• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Wednesday, June 18, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Dec 22, 2015

नेरूळमध्ये अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन

adminbyadmin
in नवी मुंबई
0
नेरूळमध्ये अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन

नवी मुंबई : नेरूळ सेक्टर सहा परिसरात त्रिमूर्ती मित्र मंडळाच्या वतीने अखंड हरिनाम सप्ताहाचे व जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज गाथा पारायणाचे आयोजन करण्यात आले आहे. ह.भ.प किसनमहाराज आमले यांच्या प्रेरणेतून व गुरूवर्य ह.भ.प शाम महाराज खोडे यांच्या मार्गदर्शनाखाली गेली ५ वर्षे या अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात येत आहे.
३१ डिसेंबर ते ३ जानेवारी या कालावधीत नेरूळ सेक्टर सहामधील महापालिकेच्या तानाजी मालुसरे क्रिडांगणावर अखंड हरिनाम सप्ताहाचे व जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज गाथा पारायणाचे आयोजन करण्यात आले आहे.
या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये पहाटे ५ ते ७ काकडा, सकाळी ७ ते ८ विष्णू सहस्त्रनाम, सकाळी ९ ते १२ गाथा पारायण, सांयकाळी ४ ते ५ प्रवचन, सांयकाळी ५ ते ६ हरिपाठ, सांयकाळी ६ ते ७ संगीतभजन, रात्रौ ८ ते १० किर्तन अशा विविध धार्मिक कार्यक्रमाचा समावेश आहे.
ह.भ.प संदीपबुवा आमले, ह.भ.प उत्तममहाराज आवारे, ह.भ.प मारूतीमहाराज आमले, ह.भ.प भाऊसाहेब आमले, ह.भ.प बाळाराममहाराज पाटील, ह.भ.प मेहेरगुरूजी, ह.भ.प राजाराममहाराज चतुर, ह.भ.प दिलीपमहाराज शेलार, ह.भ.प मधुकरमहाराज कुंभार आदी मंडळी गाथा पारायण करणार असून ह.भ.प महादेव महाराज मोरे, ह.भ.प ज्ञानेश्‍वरमहाराज केदार, ह.भ.प जयराममहाराज भेरे आदींची प्रवचने होणार आहेत.
ह.भ.प विश्‍वनाथ महाराज वारिंगे, ह.भ.प विठ्ठलमहाराज साबळे, ह.भ.प शंकर महाराज शेवाळे यांची किर्तने होणार असून ह.भ.प पांडूरंग महाराज घुले यांचे काल्याचे किर्तन होणार आहे. शनिवारी २ जानेवारी रोजी सांयकाळी ५ वाजता दिंडी सोहळ्याचे आयोजन केले आहे. नवी मुंबईतील भाविकांनी मोठ्या संख्येने या अखंड हरिनाम सप्ताह व जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज गाथा पारायणात सहभागी व्हावे असे आवाहन सप्ताहाचे आयोजक व त्रिमूर्ती मित्र मंडळाचे अध्यक्ष दिलीप आमले यांनी केले आहे.

Previous Post

संजीव नाईक, ज्ञानेश्‍वर नाईक, सागर नाईक यांची सुरक्षा तातडीने परत प्रदान करण्याची राष्ट्रवादी कॉंग्रेसची मागणी

Next Post

जुईनगर ते कार्लादरम्यान पदयात्रेचे आयोजन

Next Post
जुईनगर ते कार्लादरम्यान पदयात्रेचे आयोजन

जुईनगर ते कार्लादरम्यान पदयात्रेचे आयोजन

बीएसएफच्या विमान भीषण अपघातात १० ठार

बीएसएफच्या विमान भीषण अपघातात १० ठार

सलमानला हृदयात विशेष स्थान: सनी लिओनी

सलमानला हृदयात विशेष स्थान: सनी लिओनी

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com