• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jul 15, 2017

मीरा- भाईंदर महानगरपालिकेसाठी 20 ऑगस्टला मतदान -राज्य निवडणूक आयुक्त

adminbyadmin
in महाराष्ट्र
0
मीरा- भाईंदर महानगरपालिकेसाठी 20 ऑगस्टला मतदान  -राज्य निवडणूक आयुक्त

मुंबई : मीरा- भाईंदर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 20 ऑगस्ट 2017 रोजी मतदान होईल; तर 21 ऑगस्ट 2017रोजी मतमोजणी होईल. त्यासाठी आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे केली.

श्री. सहारिया यांनी सांगितले की, मीरा- भाईंदर महानगरपालिकेची मुदत 27 ऑगस्ट 2017 रोजी संपत असल्याने तत्पूर्वी निवडणूक घेणे बंधनकारक आहे. एकूण 24 प्रभागातील 95 जागांसाठी मतदान होणार आहे. नामनिर्देशनपत्रे 26 जुलै ते 2 ऑगस्ट 2017 या कालावधीत दाखल करता येतील. त्यासाठी संगणकीय प्रणाली उपलब्ध करून दिली आहे. 3 ऑगस्ट 2017 रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी होईल. नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याची अंतिम मुदत 5 ऑगस्ट 2017 पर्यंत असेल. निवडणूक रिंगणातील अंतिम उमेदवारांना 7 ऑगस्ट 2017 रोजी निवडणूक चिन्हे नेमून देण्यात येतील. 20 ऑगस्ट 2017 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. मतमोजणी 21 ऑगस्ट 2017 रोजी सकाळी 10वाजता सुरू होईल. निकाल जाहीर झाल्यावर आचारसंहिता संपुष्टात येईल.

मीरा भाईंदर एक दृष्टिक्षेप

•           एकूण लोकसंख्या- 8,09,378

•           मतदार (सुमारे)- 5,93,345

•           एकूण प्रभाग- 24

•           एकूण जागा- 95 (महिला 48)

•           सर्वसाधारण- 64 (महिला 32)

•           अनुसूचित जाती- 4 (महिला 2)

•           अनुसूचित जमाती- 1 (महिला 1)

•           नागरिकांचा मागास प्रवर्ग- 26 (महिला 13)

जि.प. आणि पं.स. च्या रिक्त पदांसाठी मतदान

अहमदनगर जिल्हा परिषदेच्या चांदेकासारे (ता. कोपरगाव) निवडणूक विभाग; तसेच पुणे जिल्ह्यातील खेड पंचायत समितीच्या पिंपरी बु. आणि अमरावती जिल्ह्यातील तिवसा पंचायत समितीच्या मोझरी निर्वाचक गणाच्या रिक्त पदासाठीदेखील 20 ऑगस्ट 2017 रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी संबंधित क्षेत्रात आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे. 31 जुलै ते 5 ऑगस्ट 2017 या कालावधीत नामनिर्देशनपत्रे स्वीकारली जातील. 20 ऑगस्ट 2017 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. 21 ऑगस्ट 2017 रोजी मतमोजणी होईल,असेही श्री. सहारिया यांनी सांगितले.

 

Previous Post

महापालिका शाळेतील इयत्ता नववीतील मुलांच्या पुस्तक वितरणाची चौकशी करण्याची युवा सेनेची मागणी

Next Post

17 ते 31 जुलै दरम्यान प्रत्यक्ष क्षयरूग्ण शोध मोहीम

Next Post
17 ते 31 जुलै दरम्यान प्रत्यक्ष क्षयरूग्ण शोध मोहीम

17 ते 31 जुलै दरम्यान प्रत्यक्ष क्षयरूग्ण शोध मोहीम

गोरक्षणाच्या नावावर माणसं मारणाऱ्यांना कठोर शिक्षा करा -केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले

मागासवर्गीय विकास महामंडळ कर्ज माफीसाठी रिपाइंचे 25 जुलै रोजी राज्यव्यापी आंदोलन

‘फिफा अंडर 17 वर्ल्ड कप इंडिया 2017’ स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर  महापालिका आयुक्तांनी घेतला पूर्वतयारीचा आढावा

‘फिफा अंडर 17 वर्ल्ड कप इंडिया 2017’ स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्तांनी घेतला पूर्वतयारीचा आढावा

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com