• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Nov 7, 2016

गांवठाणातील घरांवरील कारवाईच्या अपप्रचाराचे महापालिकेकडून खंडन

adminbyadmin
in नवी मुंबई
0
गांवठाणातील घरांवरील कारवाईच्या अपप्रचाराचे महापालिकेकडून खंडन

नवी मुंबई : महापालिका प्रशासन आणि नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्त ग्रामस्थांमध्ये दरी निर्माण व्हावी, पालिका प्रशासनाप्रती स्थानिक ग्रामस्थांमध्ये असंतोष निर्माण होवून ग्रामस्थांचा उद्रेक व्हावा की जेणेकरून पालिकेच्या कारवाईमध्ये अडथळा निर्माण व्हावा या हेतूने गेल्या आठवडाभरापासून सोशल मिडीयावर वेगवेगळी माहिती काही घटकांकडून जाणिवपूर्वक पसरवली जात आहे. याविरोधात महापालिका आता मैदानात उतरली असून नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांना खरी माहिती कळावी याकरता मनपा प्रशासनानेही मिडीया व सोशल मिडीयाचा आधार घेण्याचा निर्णय घेतला आहे.
नवी मुंबई महानगरपालिका प्रकल्पग्रस्त नागरिकांना नोटीसेस देऊन त्यांची घरे तोडणार असल्याची माहिती व बातमी सध्या सोशल मिडीयावरून फिरत असून प्रकल्पग्रस्त नागरिकांमध्ये विनाकारण गैरसमज पसरविण्यात येत आहे.  याबाबत वस्तुस्थिती सादर करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत जी अनधिकृत बांधकामे आहेत अशा बांधकामाबाबत वेळोवेळी मा.उच्च न्यायालयाने दिलेल्या निदेशानुसार व शासनाने ठरवून दिलेल्या मार्गदर्शक सूचना व तत्वानुसार निष्कासनाची कार्यवाही करण्यात येणार असल्याचे महापालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
नवी मुंबई महानगरपालिका गांवठाण / विस्तारीत गांवठाणातील घरे नियमित करण्याच्या प्रस्तावात शासनाच्या विचाराधिन असलेल्या घरांवर कोणतीही कार्यवाही सध्या करणार नाही. महापालिकेमार्फत गावठाण व विस्तारीत गावठाणातील घरांना बांधकाम परवानगी देण्यास देखील सुरुवात केलेली असून याबाबत ऑनलाईन बांधकाम परवानगी देण्याची पध्दतदेखील सुरू केलेली आहे.  त्यामुळे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, रितसर परवानगी घेऊनच घरांचे बांधकाम, दुरुस्तीची कामे करण्याची दक्षता घ्यावी. नवी मुंबई महानगरपालिका किंवा शासकीय जागेवर जी अनधिकृत बांधकामे झालेली आहेत, ज्यामध्ये रहिवास सुरू झालेला नाही व ज्यांना नोटिसेस देऊन देखील अद्याप बांधकामे थांबविलेली नाहीत अशाच अनधिकृत बांधकामावर मा.उच्च न्यायालयाच्या निदेशानुसार अतिक्रमण हटविण्याची कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घेण्यात यावी असे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
सध्या महानगरपालिका हद्दीमध्ये काही ठिकाणी बनावट कागदपत्रे सादर करुन काही विकासकांनी अनधिकृतरित्या बांधकामे सुरु केलेली आहेत,  अशा बांधकामांवर प्राधान्याने निष्कासनाची कार्यवाही करण्यात येणार  आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने गावठाणातील बांधकामे निष्कासित करण्यात येणार  आहेत अशा अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच याबाबत काही अधिक माहिती आवश्यक असल्यास नवी मुंबई महानगरपालिकेशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे.

Previous Post

भाजपा सरकारमुळे कामगार देशोधडीला लागले – छाजेड

Next Post

प्रकल्पग्रस्तांच्या युवा पिढीचा आता पावणे चार टक्क्यांसाठी सिडकोविरोधात लढा

Next Post
भुखंड घेतलेल्या बिल्डरांना दिलासा मिळणार काय?

प्रकल्पग्रस्तांच्या युवा पिढीचा आता पावणे चार टक्क्यांसाठी सिडकोविरोधात लढा

लोकशाहीची हत्या होऊ देणार नाही- जितेंद्र आव्हाड

लोकशाहीची हत्या होऊ देणार नाही- जितेंद्र आव्हाड

६ ऑगस्ट रोजी ऐरोली सेक्टर-५ मध्ये ‘वॉक विथ कमिशनर’

विथ कमिशनर अभियान राबविण्याची मागणी

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com