी मुंबई
0
महापालिकेच्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज विद्यालयास राष्ट्रीय पातळीवरील स्वच्छ विद्यालय पुरस्कार जाहिर

स्वयंम न्युज ब्युरो : 8369924646 / 9619197444
नवी मुंबई : केंद्र शासनामार्फत संपूर्ण देशातून स्वच्छ भारत – स्वच्छ विदयालय या उपक्रमांतर्गत स्वच्छ विदयालय पुरस्कार सन 2016-17 साठी देशभरातून 172 शाळांची निवड करण्यात आली असून त्यामध्ये महाराष्ट्रातील 15 शाळांचा समावेश आहे. सदरचा पुरस्कार हा जिल्हा, राज्य तसेच राष्ट्रीय पातळीवर देण्यांत येतो. ठाणे जिल्ह्यातून या पुरस्कारासाठी राजर्षी ठत्रपती शाहू महाराज विद्यालय, नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्रमांक 104, आंबेडकर नगर या एकमेव शाळेची निवड करण्यात आलेली असून या पुरस्कारामुळे नवी मुंबई शिरपेचात आणखी एक राष्ट्रीय मानाचा तुरा खोवला गेलेला आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेस नुकताच स्वच्छ भारत अभियानातंर्गत देशात आठवे आणि महाराष्ट्र राज्यासह देशाच्या पश्‍चिम विभागात सर्वप्रथम क्रमांकाचा स्वच्छ शहराचा बहुमान प्राप्त झालेला असताना आंबेडकरनगर, राबाडे येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज विद्यालय नमुंमपा माध्यमिक शाळेची निवड राष्ट्र्रीय स्तरावरील स्वच्छ विदयालय पुरस्कार सन 2016-17 करिता होणे ही नवी मुंबई शहरासाठी अतिशय अभिमानास्पद बाब असल्याचे मत या शाळेच्या जडणघडणीपासून आगामी विकासाकडे विशेष लक्ष देणारे नवी मुंबईचे महापौर सुधाकर सोनवणे आणि महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी व्यक्त केले आहे. या पुरस्काराबद्दल महापौर, आयुक्त यांच्यासह महापालिका पदाधिकारी, नगरसेवक – नगरसेविका, अधिकारी वर्ग यांनी संबंधितांचे अभिनंदन केले आहे.
हा पुरस्कार 01 सप्टेंबर रोजी, सकाळी 10 वाजता, केंद्रीय मानव संसाधन व विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांचे हस्ते दिल्ली येथे एका विशेष समारंभात प्रदान करण्यात येत आहे. या पुरस्कार सोहळ्यास शाळेच्या वतीने शिक्षक मारुती गवळी व विदयार्थी सुरज झा हे उपस्थित राहणार आहेत. स्वच्छ विद्यालय पुरस्कार प्राप्त शाळांना पन्नास हजार रूपये इतके अतिरिक्त शाळा अनुदान मिळणार असून त्याचा विनियोग शाळेची स्वच्छता व मुलांच्या आरोग्य वृध्दीसाठी करण्यात येणार आहे.

Previous Post

मूषक नियत्रंकाच्या थकीत वेतनासाठी ‘भिक मागो’ आंदोलनाचा काँग्रेसचा इशारा

Next Post

मनसेच्या इशार्‍यानंतर महापालिकेला जाग

Next Post
गणेशोत्सवापूर्वी खड्डे न बजविल्यास खड्ड्यांना अभियंते व कंत्राटदारांची नावे देण्याचा मनसेचा इशारा

मनसेच्या इशार्‍यानंतर महापालिकेला जाग

लाखो शेतक-यांच्या हक्कासाठी प्रसंगी रस्त्यावरचीच नाही तर न्यायालयीन लढाई ही लढणार : सचिन सावंत

लोकायुक्तांच्या अधिकारासंदर्भातील कायदेशीर सल्ला मुख्यमंत्र्यांनी जनतेसमोर ठेवावाः सचिन सावंत

मच्छिविक्रेत्या महिलांसाठी आमदार मंदाताई म्हात्रेंचे महापौर सुधाकर सोनवणेंना साकडे

‘ईटीसी ’मधील संचालक पदाच्या मंजुरीला स्थगिती देण्याची आमदार मंदा म्हात्रेंची मागणी

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com