• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Wednesday, June 18, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Dec 7, 2015

भारताचा ऐतिहासिक मालिका विजय

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
भारताचा ऐतिहासिक मालिका विजय

नवी दिल्ली : अखेरच्या कसोटी सामन्यात आफ्रिकेवर तब्बल ३३७ धावांनी विजय मिळवत भारताने घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिका सारख्या मातब्बर संघाविरुद्ध ऐतिहासिक मालिका विजय मिळवला. नंबर वन टीम असलेल्या आफ्रिकेला भारताने चार सामन्यांच्या मालिकेत ३-० असा व्हाईटवॉश दिला. फिरकी गोलंदाजी भारताच्या विजयाच्या प्रमुख वैशिष्ट्य ठरले.
चौथ्या कसोटीतील दुसर्‍या डावात आफ्रिकेसमोर विजयासाठी ४८१ धावांचे आव्हान होते. या आव्हानाचा पाठलाग करताना पाहुण्यांचा संघ अवघ्या १४३ धावांत ढेपाळला. अश्विनच्या पंचक मार्‍यासमोर आफ्रिकेच्या फलंदाजांनी पुन्हा नांगी टाकली. अश्विनने ६१ धावांत पाच विकेट घेत मालिका विजयात मोलाचा वाटा उचलला.
भारताने यापूर्वीच चार सामन्याच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेत मालिका खिशात घातली. अखेरचा कसोटी सामना जिंकत व्हाईटवॉश टाळण्याची संधी आफ्रिकेला होती. मात्र त्यांना संधीचा फायदा उचलता आला नाही. संपूर्ण मालिकेत भारताच्या स्पिनर्सनी आफ्रिकेच्या फलंदाजांवर वर्चस्व गाजवले. आर. अश्विन आणि रविंद्र जडेजा यांच्या फिरकी मार्‍याने आफ्रिकेच्या फलंदाजांना कोणत्याच सामन्यात मोठी धावसंख्या उभारु दिली नाही.
वनडे मालिका आणि टी-२० मालिकेत वर्चस्व गाजवणारा आफ्रिका संघ कसोटी मालिकेत पुरता नापास ठरला. भारताने दिमाखदार कामगिरी करताना यहॉं के हम सिकंदर असे म्हणत घरच्या मैदानावर मालिका विजय मिळवला.
चौथ्या कसोटीत दोन्ही डावात शतके ठोकणार्‍या अजिंक्य रहाणेला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. तर आर. अश्विनने मालिकावीराचा पुरस्कार मिळवला.

Previous Post

सरकारवर संसदेत हल्लाबोल करा : उद्धव ठाकरे

Next Post

सीएसटी येथे लोकल बंफरला धडकली

Next Post
सीएसटी येथे लोकल बंफरला धडकली

सीएसटी येथे लोकल बंफरला धडकली

दररोज अडीच लाख रेल्वे प्रवासी प्रवास करतात डोंबिवली स्टेशनवरून!

दररोज अडीच लाख रेल्वे प्रवासी प्रवास करतात डोंबिवली स्टेशनवरून!

विरोधकांचा मोर्चा पोहोचला विधानभवनाच्या पायर्‍यांवर

विरोधकांचा मोर्चा पोहोचला विधानभवनाच्या पायर्‍यांवर

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com