• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Wednesday, June 18, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 20, 2017

गणेशोत्सवापूर्वी हायमस्ट, पथदिव्याची समस्या न सुटल्यास आंदोलन करण्याचा काँग्रेसचा इशारा

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
गणेशोत्सवापूर्वी हायमस्ट, पथदिव्याची समस्या न सुटल्यास आंदोलन करण्याचा काँग्रेसचा इशारा

स्वयंम न्युज ब्युरो : 8082097775 / 8369924646

नवी मुंबई : गणेशोत्सव अवघ्या चार ते पाच दिवसावर आलेला आहे. त्याअगोदर नेरूळ सेक्टर आठ व दोनमधील राजीव गांधी उड्डाणपुलाखालील व लगतचा परिसर, सेक्टर 2 आणि 4 तसेच जुईनगर सेक्टर 24 व 25 परिसरातील हायमस्ट, पथदिव्यांच्या समस्यांचे निवारण न झाल्यास पालिका प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा लेखी निवेदनातून काँग्रेसचे रोजगार व स्वंयरोजगारचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष आणि इंटकचे नवी मुंबई अध्यक्ष रवींद्र सावंत यांनी महापालिका आयुक्तांना दिला आहे.
नेरूळ पश्‍चिमेला सेक्टर 2 आणि 8 परिसरात राजीव गांधी उड्डाणपुल आहे. गेल्या काही महिन्यापासून या उड्डाणपुलाखालील परिसरात तसेच लगतच्या परिसरात सांयकाळनंतर अंधुक प्रकाशामुळे स्थानिक रहीवाशांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. या ठिकाणी पालिका प्रशासनाकडून हायमस्ट व अन्य पथदिवे उपलब्ध केले असले तरी त्यातून पुरेसा प्रकाश येत नसल्याने तात्काळ हायमस्टमधील व पथदिव्यामधील बल्ब बदली करण्यात यावेत. आता अवघ्या 4 ते 5 दिवसावर गणेशोत्सव आलेला आहे. पुलाखालील भागात गेल्या अनेक वर्षापासून सेक्टर 2-8-10चा सार्वजनिक गणेशोत्सव साजरा होत आहे. तसेच नेरूळ पश्‍चिमेकडील सार्वजनिक तसेच घरगुती गणेशमूर्ती याच भागातून चिंचोलीच्या जुईनगर तलावात विसर्जनासाठी जात असतात. त्यामुळे या समस्येचे गांभीर्य लक्षात घेता युध्दपातळीवर या समस्येचे निवारण झालेच पाहिजे याबाबत संबंधितांना निर्देश देण्याची मागणी रवींद्र सावंत यांनी केली आहे.
नेरूळ सेक्टर 2 आणि 4 तसेच जुईनगर सेक्टर 24 व परिसरातही पथदिव्याच्या अंधुक उजेडाबाबत स्थानिक रहीवाशांकडून याच स्वरूपातील तक्रारी येत आहेत. पथदिव्यांचा पदपथावर उजेड पडत नाही तर रस्त्यावर काय उजेड पडणार. आपण स्वत: या परिसरात येवून समस्येची पाहणी केल्यास आपणास आमच्या तक्रारीमागील गांभीर्य लक्षात येईल. राजीव गांधी उड्डाणपुलाखालील परिसर, नेरूळ सेक्टर 2 आणि 4 तसेच जुईनगर सेक्टर 24 व 25 परिसरातील हायमस्ट, पधदिव्यातून येणार्‍या अंधुक प्रकाशामुळे स्थानिक रहीवाशी त्रस्त झाले आहेत. गणेशोत्सवापूर्वी या समस्येचे निवारण न झाल्यास स्थानिक रहीवाशांसमवेत काँग्रेस पक्षाच्या वतीने महापालिका मुख्यालयासमोर तसेच नेरूळ विभाग कार्यालयासमोर आंदोलन व निदर्शने केली जातील तसेच अंधुक प्रकाशामुळे संतप्त रहीवाशांचा उद्रेक झाल्यास याची सर्वस्वी जबाबदारी पालिका प्रशासनाची राहील; असा इशारा यावेळी रवींद्र सावंत यांनी दिला आहे.

Previous Post

नव्या इमारतीमध्ये ग्रामीण रुग्णालय सुरु करा

Next Post

श्रावणी सोमवारनिमित्त सीवूड्सला महारूद्राअभिषेक

Next Post
श्रावणी सोमवारनिमित्त सीवूड्सला महारूद्राअभिषेक

श्रावणी सोमवारनिमित्त सीवूड्सला महारूद्राअभिषेक

गणेशोत्सवापूर्वी खड्डे न बजविल्यास खड्ड्यांना अभियंते व कंत्राटदारांची नावे देण्याचा मनसेचा इशारा

गणेशोत्सवापूर्वी खड्डे न बजविल्यास खड्ड्यांना अभियंते व कंत्राटदारांची नावे देण्याचा मनसेचा इशारा

नवी मुंबई महानगरपालिका 656 पदनिर्मितीस व महानगरपालिकेच्या आकृतीबंधास शासन मान्यता

नवी मुंबई महानगरपालिका 656 पदनिर्मितीस व महानगरपालिकेच्या आकृतीबंधास शासन मान्यता

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com